खालील कथा ही पुर्णपणे काल्पनिक असुन तिचा वास्तविक व्यक्ती, स्थळे, घटना ह्यांचयाशी काही संबंध नाही तसा आढळल्यास तो मात्र एक योगा योग समजावा
छद्मयुद्ध -१
एपीसोड १ :- रुटीन
स्थळ :- प्रोफ़ेसर्स रेसिडेंट क्वार्टर्स,खान रिसर्च लेबॉरेटोरी, कहुटा, पाकीस्तान
वेळ :- सकाळी ०८००
प्रो. रहीम खुर्रम आज फ़ुल मुड मधे होते, मुखात गुलाम अली साहेबांची " चुपके चुपके रात दिन आंसु बहाना याद है" गझल होती, त्याला कारण ही तसंच होतं त्यांची लाडकी परवीन आज चक्क त्यांच्याकडे पाहुन हसली होती, "खुदा तुझे लाख शुक्रिया" म्हणता म्हणता प्रोफ़ेसर साहेबांचे डोळे पाणावले, पाणावणार होतेच, २३ वर्षांचे होते ते फ़क्त बी. टेक झाले तेव्हा. तरुण रहीम घरी आपल्या अब्बांसोबत वाद घालत होता..........
"अब्बा, मी शिक्षण घ्यायला जायचं म्हणतोय हो!!!, स्थाईक व्हायला नाही....., जरा समजुन घ्या ना "
"खुर्रम, तो नापाक देश आहे बेटा, मी अन तुझे आजोबा हिंदुस्तान सोडुन इथे इतक्याच साठी आलोय की आपण काफ़रांत रहायला नको, अन तु??? अरे तिथे स्त्रीया प्रदर्शनीय वस्तु आहेत, शराब ,जुआ सारखी हराम व्यसनं आहेत, एकदा जरी पाय घसरला तरी कयामत च्या दिवशी, सुवर चे तोंड असेल तुझे पोरा, लहौल विलाकुवत "
"अहो पण अब्बा मी, मजा मारायला नाही जात आहे, मी जिथे जायचे म्हणलोय ते यु सी एल ए म्हणवते अब्बा, जगातले एक सर्वोत्तम विद्यापीठ आहे ते अभियांत्रिकीचे" खुर्रम डोळे आशेने शिगोशिग भरुन अब्बांकडे पाहत बोलला
तसं, काहीसा निश्चय करुन अब्बा उठले, म्हणाले
"खुर्रम , तु जा, आधुनिक शास्त्र शिक , पाकिस्तान अन इस्लाम चे नाव मोठे कर, पण एका अटीवर, तु लग्न करुन आपल्या बेगमेस सुद्धा अमेरीकेला न्यायचेस बस!!!, तखलिया"
खुर्रम पुढे इलाज नव्हता, लाहोरच्या मामाजींची परवीन तशीही अम्मी अब्बांच्या नजरेत भरलेली होतीच, बी.ए केलेली होती ते पण अर्थशास्त्रात, नकार बापाच्या तोंडावर द्यायची हिंमत नसायचा तो काळ होता भारत पाकीस्तानात, पुढे अमेरीकेतच दोन फ़ुले संसारवेलीवर उगवलेली, कादीर अन उज्मा, जुळी!!, पुढे परवीन ने जिद्दीने केलेले अर्थशास्त्रातले पी.एच्डी होते!. मुले सात वर्षांची झाली तशी प्रो.रहीम अन सौ.परवीन ह्यांनी पाकीस्तानात परत यायचा निश्चय केलेला, पाकीस्तान सरकारने त्यांना दिलेली "डीन, खान लॅब्स" ची पोस्ट तगडी होती, डेली रेपोर्टिंग फ़क्त नॅशनल सिक्युरिटी ऍडवायजरना होते त्यांचे. सौ परवीन, ह्या पण कहुटा वुमेन्स कॉलेज ला प्रोफ़ेसर,त्यात प्रोफ़ेसरांना त्यांच्या आवडत्या "गॅस सेंट्रीफ़्युज टेक्नॉलॉजी" वर काम करायची पर्वणी, टीपिकल बुद्दीजीवी उच्चवर्गीय मुस्लिम जोडपे, मुलांना रहीम साहेबांनी डी.एन.ए अन स्वातंत्र्य दोन्ही बहाल केलेलं, उज्मा सॉफ़्टवेर इंजिनियर होती अन कादिर न्युरॉलॉजिस्ट, दोघंही , परदेशात सेटल्ड. अन एक दिवस ती मनहुस सकाळ उगवलेली आठवताच रहीमसाहेबांची तंद्री तुटली, स्त्रीयांनी शिकु नये म्हणुन विरोध करायचा म्हणुन विरोधक तेहरीके तालिब पाकीस्तानने केलेला वुमेन्स कॉलेजवरचा हल्ला, एका अश्राप मुलीला वाचवण्याच्या नादात प्राध्यापक परवीन रहीम ह्यांच्या डोक्यावर मागुन झालेला ए के ४७ च्या दस्त्याचा क्रुर रट्टा, डॉक्टर मुलगा धावत आला, पण "अल्लाहु अकबर" "सबसे बडा अल्ला", त्यांच्या सर्व्हायकल आर्टरी मधे क्लॉट आल्या कारणाने आलेला कायमचा लकवा............. तो शुष्क होत गेलेला चेहेरा, पाखरे किती दिवस राहणार ? गेली बाळे उडुन, म्हातारा म्हातारीची काळजी घ्यायला अल्लाताला समर्थ सोडुन.......
"सलाम वालेकुम , प्रोफ़ेसर साहबsssssssss" , ती ओळखीची हाक ऐकताच त्यांची तंद्री तुटली, "आला सैतान" म्हणत खुर्रम साहब उठले
"आओ आओ इस्माईल मियां, आज बडी बात हुई है जनाब!!, आज आपकी मॅडमजी मुस्कुराई है "
"सुभान अल्लाह, परवर्दिगार को शुक्रिया, आज मै पाच नमाज पक्का पढुंगा सरजी, आज आप बाल तो कटवाईएगा न जनाब??"
"हां हां क्यों नही, आजाओ बरामदे में" , काही वेळाने इस्माईलची कात्री अन मिठ्ठास वाणी सुरु झाली,
"जनाब, एक दरख्वास्र्त थी, इजाजत हो तो फ़रमाऊं ??"
"बोलो मियां, आज तो हम खुब खुष है, ऍडव्हान्स चाहीए ? या थक गये हो बुढ्ढे की रोज दाढी बनाकर"
"तौबा तौबा, प्रोफ़ेसर साब क्या कह रहें है आप!!!, दरसल बात यह है की, मेरी एक बहन है, निलोफ़र, खैबर तरफ़ की है , लडकी है अनपढ, पर है बडी तेज, लाहोर मे थी तब पुराने मालिक के पास ,माईक्रो वेव तक चलाना सिखी है मेरी बहन"
"तो ?? निकाह करवाना है ?? बात चलाऊं मेरे ड्रायवर के बेटे के लिए?? "
"न साब, निकाह के लिए पैसे इकठ्ठे करेगी पहले, पठान की बेटी है, खुद्दारी की रोटी खाएगी, बस.... अगर मॅडमजी के साफ़सफ़ाई, और इंतेजामात के लिए अगर आप नौकरी पर रख लेते तो अहसान होते जनाब" .....
"बस इतना ही है ना!!!, अरे भई तुम्हारी बहन मेरी बेटी है!! ले आओ उसे, यही रहेगी खाएगी और आपके मॅडम का मन भी बहलेगा"
" सुभान अल्लाह, फ़रिष्ते है आप मालिक"
"चल भाग अब!!, मेरे ऑफ़िस जाने का टाईम हो गया है"
घाई घाईत जमीनीवर पडलेले केस सावरत इस्माईल मिया तिथुन सटकले.
सुमारे अर्ध्यातासाने, लॅब मधुन गाडी आली, आज ड्रायव्हर नवा पोरगा दिसत होता, घारे पिंगट डोळे अन साडेसहाफ़ुट उंच उंची, भुरके केस, सरकारी नोकरीत असल्याच्याने वेल मेंटेन दाढी. ते काही नवे नव्हते, परमाणु प्रयोगशाळेत काम करणा-या वैज्ञानिकांचा टर्शरी स्टाफ़ सतत रोटेट करायची एक पद्धत होती इस्न्टीट्युट ला.
"बरा पोरगा दिसतो आहे....." असं पुटपुटतच प्रोफ़ेसर साहेब काठी टेकत बाहेर पडले, आताशा त्यांना पण आर्थ्रायटीस चा त्रास सुरु झाला होता ना. साहेबांना पाहताच पोरगा हुषारी ने धावत पुढे आला, डिक्कीतुन व्हीलचेर काढली अन अनफ़ोल्ड करुन काही सेकंदातच व्हरांड्याच्या दारी पोचला.
"गुड मॉर्निंग सर, मी अश्फ़ाक" सुहास्य वदने तो बोलला
"आता तुम्ही अडकलात अश्फ़ाक मियां, नुसते ड्रायव्हिंग नाही, आता महीनाभर रोज, मी म्हणेल त्या त्या सेक्शन ला मला व्हिलचेर वर ढकलत न्यायचे" मिष्कीलपणे प्रो बोलले
"तो माझा सन्मान असेल साहेब, तुमची सेवा म्हणजे मुर्तीमंत पाकीस्तानाची सेवा करणे आहे"
क्वार्टर पासुन लॅब , ३ किमी होती, अश्फ़ाक मियांनी हां हां म्हणता गाडी लॅब ला आणली, गार्ड ने फ़क्त आत डोकावुन पाहीले, अन ओरडला "जाने दो", व्हिलचेर वर स्थानापन्न होताच प्रो म्हणाले" बेटा आज सेंट्रीफ़्युज चलो", २० मिनिट्स नंतर अश्फ़ाक त्यांना सोडुन आला गाडीच्या ड्रायवर सीट वर बसताच त्याने त्याच्या डायरीत काही नोंद केली, साधी सर्विस डायरी होती ती पॉकेट साईझ , लाल रंगाची.
संध्याकाळी ६ च्या सुमारास, प्रो परतले तेव्हा , इस्माईल एका बुरकाधारी स्त्री समवेत हजर होता , अश्फ़ाक सरांना लोटत आत घेऊन आला तसे दोघे झटकन उठुन उभे राहीले, इस्माईल धावत सामोरा आला
"सर, बहन को लाया हुं अपने मै, एssss साब को सलाम करो"
" वालेकुम जनाब" आवाज मंजुळ आहे पोरीचा, वाटते तरी सोज्वळ, निलोफ़र नाही का.....
"जाओ बेटी, उपर तुम्हारे बाएं तुम्हारे रहने का इंतजाम है", निलोफ़र निघाली, तसं इस्माईल म्हणाला
"जी लगाकर मेहनत कर बहन, यही मसीहा है हमारे, समझी", परत तोच फ़्रेश मंजुळ आवाज, मागे वळताना तिची थबकुन अश्फ़ाक सोबत झालेली नेत्रपल्लवी मात्र इस्माईलला भाऊ म्हणुन अस्वस्थ करुन गेली, अन नकळतच तो अश्फ़ाक चा राग करायला लागला
एपीसोड दोन :- वादळ.
महीनाभर हेच रुटीन चाललेलं, सकाळी इस्माईल दाढी करायला यायचा , फ़क्त आजकाल बहीणीच्या हातचा चहा प्यायला थांबायचा, तोवर प्रो फ़्रेश व्हायचे, ते होई होईस्तोवरच अश्फ़ाक गाडी घेऊन यायचा, साहेबांना गाडीत बसवताना निलोफ़र अन अश्फ़ाक ची नेत्र पल्लवी होऊ नये म्हणुन इस्माईल आटोकाट प्रयत्न करायचा, दिवसें दिवस त्याला बहीणीची जास्तच काळजी होऊ लागली होती, अश्यातच एक दिवस, काही कामात व्यस्त असलेली निलोफ़र फ़ोन ची रिंग ऐकुन धावत किचन मधुन बाहेर आली अन फ़ोन उचलला, ऑफ़िसर्स चे येणारे फ़ोन सवयीचे होऊन ती चटपटीत पोर हल्ली "गुड मॉर्निंग" वगैरे म्हणायला शिकली होती, तिने फ़ोन उचलला अन म्हणाली
"जी गुड मॉर्निंग, प्रो. रहीम खुर्रम हाऊस, आप कौन ??"
तिच्या त्या सवयी ने झालेल्या टीपिकल टेप सारक्या आवाजाला समोरुन फ़क्त "खॉक खॉक" असं दोनदा खोकलल्याचं ऐकु आलं अन फ़ोन कट झाला.
"कौन था बिटीया ?? "
"कोणी नाही प्रोफ़ेसर साहेब फ़ोन कट झाला, कोणी काही बोलायच्या आधी" निलोफ़र म्हणाली, दरम्यान एक अजुन चांगली झालेली डेव्हलपमेंट म्हणजे मॅडम परवीनजी खुपच सुधरत चालल्या होत्या!!, हल्ली तर त्या उशीला टेकुन बसत अन लाळ गळत का होईना एक दोन वाक्यं बोलंत. "अल्ला मोठा आहे, ह्या पोरीचे पाय घराला लागले अन बरकत आली, हिच्या निकाह चा मेहेर नजराना आपण करायचा " असं प्रो साहेब दिवसभरात २-३ वेळा स्वतःला बजावत असत. अन स्पीच थेरेपी ने परवीन ला बरे वाटेल ह्या समजुतीने रोज डीनर नंतर तिच्याशी गप्पा मारायचा परीपाठ त्यांनी सुरु केला होता. त्या दिवशी पण प्रोफ़ेसर साहेब नेहेमी प्रमाणेच दाढी करायला व्हरांड्यात बसले, तसे इस्माईल म्हणाला "सर, केस खुप वाढलेत, आज कापतो न "
"ठीक पण लवकर कर इस्माईल आज खुप काम आहे", इस्माईलची आज फ़क्त कात्रीच चालली, अन्यथा अश्फ़ाक ची कागाळी आज करायचीच असे ठरवुन तो आलेला होता, तरीही तो घाई गडबडीत तो चहा प्यायला थांबलाच!!. ठरल्याप्रमाणे अश्फ़ाक आला !! पण आज त्याने निलोफ़र कडे पाहीले पण नाही!! नजर जमीनी कडे होती साल्याची!!! "समजला असेल, खैबरी पठाण कसे मार देतात ते!!!" असं इस्माईल स्वगत बोलला त्यावर.
संध्याकाळी प्रो जसे आले तसे तडक पहीले त्यांनी निलोफ़र ला बोलवले, " निलोफ़र, बेटी, ही ब्रिफ़केस घे, अन माझ्या अलमीरा मधे जो लॉकर आहे त्यात हे ठेव बरं, तुझा अब्बा आज थकलाय ग पोरी" ,
"जी" असं मोजकंच बोलंत ती हुषारी ने ब्रिफ़ घेऊन वर निघाली तेव्हा प्रोफ़ेसर साहेब खाली काठी टेकत शॉवर कडे बिघाले होते अन अश्फ़ाक ची तिच्यावरुन नजर हटलीच नव्हती.
ती, २० मिनिटांनी खाली आली तेव्हा प्रो त्यांच्या ब्लॅक कॉफ़ी ची वाट पाहात होते, "इतका का वेळ लागला ग???" त्यांनी तडक निलोफ़र ला विचारले त्यावर
" वो जी अब्बाजी, मुझे अंग्रेजी गिनती ठीक से नही आती, और वो सेफ़ के बटन तो सब अंग्रेजी है न, तो समझ करके खोल के, और कागजात अंदर रखके आने में समय कट गया"
"ठीक है ठीक है!!!, अब लगता है तु कुछ दिनोंमे कॉलेज भी सिख ही लेगी बेटी" संतोषाने हसत प्रो म्हणाले. त्यावेळी निलोफ़र ने सोडलेला निश्वास त्यांच्या नजरेतुन चुकला. त्या रात्री निलोफ़र ने खास शामी कबाब, कोरमा अन पुलाव बनवले होते, तिच्या अब्बांचे आवड्ते, सख्ख्या बापाला जेऊ घालावे तसे त्या वेड्या पोरीने प्रों ना जेवु घातले होते, रात्री तर आज चक्क मॅडमजींनी तिच्या डोक्यावरुन हात फ़िरवुन माया केली होती, एकंदरीत म्हातारा म्हातारी आनंदात होते, रात्री प्रो. २१०० ला झोपी गेले, त्यांच्या रुटीन प्रमाणे दिवसभराच्या कामाने दमलेली त्यांची बिटीया निलोफ़र, त्यांना मॅडम जवळ बसवुन २०३० लाच गाढ झोपली होती.
रात्री, १२०० ला निलोफ़र हळुच उठली, हळुच बुरका घातला , अन चोरपावलांनी खोलीतुन खाली उतरायला लागली, उतरायच्या आधी तिने स्वतःच्या ओच्यातले "स्मिथ ऍंड वेस्सन "चिफ़्स स्पेशल रिवोल्वर" नीट तपासले, खाली उतरतानाच तिला खोलीत शांत पहुडलेले म्हातारा म्हातारी दिसले, पुढे काय होणार हे माहीती असल्यामुळे तिला घाम फ़ुटला होता, पण कश्याची ही कल्पना नसलेले ते दोन थकले भागले जीव आरामात झोपले होते, निलोफ़र खोलीत आली अन...... तिने हळुच........ म्हातारा म्हातारीच्या पायाला स्पर्श केला, डोळ्यासमोर काहीही दिसत नव्हते, आसवे दाटलेली, पण निग्रहाने ती पुसुन ती बाहेर पडली, पडल्यावर सरळ फ़ाटकाने न निघता ती घराच्या डाव्या बाजुला सीमाभिंती पर्यंत गेली अन ९ फ़ुटांची ती भिंत लिलया ढोपरं गुढघे सोलपटत का होईना चढली, पलिकडे अलवार उतरताच ठरल्याप्रमाणे तिला गाडी उभी दिसली, आत बसलेला तोच हसतमुख अश्फ़ाक, ती आवाज न करता गाडीत बसली ,अश्फ़ाक ने नंबर प्लेट्स बदललेल्या गाडीच्या, रात्रीच्या धुक्यातच, गाडी अन राघु मैना गुल झाले.
गाडीत बसल्यावर तिने पहील्यांदाच बुरका वर केला, तरीही त्याला नवल असे वाटले आहे असे काही त्याच्या भावा वरुन जाणवले नाही,
"तुला इतका वेळ का लागला ??? " कोरडेपणाने त्याने विचारले
"कारण मी माणुस आहे म्हणुन...." किंचित चिड अन उद्वेगाने ती म्हणाली
"माणुस.... मग ह्या पेशात कश्याला आलीस" हे स्वगत अश्फ़ाक मनात बोलला, अन मग काही ही न बोलता त्याने गाडी भरधाव लाहोर कडे सोडली.
सकाळ झाली अन प्रो साहेब उठले तर त्यांना निलोफ़र कुठेच दिसली नाही, तिच्या खोलीत पाहीले तर मोडक्या उर्दुत लिहिलेली एक चिठ्ठी,
"प्रिय अब्बा, मला माझे खावंद म्हणुन अश्फ़ाकसाबच हवे होते, आपण लग्न लावुन दिले असतेही पण इस्माईल भाईसाब मानणार नाहीत म्हणुन आम्ही दुर निघुन जात आहोत, मला माफ़ करा, निलोफ़र".
डोक्यावर लगुडाघात झाल्यासारखे प्रो पाच मिनिट्स शांत होते, फ़क्त विचार करत आता ते इस्माईल ला काय सांगणार होते,
होता होता फ़ाटकात इस्माईल चा आवाज आलाच "प्रोफ़ेसर साहब ssssssss" , तशी प्रोफ़ेसर साहेब निमुट येऊन खुर्चीवर बसले व्हरांड्यातल्या, इस्माईल ने दाढी केली तसं ते तंद्रीतच म्हणाले "आज बाल भी काटो" ,
तशी इस्माईल बोलला "कल ही तो कट मारा था साब"
"आज पुरी कम कर दो, सर्दी लगी जा रही है" इस्माईल ने निमुट आदेशाचे पालन केले अन विखुरलेले कापलेले केश गोळा करुन घेतले, अन नेहमी प्रमाणे आतल्या दाराकडे अपेक्षेने पाहु लागला, की आता बहन चहाचा कप घेऊन येईल, त्याची ती नजर असह्य होऊन प्रो साहेबांनी त्याला धडाधड सगळे सांगितले ती चिठ्ठी पण दिली, आता सुन्न इस्माईल झालेला, तो कसा बसा बोलला,
"अहो माझ्या गावाहुन पंचांपैकी एक आलाय, तो निलोफ़रचा पण दुरचा चचा लागतो, त्याला हे कळले तर??, ही काळतोंडी कुठे गेली माहीती नाही, माझ्या नावचा फ़तवा निघेल अन मला चौकीच्या बाभळीला बांधुन ए के ४७ ने चाळणी करायची शिक्षा मिळेल हो साहेब" बोलता बोलता गर्भगळीत झालेल्या इस्माईलच्या तोंडचा फ़ेसच पळालेला होता, तो फ़क्त म्हणाला
"साहेब कर्म बघा, ही हड्ळ बहीण म्हणुन मिळावी का मला?? तुमच्या कडे काय कमी होते, निकाह तुम्ही मी ठरवुन तिच्या भल्याचा होईल असाच केला असता न हो ??, आता फ़क्त ती चिठ्ठी मला द्या, ती कोणाच्या हाती लागली तर माझं मढं पडेल आडवं, अन रजा द्या मालक, ह्या पुढे मला पण भुमिगत व्हावे लागणार, तुमची सेवा करायचं पुण्य ह्या पुढे नाही मला "
प्रोफ़ेसर साहेबांच्या हाती " हो" म्हणणे सोडुन काय होते ?? ..... वॉकर घेऊन चालु लागलेल्या मॅडमजी पण हतबद्ध होऊन जाणारा इस्माईल अन काळवंडलेल्या चेहे-याचे प्रोफ़ेसर साहेब बघतच राहील्या, वादळ येऊन गेलं होतं.........
इस्माईल, सकाळी जो निघाला तो आधी कहुट्यात चोरासारखा भटकला, कुठे जावे ते न सुचल्यासारखा तो घुमत होता, शेवटी संध्याकाळी तो जरा हुषारला अन रात्रीची लाहोरला जाणारी बस त्याने पकडली, मनात त्याने कदाचित निलोफ़र ला चपले ने बडवले असेल अन अश्फ़ाक ला तर उभा जाळला असेल, सकाळी लाहोरला उतरल्यावर त्याने आधी एक चहा मारला, थोडा हुषारल्यावर त्याला समजले की आता आपण कहुट्या पासुन दुर आलो आहोत तसा तो जरा पाघळला, त्याने सराईतपणे एका टॅक्सी ला हात केला अन बसल्यावर "हिरा मंडी चलो" म्हणाला
"ओये सुबह सुबह मुड विच आगया खोत्त्या" हे टॅक्सीवाल्याचे खवचट शब्द त्याने दुर्लक्षिले, कारण तसंच होतं, हिरा मंडी ही लाहोरची प्रसिद्ध वेश्या वस्ती होय, हिरा मंडी ला उतरताच, त्याने थोडी विचारपुस केल्या सारखे भासवले अन आपल्या मागे कोणी येत नाही हे कन्फ़र्म करुन तो कोठी नंबर १३ ला आत शिरला, आत पार भुतबंगला झालेला होता, कबुतरांचे घुमण्याचे आवाज पण भयाण वाटत होते, तो तसाच आत शिरला मधल्या चौकात आल्यावर थोडा घुटमळला , अन उजवीकडच्या खोली पुढे उभा राहीला अन लयीत तीन ठोके देऊन दार ठोकले ,तसे काही सेकंदातच दार उघडुन समोर उभी होती ती निलोफ़र!!!!!!!, पण जरा ही न विचलित होता तो सराईत पणे आत शिरला अन दार लावुन घेतले,
"ओ के आहेस न ??" निलोफ़र उर्फ़ गौरी चतुर्वेदी ला इस्माईल उर्फ़ राजेश देशकर हिंदीत विचारत होता.....
"हो, पण त्या जोडप्याला सोडताना फ़ार कसंतरी होत होतं राजेश"
" ओये कक्के राजेश समझा यार कुडी नूं, जे अकल से डोरी (अंधी) हो गई है एमोशनल स्यापे कर्रेसी रे भाया" थेट हरयाणवी हिंदीत अश्फ़ाक उर्फ़ ऑफ़िसर करणसिंह गुज्जर म्हणत होता.
"तु चुप कर हरयाणवी!!!, साले बैल बुद्धी है पुरा"!! अभी काम पुरा होने दे, गौरी सॅटफ़ोन काढ"
गौरी ने मेकॅनिकली पायाखालची सतरंजी सरकवुन एक फ़रशी उचकटली अन आतुन ३, .४५ कॅलिबर ची पिस्टल्स अन एक सॅटफ़ोन काढला. हा स्पेशल सॅटफ़ोन भारत इलेक्ट्रोनिक्स नी बनवला होता अर्थात ह्याचे हार्डवेर पण प्रोप्रायटरी होतेच पण शिवाय ह्याची डीजिटल सिग्नेचर प्रस्थापित कुठल्याही सिस्टीम ला म्हणजेच मोटोरोला, पायोनियर, केनवुड ला मॅच होत नसे. ह्या फ़ोनने कुठल्या ही देशातुन कुठ्ल्याही भारतीय वकीलात, युद्धपोत, आर्मी बेस, पोलिस स्टेशन, सीबीआय, अन पीएमओ ला फ़ोन करता यायचा फ़क्त, राजेश ने कोड दाबला तसा पलिकडुन आवाज आला, तो आवाज इस्लामाबादेतल्या भारतीय वकीलातीतुन आला होता. नंबर पाहताच भारताचे पाकीस्तानातले कल्चरल सेक्रेटरी संकेत पारधी ऑनलाईन होते, त्यांची मिटींग पाकचे कल्चरल सेक्रेटरी एहसान कुरेशी ह्यांच्या सोबत चाललेली, शिष्टाचार पुर्वक पारधी साहेबांनी एका हाताने फ़ोन दाबत
"अपोलोजिज सेक्रेटरी सर, इट्स अर्जंट, कॅन आय रिसिव द फ़ोन बाय युवर पर्मिट ? " असे विचारले
"बाय ऑल मीन्स सेक्रेटरी सर, टेक युवर ओन टाईम"
"सिग्नेचर व्हेरीफ़िकेशन, ५..३...२ खेळाल की तीन पत्ती ?? "
"तीन पत्ती "
"व्हेरीफ़ाईड, सिक्युर्ड, बोला"
"एक्स्फ़िल, रिक्वेस्ट"
"डन, अटेंप्ट @ 1900 Hrs टुडे इव्ह, ओवर न आऊट"
फ़ोन कट करुन पारधी साहेब थेट विषयालाच हात घालुन बसले
"हां तो कुरेशी साब, क्या ख्याल है, आपने जो हिंदुस्तानी फ़िल्मों पर बॅन लगवाया है उसे हटवाईये और हम आपके गझल मुशायरे की खुशामदीदी कर देंगे........."
हे होत असतानाच पारधी साहेबांनी तीन वेळा घाम पुसला अन आपल्या पी ए वर ओरडले
"रमन मै ३ बार पसीना पोछ रहां हुं , जाओ तो ए सी ठीक करवाओ और कुछ खाने का प्रबंध करो"
पॅंटीत झुरळ शिरल्यासारखा रमन पळाला, तो पहीले किचन मधे गेला, तिथुन ए सी चं टेंप्रेचर कमी केलं अन येताना रॉ चं स्टेशन ऑफ़िस पडायचं तिथे फ़क्त डोकावला व मिथिलेश बनर्जी ला बोलला.
"साहब का पसीना निकला, व्हाईट हॅट, काम पे लग जा "
बनर्जी ने लगेच एक डायरी काढली त्यातुन एक नंबर काढुन तो पीसी टर्मिनल ला फ़िड केला पीसी वर असलेल्या सिस्टम ने तो लाहोर जवळ असलेल्या एका पाक रेंजर्स पोस्ट वर कनेक्ट थ्रु पॅच केला,
"जी , xxx पोस्ट "
"हां जनाब, आपकी दस्तखत ???"
"साले हरामी तु समझा क्या है अपने आप को?? तु दो टके का मेजर पाक रेंजर्स का, साले आर्मी हेड क्वार्टर से दस्तखत पुछता है , नामाकुल , खोत्या, वह भी एक पंजाबी अफ़सर से!!! साले कराची का सिंधी है की बलोच" बनर्जी केकाटला
" माफ़ी जनाब माफ़ी", समोरच्याची चड्डीच नाही तर पुर्ण युनिफ़ॉर्म वल्ला झालेला बंगाली मनमुराद ऍन्जॉय करत होता "हुक्म किया जाए जनाब "
"सुन, आज दो बंदे और एक खवातीन, तेरे पोस्ट से होते हुए, अटारी पोस्ट तक जाएगी उन्हे बाकी असला सप्लाई कर दिया है, तु बस चुप चाप उन्हे अटारी तक ले जा, ये तीन उधर पहुंचे तो समझो ३ बम और फ़टेंगे हिंदोस्तां मे " अन खरंच एखादा खुनशी कर्नल असल्यागत बनर्जी खदा खदा हसला, फ़ोन कट करुन तो मागे वळुन पाहतो ते हसु दाबत स्टेशन डारेक्टर जीवन बार्दोलोई, संकेत पारधी सर अन रामन हसु दाबत उभे असलेले, तो बिचारा ओशाळा झाला,
संध्याकाळी , कल्चरल मिटींग च्या मिनट्स फ़ोन वर डिस्कस करताना दिल्लीतुन एम ई ए ला बसलेले एडीशनल कल्चरल एन्वॉय ऑफ़ ईंडीया अवनित झा म्हणाले
"और बताओ संकेत, तबियत कैसी है तुम्हारी??"
"सर पता नही , आज तीन बार जम के पसीना आया"
बोलणे संपल्यावर झा सरांनी एक फ़ोन लावला, लोधी रोड दिल्ली ला १३ मजल्याच्या एका बिल्डिंग मधे १२व्या मजल्यावर तो फ़ोन उचलला, गेला
"बोलो अवनित, कैसे हो भाई ??"
"यार भुल्लर कित्थे था सरदार ?? तेरे "३ " बार कॉल किया तैने उठाया हे नही"
"ओये कोई नही, काम मे था, तुने पक्का तीन बार फ़ोन किया था न ? "
"हां बे"
" ओये सुन कुछ काम है, मै जा रेयासी, इक काम करते है, शाम को मेरे बंगलो पे आजा व्हिस्की पिते है "
"ओके, ७.०० बजे आऊंगा "
जसजीत भुल्लर, ह्यांनी तडक एम एच ए ला फ़ोन लावला
काही मिनिटांतच, एम एच ए मधुन अटारी बीएसएफ़ ला फ़ोन गेला,
" तीन बंदे, २ बंदे एक औरत बुरकानशीन, शाम ७, अटारी, खीच लिया जाए"
" ओके सर, जय हिंद, ओवर न आऊट"
संध्याकाळी बरोब्बर सात ला हातात काही सुटकेसी घेऊन दोन पुरुष अन एक स्त्री अटारी ला पोचले, बी एस एफ़ जवानांनी मेकॅनिकली त्यांचे पासपोर्ट्स तपासल्यासारखे केले व शेवटी एकदाचे गेट उघडले, गेट पासुन १०० मी वर एक काळी स्कॉर्पियो उभी होती, तिघे ही त्यात बसले, स्कॉर्पियो अमृतसर ला पोचे पर्यंत कोणी काहीच बोलले नाही
भारतीय गुप्तहेर संस्थेचे ३ बहाद्दर अधिकारी, पाकीस्तानात बहीर्जीच्या औलादी बनुन एक वर्ष राहुन एक अतिशय रिस्की मिशन पार पाडुन आले होते .
काय होते ते मिशन ?? काय काय केले त्यांनी ?? त्या मिशन मधुन आलेला लिंकप पुढे कुठे कुठे कसा वापरला गेला ?? फ़ायनल रिझल्ट काय लागला ??
ह्या सगळ्यासाठी वाचा , छद्मयुद्ध -२
सुरूवात सॉलिड आहे.
सुरूवात सॉलिड आहे. उत्कंठावर्धक!!!
जबराट... पुढचा भाग लवकर येवु
जबराट...
पुढचा भाग लवकर येवु द्या
विकु, पुढचा भाग आला पण. हय
विकु, पुढचा भाग आला पण. हय किधर तुम?
विशाल दा नंदिनी जी आपले
विशाल दा
नंदिनी जी आपले आभार
भारी....
भारी....
आभार
आभार
आं? बर्याच लोकांनी हे
आं? बर्याच लोकांनी हे पाहिलेलेच दिसत नाही. वा: खास सोहोण्याबाहापू स्टाईल....
मी पण हे अत्ताच बघतेय . मस्त!
मी पण हे अत्ताच बघतेय . मस्त!
काय भारी लिहिलय. खास
काय भारी लिहिलय.
खास सोहोण्याबाहापू स्टाईल...>> +१
मायला ही कोणी वर आणली! तेव्हा
मायला ही कोणी वर आणली! तेव्हा फार क्रूड लिहित असे मी
सोहोण्याबाहापु, म्या...
सोहोण्याबाहापु, म्या... म्याच आणली बगा मोत्यासारकी कथा समुद्राच्या तळापासून. एक डाव मापी असावी !
मापी!!?? का हो रॉहु लगे लगे
मापी!!?? का हो रॉहु लगे लगे पायताण हाणायले डोक्यावर आमच्या?
मी पण आत्ताच पाहिली. अगदी
मी पण आत्ताच पाहिली. अगदी उत्कंठा वाढलीय. दुसरा भाग लगेच वाच्णार. मस्त लिहीलं आहे.
सोन्याबापू, एक विनंती. लेखाच्या शेवटी छद्मयुद्ध -२ ची लिंक देणार का?