ज्योतिष शिकायला लागल्यानंतर वयाच्या ३३ व्या वर्षी मला लक्षात आले की माझी स्वतःची मुळ नक्षत्राची शांत झालेलीच नाही. आधी अनुभवावे मग सांगावे यान्यायाने प्रथम मी माझी स्वतःची मुळ नक्षत्र आणि अमावस्या योगावर जन्माला आल्याची शांत केली. तहान लागली पाणी पिले आणि समाधान झाले इतका कार्यकारण भाव जरी या शांती नंतर दिसला नाही तरी अरोग्यात सुधारणा, स्वभावात सकारत्मक बदल, अकारण चिडणे क्मी झाले इतके स्पष्ट बदल स्वतःला जाणवले. पाठोपाठ माझ्या मुलीचे पुष्य नक्षत्रावर जन्म असल्यामुळे जननशांती कर्म खुप उशीरा म्हणजे तीच्या वयाच्या ९ वर्षी मी करवले.
दर वर्षीच्या दाते पंचांगात खालील प्रमाणे जननशांती सांगीतल्या आहेत.
तिथी - कृष्ण चतुर्दशी, अमावस्या
नक्षत्रे - अश्विनीची पहीली ४८ मिनीटे, पुष्याचा दुसरा व तिसरा चरण, आश्लेशा पुर्ण, मघा प्रथम चरण, उत्तराचा प्रथम चरण्,चित्राचा पुर्वार्ध, विशाखाचा चतुर्थ चरण, जेष्ठा पुर्ण, मुळ पुर्ण, पुर्वाषाढाचा तिसरा चरण, रेवतीची शेवटची ४८ मिनीटे.
योग - वैधृती, व्यतीपात, भद्रा ( विष्टी )
इतर - ग्रहण पर्वकाल, यमल म्हणजे जुळे, सदंत जन्म ,अधोमुख जन्म, माता -पिता-भाऊ - बहिण यांच्यापैकी एकाच्या जन्मनक्षत्रावर जन्म झालेला असताना, तीन मुली नंतर मुलगा किंवा तीन मुला नंतर मुलगी तसेच सुर्य संक्रमण पुण्यकाल, दग्ध, यमघंट, मृत्युयोग या पैकी कारण असेल तर शांती करावी.
मी याला अनुसरुन आलेल्या जातकांना मार्गदर्शन करायला सुरवात केली.
एक केस अशी आली की आमच्या एका साहेबांची मुलगी अभ्यास पुरेसा न झाल्याने बारावीला परिक्षेला ड्रॉप घेण्याचे म्हणत होती. आई वडील मुलीला समजाऊन हैराण झाले की हा निर्णय घेऊ नको. शेवटी पत्रीका पहाणे या विचारापर्यंत वडील पोहोचले आणि पत्रीका माझ्याकडे आली. या मुलीला मेडीकलाला जाण्याची तीव्र इच्छा होती. त्याकाळात फक्त बारावीच्या गुणांच्या आधारावर मेडिकल शाखेला प्रवेश मिळत होता. सी ई टी नव्हती.
पत्रीकेत शिक्षणाचे योग्य योग असताना असे का म्हणुन मी पाहिले असता या मुलीचे नक्षत्र आश्लेषा आढळले. आश्लेषा नक्षत्र राक्षस गणी असल्यामुळे आपल्या अपेक्षापुर्ती साठी तडजोड करणारे नसते.
मी जननशांतींची चौकशी केली असता ती न झाल्याचे समजल्याने शेवटी करण्याचा सल्ला तीच्या वडीलांना दिला पण हे करत असताना उत्तम पौरोहित्य जाणणारे गुरुजी सुचवुन अग्नी पृथ्वीवर असलेल्या योगावरच शांती कर्म करण्याचे दिवस शोधुन दिले. हे सर्व त्या मुलीच्या नशीबाने बारावीच्या परिक्षेच्या आधी जुळुन आले.
शांतीकर्म घडताच एक दृष्य बदल असा घडला की जी मुलगी बारावीच्या परिक्षेला बसणार नाही म्हणत होती ती स्वतःहुन परिक्षा देण्यास तयार झाली. पुढे निकाला अंती उत्तम गुण मिळाले. त्याच वर्षी मुलींसाठी मेडीकलला वेगळा कोटा सिस्टीम आल्याने तीला हवे ते कॉलेजही मिळाले. ती पुढे एम. बी. बी एस झाली हे वेगळे सांगणे नको.
यानंतर लग्न जुळत नाही म्हणुन न केलेली जननशांती दुसर्या एका मुलीला लग्नाच्या आधीच्या वयात करायला सांगीतली आणि आश्चर्यकारक रित्या त्वरीत लग्न जुळल्याचे अनुभवले.
असे अनेक अनुभव घेतल्यानंतर आज हे लिहण्याचे कारण घडले. माझ्या मते यावर आणखी संशोधन व्हावे. ह्या संशोधनाला जर लोक पुढे आले तर यातुन निष्कर्ष निघु शकेल.
माझ्या अनुभावात तरी जननशांती कर्म निष्फळ झाल्याचे दिसले नाही. यात या यज्ञ कर्माचा योग्य दिवस शोधणे आणि अग्नी भुमीवर त्या दिवशी असणे हे ज्योतिषाने शोधुन जातकाला सांगणे व त्या दिवशी उत्तम पौरोहीत्य करणार्या गुरुजींच्या हस्ते हे घडवणे आवश्यक आहे हे निक्षुन सांगावेसे वाटते.
>>>> भरल्या बासून्दीच्या
>>>> भरल्या बासून्दीच्या पातेल्यात मुतल्याप्रमाणे एखादी धार्मिक चर्चा
<<
>>>> अरे काय हे लिम्बाजी राव?
>>>>रच्याकाने हे पातेलं ललित मधुन ज्योतिषात कधी अन कुणी हलवलं?<<<<<
अहो इब्लिसराव, गोड धार्मिक चर्चेच्या गुर्हाळातील मधुर रसाचे पातेले आमच्याबरोबरच अस्ते, फक्त हल्लीहल्ली पातेल्यामागून..... .... ...... आता काय बोलावे या कर्माला?
जौद्याहो, मूळ विषयावर येऊयात
तुम्हाला काय तुमची/तुमच्या गाडीघोड्याची/तुमच्या मोबाईलवगैरेची/तुमच्या हत्यारांची (म्हन्जे स्टेथास्कोप हो), अन अजुन कशाचीही शान्तिबिन्ती करायची असेल तर सान्गा, शास्त्रानुसार यथोचित मार्गदर्शन जरुर करू! 
इब्लिस, आपण आपला प्रतिवाद
इब्लिस, आपण आपला प्रतिवाद चालू ठेवा .दुसर्यांना विपूत शिव्या देणार्यावर कोणते संस्कार त्यांच्या आई बापाने केलेले असतात व घरात हे लोक आपल्या मुलाबाळांवर कोणते संस्कार करतात हे न समजण्याइतके लोक मुर्ख नाहीत. पोकळ धमक्यांना भीक घालू नका .हे असले भेकड लोक काही करत नाहीत, फक्त कानशीलं यांची लाल होतात.दूसर्याला शिव्या देण्याउपर यांच्या शौर्याच्या धाव लांब जात नाही.
>>>> भरल्या बासून्दीच्या
>>>> भरल्या बासून्दीच्या पातेल्यात मुतल्याप्रमाणे एखादी धार्मिक चर्चा
<<
>>>> अरे काय हे लिम्बाजी राव?
>>>> रच्याकाने हे पातेलं ललित मधुन ज्योतिषात कधी अन कुणी हलवलं?
घ्याऽऽ इब्लिसराव, ललितातुन धार्मिकात कस आल विचारताहात ना? मी बोल्लो तर पटल नस्त, तर घ्याऽऽ , तो तिकडे मावळता सूर्य अन हा वरती जयद्रथ!

असो.
) मायबोलीवर तुम्हाला या विषयाबाबत काहीही कमी पडणार नाही.
हातच्या कन्कणाला तुम्हाला आरसा कशाला हवाय म्हण्तो मी?
अहो धागा काय विषयाचा, ही लोकं बोल्ताहेत काय! आहे कशाचा कशास मेळ?
धार्मिक ते ते बोलणारि माणसे ती ती अन्धश्रद्ध, अन त्यान्ना सुधरविण्याचा, ते न जमल्यास किमान त्यान्चे लिहिणे बोलणे वाचणार्यान्ना अपशकुन करण्याचा विडा उचललेले जिथेतिथे नाके खुपसतात तेव्हा वरले ललितातले पातेले, अन त्यामागुन ...... येणारे यांचीच आठवण होणार ना?
आपण विषयांतर नको करुयात!
बोला, कधी काळी पूजापाठ होमहवन इत्यादीबाबत मार्गदर्शन हवय का? गेलाबाजार देवाच्या नामस्मरणाबाबत? असल्यास सान्गा, देवदयेने (तुम्हाला हवे तर "इन्शाल्ला" असेही म्हणू शकता, मला तेही चालेल
सर्व सन्माननीय वाचक/ प्रतिसाद
सर्व सन्माननीय वाचक/ प्रतिसाद देणारे सज्जन हो !
मला माहित आहे की हा विषय इतका सहज पचनी पडणारा नाही. पडवा असा आग्रह अजिबातच नाही.
माझा शेवटुन दोन नंबरचा खालील पॅरेग्राफ ( मराठीत काय लिहायच आठवल नाही ) कुणी वाचलाच नाही की काय ? साप पाहिल्यावर जनमानसात जी मारा मारा ही प्रार्थमीक प्रतिक्रीया येते तद्वत ज्योतिष हा शब्द ऐकल्यावर आल्यासारखी दिसते.
प्रत्येकाला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य आहेच त्यामुळे त्यावर माझे काहीच म्हणणे नाही.
असे अनेक अनुभव घेतल्यानंतर आज हे लिहण्याचे कारण घडले. माझ्या मते यावर आणखी संशोधन व्हावे. ह्या संशोधनाला जर लोक पुढे आले तर यातुन निष्कर्ष निघु शकेल.
वरील वाचुन आपले वैयक्तीक अनुभव ऐकावे हा उद्देश मात्र असफल होतो आहे. जे ज्योतिष हा उपजिवीकेचा व्यवसाय करतात त्यांना वरील प्रतिक्रियांकडे लक्ष द्यावे असे कारण नाही.
पण संशोधनावाचुन एखादा विषय कालबाह्य / चुकिचा ठरवणे मात्र योग्य नाही.
मी केलेल्या प्रयोगाच्या ( जननशांती ) च्या प्रयोगाबाबत न लिहता गुरुत्वाकर्षणाचा संबंध जोडणे हे आणखी असंबध्द वाटले.
सर्वांचेच आभार ! मी चुकीचा फोरम पुन्हा निवडला. या विषयावर चर्चा ज्योतिषविषयक/ ज्यांना रुची आहे अश्या ठिकाणी न करता कुठे करावी यावर कुणी मार्गदर्शन करु शकेल काय ?
तुम्हाला काय तुमची/तुमच्या
तुम्हाला काय तुमची/तुमच्या गाडीघोड्याची/तुमच्या मोबाईलवगैरेची/तुमच्या हत्यारांची (म्हन्जे स्टेथास्कोप हो), अन अजुन कशाचीही शान्तिबिन्ती करायची असेल तर सान्गा, शास्त्रानुसार यथोचित मार्गदर्शन जरुर करू!
<<
लिंबू भाऊ,
स्टेथोची शांती कशाला करताय?
डायरेक्ट पेशंटच्या आजाराची शांती करीत जा की.
गायीने हुंगलं की क्यान्सर गायब. शेपूट डोळ्यावरून फिरवलं की एड्स गायब.
हाकानाका.
बघा बरं तुमच्या शास्त्रात काही आहे का त्याबद्दल?
असेल तर सांगा चार दोन होराभूषण नेमून टाकतो दुकानात. म्हणजे मी हरी हरी किंवा तुमच्या भाषेत हाय अल्ला हाय अल्ला करायला मोकळा
पण काय हो,
एक समजत नाही,
हे सगळे ग्रहगोलांचे परिणाम जर त्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे होतात म्हणे,
तर एकाद्या भाकड गायीच्या हुंगण्याने वा मंत्रबिंत्राने ते परिणाम बदलतात कसे काय? गुरुत्वाकर्षण बदलते, की होराभूषणाने दाखवलेली भीती?
बाकी धागा धार्मिकात कसा आला
बाकी धागा धार्मिकात कसा आला ते विचारण्याबाबत.
धागा सुरुवातीला ललित सदरात होता, तेव्हाच पहिला प्रतिसाद लिवला होता. तुमच्या धार्मिक अन ज्योतिषबितिष ग्रूप कडे मी फिरकत नाही.
वेल, >> <<गायीने डोक्याचा वास
वेल,
>> <<गायीने डोक्याचा वास घेतल्याने नक्षत्रांचा 'ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट' कसा बदलेल>> +100
माझ्या माहितीप्रमाणे ग्रहनक्षत्रांचा प्रभाव गुरुत्वाकर्षणाद्वारे पडतो असा दावा फलज्योतिषात कुठेही केला गेलेला नाहीये. ग्रहनक्षत्रांना कारकत्व नसून सूचकत्व असते असाही एक मतप्रवाह आहे.
यानिमित्ते एक सुचवू इच्छितो. गुरुत्वबलासंबंधी मानवजातीचं आधुनिक वैज्ञानिक आकलन त्रोटक आणि परस्परविरोधी आहे. तेव्हा असे दावे करतांना जरा जपून राहावे.
आ.न.,
-गा.पै.
पैलवान, यल्कम टु द
पैलवान,
यल्कम टु द धागा.
सर्वात आधी तुमास्नी नव्या वर्षाच्या शुभेच्छा, व तुम्हाला आयुरारोग्य चिंतितो. तुमची विपु चालू नसल्याने हितं लिवलं.
अनेक होराभूषण ज्योतिषाच्या शास्त्रोक्त/शास्त्रियतेची चर्चा करताना चंद्रामुळे भरती येते इत्यादी युक्तिवाद लिहितात. तुमचा 'अभ्यास' असेल, तर नक्की हाऊ डझ इट वर्क, याबदल लिहावे, मग त्याचेबद्दल पुढील चर्चा करता येईल, असे म्हणतो.
हितं ज्योतिष सोडाच, त्यातील "दोष" व "त्यांचे निवारणार्थ 'शांती'" इत्यादी प्रकर्ण आहे. जे टोटल पोटभरायासाठी कुडमुड्यांनी तयार केलेले भाकड अवडंबर आहे, हे शांती करवून घेणार्या यजमानालाही बहुतेकदा मनात ठाऊक असते. पण उगाच, 'नको विषाची परिक्षा'; 'अमक्याला अनुभव आलाय नं?' इ. प्रकारचे लॉजिक्स लावून या शांत्या करतात, केल्या जातात.
बाकी हे नितीनचंद्र्जी नुसतेच संशोधन करायला हवे असे बोलतात, व अॅनेक्डोट एव्हिडन्स म्हणुन पेश करतात. ए ना चॉलबे. यासाठी त्यांना उत्तर देत नाही / त्यांच्याशी डायरेक्ट बोलत नाही. फार फार पूर्वी त्यांच्याशी आयुर्वेदाबद्दल बोल्लोय मेलीत.
"अॅनेक्डोट एव्हिडन्स म्हणून
"अॅनेक्डोट एव्हिडन्स म्हणून पेश करणे"
>>
देवनागरी इंग्रजीबद्दल माफी.
हे अॅनेक्डोट :
anecdote
ˈanɪkdəʊt/
noun
noun: anecdote; plural noun: anecdotes
1.
a short amusing or interesting story about a real incident or person.
synonyms: story, tale, narrative, sketch; More urban myth; reminiscence
2.
an account regarded as unreliable or hearsay.
3.
the depiction of a minor narrative incident in a painting.
"the use of inversions of hierarchy, anecdote, and paradox by Magritte, Dali, and others"
अर्थात,
(अनुभवाचे) किस्से पुरावा म्हणून पेश करणे. यातला "अनुभवाचा किस्सा" = अॅनेक्डोट. वर डीक्शनरी अर्थ आहे. अर्थ क्र. ३ इथे गैरलागू. अर्थ क्र. २, महत्वाचा.
'बेभरवशाची, वा सांगोवांगीची गोष्ट' असा त्याचा मराठी अर्थ आहे.
मला नितीनचंद्र 'अॅनेक्डोट' सांगतात की अमक्यास अनुभव आला, तर मी त्यावर विश्वास कसा ठेवू?
सूचकत्व आणि गुरुत्त्वबल काय
सूचकत्व आणि गुरुत्त्वबल काय असतं जरा समजावून सांगितलत तर बरं होईल.
नितीनचंद्र, बहुतेक सर्व
नितीनचंद्र,
बहुतेक सर्व अवतारांचे जन्म अत्यन्त शुभ काळी, उच्च ग्रहस्थिती असतांना झालेले आहेत. (श्री राम, श्री कृष्ण, आणि अनेक संत.) बहुतेक पापी लोकांचे जन्मही अशुभ काळी झालेले आहेत. आपला अनुभव योग्यच आहे, पण त्याचा फायदा अनेक अर्धवट लोकहि पैसे कमविण्यासाठी घेतांना दिसतात.
पितामह भीष्मांनी अनुकूल काळ येण्यासाठी (उत्तरायण) अनेक महिने शरशय्या सहन केली हे सर्वांनाच माहित आहे. जो नियम जन्माला, तोच मृत्युलाही आहे.
ग्रहांचा परिणाम का होतो, हे कदाचित विज्ञान उद्या सांगेलाही. पण तो "होतो" असे सांगायला जसा पुरावा लागतो, तसेच तो "होत नाही" असे सांगायला सुद्धा पुरावा लागतोच.
वेल, >> सूचकत्व आणि
वेल,
>> सूचकत्व आणि गुरुत्त्वबल काय असतं जरा समजावून सांगितलत तर बरं होईल.
तुम्ही 'ग्रॅव्हिटेशनल इफेक्ट' म्हणालात तो 'ग्रॅव्हिटेशनल फोर्स' मुळे होतो. या 'ग्रॅव्हिटेशनल फोर्स' ला मराठीत गुरुत्वबल म्हणतात.
सूचकत्व म्हणजे संकेत देण्याची क्षमता. ग्रहांना सूचकत्व आहे म्हणजे ते केवळ आगाऊ घटनांची सूचना देतात. प्रत्यक्ष घटना घडवून आणत नाहीत. हे एखाद्या वाहतूक सिग्नल सारखे झाले. लाल दिवा लागला की वर्दळ थांबणार असे समजते. दिव्याचा लाल रंग प्रत्यक्षात वर्दळ थांबवत नाही. म्हणून लाल दिव्यात वर्दळ थांबण्याचे सूचकत्व आहे.
तर काही फलज्योतिषांच्या मते ग्रहनक्षत्रांत केवळ सूचकत्व असते. तर काही फलज्योतिषी त्यांना कारकत्व आहे असेही मानतात. कारकत्व म्हणजे ग्रह आणि नक्षत्रांचे कुठलेतरी ज्ञाताज्ञात बल प्रत्यक्षात कार्य करून घटना घडवते.
आ.न.,
-गा.पै.
माझ्या मते यावर आणखी संशोधन
माझ्या मते यावर आणखी संशोधन व्हावे.
या वाक्यातून असे ध्वनित होते की अद्याप संशोधन झालेच नाही. खरं तर ज्योतिष या विषयावर भरपूर संशोधन झालेले आहे. (अधिक माहितीसाठी तूर्त प्रकाश घाटपांडेकाकांचे ज्योतिषविषयक पुस्तक वाचावे, असा धागाकर्त्याला आग्रहाचा सल्ला आहे.)
खरं तर इतक्या सहज समजण्यासारख्या गोष्टींना गूढतेचे वलय देऊन, त्यात पुन्हा संशोधन वगैरेंचा आग्रह धरणे एकविसाव्या शतकात अक्षरशः हास्यास्पद आहे. "पृथ्वी गोल नसून सपाट आहे अशी माझी शंका आहे, नव्हे खात्री आहे. माझा व्यक्तिगत अनुभवही हेच सांगतो. तस्मात या विषयावर आणखी संशोधन झाले पाहिजे" अशा स्वरुपाचा हा युक्तिवाद आहे.
बरं, या विषयात रुची कोणाला आहे? यात काहीतरी अर्थ आहे असे कोणाचे म्हणणे आहे? तर यांचे. आणि संशोधन कोणी करायचे? तर दुसर्यांनी. तुम्ही करा ना संशोधन ! कोणी अडवले आहे? वैज्ञानिक दृष्टिकोनातून तुमच्या प्रमेयाची सिद्धता करा, काय टाप आहे कोणाची विरोध करण्याची?
या विषयावर फक्त अनुभवाचे बोल
या विषयावर फक्त अनुभवाचे बोल आहेत का , क काही गणिती बाजू पण आहे?
जसे की काही ठराविक नक्शत्रेच का?सगल्ळी का नाहीत.. ठरविक योग का इत्यादी. (प्रश्न अतिशय प्रांजळ्पणे विचारला गेलाय याची या विषयातील जाणकारांनी नोंद घ्यावी..)
याचा आवाका खूप मोठा आहे..पण तरिही काही महिती मिळाली तर बर होइल..
विषयांतरासाठी खुराकः
आयुर्वेदात नक्शत्राप्रमाणे व्यक्तीची प्रकृती अन त्याचे औषध असाही अभ्यास झाला आहे.
आश्लेषा , भरणीय्नक्शत्रांना
आश्लेषा , भरणीय्नक्शत्रांना झालेले शारिरीक्,मानसिक त्रास जवळुन पाहिले आहेत.
नमो नम: अरेरे या चांगल्या
नमो नम:
अरेरे या चांगल्या धाग्यावर काही नास्तिकता वादी अन कथित ढोंगी विद्न्यानवादी वृथा गोंधळ घालीत असल्याचे पाहून वाईट वाटले....
नितीनचंद्र जी, कुणीही काहीही बरळोत , आपण केलेले लिखाण त्रिवार सत्य आहे.
स्वाती_आंबोळे जी आपण उल्लेख केलेल्या पुस्तकं धर्मग्रंथ म्हणून अविश्वासार्ह अन अस्वीकारार्ह आहेत ,याचे कारण माबो करांस विदित असेलच.
त्यासंदर्भात केवळ धर्मसिंधु अन निर्णायसिंधू व दाते आदि पंचांग स्वीकारार्ह मानावित .
धन्यवाद
malaa mazhyaa mulaa sathi
malaa mazhyaa mulaa sathi shanti karayla saangitle aahe. mee baner pune parisara madhe rahte. tari ithe koni changle guruji aahet ka? koni mahiti deu shakel kay?
Pages