Submitted by बागेश्री on 25 December, 2013 - 11:13
डोळ्याच्या शिंपल्यात, स्वप्नाची रेघ
रात्रभर घरावर, रेंगाळता मेघ..
कधीतरी अनावर झाल्यावर
रिता रिता झालेला,
गळक्या छपरावरून पाऊस
थेट घरात आलेला..
एक थेंब त्याचा मग
शुभ्र शुभ्र शिंपल्यात,
मोती फुलला स्वप्नांचा
गच्च मिटल्या डोळ्यात..
किती उतला मातला
नभ भावभोर झाला
त्याने जाग आली तुला
अन मोती निखळला
किती शोधशील त्याला
गेला वाहून जो गेला
त्याची साथ तेवढीशी
हेच सांग तू मनाला
घाल काजळ नव्याने
तुझ्या डबीतले ओले,
ओढ रेघ तू स्वप्नांची
कर शिंपले तजेले..
-बागेश्री
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बागेश्री , खूपच छान. प्रचंड
बागेश्री , खूपच छान.
प्रचंड आवडली कविता.
छान...... भाव सहजतेने प्रकट
छान...... भाव सहजतेने प्रकट झालेत.
"किती शोधशील त्याला
गेला वाहून जो गेला
त्याची साथ तेवढीशी
हेच सांग तू मनाला"
हे कडवं सर्वात छान
कविता आवडली.
कविता आवडली.
छानच
छानच
क्या बात है .... अप्रतिम
क्या बात है .... अप्रतिम अभिव्यक्ति ....
खूपच आवडलीये....
छान कविता.
छान कविता.
वाह ! वाह !
वाह !
वाह !
सुंदर... डोळ्याच्या
सुंदर...
डोळ्याच्या शिंपल्यात, स्वप्नाची रेघ
रात्रभर घरावर, रेंगाळता मेघ..
कधीतरी अनावर झाल्यावर
रिता रिता झालेला,
गळक्या छपरावरून पाऊस
थेट घरात आलेला.. ......हे मस्त
किती उतला मातला
नभ भावभोर झाला
त्याने जाग आली तुला
अन मोती निखळला
"नभ" ऐवजी "मेघ" हवंय का ?
गुणी कविता!
गुणी कविता!
किती गं सुंदर! अनेक ओळी
किती गं सुंदर!
अनेक ओळी आवडल्यात
लिहित रहा गं!!!!
आवडली ग!
आवडली ग!
कविता आवडली
कविता आवडली
किती शोधशील त्याला गेला वाहून
किती शोधशील त्याला
गेला वाहून जो गेला
त्याची साथ तेवढीशी
हेच सांग तू मनाला
घाल काजळ नव्याने
तुझ्या डबीतले ओले,
ओढ रेघ तू स्वप्नांची
कर शिंपले तजेले..
वा गं !!
कविता आवडली
कविता आवडली
आशय छान आहे कवितेचा.
आशय छान आहे कवितेचा. आवडली.
फक्त लई जड जड शब्द हैत
दक्षे, उलट साधेच शब्द आहेत,
दक्षे, उलट साधेच शब्द आहेत, नेहमीच्या वापरातले, तेरेकु कै हुआ?
"नभ" ऐवजी "मेघ" हवंय का ?
>> नाही अज्ञातजी.
प्रतिसाद देणार्यांचे आभार..
चित्रदर्शी कविता, कल्पनाही
चित्रदर्शी कविता, कल्पनाही आवडली.
"नभ" ऐवजी "मेघ" हवंय का ?
>> नाही अज्ञातजी.>>>
इथे बोलावेसे वाटत आहे, न आवडल्यास क्षमस्व!
'नभ'च म्हणायचे असेल तर 'झाला' हे क्रियापद चालणार नाही, ते नभ/आभाळ असते नाही का?
येस विदिपा, you are perfectly
येस विदिपा, you are perfectly right!
घन भावभोर रूचेल मला.
थँक्स!