"इस्किलार" या नाट्काचं अभिवाचन: अविस्मरणिय दिवस...

Submitted by डॉ अशोक on 16 December, 2013 - 10:55

"इस्किलार" या नाट्काचं अभिवाचन: अविस्मरणिय दिवस...

https://www.facebook.com/photo.php?fbid=768197153196623&set=p.7681971531...

काल रविवार दि. १५ डिसेंबर २०१३. माझ्या आयुष्यातील अविस्मरणिय दिवस होता. ्ज्येष्ठ मराठी कथाकार जी. ए. कुलकर्णी यांच्या २६व्या स्मृती दिनानिमित्त जीएंच्या भगिनी सौ. नंदा पैठणकर यांच्या सहकार्यानं "नाट्यरंग,औरंगाबाद"नं पुण्याच्या ज्योत्स्ना भोळे सभागृहात "इस्किलार" या नाट्काचं अभिवाचन केलं (नाट्यरुपांतर माझा मित्र कै. कुमार देशमुखनं केलेलं). अभिवाचनात मी सामील होतो. अभिवाचन रंगलं, पण विशेष मझा आला तो "नटसम्राट" डॉ. श्रीराम लागू आणि सौ दीपा श्रीराम यांच्या उपस्थितीनं !

ते समोर आहेत हे पाहून आम्हा सर्वांना उत्साह आला आणि काय आवाज "लागले" सांगू एकेकांचे ! लागूंनी शेवटपर्यंत अभिवाचन मन:पूर्वक ऐकलं आणि शेवटी उभं राहून टाळ्या वाजवल्या. "तुम्ही जी.एंच्या कथेला न्याय दिलात" ह्या त्यांच्या अभिप्रायानं कालचा रविवार सार्थकी लागला !

डॉ. अशोक

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच! त्या दीर्घकथेचं नाट्यरूपांतर करणं म्हणजे शिवधनुष्यच आहे. ते कुठे प्रकाशित झालंय का? मिळू शकेल का? वाचायला आवडेल.

डॉक्टर...."इस्किलार" एवढेच नाव टंकले असते तरी मी तिथे धावत गेलो असतो. अभिवाचनाच्यावेळी लागू दांपत्य हजर होते म्हणजे तुमच्या उत्साहाला किती मोहोर फुटला असेल याची कल्पना मी करू शकतो. दुव्याच्या आधारे प्रत्यक्ष आनंद घ्यायला धावलो पण "This content is currently unavailable...." असा संदेश येत आहे. नक्कीच काहीतरी तांत्रिक अडचण असेल....होईल बहुतेक थोड्या वेळाने दुरुस्त.

या नाटकाचा प्रयोग १९७४ मधे महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत "नाट्यरंग, औरंगाबाद"नं केला.
*
नाटकाची मुद्रित प्रत "जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद"नं जाने, २०१३ ला प्रकाशित केलं.
*
त्यांचा पत्ता:
जनशक्ती वाचक चळवळ, पिनाक, २४४, समर्थ नगर, औरंगाबाद, ४३१००१"
दूरभाष: (०२४०)२३४१००४, इ-मेल: janshakti.wachak@gmail.com
*
किंमत: २२५ (इस्किलार, अघटित, व्यथा ही मानवाची ही तीन नाटके समाविष्ट)