दिवाळी झाली की शाळांना स्नेहसंमेलनाचे वेध लागतात. त्यात चिमुकल्यांच्या आनंदाला तर उधाण येतं. शिशुवर्ग आणि बालवर्गाची तर ही पहिलीवाहिली संमेलनं. पहिल्यांदाच नेहमीपेक्षा वेगळा पोषाख, नाटकात काम, गाण्यावर नाच, फॅन्सी ड्रेस, पाठांतर, गोष्ट सांगणं, लिंबू चमचा नि बेडूक उड्या ! शाळा कोणतीही असो, कोणत्याही गावातली, कोणत्याही माध्यमाची नि बोर्डाची, गरिबीतली किंवा श्रीमंतीतली ; छोट्या वर्गांच्या स्नेहसंमेलनाची धमाल सगळेकडे सारखीच ! अशाच काही संमेलनातील निरीक्षणे.
एका शाळेच्या क्रीडास्पर्धा. बेडुक उड्या. भल्या सकाळी ७:३० वाजता आपापल्या चिमुकल्यांना मैदानावर घेऊन आलेले पालक. मुलांना समजत नाहिये की आजच माझ्या बेडूक उड्या बघण्यासाठी सगळे आईबाबा एवढे का उत्सुक आहेत. बाईंना अजून उत्साह. गणवेषातल्या मुलांना मैदानावर आखलेल्या पांढर्या रेषेवर उभं केलं जातं. मुलं निर्विकार चेहर्यानं गर्दीकडे बघतायत. काहींच्या माता 'फास्ट जा हं' च्या खुणा करतायत. काहींच्या माता तक्रारीच्या सुरात लहानग्यांचे कौतुक करतायत. " काय दिवे लावते काय माहीत ! घरात तर साधी चालतच नाही. बेडूक, घोडा, गाढव, ससा अशांच्याच उड्या चाललेल्या असतात ". हे सांगताना डोळ्यातून कौतुक ओसंडून चाललेलं. मुलं आता आपसात गप्पा मारतायत. ही 'स्पर्धा' त्यांच्या गावीही नाही. पहिली शिट्टी होते. एखादा झोपाळू ऐसपैस जांभई देतो. बाकी मुलं निवांत. बाईंच्या सूचना. 'आता शिट्टी वाजली की बेडूकउड्या मारत त्या रेषेपर्यंत जायचं हं सगळ्यांनी ! ' मुलं शिकवल्याप्रमाणे सुरात 'हो...' म्हणतात. " जो तिथे आधी पोहोचेल त्याचा नंबर पहिला " मुलं काही न समजताही सवयीनं 'हो....' भरतात. शिट्टी होते.बेडूकपोजिशन मधून पुढे जाताना एकमेकांचा धक्का लागून मुलं पडतात. काही खरोखर टुणटुणत मज्जेत पुढे जातात. पडलेल्यांपैकी काहींचे भोंगे...काहींचं खिदळणं...काहींचं काहीच न सुचून जागेवर उभं राहाणं... यातलाच एखादा 'गिफ्टेड' या सगळ्यांशी देणं घेणं नसल्यासारखा अंगठा चोखत निवांत मांडी घालून पांढर्या लाईनवर बसून राहिलेला असतो. त्याची माता तिकडे कपाळाला हात लावून ! क्रीडा शिक्षिकांनी मात्र सगळ्यांना बेडकवायचा चंग बांधलेला असतो. त्या मुलांजवळ जाऊन काहीतरी खुसपुसतात. आता रडणारे,हसणारे,निवांत असणारे डोळे बाईंचे बोलणे प्राण कानात आणून ऐकत असतात. अचानक काय होतं माहीत नाही. "सुरु" असं म्हटल्याबरोबर आतापर्यंत डिंभक असणारे आता डराव डराव करत टणाटणा उड्या मारत स्पर्धा पूर्ण करतात. माता पिता टाळ्या वाजवत सुटकेचे निश्वास सोडतात... !!!
आज बडबडगीतांची स्पर्धा असते. जास्त संख्येनं माता नि कमी संख्येनं पिता मंडळी रांगेत बसलेली असतात. ज्यांनी स्पर्धेत भाग घेतला ती मुलं पुढच्या रांगेन नि ज्यांनी भाग घेतला नाही ती पालकांच्या जवळ. भाग घेतलेल्या मुलांमध्ये अजिबात शांतता नाही. कारण ताणच नाही !
स्पर्धा सुरू होते, बाई पहिले नाव घेतात. अनिका येते. परीक्षकांकडे तोंड करून उभी राहाते. नाव सांगते गाणं सुरू.. कोणास ठाउक कसा, पण शाळेत गेला ससा.... सश्याने उडी मारल्यावर अनिकाचे लक्ष प्रत्येक स्पर्धकाला देण्यासाठी समोर ठेवलेल्या बक्षिसांकडे जाते. गाणं थांबवते. बाई जवळ येतात. प्रेमाने सांगतात, अनिका, पुढचं गाणं म्हणणार ना ? अनिका तो प्रश्न सपशेल दुर्लक्षून बाईंनाच विचारते, ' टेडीची पेन्सिल कधी देणार ? ' ! अनिकाची माता असहाय नजरेने बाई नि परीक्षकांकडे बघत कसनुसं हसते. बाई अनिकाला पेन्सिल देतात. अनिका उड्या मारत जागेवर ! मज्जेत !
आता गोष्ट सांगण्याची स्पर्धा. वातावरण तेच. वेद गोष्ट सांगायला उभा राहातो. "ससा नि कासव पळायला लागतात. सशाला भूक लागते. मग तो मेथीचा पराठा खातो. कासवाला आई म्हणते आंघोळ झाल्याशिवाय लाडू नाही म्हणजे नाही !" त्याची माता चक्कर येऊन पडायचीच बाकी. परीक्षक जे कौतुकाने ऐकतायत ती गोष्ट सांगायची ठरलेलीच नसते. सकाळपर्यंत टोपीवाला नि माकडाची गोष्ट पोपटासारखा सांगणारं आपलं कार्टं आई नि त्याच्यातले प्रेमळ संवाद गोष्टीत का घुसडतंय ते तिला कळतंच नाही.
आज फॅन्सी ड्रेस ! सगळ्या मॉडर्न आयाआणि सोबत जनाबाई, तानाजी, शिवाजी महाराज, संत तुकाराम, भाजीवाल्या, दहीवाल्या, कृष्ण, झाशीच्या राण्या आणि विठोबा रुक्मिणी, झालंच तर भारत माता, बैलजोड्या, वाघोबा, ससे, मोर........... एकच जत्रा. कुरकुरे खाणारा भटजी, दाढीमिशांमध्येच सर्दीने हैराण शिवाजी महाराज, 'मला नाही जायचं ..' म्हणत आईच्या गळ्यात पडणारा तुकाराम, भारदस्त पगडी घातलेला पण कोकिळस्वरात " मी शेंगा खाल्ल्या नाहीत..." म्हणणारा टिळक, आतून घातलेली स्लॅक्स दिसणारा वल्कलधारी राम, मोरपिसार्याचे बंद गच्च बांधल्याने तिथे खाजवणारा मोर, मधेच 'मी मोबाईल आहे..' म्हणत नाचत धुमाकुळ घालणारा 'मोबाइल'.... डोळ्यांचे पारणे फिटते अक्षरशः !!!!!
आता मुख्य दिवस. मोठ्या सभागृहात पालक आपापल्या इष्टमित्रांसह आपल्या पिल्लांचा सांस्कृतिक कार्यक्रम बघायला आलेत. स्टेजच्या मागे मुलं सोडलियेत. १० शिक्षिका मिळून सुमारे ८० पोरांना तयार करतायत. मदतीसाठी आलेले निवडक पालक भराभरा पोरींना नऊवारीत गुंडाळतायत. गालांवर 'लाली' नि ओठांवर लिपस्टिक, स्केच पेन ने गोंदण नि डोळ्यात बचकभर काजळ, बॉब केलेल्या केसांना हजारो पिना लावून बांधलेले अंबाडे, त्यातही केस पुढे येऊ नयेत म्हणून डिंकाने ते चिप्प बसवलेले.एकेक जण मोठ्या कापडात गुंडाळलेला गोंडस कोबीचा गड्डा ! कोणाचे तरी कानातले सापडत नाहीत. म्हणून सोनेरी कागद कानाच्या पाळीला चिकटव, कोणाचं गळ्यातलं पदराला शिवून टाक, कोणाला बांगड्या घालून दे...चाललंय.. एकीला पूर्ण नऊवारी नेसवल्यावर, दोर्यांनी आवळून बांधल्यावर शू येते. तिचे ऐकून बाकीच्यांनाही. कावलेल्या बाई वरात घेऊन सगळ्यांची लुगडी सोडवत एकेकीला नेऊन आणतात. पुन्हा बांधाबांध. लुगड्यांची. कागदी गजरे नि बांगड्या घालून अखेर ग्रुप तयार. नाचाला जातो नि ठसक्यात धमाल नाचतो.मधेच आपापल्या आई-आजीला हेरून त्यांच्याकडे बघत शायनिंग मारत नसलेल्या स्टेप्सही नाचल्या जातात. ज्या स्टेपला फुगड्या आहेत. तिथे जोडीदारीणच हरवते. ती कोपर्यातच ठुमकत असते. तिला ओढत आणून फुगडी उशीराने साजरी होते. तोवर बाकीच्यांची पुढची स्टेप नाचणं सुरू. पण काही फरक पडत नाही. मन लावून क्रमाने नाचणं महत्त्वाचं !
मुलांचा नाच असतो विदुषकांचा. ३० विदुषक रंगीबेरंगी कपड्यात सजलेत. नाकावर फुगे, डोक्यावर टोप्या.. एकाला अचानक आईची आठवण येते. भोंगा निघतो. "आई पाहिजे..... " एका विदुषकासोबत मग बाकीचेही विदूषक रडवेले. याचा "आई पाहिजे.." चा सूर एवढ्या गर्दीत बाहेर बसलेल्या माऊलीला ऐकू जातो. ती लगबगीने विंगेत येते. तिला पाहिलं की बाळाला अजून मोठ्ठ्याने रडू येतं. बाकीचे रडण्याच्या काठावर. बाई महा अनुभवी असतात. आलेल्या मातेला बाहेर पाठवतात. आणि ठेवणीतल्या आवाजात , " सगळे विदूषक जर आता हसले नाहीत तर एकेकाला फटके देईन" असे सुनावतात. मुख्य रड्या विदूषक गप्प. बाकी गप्प. तेवढ्यात गाण्याचा नंबर. विंगेतून स्टेजवर जाताना एकेकाच्या चेहर्यावर हसू. गाणं सुरू होतं. रंगीत तालीम दोन वेळा झाली असूनही ३० पैकी १०-१२ विदूषकच नाचत असतात. बाकीचे पाय हलवत समोर प्रेक्षकांमध्ये आई बाबांना शोधत असतात. विशेष म्हणजे ते एकमेकांना सापडतात. मग गाण्याला उधाण येतं नि उरलेला नाच झोकात होतो !
नंतरची भाषणं, सत्कार, बक्षिसं यात कोणालाच रस नसतो. आई बाप आपल्या चिमुकल्यांनी पहिल्यांदा स्टेजवर परफॉर्म केल्याच्या कौतुकात नि मुलं एवढ्या गर्दीत सापडले बाबा आईबाबा ! या विचारात बडबडत सुटलेले !!!
अशा रितीने हे पहिलेवहिले स्नेहसंमेलन पार पडते.
तुम्हाला आठवतायत अशा गमतीजमती ? सांगा तर मग...
(No subject)
इंद्रधनुष्य, किती नेमके फोटो
इंद्रधनुष्य, किती नेमके फोटो !!!! मस्तच !
इंद्रा अरे तो पडला का रे
इंद्रा
अरे तो पडला का रे अडखळून पुर्ण?
:हहपुवा:
:हहपुवा:
इंद्रधनुष्य.. नेमके फोटो
इंद्रधनुष्य.. नेमके फोटो![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
भारिये सगळे.. लेकिच्या शाळेत
भारिये सगळे..![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
लेकिच्या शाळेत English skit "Who is the mightiest one" होते. लेक साधू झालेली. उंदराला सुंदर मुलीत बदलताना , आधिच उंदिर मागे पळू लागला, तेव्हा आमच्या साधूने त्याला पकडून, कन्नड्मधे दम देवून समोर आणले आणी मग मंत्र म्ह्णुन सोड्ले.
तेव्हा आमच्या साधूने त्याला
तेव्हा आमच्या साधूने त्याला पकडून, कन्नड्मधे दम देवून समोर आणले आणी मग मंत्र म्ह्णुन सोड्ले.
>> आवरा !!!![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
उंदरला पकडून समोर आणून
उंदरला पकडून समोर आणून इंग्रजी नाटकात कन्नडमध्ये दम दिला![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
आहे अगदी . मजा येतेय वाचायला.
इन्द्राच्या पडोसनवाल्या
इन्द्राच्या पडोसनवाल्या फोटोमधले त्या मुलीचे एक्स्प्रेशन कसले भारी आहेत.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
अख्खा धागा हहपुवा आहे.
मितान छान धागा सुरू
मितान छान धागा सुरू केल्याबद्द्ल तुमचे धन्यवाद.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मजा येत आहे वाचायला.
इंन्द्रधनुष्य, अचूक फोटो टिपले आहेत.
फोटोज, किस्से... धम्माल आहे
फोटोज, किस्से... धम्माल आहे नुस्ती... फोटोजचं टायमिंग तर _/\_
(No subject)
गेले तीन दिवस वाचतेय आणि
गेले तीन दिवस वाचतेय आणि अशक्य हसतेय![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
इंग्रजी नाटकात कन्नडमध्ये दम
इंग्रजी नाटकात कन्नडमध्ये दम दिला![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
कन्नडमध्ये दम ! अय्यो.....
कन्नडमध्ये दम ! अय्यो.....![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
अरे तो धोतर सुटलेला बाहेर
अरे तो धोतर सुटलेला बाहेर पळायला पहातोय का व दुसरा त्याला रोखायला? आणि ती मुलगी कपाळाला हात लावुन उभी आहे ते पाहुन.
अकबर कॉपी, कन्नडदम, पायपटका पण मस्त ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
काय मस्त किस्से आहेत एक
काय मस्त किस्से आहेत एक एक.......
ळॉळ
ळॉळ
कसल भारी लिहल आहे.हापिसात हसत
कसल भारी लिहल आहे.हापिसात हसत सुटलीये वेड्यासारखी.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
ते फोटो आनि सगळे प्रतिसाद
ते फोटो आनि सगळे प्रतिसाद![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
माझ्या मुलीचा पहिलाच वार्षिक
माझ्या मुलीचा पहिलाच वार्षिक सेन्ह्समेलन-JR KG प्रबोधनला होता. सोबत छोटी (वय वर्षे १) दीदी स्टेजवर नाचतेय हे पाहून तिलाही स्फुरण चढले आणि हातातून सुटून सरळ स्टेज च्या दिशेने आगेकूच सुरु झाली मग काय तिला पकडण्यासाठी मलाही तिच्या मागे धावावे लागले पण ती काही हाती लागेना आणि भर स्टेज वर दिदिबरोबर आमचीही पकडापकडी सुरु झाली
वेळीच आवरली ..........पण हि बाय काही थांबेना रडून गोंधळ घालायला लागली आणि मग हिला घेवून मला बाहेर यावे लागले इथेही तोच गोंधळ शेवटी खाली उतरवले तर तिने जी पळायला सुरुवात केली ती प्रबोधनला पूर्ण प्रदक्षिणा घालूनच थांबली. दिदीचा डान्स काही मला पाहता आला नाही.
बाई महा अनुभवी असतात. आलेल्या
बाई महा अनुभवी असतात. आलेल्या मातेला बाहेर पाठवतात. आणि ठेवणीतल्या आवाजात , " सगळे विदूषक जर आता हसले नाहीत तर एकेकाला फटके देईन" असे सुनावतात. मुख्य रड्या विदूषक गप्प. बाकी गप्प. >>>>>>:):):):):):):):):):):):)
"चला बाई केर वारे आवरते". आणि बघते तर केरसुणीच नाही. मी इकडे तिकडे बघायला लागल्यावर विंगेतून उडती केरसुणी आली आणि माझ्या पायाजवळ पडली. मी शांतपणे ती उचलली आणि केर काढला :):):):):):):):):):):)
हा हा हा...मज्जाच
हा हा हा...मज्जाच मज्जा....
लेकीने ती चिमुरडी असताना, लई भारी धमाल केली होती.
भरजरी गं पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण हे गाणे म्हटले होते
गाण्याच्या शेवटी... दौपदी आपल्या भावाला चिंधी देते ती ओळ अगदी क्लायमॅक्स म्हणा ना..
त्रैलोक्यमोलाचे वसन दिले फाडून अशी ती ओळ...
तर....बाकी गाणे मस्त म्हटले, अगदी डोळ्यात पाणी वगैरे आले सगळ्यांच्या...
पण एक शब्द चुकवला शेवटाच्या ओळीतला आणि पब्लीकला हसावे का रडावे का अंतर्धान पावावे हेही सुचेना...
त्रैलोक्यमोलाचे वसन दिले काढून![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कहर धमाल धागा आहे
कहर धमाल धागा आहे![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
शाळेतली आठवण झाली . सगळ्या
शाळेतली आठवण झाली . सगळ्या शाळांमध्ये तेच वातावरण .खूप धमाल आली वाचताना . त्या त्या ठिकाणी मला मीच दिसत होते. स्नेहसंमेलन , वार्षिक क्रीडा स्पर्धा सेम टु सेम वातावरण . काही फरक नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
<<स्टेजच्या मागे मुलं सोडलियेत. १० शिक्षिका मिळून सुमारे ८० पोरांना तयार करतायत. मदतीसाठी आलेले निवडक पालक भराभरा पोरींना नऊवारीत गुंडाळतायत. गालांवर 'लाली' नि ओठांवर लिपस्टिक, स्केच पेन ने गोंदण नि डोळ्यात बचकभर काजळ, बॉब केलेल्या केसांना हजारो पिना लावून बांधलेले अंबाडे, त्यातही केस पुढे येऊ नयेत म्हणून डिंकाने ते चिप्प बसवलेले.एकेक जण मोठ्या कापडात गुंडाळलेला गोंडस कोबीचा गड्डा !------->> +११११११११
१) मला राम केल होत पहिलीत. आयत्या वेळी" मी नाही जाणार स्टेज वर " म्हणून सागितलं . सीता आणि
लक्क्षुमणाच्या माता हैराण . आपल्या मुलीना स्टेज वर जायला मिळतंय कि नाही या काळजीने
शबरी पाठच्या पाठी स्टेज च्या खाली पडली . बोलता बोलता गायब. परत टुणकन स्टेज वर चढून आली पण तो पर्यत आम्ही घाबर्या घुबऱ्या . सगळ सगळ आठवल
२) पाचवीत असताना मला म्हातारी केल होत . डावा हात पाठीमागे कमरेवरती आणि उजव्या हातात काठी आणि खोकत खोकत एन्ट्री. ( म्हातारी म्हणजे खोकण मस्ट )
नाटकातली माझी नातवंड माझ्या पेक्षा उंच .त्यांच्या डोक्यावरून हात फिरवताना त्यांना खाली वाकाव लागत होत. बर डोक्यावरून हात फिरवायचा तर हातातली काठी ठेवायची कुठे? हि पंचाईत. डावा हात तर कायमचा पाठी बांधलेला. मग नातवंडांच्या हातात काठी देऊन ती डोक खाली वाकवणार आणि मी डोक्यावरून हात फिरवणार
परत ती शिस्तीत काठी माझ्या हातात देणार ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
बर म्हातारीच्या वेशात लिपस्टिक हि कमी लावली होती त्याच ही खर तर वाईट वाटत होत.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कारण स्टेज वर डार्क लिपस्टिक मस्ट. म्हातारी असली म्हणून काय झाल
सुजा...
सुजा...![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
नितीनचंद्र, केअश्वे ,अकु
नितीनचंद्र, केअश्वे ,अकु![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सगळेच प्रतिसाद : फोटो पण जबरीच
उंदरला पकडून समोर आणून इंग्रजी नाटकात कन्नडमध्ये दम दिला
मस्त आहे हा धागा.
मस्त आहे हा धागा.
धमाल आहे
धमाल आहे
Pages