Submitted by बेफ़िकीर on 11 December, 2013 - 02:39
मूक शिवालय, सळसळ पाने, वेडे पक्षी, एक प्रवासी
पिंडीवरती युग ओघळते गाभार्याची खोल उदासी
चिरंतनाच्या अस्तित्वावर क्षणभंगुरतेच्या कागाळ्या
निर्माल्याची ओल जगवते धर्माधर्मांच्या लाथाळ्या
काय हेलपाटा पडला हा, हे तर डोंगर दुरुन साजरे
अंधाराचा राजदूत मी, मी स्वीकारू तेज का बरे
शून्यामधल्या प्रसववेदना गूढ, निराकारी, बहुपदरी
इथले फेरे या हृदयाच्या निर्हेतुकश्या अफरातफरी
-'बेफिकीर'!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान..... शेवटचे कडवे आणि
छान..... शेवटचे कडवे आणि त्यातही शेवटची ओळ विशेषच.
वा!
वा!
तात्विक मुद्दा प्रभावीपणे
तात्विक मुद्दा प्रभावीपणे मांडणारी कविता खूप आवडली.
क्या बात!
क्या बात!
बापरे, जबरी आहे. नेहेमीच्या
बापरे, जबरी आहे. नेहेमीच्या वर्तमानकाळाशी सम्बधीत कविता/ गझल वाचुन तेच ते वाटत होते. एकदम गुढ अध्यात्मात गेल्यासारखे वाटले.
जबरी या हृदयाच्या
जबरी
या हृदयाच्या निर्हेतुकश्या अफरातफरी>>>>> अफलातून.
कळाली नाही, पण शब्दरचनेतील
कळाली नाही, पण शब्दरचनेतील गूढ व डोळ्यासमोर निर्माण होणार्या प्रतिमा यामुळे आवडली. पुन्हा वाचून पाहीन समजते का.
मस्त पण लवकर संपली
मस्त

पण लवकर संपली
प्रभावी....... ---------- वैभ
प्रभावी.......
----------
वैभू,
लौकर संपली, असं मला तरी वाटलं नाही रे ! जे बोलायचंय ते बोलून झालंय ना ? बस तर मग !
थोडक्यात मजा असते ना ?
वैभवशी सहमत. नेहमीप्रमाणे
वैभवशी सहमत. नेहमीप्रमाणे सुंदर रचना ,पण एकदिश नाही असं जाणवलं .पहिल्या दोन अन शेवटच्या दोन ओळींमधून जे सापडलं ते मधल्या ओळींत विखरून गेलं..
सर्वांचा मनापासून आभारी आहे.
सर्वांचा मनापासून आभारी आहे.
मागील कवितेची थोडीफार
मागील कवितेची थोडीफार पुनरावॄत्ती वाटते.
पण चांगली आहे. !