१.
विसरण्याचा प्रयत्न मी किती वेळा केला
तो हिशोब विसरलो..
पण तुला नाही विसरू शकलो
रडण्याचा प्रयत्नही मी किती वेळा केला
वाटलं रडून शांत होईन..
पण रडूच नाही शकलो
मी पुरुष आहे ना..
डोळ्यातल्या विहिरी आटलेल्या असतात
मी मोठा झालोय ना..
आता भावनांना प्रौढत्वाच्या सीमा असतात
कुणास ठाऊक कुणी आखल्या..?
आणि का आखल्या..??
पण कैद होतात माझ्यासारखे..
बोलताही येत नाही..
रडताही येत नाही..
बस.. कुढत बसायचं...
आतल्या आत,
कुणाला ऐकू न येऊ देता
रडत राहायचं
डोळे न भिजवता..
आणि सारं काही विसरण्याचा
केविलवाणा प्रयत्न करायचा
उधारीचं हसू आणून...
....रसप....
१५ मार्च २०११
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
२.
मग इच्छा नसतानाही
मुखवटा चढवावा लागतो
झापडं बांधावी लागतात
आणि जन्म घेतो
एक बेमुर्वतखोर स्वभाव
काही केल्या ऐकणार नाही..
ऐकायचंच नाही..!
कुणाचंही.. अगदी स्वत:चंही!
अडूनच बसायचं उदासीन बनण्यासाठी!
काही आवडलं तर हसायचं नाही..
काही नावडलं तर चिडायचं नाही..
कुणी बोलावलं तर ऐकायचं नाही..
कुणी हटकलं तर बधायचंही नाही
कृत्रिम चाल..
त्रोटक संवाद..
शून्य नजर..
आणि खरा चेहरा..?
तो लपवायचा..
उधारीचं हसू आणून….
....रसप....
१६ मार्च २०११
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
३.
तू ओरबाडलं नाहीस..
तरी ओरखडा उठला
मी अश्रू ढाळले नाहीत
पण हुंदका फुटला
काट्या-काट्यामध्ये फरक आहे
गुलाब आणि बाभळीचा
दु:खा-दु:खामध्ये फरक आहे
आवडीचा-नावडीचा
माझं दु:ख मी जपतो
प्रेम केलंय म्हणून
प्रेमाच्याच बदल्यात मिळालंय…
“अमूल्य ठेव” म्हणून!
आपणच आपले खरे सोबती
मला चुकलंय कळून
हीच जाणीव लपवत असतो…
उधारीचं हसू आणून
....रसप....
१६ मार्च २०११
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
४.
हातावरच्या रेषांना काही अदृश्य वळणं असतात
किंवा ती फक्त मायक्रोस्कोपनेच दिसतात
कारण कसं शक्य आहे..
आयुष्य इतकं सरळसोट किंवा एकवळणी असणं?
वर्षानुवर्षांची कहाणी काही इंचांत लिहिणं..?
.
.
- असं मला पूर्वी वाटायचं
की सगळं खोटं असतं
पण आता पटतंय
एखादंच वळण असतं
तेव्हाच सावरायचं असतं
आणि जपून चालायचं असतं
तिथे तोल गेला की..
गडगडत खाली यावं लागतं
मग फक्त झाल्या जखमांना
भरून निघेपर्यंत सहन करायचं..
उधारीचं हसू आणून..
....रसप....
१६ मार्च २०११
* * * * * * * * * * * * * * * * * * * *
५.
अधाशी भुंग्यासारखं
सतत हुंगत राहा
म्हणजे तुम्हाला सुख मिळेल
हाच एक उपाय आहे आयुष्यात सुखी होण्याचा
सुख तुमच्याकडे येत नाही..
हुडकून काढावं लागतं
आणि दु:ख..?
कधीच चुकत नाही
बरोब्बर घाला घालतं….
पण तरीही…
आपण आपला शोध सुरूच ठेवायचा
अविरत हुंगत राहायचं..
आणि जे काही थोडंफार मधाळ मिळेल
त्याच्या क्षणैक माधुर्यात
आनंद मानायचा..
.
.
उधारीचं हसू आणून....
....रसप....
१७ मार्च २०११
(क्रमशः)
http://www.ranjeetparadkar.com/2011/03/blog-post_2643.html
ही एक शृंखला आहे. ह्यातील
ही एक शृंखला आहे. ह्यातील सर्व (आत्तपर्यंतच्या) कविता माझ्या ब्लॉगवर आणि फेसबुकच्या भिंतीवर आहेतच. इथे मी आजपासून हळूहळू सर्व पोस्ट करत आहे.
ग्रेट गोईंग ! चालू ठेव ,
ग्रेट गोईंग !
चालू ठेव , वाचतेय !
रणजित, हे बाकी झकास
रणजित, हे बाकी झकास केलंस!
एफ. बी. वर वाचलीच आहे शृंखला, पण इथेही आवर्जून वाचणार... कारण.. हे जसं जसं पुढे जातं, तशी हाँटिंग होत जाणारी कवितामालिका आहे..
समीर चव्हाणजींची "फुटकर" आणि रणाजितचं "उधारीच हसू..." प्रत्येक साहित्यप्रेमींनी आवर्जून वाचावंच.
शुभेच्छा.
संपादित - ३. तू ओरबाडलं
संपादित -
३.
तू ओरबाडलं नाहीस..
तरी ओरखडा उठला
मी अश्रू ढाळले नाहीत
पण हुंदका फुटला
काट्या-काट्यामध्ये फरक आहे
गुलाब आणि बाभळीचा
दु:खा-दु:खामध्ये फरक आहे
आवडीचा-नावडीचा
माझं दु:ख मी जपतो
प्रेम केलंय म्हणून
प्रेमाच्याच बदल्यात मिळालंय…
“अमूल्य ठेव” म्हणून!
आपणच आपले खरे सोबती
मला चुकलंय कळून
हीच जाणीव लपवत असतो…
उधारीचं हसू आणून
....रसप....
१६ मार्च २०११
संपादित - ४. हातावरच्या
संपादित -
४.
हातावरच्या रेषांना काही अदृश्य वळणं असतात
किंवा ती फक्त मायक्रोस्कोपनेच दिसतात
कारण कसं शक्य आहे..
आयुष्य इतकं सरळसोट किंवा एकवळणी असणं?
वर्षानुवर्षांची कहाणी काही इंचांत लिहिणं..?
.
.
- असं मला पूर्वी वाटायचं
की सगळं खोटं असतं
पण आता पटतंय
एखादंच वळण असतं
तेव्हाच सावरायचं असतं
आणि जपून चालायचं असतं
तिथे तोल गेला की..
गडगडत खाली यावं लागतं
मग फक्त झाल्या जखमांना
भरून निघेपर्यंत सहन करायचं..
उधारीचं हसू आणून..
....रसप....
१६ मार्च २०११
http://www.ranjeetparadkar.com/2011/03/blog-post_2643.html
आवडेश
आवडेश
मीही यातल्या काही फेबु वर
मीही यातल्या काही फेबु वर वाचल्या आहेत.
परत वाचायला आवडल्या.
मस्त आहेत. पुढे वाचणारच !!
मस्त आहेत. पुढे वाचणारच !!
रणजित आता तूही ह्या 'स्वैर'
रणजित आता तूही ह्या 'स्वैर' अभिव्यक्तीच्या माध्यमात रमू लागला आहेस हे पाहून अनेकजण सुखावले असतील
हाहाहाहा!! कणखरजी........ खर
हाहाहाहा!!
कणखरजी........
खरं सांगायचं तर मला मुक्त लिखाणही तितकेच आवडते जितके छंदोबद्ध. आणि ही शृंखला बरीच जुनी आहे.
अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं झाल्यास - निर्बंध झुगारून मादक दिसणारी स्त्री मला आवडते, पण उच्छृंखल दिसणारी नाही. तसंच कविताही सुंदर असेल तर आवडते... मुक्ततेच्या नावाखाली धरबंध(?) सोडणे पटत नाही.
धन्यवाद !
छान आहेत रचना!
छान आहेत रचना!
संपादित - ५. अधाशी
संपादित -
५.
अधाशी भुंग्यासारखं
सतत हुंगत राहा
म्हणजे तुम्हाला सुख मिळेल
हाच एक उपाय आहे आयुष्यात सुखी होण्याचा
सुख तुमच्याकडे येत नाही..
हुडकून काढावं लागतं
आणि दु:ख..?
कधीच चुकत नाही
बरोब्बर घाला घालतं….
पण तरीही…
आपण आपला शोध सुरूच ठेवायचा
अविरत हुंगत राहायचं..
आणि जे काही थोडंफार मधाळ मिळेल
त्याच्या क्षणैक माधुर्यात
आनंद मानायचा..
.
.
उधारीचं हसू आणून....
....रसप....
१७ मार्च २०११
http://www.ranjeetparadkar.com/2011/03/blog-post_2643.html
मस्तच ही पण
मस्तच ही पण