Br Ba

Submitted by तृप्ती आवटी on 5 December, 2013 - 10:46

If you aren't watching "Breaking Bad" at the moment, you need to reconsider your life choices!

Braking-Bad--620x400.jpg

"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्‍या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!

ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch

ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm

ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad

http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki

साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music

गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/

http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0

ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.

brba.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी दुसर्‍या सीझन च्या शेवटी शेवटी आहे आता. आतापर्यत जेसीला १० पैकी १० मार्क. काही सहानुभूती वाटण्याजोगे न करून पण त्याच्याबद्द्ल फार वाईट् वाटत राहतं. बेघर करण्यात आल्यावर तर अगदी पोटात तुटलं माझ्या .. वय झाल्याचं लक्षण असावं Wink

हो, त्याचे आईवडील त्याला जी काही परकी वागणूक देतात ती अगदीच खटकली मला. ते बेघर करण्याचं बघूनही 'असं वागू शकतात?' असा प्रश्न पडला.

+१.

त्या कॅरेक्टरला लहान मुलांबद्दल विशेष सहानुभूती असल्याचं दाखवलं आहे ते त्याच्या बॅकग्राउंडमुळे असावं.

मला अधून मधून बोर व्हायला लागलं आहे. काही गोष्टी टिपिकल तर काही प्रेडिक्टेबल झाल्यात. ते लार्ज साइझ स्टिकर अगदी टिपिकल वाटलं.

वॉल्टचे चौथ्या सीझनमधले वागणे, धाडस सगळंच स्टुपिड वाटलं. तो अगदीच घाई करतो आहे. स्कायलर अनॉइंग झाली अगदी.

चौथ्या सीझनचे तीन एपिसोड झाले Happy

आता मीच मागे पडले आहे वाटतं. मधेमधे अगदीच बघणं झालं नाही. अधलंमधलं काहीकाही विसरलेही आहे बहुधा - तुम्ही म्हणता ते सगळे रेफरन्सेस लागत नाहीयेत पटापट.

सेम हियर. मधे मधे बोअर झालं तेव्हा काही एपिसोड्स पूर्ण बघितले नाहीत त्यामुळे क्वचित संदर्भ लागत नाहीत पण आता दुसरीकडे गुंतल्यामुळे हे पुन्हा बघणं शक्य वाटत नाहीये.

बरेच भाग एकदम बघून थकायला होतं खरं मी पण अधे मधे फॉरवर्ड करते. सिंडे तू तर १० एक भाग पाहिलेले दिसतायत पटापट! फटीग आला असेल Happy
मी आता एका वेळी २-३ फार तर ४ बघून पुन्हा नेक्स्ट वीकेन्ड पर्यन्त बघायचे नाही असे करतेय.
बायदवे, सॉल अगदी पाहिल्या एन्ट्रीपासून, अगदी पहिल्याच डायलॉग ला स्कोर करतो! मला एकूण बॅजर च्या अरेस्टचा भागच लय आवडला. त्यात सॉल आल्या आल्या त्या "बेबीफेस" कॉप ला "गो गेट अ ज्यूस बॉक्स, वॉच सम टिव्ही , गेट अ नॅप" वगैरे म्हणतो ते फार भारी! Lol

मी पण बरेच भाग पाइले परवा. मला स्कायलरचा अजूनही राग आलेला नाही अजिबातच. जेसी हा अतिच अनॉयिंग होतो आहे मला. झीरो सहानुभूती मला त्या कॅरॅक्टरबद्दल आणि वॉल्ट बद्दल तर मला काहीच वाटत नाही Uhoh
मी खूप फॉर्वर्ड करत बघते.
रच्याकने, लेकीबरोबर परवा परत शेरलॉकचे पहिले २ एपिसोड पाहिले आणी वाटलं की तो अस्ता तर त्याने ब्रे. बॅ. केस लगेच्च निकालात काढली असती.

मी २-२ एकावेळ बघते वीक एंडला. एरवी रोज एक. क्वचित ३ बघितलेत. एकदम बघितले की अती होतं हे खरं आहे.

शूम्पी, वॉल्टबद्दल तुला काहीच वाटत नसेल तर I think you didn't get it. पुन्हा पहिल्यापासून बघ किंवा बघायची थांब Happy

>> तो अस्ता तर त्याने ब्रे. बॅ. केस लगेच्च निकालात काढली असती.
शूम्पे, लिहून टाक एक फॅनफिक्शन. Happy

>> जेसी हा अतिच अनॉयिंग होतो आहे मला. झीरो सहानुभूती मला त्या कॅरॅक्टरबद्दल आणि वॉल्ट बद्दल तर मला काहीच वाटत नाही >> Uhoh

पुन्हा पहिल्यापासून बघ किंवा बघायची थांब>> हे म्हणजे त्या सिनेमा आवडेपरयंत परत परत बघा सल्ल्यासारखच झालं की.

जेसी ड्रग अ‍ॅडिक्ट आहे आणि हे डिझर्व्हज व्हॉट ही गेट्स. होप वॉल्ट विल गेट व्हॉट ही डिझर्व्हज.

लिहून टाक एक फॅनफिक्शन>>मेरी इतनी पहुच कहा...तूच लिही की.

अ‍ॅक्च्युअली जेनला पाहिलं की जेसीच्या आईवडिलांची सायकॉलॉजी कळते. आपल्याला त्यांची हिस्टरी दाखवली नाहीये इतकंच. जेसीची त्या लहानपणी बनवलेल्या वुडन बॉक्सची स्टोरी आली का तुमच्या बघण्यात? तेव्हापासून जर त्याला व्यसन लागलं असेल तर ते हॅन्डल करणं सोपं नसणार. दोन्ही बाजू कितीही बेस्ट ऑफ इन्टेन्शन्स बाळगून असल्या तरी ते व्यसन त्याचा पार चोळामोळा करू शकतं.

अर्थात तरीही जेसी अनॉयिंग होत नाही मला, पण त्याचे आईबापही होत नाहीत. त्यांचीही दयाच येते.

अजिबात नाही. तुला सिरियल आवडली नाही असं कुठे तू म्हणते आहेस?

मी बघितली ती वुडन बॉक्सची स्टोरी. तो व्यमु केंद्रात उचापती करायला लागतो तेव्हा मला चीड आलेली त्याची. और कितना गिरोगे असं झालेलं.

कदाचित तू स्वतःला जास्त फोर्स करते आहेस बघायला.
>> हे अगदीच पॉसिबल आहे. खरच पियरप्रेशरपायी बघायला सुर्वात केली आणी फक्त आता अतळ शेवटाकडे कसा प्रवास होणार इतपतच उत्सुकता. हातात घेतलेलं पुस्तक कसं कतीही रटाळ असलं तरी पानं गाळत उड्या मारत संपवतो तसच काहिसं. Proud

>> व्यमु केंद्रात उचापती करायला लागतो तेव्हा मला चीड आलेली त्याची. और कितना गिरोगे असं झालेलं.
अगदी प्रिसाइजली तसाच त्याच्या पेरेन्ट्सचाही एक टिपिंग पॉइंट आलाच असणार. आय डोन्ट ब्लेम देम, स्पेशली इफ दे हॅव अ यन्गर चाइल्ड टु प्रोटेक्ट फ्रॉम धिस इन्फ्लुअन्स. तेही होत नाही हे तर आणखी दुर्दैव. अ‍ॅडिंग इन्सल्ट टू द इन्ज्युरी!

वुडन बॉक्सचं नीट आठवत नाहीये आत्ता.
जेसीचं कॅरेक्टर आवडत नाही हे मला पचवायला जड जातंय. त्याच्याबद्दल सहानुभूती वाटावी की नाही हा मुद्दा वेगळाच आहे. मला वाटली तो अती जंकी दाखवलेला असूनही.

शूम्पी>> पात्रांबद्दल मत बनवण्याच्या भानगडीत न पडता फक्त नाट्यं बघ. ईथली मतं वाचून त्याच दृष्टीकोनातून पात्रांना बघितलं तर चुकीच्या नंबरच्या चष्म्यातून जग बघण्यासारखं होईल. आधी नाट्य बघितले की मग तुझे स्वत:चे अ‍ॅनालिसिस करणं सोपं जाईल, जे करायलाच पाहिजे असेही काही नाही.

जेसी,वॉल्ट आवडायलाच पाहिजे असे काही नाही. नुसता थरार आणि नाट्य जरी क्षणिक आनंद देऊन गेले तरी खूप आहे, वेळ वाया गेला असे तरी वाटणार नाही.

माझं राहीलं बघायचे. आम्ही नेटफ्लिक्स बंद करायचे ठरवलं होतं, ते झालं! Sad
बहुतेक परत घेईन आता. नेटफ्लिक्सशिवाय काही राम( आणि वॉल्ट, जेसी) नाही..

चमन, कुठलंही पात्र आवडायलाच किंवा नावडायलाच पाहिजे असं अजिबात नाही. पण या ड्राम्यातली जी दोन मुख्य पात्र आहेत त्यांच्याविषयी काहीच न वाटणं थोडं विचित्र वाटलं मला. मुळात सगळी गोष्ट वॉल्ट आणि जेसीची आहे. इतर पात्र त्यांच्या सोबतीने फरफटली जातात, त्यांच्या गोष्टी पण येतात. तरी ब्रेकिंग बॅड हे टायटल दिलंय ते वॉल्टच्या आणि थोडं फार जेसीच्या अधोगतीला अनुसरूनच. तसं नसतं तर 'कहानी एक घर की' किंवा 'अ डेस्परेट हाउसवाइफ' सुद्धा चाललं असतं. स्कायलरचं देवनागरीतलं वागणं तसंच आहे नाही तरी.

असो, जेसी ज्या गावात सापडतो तो त्या गावातच सापडणार ही आणखी एक प्रेडिक्टेबल गोष्ट. मला वाटलेलं तो सॉलच्या ऑफिसमागे एखादी सिक्रेट रूम असेल तिथे लपलेला असणार. तो एक अंदाज चुकला.

मला गस च्या वागणूकीचा काही पत्ता लागत नाहीये. म्हणजे प्रथम तो ए कदम secretive, अजिबात स्वतःला expose होऊ न देता cautious दाखव लाय. नी आता सीझन ३ मध्ये त्या २ रोड जंकीज ना जेसीला भेटायला काय बोलव तो, to make the peace वगैरे म्हणत ... त्या जंकीज ना मारलं म्हणून त्याला वॉल्टरला मारायचय? काही कळंलं नाही... त्याला का मारायचय?

सीझन ४ : पहिला एपिसोड मधलं पण त्याचं कळलं नाही..

*****Spoiler******

त्या स्वतःच्या माण साला गेलच्या इथे लोकांनी बघितलं म्हणून मारल? मग त्या रोड जंकीज ना स्वतः भेटतो?
त्यांना तर पोलिस कधीही पकडू शकतात. and they can easily give Gus away. कुछ हजम नही हुआ.

ते त्याचे ट्रस्टेड एम्प्लॉयीज आहे असं सांगतो ना तो. त्यांना मारलं म्हणून त्याचा या दोघांवर खास करून जेसीवर राग आहे. विश्वासघात झाल्यासारखं पण वाटत असेल.

मला तो वॉल्टला घरी जेवायला बोलावतो ते असंच स्ट्रेंज वाटलेलं. इतक्या लगेच घराचा पत्ता देतो त्याला. कदाचित ते त्याचं घर नसेलच, अशाच एखाद्या ट्रस्टेड एम्प्लॉयीचं घर असेल Wink

गस चांगला मॅनेजर आहे. त्याच्या हाताखालच्या माणसांच्या नाड्या बर्‍यापैकी अचूक ओळखतो. ही विल सी की त्या त्या व्यक्तीला त्याच्या अ‍ॅबिलिटी आणि इन्क्लिनेशनप्रमाणे काम आणि कॉम्पेन्सेशन मिळेल, आणि अ‍ॅट द सेम टाइम कोणी स्वतःपेक्षा वरचढ होऊ नये याचीही दक्षता घेतो.
वॉल्टबद्दल त्याला आदर खरा, पण गिवन हिज इन्टेलिजन्स आणि हिस्टरी तो आपल्या डोक्यावर बसेल याची त्याला जवळपास खात्री आहे.वॉल्ट किंवा कोणीही इन्डिस्पेन्सिबल होता कामा नये असा कटाक्ष आहे. गेलला तेवढ्यासाठी वॉल्टचा मदतनीस केला आहे. गेलने त्याची 'मेथ'ड शिकून घेतली की वॉल्टचा उपयोग संपला. आणि प्रिसाइजली याच कारणासाठी वॉल्टला गेल नकोसा होतो.

Pages