Submitted by हर्ट on 30 December, 2013 - 22:07
मला माझ्या वृद्ध आईला सोबत घेऊन अष्टविनायक करायचे आहेत. दोन दिवसांची बस असते ती घ्यायची की स्वतःहून केलेले जास्त बरे? कुठला ऋतु जास्त बरा पडेल. मला देवळातले कार्यक्रम फार आवडत. आईलाही.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
स्वतः हुन केलेले बरे पडेल. बस
स्वतः हुन केलेले बरे पडेल. बस वाले धावडवतात. खाणे पिणे आपल्या मर्जीने करता येते. सगळे गणपती साधरण पुण्याच्या आसपास आहेत. सध्याचा काळ उत्तम. साधारण १५ जाने नंतर करा म्हणजे थंडी कमीहोइल. फक्त लेण्याद्री कसा जमेल ते पहा. कारण खुप पायर्या आहेत.
पुण्यात मुक्काम ठोका आणि गाडी
पुण्यात मुक्काम ठोका आणि गाडी करा.
अहो आम्ही पुण्यातच आहे.
अहो आम्ही पुण्यातच आहे.
गाडी करा. ईंडिका वा स्विफ्ट.
गाडी करा. ईंडिका वा स्विफ्ट. ८/१० रु. प्रती किमी असावा आताचा रेट. मस्त पैकी स्वतःच्या मर्जीनी फिरता येईल. हवं तिथे जेवणखाण करता येईल. प्रवासाकरता शुभेच्छा!
बी, आम्ही सचिन ट्रॅवल्स तर्फे
बी, आम्ही सचिन ट्रॅवल्स तर्फे गेलो होतो. मस्त सोय झाली.
केसरी ने जावू शकता , वृद्ध व्यक्ती साठी योग्य आहे. पण दोन दिवसात प्रवास खूप होतो, जो तुम्ही पर्सनली गेलात तरी होईलच.
ट्रॅवल्स तर्फे मुंबई करांना बरे पडते.
तुम्ही पुण्यातच आहात मग स्वतःच्या गाडीने आरामात जाऊ शकता, २ दिवसांचे ३/४ दिवस करा.
बी दोन टप्प्यांमधे करता येईल
बी दोन टप्प्यांमधे करता येईल सलग करण्या पेक्षा आणि ते जास्त सोईचे पण होईल
पण आमच्याकडे कार चालवता येत
पण आमच्याकडे कार चालवता येत नाही कुणाला हा एक प्रश्न आहे. भाड्याची कार घेतली तर चालक फुकट मिळतो का? आणि तो दोन दिवस देईल का?
सामी रेट चे डिटेल्स टाक ना
सामी रेट चे डिटेल्स टाक ना प्लीज..
दिपु, सध्या तरी सचिन चा
दिपु, सध्या तरी सचिन चा पर्याय बाद आहे.
केसरी ची लिन्क
http://www.kesari.in/Speciality-Tours/Ashtavinayak-13-OA.asp
बी अष्टविनायकापैकी रान्जणगाव
बी अष्टविनायकापैकी रान्जणगाव हे नगर् रोडवर पुण्यापासुन जवळच आहे. सकाळी जाऊन दुपारी येऊ शकशील. सिद्धटेक हे पण सकाळी जाऊन सन्ध्याकाळी येण्यासारखे म्हणजे एका दिवसात होण्यासारखे आहे. त्यामुळे रान्जणगाव, सिद्धटेक हे तरी एका दिवसात होइल. बाकी ठिकाणे जरा लान्ब आहेत. आणी रान्जणगावाच्या विरुद्ध दिशेला, त्यामुळे तुला जास्त थकवणारा प्रवास टाळायचा असेल आणी सुट्टी भरपुर् असेल तर आरामात ३ ते ४ दिवसाचे प्लॅनिन्ग कर. तुला शुभेच्छा. प्रवासात पाणी, खाणे, औषधे( आईसाठी) सर्व नीट ठेव.
सिद्धटेक दौन्डजवळ आहे.
सिद्धटेक दौन्डजवळ आहे.
रश्मी धन्यवाद. कुणी
रश्मी धन्यवाद.
कुणी अष्टविनायकाची नावे लिहू शकेल का इथे? आणि ते मंदीर ज्या जिल्यात आहे/गावात आहे त्याचे पण नाव लिहा. जर पुण्यापासून किती किलोमीटर अंतरावर आहे हे माहिती असेल तर तेही लिहा.
http://en.wikipedia.org/wiki/
http://en.wikipedia.org/wiki/Ashtavinayaka
बी हे घे तुला हवे ते सापडेल.
दिपु, सध्या तरी सचिन चा
दिपु, सध्या तरी सचिन चा पर्याय बाद आहे.>>>>>>>>>>>>>>>> ???????? का बरं.
भाड्याची कार घेतली तर चालक
भाड्याची कार घेतली तर चालक फुकट मिळतो का?>>> चालकासकट गाडी हजर असते.फक्त पैसे देण्याचे काम करणे. त्यांचा दरदिवशीचा allowance(त्यातच त्यांचे जेवण इ येते),प्रति कि.मी.चा दर आधी ठरवून करणे.
काही आठवड्यांपूर्वीच सहकुटूंब
काही आठवड्यांपूर्वीच सहकुटूंब अष्टविनायक केले. बरोबर सहा व्यक्तींना (त्यात ३ ज्येष्ठ नागरीक) शेव्हर्ले एन्जॉय गाडी केली होती. सकाळी ६ला निघालो. पहीला गणपती मोरगाव त्यानंतर सिद्धटेक, थेऊर व शेवटी रांजणगांव गणपती केले. वेळ वाचावा म्हणून दुपारचे जेवण थेऊर येथील मंदीरात चालणार्या अन्नछत्रात केले (प्रसाद म्हणून नावे ठेवू नये पण अत्यंत सुमार दर्जा). रांजणगावाहून निघून थेट लेण्याद्रीला पोहोचलो. लेण्याद्रीच्या पायथ्याला लेण्याद्री गणपती संस्थानाचे हॉटेल आहे तेथे रात्री मुक्काम केला. (रेंट रू ६००/- दिवशी, दर्जा साधारण). तेथेच रात्रीचे जेवण वक्रतुंड रेस्टॉरंटमध्ये केले (१००रू राईस प्लेट, दर्जा चवीष्ट).
सकाळी ६ला लेण्याद्रीच्या पायर्या चढायला सुरूवात केली. दर्शन होऊन रमत गमत खाली येईपर्यंत ८ वाजलेले होते. तेथून ओझर केले व महडला निघालो. नाशीक हायवेला प्रचंड ट्राफीक असते व नंतर मुं-पु एक्स्प्रेस्वेला देखील. महड करून नंतर पाली केले. पुण्यात परतेपर्यंत ८ वाजलेले होते.
साधारण गाडी भाडे ८०००रू झाले (१०रू प्रती किमी). रांजणगांव ते लेण्याद्रीला नारायणगाव (की नारायणपूर?) हा मधला रस्ता आहे पण खराब आहे व रस्त्याची कामेही सुरू आहेत.
वाटेत अनेक टोल लागतात. अनेक अष्टविनायकांच्या गावात प्रवेशकर व पार्कींगचे वेगळे पैसे घेतातच. पिवळी पाटीची गाडी पाहून वाहतूक पोलीसही अडवणूक करतात (व चिरीमिरी घेतल्याशिवाय सोडत नाहीत). आम्हाला दर्शनाला गर्दी अशी फक्त रांजणगावात लागली (माझ्यामते ते रस्त्यावर असल्याने सगळ्या अष्टविनायकात सर्वात जास्त आक्सेसीबल असावे).
गाडीवाल्याचा नंबर हवा असल्यास विपूत कळवा. चालकासहीत गाडी सर्वात चांगला पर्याय. लेण्याद्रीला ज्येष्ठांना हळू चढत गेल्यास त्रास होत नाही.
मी काही वर्षांपुर्वी दुचाकीने
मी काही वर्षांपुर्वी दुचाकीने दोन दिवसात अष्टविनायक केले होते. व्यवस्थित प्लॅन केला तर चारचाकी वाहनाने दोन दिवसात सहज शक्य आहे. दोन-दोन गणपती एका रूटवर असे आहेत. त्यामुळे एकूण चार रूट्स (पुण्यापासून) होतात. बाकी कटकटी (टोल, जेवण, मुक्काम इ.) नको असतील तर यात्रा कंपनीचा पर्याय योग्य आहे. चौधरी यात्रा कंपनी विख्यात आहे या सहलीसाठी, असे ऐकले आहे. मला अनुभव नाही.
विंग्स ट्रॅव्हलला कॉल करुन
विंग्स ट्रॅव्हलला कॉल करुन विचारू शकता. ते गाडी चालकासह रिझनेबल रेट मध्ये देतात
लेण्याद्रीला डोली उपलब्ध
लेण्याद्रीला डोली उपलब्ध आहेत.
'अष्टविनायक कसे करायचे?' हे
'अष्टविनायक कसे करायचे?' हे शिर्षक वाचल्यावर लगेच म्हणावेसे वाटतेय की "ते करावे लागत नाही, तिथेच असते."
दिपु, सध्या तरी सचिन चा पर्याय बाद आहे.>>>>>>>>>>>>>>>> ???????? का बरं.>>
कारण काही महिन्यांपुर्वी सचिन जकातदार बॅंक्रप्ट होते आणि खूप लोकांचे पैसे वैगरे दिले नाहीत, माझ्या ओळखीच्या दोघांचे चेक बाऊन्स झाले. सध्या माहीत नाही, त्यांची जाहिरात पण हल्ली दिसत नाही.
सामी
सामी
बी <<<<< कुणी अष्टविनायकाची
बी
<<<<< कुणी अष्टविनायकाची नावे लिहू शकेल का इथे? आणि ते मंदीर ज्या जिल्यात आहे/गावात आहे त्याचे पण नाव लिहा. जर पुण्यापासून किती किलोमीटर अंतरावर आहे हे माहिती असेल तर तेही लिहा.>>>>>>>
स्वत:चे वाहन घेऊन गेल्यास थोडे स्वस्त नक्कीच पडेल. पण देवदर्शन टेंशन न घेता (गाडी पंक्चर, रस्ते माहित नसणे, राहण्याची सोय आदी) पाहायचे असेल तर टुरिस्ट बसच पकडा. अधिक माहितीसाठी माझ्या ब्लॉगवरील काही अष्टविनायकांची माहिती दिलेली आहे. ती पहा....
http://ferfatka.blogspot.in/p/blog-page_2458.html
बी, तुम्ही आईला घेऊन
बी, तुम्ही आईला घेऊन travellsच्या गाडीने जा,बरे पडेल पण दोन दिवसात कदाचित दगदग होईल आईला. स्वतः भाड्याची गाडी केलीत तरी हरकत नाही, दोन्ही पर्याय आहेत.
मध्ये आम्ही zylo (एसी) गाडीने नोव्हेंबरमध्ये डोंबिवली येथून अंबेजोगाई-परळी वैजनाथ केले तेव्हा आम्हाला ११.५० पर किमीचा रेट पडला गाडीचा आणि driverचे पर नाईट २०० रुपये आणि जेवण driverचे आमच्याबरोबरच. काही ठिकाणी हाच रेट आम्हाला १२ पर किमी आणि driverचे ३०० रु. नाईट असे सांगितले, तुम्ही पुण्यात दोन-तीन ठिकाणी चौकशी करा गाडी आणि driverच्या रेटची.
आमच्याबरोबर जेष्ठ नागरिक आणि लहान मुले असल्याने मी आवर्जुन सांगितले गाडीच्या मालकांना कि driverला स्मूथली चालवायला सांगा, आम्हाला driver चांगला मिळाला आणि प्रवास सुखकर झाला. तुम्हालापण अष्टविनायकसाठी शुभेच्छा.
एक शंका- आठ गणपतींचे दर्शन
एक शंका- आठ गणपतींचे दर्शन घ्यायला काही विशिष्ठ क्रम ठरवला आहे का? की आपल्या सोयीने कसेही गेले तरी चालते?
मोरगाव पासून मोरगावपर्यंत असा
मोरगाव पासून मोरगावपर्यंत असा क्रम आहे पण क्रमाने कोणी करत नाही शक्यतो आपल्या सोयीनेच जातात, travells कंपनीपण सोयीनेच प्रवास ठरवतात.
#मंगेश देशपांडे , +१०
#मंगेश देशपांडे ,
+१० .
#ferfatka ,
ब्लॉग वाचला +१० .
अष्टविनायकाचा शास्त्रोक्त
अष्टविनायकाचा शास्त्रोक्त क्रमः
मयुरेश्वर, मोरगाव
सिद्धिविनायक, सिद्धटेक
बल्लाळेश्वर, पाली
वरदविनायक, महड
चिंतामणी, थेऊर
गिरिजात्मज, लेण्याद्रि
विघ्नेश्वर, ओझर
महागणपति, रांजणगाव
पुन्हा मयुरेश्वर, मोरगाव येथे यात्रेची सांगता करावी.
या क्रमात फार उलट सुलट प्रवास होतो, म्हणून सहसा कोणी (यात्राकंपनी तरी) अश्या क्रमात यात्रा करत नाहीत.
अष्टविनायक यात्रेविषयी इथे ही
अष्टविनायक यात्रेविषयी इथे ही चर्चा झाली आहे. http://www.misalpav.com/node/26252
शास्त्रोक्त पद्धतीने केले तर
शास्त्रोक्त पद्धतीने केले तर चांगलेच आहे पण ते करताना ट्रॅव्हलचे अंतर जास्त होतेय, त्रासाचे होतेय हा विचार मनात येउन केले तर त्याला काही अर्थ नाही. पुर्ण श्रद्धेने आणि भक्तीभावाने केले तर ते देवाला जास्त प्रिय होइल म्हणुन कुठल्याही क्रमाने करा पण भक्तीने, आनंदाने करावे.
पुर्ण श्रद्धेने आणि
पुर्ण श्रद्धेने आणि भक्तीभावाने केले तर ते देवाला जास्त प्रिय होइल म्हणुन कुठल्याही क्रमाने करा पण भक्तीने, आनंदाने करावे.
>>
अगदी बरोबर!!
Pages