छद्मयुद्ध-१ इथे वाचा
http://www.maayboli.com/node/46780
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
छद्मयुद्ध-२
एपीसोड १ - खुलासा
स्थळ - रॉ हेड क्वार्टर्स, दिल्ली
आज तिने जवळपास १ वर्षाने साधी ब्लू डेनिम अन एक फ़ॉर्मल पांढरा शर्ट घातला होता, केस मोकळे सोडले होते, मेबलिन ची हल्कीशी आय लायनर पुरेशी होती निलोफ़र उर्फ़ गौरी साठी, लावण्यखनी म्हणावी अशी २६ वर्षांची टीपिकल "दिल्ली दी कुडी" वाटणारी गौरी, अनार्म्ड कॉंबॅट अन बेटन फ़ायटींग मधे सगळ्यांची आई असल्याचे फ़क्त शहादरा स्टेशन वरच्या २ "मनचल्यांना" पुरे कळले होते!.
तिकडे दिलशाद गार्डन मधे करण उर्फ़ अश्फ़ाक आपली रॉयल एन्फ़िल्ड धुतल्यावर सुरु करत होता, एक वर्ष दुर होता तो तिच्या पासुन !!!, आर्मी बॅकग्राऊंड चा पोरगा, वय वर्षे २७, वडील ब्रिगेडीयर, स्वतः करण आधी बीएसएफ़ ला असिस्टंट कमांडंट डेप्युटेशन वर रॉ ला आलेला. वेपन्स अन ट्रान्स्पोर्ट एक्स्पर्ट.
तिसरा अन टीम चा सगळ्यात जुना मेंबर, राजेश देशकर, कुठुनही डेप्युटेशन वर न आलेला, जातकुळी अन ट्रेनिंग ने अस्सल स्पाय..... गुप्तहेर.... युनिवर्सिटी ला मेकॅनिकल च्या थर्ड ला असताना कॅंपस इंटरव्यु ला तो एका "कंपनी" ला बसलेला, कंपनी ने " ओके राजेश, वी विल लेट यु नो अबाऊट इट सुन" म्हणले अन नंतर २० दिवस राजेश २४/७ निगराणीत होता, २१ व्या दिवशी कॉल , राजेश उद्या तु नागपुर ला येऊ शकशील का इंटरव्यु ला ? नागपुर ला "क्ष" हॉटेल ला आलेली ती सुखद ऑफ़र, "विल यु जॉईन वर्ल्ड्स वन ऑफ़ द बेस्ट इंटेल एजन्सी राजेश ? " झटक्यात दिलेला होकार, वर्षभर आधीच लग्न झालेला, बायको मुंबईला सी.ए, "वर्षभर मला सुट्टी नाही" हे तिला पटवुन घराबाहेर पडलेला , घरी परतायची आस लागलेला राजेश देशकर, वय वर्षे २९.
सकाळी, ०११० ते ०११५ च्या मधे ५ -५ मिनिट्स च्या अंतराने सगळे एच क्यु ला पोचलेले, लाऊंज मधे दोघे पुल खेळत बसलेले तर गौरी कॉफ़ी पित बसलेली, इतक्यात एक चलाख असिस्टंट धावत आली, तिघांना त्यांचे आर एफ़ आय डी कार्ड देत बोलली, " मॅम, सर्स, प्लीज टेक द एलेव्हेटर टू लेवल १२"
"इतकं पण एच क्यु नाही विसरलेलो आम्ही मॅम" करण हसत म्हणाला
" तु हरयाणवी ,जिधर कुडी दिखी नही लाईन लगाना शुरु" गौरी ने हसत टोमणा मारला , त्यावर
"जे बात तो तेरी सही से छोरी पर में बस खुबसुरत कुडीयों के पास ही जाता हूं" म्हणत त्याने परत फ़ेड केली!!.
लेवल १२ ला लिफ़्ट चे दार उघडले तर समोर " वेल्कम चितों" लिहिलेला बॅनर, सजवलेला हॉल, अन स्वागताला स्वतः स्पेशल डायरेक्टर जसजीतसिंह भुल्लर!!!.
" ओये , जल्दी चलो समोसे बियर बाद में" पहले ब्रिफ़िंग है खुद एक बडे व्यक्ति आये है " असं म्हणत त्यांनी वरात चालवली, त्या साऊंड प्रुफ़ अन सिग्नल प्रुफ़ रूम मधे घुसायच्या आधी शेवटचे इस्ट्र्क्शन आले
"राजेश , ब्रिफ़िंग तेरी होगी, जहां रेफ़रंस होगा, वहां जट्ट या कुडी बोलेगी, क्लियर ?? "
राजेशने मान डोलवली तसे दार उघडुन सगळे आत गेले, अन सर्दच झाले, हीज एक्सलंसी , सुप्रीम कमांडर , महामहीम राष्ट्रपती महोदय, सुहास्य वदने स्वागत करत होते
" सर, ही आमची डेल्टा टीम, अग्रेसीव एस्पीयोनेज मधे हिच्या सारखी फ़क्त सी.आय.ए ची स्पेशल ऍक्टीव्हिटीज डिविजन आहे, दिज आर द फ़ायनेस्ट मेन ऍंड विमेन , ब्रिफ़िंग विथ यौर पर्मिशन , सर ? "
"गो अहेड"
राजेश ने सावधान मधे उभं राहुन पहीले "जय हिंद" केला, "सर, सिनियर टीम मेंबर राजेश देशकर .... सर"
"ऍट इज ऑफ़िसर, आय एम हियर टु अप्लॉज यु, गो ऑन" सगळे स्थानापन्न झाल्यावर राजेश सुरु झाला
" सर, जवळपास एक वर्ष आधी, रॉ स्टेशन विएन्ना, ला तिथे एक सर्वेवलंस दरम्यान हे आढळले की एक पाकीस्तानी वेपन्स दलाल, शम्सी कफ़िल हा आय ए ई ए अर्थात International Atomic energy Agency च्या काही अधिका-यांच्या मागावर आहे, त्याच्या हालचाली आम्हाला इंटरेस्टींग वाटल्या, कारण तो ज्या अधिका-या पर्यंत पोचायचा प्रयत्न करत होता, तो एक जर्मन कंपनी न्यु लुक्स जी एम बी एच (Nu luks Gmbh) चा टेक्निकल व्ही.पी लुथर बाह्न्मन होता, फ़ॉय युवर इन्फ़ो सर, IAEA ला जसे परमाणु शक्ती धारक देश सदस्य असतात, तसे ह्या तंत्रात काम करणा-या कंपन्यांचे अधिकारी पण असतात, काही युनो च्या लग्याने तर काही त्या त्या देशाच्या सरकारचे वेस्टेड इंटरेस्ट जपायसाठी अंडर कवर त्या त्या सरकार ने घुसवलेले, जसे की अमेरीका वेस्टींग हाऊस चे अधिकारी घुसवते, जर्मनी ने नु लुक्स चा घुसवला, अगदी आपला एन पी सी आय एल चा माणुस पण आम्हीच तिथे प्लांट केलाय."
"आमच्या एन पी सी आय एल च्या तिथल्या हस्तका नुसार शम्सी काही जुनी गॅस सेंट्रीफ़्युज ची डिझाईन्स मिळवायसाठी बाह्न्मन च्या मागे होता, बाह्न्मन हा पक्का रंगेल अन अय्याश असल्याचे पण आम्ही पता लावले, ह्याचा अर्थ सरळ होता की पाकीस्तान ला वेपन्स ग्रेड युरेनियम एन्रिचमेंट करायची आस आहे, अश्यातच आम्ही आमच्या रॉ स्टेशन इस्लामाबाद ला अलर्ट केले, तिथले स्टेशन हेड श्री जीवन बार्दोलाई ह्यांनी अथक परीश्रम करुन, असे डिझाईन्स हॅंडल करायची क्षमता फ़क्त डॉ.प्रो. रहीम खुर्रम ह्यांच्यात अन ते सद्ध्या खान लॅब्स चे डायरेक्टर असल्याचा पत्ता लावला,खुर्रम साहेबांची डीटेल हिस्ट्री काढल्यावर हे समजले की त्यांना एक अधु पत्नी आहे मुले परदेशात आहेत अन मायेला हपापलेला हा उमदा माणुस एकाकी आहे, त्याचवेळी ’ऑपरेशन छद्मयुद्द" हे साकारले गेले, अन डेल्टा टीम म्हणजेच माझी टींम इन्वोल्व झाली, पहीले इन्फ़िल्ट्रेट झालो तो मी, कहुटा ला प्रोफ़ेसर कॉलनीतले प्रोफ़ेसर्स कुठे हेयर कटींग ला जातात हे पहीले मी ट्रेस केले..... "
"पण हेयर कटिंगच का ??" इति मिस्टर प्रेसिडेंट
" मी तिथेच येतोय सर, मुळात न्युक्लियर लॅब्ज किती ही सेफ़ असल्या तरी ह्या वैज्ञानिक लोकांना मायन्युट रेडीयेशन एक्पोजर होतेच होते, मी हजामाच्या दुकानात काम मिळवुन तिथे रोज कटींग चे काम करायचो, तिथे आम्ही हेयर सॅंपल्स जमा करायचॊ अन सेफ़ चॅनल थ्रु ते इंडीयन एंबसी ला पाठवायचो, तिथुन ते दर महीन्याना, एन सी एल , पुणे ला पाठवले जायचे जिथे गॅस क्रोमॅटोग्राफ़ी सारखी आधुनिक तंत्रे वापरुन त्या केसांचं एक्स्पोजर कुठल्या किरणोत्सारी पदार्थासमोर झालंय हे पता लागायचं, अश्या रितीने , खान लॅब्ज ला कोण माणुस कुठल्या सेक्शन ला काम करतो हे आम्ही ट्रायंगुलेट करु शकलो, हे ट्रायांगुलेशन झाल्यावर आम्ही, युरेनियम वर काम करणा-या लोकांना टार्गेट केलं, त्यातही सर्वाधिक एक्स्पोजर नेमके खुर्रम साहेबांचेच होते, आम्ही खुर्रम साहेबांचा बळावलेला आर्थ्रायटीस पाहुन तोच कयास बांधला होता, तो लॅब रिपोर्ट्स ने कन्फ़र्म केला." अजुन काही प्रश्न असावेत म्हणुन राजेश ने पॉज घेतला
"तुला केश कर्तनालयात नोकरी कशी मिळाली राजेश ?? "
" आय एम सॉरी सर पण मी ब्रह्मदेवालाही माईक्रो ऑपरेशनल डिटेल्स सांगु शकत नाही, फ़क्त इतकेच सांगेन माझे, कबाईली भाषांचे ज्ञान मला कामी आले ".
" ह्म्म्म, परहॅप्स थिस इज व्हाय यु गाईस आर फ़ियर्ड इन वर्ल्ड आय गेस!!!, गुड, कंटीन्यु ऑफ़िसर"
"आभारी आहे सर. तर असे २ महीने काढल्यावर मला खुर्रम साहेबांच्या जवळ जाता आले, एक दिवस थंडी मुळे जेव्हा त्यांची सांधे दुखी बळावली तेव्हा त्यांनी घरीच कोणाला तरी कटींग ला पाठवायची विनंती केली, मी लगेच उमेदवारी करुन पुढे झालो, पहील्याच मिटींग मधे ह्या साहेबांस बोलायला कोणीतरी लागते हे मी ताड्ले, तेव्हाच मी " मै आपकी रोज दाढी बनाकर खिदमत करुंगा जनाब" चे अस्त्र मी चालवले, त्यांच्या रोजच्या बोलण्यातुन मला त्यांना असलेला त्रास कळत होता, पण राष्ट्रहीतापुढे विधिनिषेध नसतात सर, ज्या दिवशी मॅडम खुश असल्याचे ते मला बोलले त्याच दिवशी माझी बहीण म्हणुन डोमेस्टीक हेल्प, म्हणुन मी गौरी ला घरात घुसवले, त्याच वेळी आमचा तिसरा एक्स्पर्ट करण पण अवतरला, अश्फ़ाक मुळात वेगळा माणुस होता त्याची अन करण ची चेहरेपट्टी जुळत असल्याने आम्ही त्याला निवडले, तो नेमका काही दिवस रजेवर होता, पण ते आमच्या पथ्यावर पडले, त्याला तो जॉईन व्हायच्या २ दिवस आधी आम्ही खतम केले व त्याचे आयडी कार्ड फ़ोर्ज करुन करण ला "अश्फ़ाक" बनवले, आता एक महीना लॅब्ज च्या आत करण अन घरी गौरी दोघांनी प्रोफ़ेसरांचा विश्वास जिंकला होता तेव्हा मी माझे डेली कटींग दाढींचं काम करतंच होतो, करण रोज प्रोफ़ेसरांना त्यांना ज्या युनिट ला जायचे आहे तिथे पर्यंत पोचवायचा त्यांची वॉटरबॉटल ब्रिफ़ सांभाळायचा, ज्या दिवशी ते सेंट्री फ़्युज ला जाणार होते त्या दिवशी करण ने त्यांच्या पाण्यात अगदी माईल्ड सिडेटीव टाकले होते, इतके माईल्ड की ते झोपले नाहीत पण दिवस भर थकल्या थकल्या सारखे फ़िल करत होते,
शिवाय त्या दिवशी सकाळी अश्फ़ाक ने गौरी उर्फ़ निलोफ़र ला फ़ोन करुन खोकुन सिग्नल दिला तो " टु नाईट इज द नाईट" हा होता. दोघांना शंका न बळावुन घेता गायब व्हायची शंका मिळावी म्हणुन त्यांनी तो "प्रेमप्रसंगाचा" बनाव केला होता सर, त्या दिवशी संध्याकाळी ऑफ़ीस मधुन निघताना , करण ने प्रोफ़ेसरांना कुठलंसं डिझाईन ब्रिफ़ मधे ठेवताना पाहीलं अन तो आश्वस्त झाला, घरी जे झाले ते आपण जाणताच, गौरी ने प्रोफ़ेसर शॉवर मधे असे पर्यंत डिझाईन्स चे फ़ोटो घेऊन ठेवले, अन त्याच रात्री दोघं लाहोर ला इलोपले, मी तर कहुटाला होतोच होतो अन मी त्या गावचाच नाही हे भासवत सकाळी मी कामावर गेलो, ते प्रोफ़ेसरांनी मला निलोफ़र ची चिठ्ठी दाखवली , मी उध्वस्त झाल्याचं भासवुन मला कबाईली शिक्षा होईल अशी बतावणी करत तिथुन सटकलो, अन ते चॅप्टर क्लोज करुन सरळ लाहोर ला आलो, लाहोर ला तिघं भेटल्यावर मी सिक्युर लाईन वर एंबसी ला फ़ोन केला, तिथे कल्चरल सेक्रेटरी पारधी साहेब हे आमचे लोकल लॉजिस्टिक्स पॉईंटमन आहेत, त्यांनी त्यांच्या एका स्टाफ़ ला जो की एक एथिकल हॅकर आहे हाती धरुन आमच्या एस्केप ला पाकीस्तान साईडने काही प्रोब्लेम न होता आम्हाला काढले, अन काल संध्याकाळी सात ला आम्ही अटारी क्रॉस झालो, डिझाईन्स सहीत"
"ग्रेट जॉब टींम, तुम्हाला आर्मी पोलिस सारखे कव्हरेज नसेल पण तुम्ही खुप मोठी कामं करता, येट माझा एक प्रश्न उरतो, भुल्लर अन होम मिनिस्ट्री ला कसं कळलं की तुम्ही सात ला तिघं अटारी ला पोचाल ?? "
"सर, जेव्हा आम्ही पारधी साहेबांना फ़ोन केला तेव्हा त्यांनी विचारले ५,३,२ की तीन पत्ती , तीन पत्ती म्हणजे आम्ही तिघं सेफ़ आहोत अन डिझाईन मिळालंय , संध्याकाळी जेव्हा ते झा सरांसोबत बोलत होते तेव्हा त्यांनी "तीन वेळा" घाम पुसल्याचे" सांगितले , तेव्हा ते त्यांना कळले, त्यांनी भुल्लर सरांना फ़ोन करुन बोलले की "मी तुला ३ वेळा फ़ोन केला पण तु उचललाच नाहीस" तेव्हा ते समजले, शिवाय पारधी सरांनी आम्हाला इन्स्ट्र्क्ट केले होतेच की एक्स्फ़िल्ट्रेशन १९०० ला म्हणजे संध्याकाळी ७ ला होईल, तोच मेसेज त्यांनी बाकी ठीकाणी पण फ़्लेश केला असेलच हे धरुन आम्ही निघालो, वास्तविक पाहता हे मला माझ्या सॅट युनिट वरुन फ़ोन करुन डायरेक्ट भुल्लर सरां सोबत ठरवता आले असते पण अश्या हाय रिस्क मिशन्स मधे आम्ही सॅट फ़ोन्स अगदी प्रोप्रायटरी असले तरी कमीत कमी वापरतो, कारण जरी सिग्नेचर बाकी कोणाशी मॅच होत नसेल ही पण अननोन सिग्नेचर पाहुन पाक इंटेल तल्लख होऊ शकत होता"
" ओके नाऊ, तुमच्या कडे डीझाईन्स आली.... ठीक, पण मला नाही वाटत भारताचे चोरीच्या डीझाईनचे सेंट्रीफ़्युजेस वापरायचे खराब दिवस आलेत, सो हा आटापिटा आपण वर्षभर का केला आहे ??, ह्यात आपला फ़ायदा ?? पाकचे नुकसान ?? अन काय फ़ायदा ?? "
राजेश भुल्लर सरांकडे पाहुन हसला , सरांनी मान डोलावली तसं तो पुढे बोलु लागला " सर ह्यात भारताचे फ़ायदेच फ़ायदे आहेत, पहीला लुथर बाह्नमन हा पाक धार्जिणा अधिकारी नु लुक्स मधुन उचल बांगडी होईल, त्याच्या जागी श्च्मिड हा अधिकारी येईल, श्च्मिड हा भारतासोबत "तांत्रिक सहकार्य " करायच्या पक्षातला आहे सो तो फ़क्त खरेदी विक्री चा व्यहार नसेल, विन विन असेल. नंबर दोन इराण ला हेच डीझाईन हवे आहे फ़क्त इराण ला ते आपण द्यायचे, बदल्यात आपले क्रुड ऑईल पेमेंट इराण भारतीय चलनात पंजाब नॅशनल बॅंक तुर्की शाखा कडुन घ्यायला राजी होईल, ह्यात कोणाला नाव कळले तर ते बाह्नमन चे कळेल त्याची नाचक्की झाली आपल्याला फ़रक पडत नाही कारण इराण वर आपण दुप्पट उपकार करतोय, पहीला पेट्रोल खरेदी अविरत ठेवणे अन २ डिझाईन देणे"
" तिसरा फ़ायदा, सर आम्ही अटारी ला बॉर्डर क्रॉस केली तेव्हा आम्ही त्या मेजर चे आय डी कार्ड फ़ोटो काढुन आणले आहे, पाक रेंजर्स चे ९०% अधिकारी ऑफ़िशियल आय एस आय पेरोल ला असतात, सो ते ऑथेंटीक आहे, त्याचे एक फ़ोर्ज कार्ड आत्ता पर्यंत बनले असेल, तो अधिकारी पंजाबी मुळाचा होता, आपल्याकडे चायना सेक्शन ला काम करणारा अजित बंसल हा तश्याच चेह्ररेपट्टीचा आहे, त्याला पाकी मेजर बनवुन आपण ते डिझाईन दिल्लीत नॉर्थ कोरीयन एंबसी ला विकायचे, कांगावा हा की पैश्यासाठी पाक चा एक अधिकारी अनधिकृत पद्धतीने डिझाईन्स विकतोय, त्याचे सी सी टि वी फ़ुटेजेस मुद्दम ब्लर करणेत येतील, हा व्यवहार पुर्ण झाला की आपणच ही न्युज सी आय ए ला फ़्लॅश करुन सांगायची "पाकीस्तान ने नॉर्थ कोरीया ला अनधिकृत रित्या डिझाईन विकले", अन आमचे वॉशिंग्टन चे लोक पक्की खबर देतायत, सी आय ए ला ह्या डिझाईन्स अन बाह्नमन चा सुगावा होता पण ह्या वेळी बाजी रॉ ने मारली आहे सर, न्युज तर ही पण आहे की जर आपण सिद्ध केले की ही डिझाईन्स पाक ने विकली आहेत, तर, अमेरीका पाक ला जी २५ अब्ज डॉलर्स ची मदत देणार होता ती तत्काळ थांबवणे करेल, प्लस एफ़-१६ सुपर हॉर्नेट विमाने पण विकायचे कॅन्सल करेल.......... हे आपले फ़ायदे आहेत सर, उम्म्म्म डीझाईनच्या ओरिजिनल वाटाव्या अश्या कॉपीज बनवायचे काम सुरु झाले आहे सर "
राजेश आता पाणी पित होता अन राष्ट्रपती आ वासुन बघत होते, शेवटी ते बोललेच " अरे तुम्ही असताना कश्याला रे आम्हाला टेन्शन आहे!!!!, काय करायचे ते करा, तुम्हाला मेडल्स द्यावी वाटतात पण सगळेच पडद्या आड, भुल्लर पोरांना प्रेसिडेंट्स स्पेशल गॅलेंट्री फ़ंड मधुन ५-५ लाख प्रत्येकी द्या चॉकलेटला!!!, काय रे पुरेत का ?? "
एव्हाना दोघे बाहेर पडले होते, कारण आज करण गौरी ला प्रपोज करणार होता, राजेश ची संध्याकाळची फ़्लाईट होती तो घरी पोचुन अस्मिते ला मिठीत घ्यायच्या स्वपनात तरंगत होता, अर्धवट उघडलेले दार तसेच धरुन तो बोलला " सर, आभार, इतके नक्कीच पुरेत !!, एकच सांगेन सर आम्ही जन्माने हिंदु, मुस्लिम, मराठी, उत्तरप्रदेशी, तामिळ असु पण आमच्या ट्रेनिंग ने आम्हाला संविधानाचा बाप्तिस्मा दिलाय अन ते जपायला आम्ही कुठल्या ही देशात कुठल्याही थरा ला जाऊ फ़ॉर, द नेशन मस्ट पर्सिस्ट, जय हिंद सर" राजेश निघुन गेला तरी राष्ट्रपती महोदय दारकडेच पाहत होते.........
संदर्भ :-
१. विकिपिडीया
२. गूगल
३. अश्विन संघी
४. रॉबर्ट लड्लम
५. भारत रक्षक
६. स्ट्राटफोर
७. वृत्तपत्रे
रमा, तुमचा सल्ला दुरुस्त आहे
रमा, तुमचा सल्ला दुरुस्त आहे पण भारतीय सरकारी डिपार्टमेंटात एक रित आहे , बोलताना फक्त सिनियर मोस्ट मेंबरच बोलतो!!! म्हणुन राजेश ला बोलका ठेवलय!!!
७०च किलोच? बरचय की....
७०च किलोच? बरचय की....
नेमका कसा खुलासा असायला हवा
नेमका कसा खुलासा असायला हवा होता असं सुचवतात आपण रमा जी ??
Ultimate !!!!, but verbal
Ultimate !!!!, but verbal signature and Voice transmission encryption signature for Satellite phone are different ( I know you are aware of it) but readers may get confused……
Keep posting stories on this theme…. Really enjoying !!!!
विशुभाऊ आभार!!!, सिग्नेचर्स
विशुभाऊ आभार!!!, सिग्नेचर्स वेगळ्या असतातच हो मी लेमॅन टर्म्स मधे त्या संप्लिफाय करायचा प्रयत्न केला
मस्त मस्त सोन्याबापू... खूप
मस्त मस्त सोन्याबापू... खूप आवडली.
आता राजेशला हिरो करताहेत तर मग आण्खीच छान. मिस्टर अँड मिसेस स्मिथ सारखे. तो रॉमधे तर ती भारताच्याच आणखी कुठल्यातरी डिपार्ट्मेंटला. जास्तच आगाउपणा होत आहे कल्पना आहे पण पुढल्या सिक्वलच्या प्रतिक्षेत. लवकर येउ द्यात.
इंटेल च्या पार्लन्स मधे
इंटेल च्या पार्लन्स मधे सेक्व्येल नसतात हर्मायनी!!! स्पेशल मिशन्स स्पेशल पर्सोनेल!! तरी बघु!!!
वोके बापू.
वोके बापू.
अश्या ट्चेस मुळे कथेचा रॉ
अश्या ट्चेस मुळे कथेचा रॉ अपील जातो फ्रँकली!!! (असं माझं आगाऊ मत आहे)
मस्त वाटल वाचुन.
मस्त वाटल वाचुन.
आवडली रे! खूप मस्त लिहीलिये.
आवडली रे! खूप मस्त लिहीलिये. !!
निवांत पाटील आपले आभारी आहोत
निवांत पाटील आपले आभारी आहोत
अक्षरी ताय, वो मारा पापडवाले को!!!, ताय को पसंद आ गयी!!!
मला तरी नविन हिरो आवडेल. उगाच
मला तरी नविन हिरो आवडेल. उगाच जुनी छाप नविन कथेत डोकावलीच पाहिजे, असं बॉदरेशन नको.
अजुनही विदर्भातच आहे का भौ?
नाई गळ्या इतलं कुकडे नसीब
नाई गळ्या इतलं कुकडे नसीब भेट्टे का कोनाले!!!..... दिल्लीत रायतो आता सध्याशिक म्या, बघाव म्हनलं काही भेट्टे का कामधंदा सरकारी/ प्राव्हेट , बाकी सरी शेगाव च्या बाबाजीची अन कारंज्याच्या उंबराची क्रुपा, माहुरवाली माय त मायच हाय म्हना!!!
हिरो नवाच असेल !!, पण थिम टोटल वेगळी, कारण मोनोटोनस हुई तो एस्पीयोनेज थ्रीलर ही क्या हुई कथा!!
आवडली कथा. वेग आणि उत्कंठा
आवडली कथा. वेग आणि उत्कंठा दोन्ही शेवटपर्यंत टिकलं.
पण मलाही वाटलं, की सार्या मोहिमेचा खुलासा इतका स्ट्रेट-फॉरवर्ड करायला नको होता. फ्लॅशबॅकच, पण तो ही अजून गुंतागुंतीचा केला असता, तर थरार अजून वाढला असता.
आणि मोहिमेनंतर सिनियर्सना माहिती वगैरे देतात त्याला डी-ब्रिफिंग म्हणतात ना?
डीपार्टमेंटल असले तर
डीपार्टमेंटल असले तर डीब्रिफिंग सिनियर्स करतात असं वाटतं, लेमॅन कोणीही सिविलियन अथॉरीटी असली (अगदी टायट्युलर हेड असला तरीही) जे होते त्याला बहुदा प्रशासकीय अन फोर्सेस च्या भाषेत ब्रिफिंग म्हणत असावेत
फ्लॅशबॅक जरा जास्तच किचकट झाला असता!! (मला लिहायला) तरीही सल्ला सही आहे तुमचा प्रयत्न तरी करेनच
मस्त लिहिले आहे
मस्त लिहिले आहे
तरी म्हतलं एकदम कशी काय सुचली
तरी म्हतलं एकदम कशी काय सुचली कथा... दिल्लीची हवा
आता हायेच तितं तं भेटुन घ्या अरविंदभौले...
जाई आपले आभार विजयजी, थ्या
जाई आपले आभार
विजयजी, थ्या गद्धईच्याले भेटुन आपुन काय करा!!!! थो का तटी बसुन मह्या प-हाटी ले भाव देइन ?
चान चान.
चान चान.
सुंदर
सुंदर
ही जबरदस्त कथा वरती
ही जबरदस्त कथा वरती आणल्याबदद्ल प्रथम म्हात्रे यांचे मन:पूर्वक आभार.
काय तूफान लिहिलंय. हेर कथा, खास करून भारतीय सैन्याच्या कथा वाचायला मला प्रचंड आवडतात त्यात तुमच्यासारख्या गिफ्टेड लेखकाने लिहिलेली...अजुन काय पाहिजे.
या कथेमधील डेटालिंग अचूक आहे. कुठेही लूझ थ्रेड नाही. अशी एकही घटना, पात्र किंवा संवाद नाही की ज्याचा कथेशी relevance नाही. छोट्या, छोट्या घटनांना, गोष्टींना सुद्धा काहीतरी अर्थपूर्ण संदर्भ आहे. कथेचा फ्लो अतिशय सुंदर.
कथा मस्तं जमलीय.
हिय्या... लैच जहबहरी
हिय्या... लैच जहबहरी सोहोण्याबाहापु .....
मस्त कथा सोन्याबापू!
मस्त कथा सोन्याबापू!
उत्कंठावर्धक, अगदी एका दमात वाचून काढले दोन्ही भाग.
आयडिया आणि शैली चांगली आहे.
आयडिया आणि शैली चांगली आहे. पण खूप थरारक नाही वाटत. दुसरे म्हणजे इथे विरोधी पार्टीकडून काहीच counter measures घेतलेले दिसत नाहीत. जर nuclear गोष्टी involved असतील तर जबरा security check असणार, त्या मानाने तुम्ही १ वर्षात सगळे उरकलेले दाखवले आहे, जे थोडे भरभर उरकल्यासारखे वाटते. आणि पाकिस्तान already zippe centrifuge नावाची advance technique वापरते(विकी संदर्भ) मग ते ह्या जुन्या design च्या मागे का लागतील? याने basis एकदम वीक होऊन जातोय. हे मला जाणवलेले कच्चे दुवे.
पायास जी, अहो रॉ च्या विकी
पायास जी,
अहो रॉ च्या विकी पेज वरती एक सन्दर्भ वाचला त्यातून खुलवली म्हणे मी ही कथा, मला टेक्निकल डिटेल्स पेक्षा फैंटेसी वर जास्त भर द्यावा वाटला इतकेच!
सोन्याबापू पहिल्यांदा तर ते
सोन्याबापू
पहिल्यांदा तर ते जी सोडा. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने आणि अधिकाराने खूप मोठे आहात. पण या शैलीत जर बिनचूक डिटेल्स असलेली हेरकथा आली तर याहून चांगली बाब ती कोणती! म्हणून वरच्या प्रतिसादाचा आगाऊपणा! गैरसमज नसावा.
मस्त जमलीये. दोन भागांतच
मस्त जमलीये. दोन भागांतच संपल्याने आटोपशीर पण तितकीच उत्कंठावर्धक झाली आहे. लिहीत रहा.
रच्याकने, ज्याने कोणी कथा वर काढली त्याचे आभार..
खूप आवडली. वाचताना थरार खूप
खूप आवडली. वाचताना थरार खूप नाही जाणवला पण, 'कसं केलं असेल बरं?' याची प्रचंड उत्सुकता मात्र होती.
लिखाणासंबंधी खूप चांगल्या सूचना मिळाल्या आहेत. पण तुमचा कंफर्ट झोन महत्वाचा. लिहीत रहा.
सोन्याबापू, फँटसीवरून एक
सोन्याबापू,
फँटसीवरून एक आठवलं. सर्व हेरकथांतल्या नायिका सुंदर तरुण वगैरे का असतात बरं? बाई जर हेर असेल तर तिने गुपचूप मिसळून जायला हवं ना समाजात. उठून दिसली तर शंका येईल ना? जर बाई उच्चपदस्थांना भुलवून गुपितं चोरणारी असेल तर फटाकडी दाखवायला हरकत नाही. नायकांचंही तेच. एकदम देखणे सहाफुटी वगैरे.
एकंदरीत हेरकथा प्रत्यक्ष कशी घडते त्यापेक्षा वाचकांच्या मनातल्या प्रतिमा किती सफाईने रंगवता येतील याकडे अधिक लक्ष गेलेलं आढळतं.
आ.न.,
-गा.पै.
Pages