अफ़लातुन चित्रकार Salvador Dali आणि त्याची विलक्षण Paintings भाग २

Submitted by मुग्धमयुर on 14 December, 2013 - 21:28

Cubism चा प्रभाव आणि त्या बाहेर पडण्याचे प्रयत्न

याच काळात एक दुर्दैवी घटना घडली दालीच्या आई चा मृत्यु झाला. आणि वडीलांनी दुसरे लग्न त्याच्या आईच्या च बहीणीशी केले. या घटनेचा खोलवर परीणाम दाली च्या मनावर झाला. मात्र त्याची एकीकडे चित्रकलेत चांगली प्रगती सुरु होती. तो तेथील फ़ेमस Prado म्युझियम मध्ये तासन तास घालवित असे व तेथील युरोपियन मास्टर्स च्या पेंटीग्जचा बारकाइ ने अभ्यास करीत असे. सुरुवातीच्या काळात त्याच्या पेंटीग्ज वर Cubism चा मोठा प्रभाव होता. यात पिकासो आणि जॉर्ज बॅरॉक यांचा ठळक प्रभाव होता.क्युबिझम मध्ये पारंपारीक थ्री-डायमेन्शन मध्ये चित्र काढण्याला फ़ाटा देण्यात आला होता. दालीने १९२३ मध्ये एक सेल्फ़ पोर्ट्रेट काढले होते नाव “ LA PUBLICITAT “. य़ात दालीने एक खासियत केली होती ती म्हणजे जनरली जसे क्युबिझम वापरलेल्य चित्रांमध्ये एखादा मुळ आकार फ़्रॅगमेंट्स मध्ये विखरुन जातो तसे न होउ देता या चित्रातील स्वत:चा चेहरा मात्र स्प्ष्ट ओळखु येइल असा ठेवला होता. काही समीक्षकांच्या मतानुसार हा दाली चा इगो होता की असेल क्युबिझम महत्वाच पण ते काही ग्रेट दाली चा चेहरा disassemble करु शकत नाही.

दी ग्रेट फ़्रॉइड ची प्रेरणा व आराध्य दैवताची प्रत्यक्ष भेट

याच काळात १९२३ मध्ये आणखी एक turning point आला तो असा की दाली च्या हातात महान मानसशास्त्रज्ञ Sigmund Freud च्या interpretation of dreams या पुस्तकाची स्पॅनीश एडीशन आली. आणि दालीवर यातील संकल्पनांचा प्रचंड परीणाम झाला जसे Dream Symbolism, Sublimation, Free Association इ. याच्या आधारे दाली स्वत:ला व स्वत:च्या चित्रांना व्यक्त करु लागला व स्वत:च्या व्यक्तीमत्वाचे समर्थन ही दाली या थेअरीज चा आधार घेउन करु लागला.नेणीव Sub-conscious mind हे दाली साठी आता Most Important सब्जेक्ट मॅटर बनले होते. फ़्रॉइड हा दालीच एक मोठ प्रेरणास्थान होत.दाली ने त्याला भेटण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण जमल नाही. पुढे हीटलर ने ऑस्ट्रिया गिळंकृत केल्यावर शेवटी जेव्हा फ़्रॉइड इंग्लंड ला त्याच्या मुलीबरोबर पळुन आला आणि Stephen Zweig ( हा ही ज्यु होता) कडे आश्रयाला होता तेव्हा दाली आणि त्याची भेट जमुन आली (दाली च्या अनेक विनंती नंतर). या भेटीत दाली ने त्याला आपली Metamorphosis of Narcissus ही पेंटींग दाखवली. फ़्रॉइड दाली शी प्रचंड इम्प्रेस झाला या भेटी बद्द्ल फ़्रॉइड एका पत्रात लीहीतो की “आजपर्यंत या सरीयलीस्ट्स ना ज्यांनी मला त्यांचा अधिकृत गुरु बनवुन ठेवला आहे त्यांना मी १०० ट्क्के मुर्ख समजत असे पण जेव्हा मी या यंग पेंटर ला भेटलो तेव्हा याची पेंटींग बघुन याचे ते स्कील याचे ते पॅशनेट डोळे बघुन मला माझ सरीयलीस्टां वीषयीची मत आता बदलण भाग आहे” दोघांत भाषेच्या अडचणी मुळे फ़ारसे बोलण झाल नाही. मात्र या भेटीनंतर फ़्रॉइड आता सरीयलीस्टाकडे थोडासा softly बघु लागला आणि दाली ने दाखविलेल्या पेंटींग वर जेव्हा as a psychologist मत विचारल गेल तेव्हा मात्र त्याने there are serious problems from the psychological point of view अस प्रामाणीक मत दील.( म्हणजे कला छान आहे पण कलाकार “सरकलेला”आहे.)

बंडखोरी, Royal Academy तुन हकालपट्टी , पिकासो-पॅरीस भेट , सोलो प्रदर्शन वगैरे

आता दालीचे अफ़ाट वाचनही सुरु झालेले होते याने त्याची कला अधिक प्रगल्भ झाली. काही दिवसातच Royal Academy त त्याला असे वाटु लागले होते की जे कोणी तेथिल कला- शिक्षक आहे त्यांच्यात काही टॅलेन्ट नाही. तेथे एका Daniel Diaz नावाच्या नविन शिक्षकाच्या भरती विरोधात याच्या ग्रुपने आंदोलन केले –झेंडा दाली च्या हातात दिला - आणि परीणाम एका वर्षासाठी Royal Academy तुन हकालपट्टी. या खाली काळात त्याने एक जबरदस्त पेंटींग बनविली जीचे नाव Pierrot playing Guitar यात जरी क्युबिझम होता तरी समीक्षकानी असे म्हटले आहे की या पेंटींग मध्ये क्युबिझम ला दालीने वेगळ्याच उंचीवर नेलेले आहे. यात दालीने भरपुर प्रतिकांचा वापर स्वत:च्या स्वतंत्र शैलीने केला होता. एका वर्षाच्या नंतर Royal Academy त दाली परतला त्याच वर्षी १९२५ मध्ये दालीने बार्सीलोनाच्या प्रसिध्द गॅलरी Dalmau मध्ये त्याचे पहीले Solo चित्रप्रदर्शन लावले. याला दस्तुरखुद्द पिकासो ने हजेरी लावली व दालीच्या पेंटीग्ज ने तो फ़ार प्रभावीत झाल. यात सर्वात सुपरहीट झाली Venus and the Sailor ही पेंटीग. यात दालीने काढलेली वडीलांची पेटींग व girl standing at window ही त्याची बहीण मॉडेल असलेली पेंटीग्ज ही होती. या सर्वांतील शैली Neo-cubist होती. दाली हळुह्ळु पिकासोच्या प्रभावातुन स्वत:च्या चित्रांना मुक्त करीत होता.नंतर दाली आयुष्यात पहील्यांदाच १९२६ मध्ये पॅरीस ला त्याच्या बहीणी बरोबर गेला. तेथे सर्वांत तो पिकासो ला त्याच्या स्टुडीयो त जाउन भेटला. या भेटीतला दोघांतला एक डायलॉग फ़ेमस आहे. दाली पिकासो ला म्हणाला “ I have visited you before going to the Louvre “ (Louvre हे युरोपातीलच नव्हे जगातील एक अतिशय मोठे आणि अनेक दुर्मिळ जगविख्यात कलाकृतींचा समावेश असलेले संग्रहालय आहे) यावर पिकासो चे उत्तर दिले You were not wrong.....दोन्ही स्पॅनीश होते दोन्ही महान चित्रकार म्हणुन प्रसिध्द झाले. दोघांना एकमेकाच्या प्रतिभेची जाणीव होती.नंतर दालीने Louvre ला ही भेट दीली तेथील विंची, राफ़ाएल यांच्या चित्रांनी दालीला भुरळ च पाडली. आता दालीला Royal Academy ची ग्रॅज्युएशन ची परीक्षा द्यायची होती. तो फ़िगारेस आला व तयारी करु लागला पण परत लहर फ़ीरली तो फ़ार निराश झाला आता त्याने परीक्षाच द्यायची नाही असे ठरविले का तर तेच म्हणे Faculty मला जज करण्याच्या लायकीचीच नाही.या वेळेस मात्र त्याच्या वागणुकीच्या कारणावरुन दालीची कायम स्वरुपी हकालपट्टी Royal Academy तुन झाली.पुढील वर्षभरात दालीच्या कलेने अनेक वळणे घेतली.आता त्याने १९२६ च्या डीसेंबर मध्ये आपले दुसरे प्रदर्शन लावले.यालाही भरपुर यश मिळाले.

Sur-realism चा गुढ,अदभुत प्रदेश !

Surrealism is destructive, but it destroys only what it considers to be
Shackles limiting our vision.- Salvador Dali

१९२९ मध्ये दाली ऑफ़िशीयली सरीयलीस्ट चळवळी त सामील झाला.मुळात Sur-realism या कलेतील जबरदस्त वादळाची सुरुवात १९२० च्याच सुमारास झाली होती.मात्र सरीयलीझम चा जाहीरनामा (Manifesto of Sur-realism ) आन्द्रे ब्रेटॉन याने १९२४ मध्ये प्रकाशीत केला होता.( तो अतिशय इंटरेस्टींग व मुळातुन वाचण्यासारखा आहे) तर सर्वांत अगोदर ही कल्पना पॅरीस मधील काही लेखकांनी वापरली sur-realite याचा अर्थ जे Beyond Reality आहे असे काही.( सरीयलीझम हा चित्रकले पुरता मर्यादीत नव्हता ) तर या कलाकारांना जे वास्तवापलीकडचे आहे ते खुणावत होते. आता ते कोठे सापडेल तर यांचा मुख्य भर होता तो मानवाच्या नेणीवेवर Sub-conscious Mind हा त्यांचा फ़ोकस होता. जे स्वप्नांचे विश्व आहे ते त्यांना महत्वाचे वाटत असे. हा मानवी मनाच्या तळा चा गुढ अदभुत चंद्रमाधवी चा प्रदेश त्यांना भुरळ पाडीत असे त्यांना प्रत्यक्ष वास्तवा पेक्षा एखाद्या वास्तव घटनेला माणसाची नेणीव कसा प्रतिसाद देते, कस स्टोअर करते आणि स्वप्नांमार्फ़त कस व्यक्त करते हे त्यांना अधिक खर अधिक ओरीजीनल वाटत असे. ते अनुभवांची नेणीवेवर पडलेली स्पंदने महत्वाची मानत, त्यांना Life as it is पेक्षा Life as lived in the Human Mind अतिशय महत्वाच वाटत असे.प्रत्येक सरीयलीस्ट कलाकार आपापल्या हातात असलेल्या माध्यमा चा वापर करुन या आदीम मनात खोलवर दडलेल्या आदीम,गुढ अगदी ओरीजीनल मानवी भाव-भावनां ना सरफ़ेस वर आणुन व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत होते. हे सरीयलीस्ट कलाकार Unexplored corners of sub-conscious mind जे होते त्याच उत्खनन आणि मग या अनुभुतीची अधिका अधिक प्रामाणिक आणि सर्वात महत्वाच म्हणजे न-नैतीक आणि सौंदर्यमुल्यनिरपेक्ष अशी अभिव्यक्ती करण्याचा प्रयत्न वा कीमान दावा तरी करत असत. त्यांच्या व्याख्येनुसार अशी अभिव्यक्ती ही अशा स्वतंत्र विचारा ची आहे जो विचार सर्व प्रकारच्या बंधनातुन मुक्त असा आहे, जो बुध्द्दी-नैतिक-सामाजिक इ. च्या नियंत्रणातुन मुक्त असा आहे.लेखनात यांचा Automatic Writing भर होता असे लेखन जे सरळ नेणिवेला आलेला अनुभव अभिव्यक्त करते Without any Conscious mind’s Editing पण इतकी निखळ अभिव्यक्ती क्वचितच साधली जात असे. Automatic Writing वर ब्रेटॉन आदींनी बराच खल केला.यात एक अजुन महत्वाचा घटक होता तो म्हणजे Juxtapositions यात त्यांचा भर होता की एकाच फ़्रेम मध्ये चित्राची असो वा कवितेची दोन किंवा त्या पेक्षा जास्त असे घटक-प्रतिमा (जे अर्थातच नेणिवेतुन आलेले आहेत) समाविष्ट करावेत की जे एक दुसर्याअशी पुर्णपणे भिन्न आहेत (जसे स्वप्नात नेहमीच होत असते) आणि त्यांची कलात्मक सांगड घालुन त्याने कला/काव्यतत्व साध्य करावे (ग्रेसच्या कवितेत असे परस्पर भिन्न प्रतिमां वापरुन असे Juxtapositions अनेकदा साधले जाते उदा. ही ओळ बघा “शुभ्र अस्थींच्या धुक्यात खोल दिठिंतली वेणा निळ्या आकाश रेषेत जळे भगवी वासना ) आणि याचा परीणाम कलेच्या आस्वादकावरही होतो अशी त्यांची धारणा होती. हे पुर्ण इलॉजिकल पण प्रभावी होते आणि ओरीजीनल असते असे त्यांना वाटत असे. या वरील विवेचनाला दोन मुद्दे जोडुन हा भाग संपवितो
एक म्हणजे या सर्व Sur-realism चा एक मुख्य आधार होता तो म्हणजे फ़्रॉइड ,जुंग आदींनी केलेले मानवी नेणिवेचे (Sub-Conscious Mind) अफ़ाट विलक्षण उत्खनन आणि त्यातुन मानवी नेणिवेचे इतिहासात जे पहील्यांदा च विलक्षण असे आकलन झाले होते ते या सरीयलिझम ची मुलभुत प्रेरणा होते.आणि या नेणिवेच्या गुढ अतर्क्य अनुभुतीला कलेच्या माध्यमातुन अभिव्यक्त करण्याचा एक अतिशय क्रांतीकारी असा प्रयत्न सरीयलीस्टांनी केला होता.
दुसर म्हणजे मला कायम Sur-realism विषयी वाचतांना एका कुठल्या कविची आठवण होत असेल तर ते म्हणजे महाकवि ग्रेस. या महान मराठी कविने नेणीवेतल्या अनुभुतींना जी अनुपम अशी अभिव्यक्ती दीली आहे तस मला तरी अस नेहमीच वाटत की जगातल्या कुठ्ल्याच सरीयलीस्ट कविला तरी जमल नसाव. या संदर्भात एक ग्रेट पुस्तक आहे डॉ. नंदकुमार मुलमुले या सायकॉलॉजीस्ट च त्याच नाव आहे “ रचनेच्या खोल तळाशी “ तुम्ही हे नक्की वाचाच.यात या अनुषंगाने त्यांनी ग्रेस च्या कवितेची विलक्षण अशी समीक्षा आहे. तर आन्द्रे ब्रेटॉन नंतर गुलफ़िशानी याचा जाहीरनामा आहे की महाकवि ग्रेस हा तमाम सरीयलीस्टांचा बाप आहे ! ( हा डायरेक्ट अचानक नेणिवेतुन आलेला डायलॉग आहे Without any conscious mind’s editing म्हणुन मला थोड सांभाळुन/ समजुन घ्याव ही नम्र Conscious विनंती !)

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओ मोरराव , दोनचार त्यांची चित्रे तरी द्यायची. आमच्यासारख्या आम जनतेला असलं वाचून काय समजणार?

लेख फार आवडला मला पेंटिंग ह्या विशयात काही कळत नाहे हे विसरायला झालं इतका गुंतून गेलो आपसूकच आणि जे लिहिलय ते आपोआप कळू लागलं
काही चित्रे हवीच होती पण तुम्ही लेखात उल्लेखलीत ती तरी

धन्यवाद वैभव जी !
तुम्हाला दाली च्या चित्रामंध्ये उत्सुकता निर्माण झाली हीच माझ्यासाठी फार आनंदाची बाब आहे.
तुम्ही गुगलुन बघा तुम्हाला सर्व चित्रं सापडतील !