Submitted by वेल on 10 December, 2013 - 02:51
बोरिवली पश्चिम येथे घरातील वरची कामे करायला, ५ वर्षाच्या मुलाला पाहायला आणि पलंगास्थित आजीला सांभाळायला पूर्ण वेळ राहाणारी बाई हवी आहे.
सुट्टी - महिन्यातून २ रविवार
पगार - सहा हजार.
जितक्या लवकर मिळेल तितके चांगले.
पूर्वीची बाई(नात्यातली) खूप सुट्ट्या घ्यायची. एक दिवस सांगून तीन दिवसांनी परत यायची. ह्यामुळे तिला ह्यावेळी सुट्टी दिली नाही तर "मी एक तारखे पासून सोडून जाते" असे तिने सांगितले.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
साती.. पॉईंट आहे.
साती.. पॉईंट आहे.
saatee >> anumodan. agadee
saatee >> anumodan. agadee sagaale kapade naahee dile taree varshaatoon ekadaa 700-800 chee saadee aaNi ekadaa saadhee saadee asa hotach.
मी माझ्या मोलकरणीला असे
मी माझ्या मोलकरणीला असे सांभाळते माहित नाही बरोबर आहे का नाही ते पण मी एकदा लावलेली मोलकरीण सहसा काढायची वेळ आलेली नाही. आम्ही साधारण तीन साडेतीन वर्षांनी एकदा घर बदलतो, प्रत्येक मोलकरीण आम्ही जाणार म्हणून डोळ्यातून पाणी काढते (खखोदेजा). सध्याच्या मोलकरणीने आम्ही घर बदलू तेव्हा जवळच शिफ्ट होणार आहोत तर ती तिकडे कंटिन्यू करणार असे सांगितले आहे.
१. मोलकरीण लावताना सरासरीपेक्षा जास्त पैसे देते. तिला आधिच तंबी देते मागशील तेवढे पैसे देत आहे महिना दोनाच्या वर दांड्या झाल्या तर पैसे कापीन. जास्तीच्या दांड्या झाल्या की पैसे कापते आणि सांगते पुढचे दोन महिने रेग्युलर आलीस तर कापलेले पैसे परत करीन. बाई रेग्युलर येते, मी पैसे परत करते. आपल्याला १००-२०० रु इकडे - तिकडे फरक पडत नाही पण तिनी मला taken for granted घ्यायला नको, तीला कापलेल्या पैश्यांची किंमत कळते. न-सांगता दांडी, पैसे कापणार नो पैसे परत.
२. दिवाळीला पूर्ण महिन्याचा पगार बोनस देते. सर्व हिंदू सणांना सुट्टी देते. सहसा सुट्टी मागितली कि नाही म्हणात नाही, तिलाच replacement आणून दे सांगते, replacement च्या पगाराचे झंझट मी गळ्यात घेत नाही तुमच तुम्ही बघा सांगते. सुट्टीत आम्ही पूर्ण महिनाभर घरांत नसलो तरी तिच्या पगाराचा खाडा करत नाही.
३. घरांत नको असलेल्या सर्व वस्तू किंमतीच्या उच्चार न करता देऊन टाकते ---- जुने कपडे, भांडी, चादरी सगळं आल. माझी घरबसल्या स्वच्छ्ता होते. आवारायला काढताना जर मला आधीच माहित असेल कि मोस्टली भंगार निघणार आहे तर तिलाच वर कामाला बोलावते आणि मला नको असलेल्या वस्तू घेऊन जा सांगते.
४. पाहुणे आले म्हणून कधीच जास्तीचे पैसे देत नाही. They are part and parcel of my life so yours too.
५. एखादी गोष्ट मला आवडली नाही तर साहेब रागावले असे सांगते. बायकांना माझ्या नापसंतीचा फारसा फरक पडत नाही पण नवरा चिडलेला कोणत्याही भाषेत कळते.
आपली लाइफ स्टाइल बघून ह्या
आपली लाइफ स्टाइल बघून ह्या बायकांचे ही डोळे फिरतात. परवा माझ्यासामानात एक वापरलेला स्मारट फोन बघून लगेच डिमांड आली एखादा हॅड्सेट असेल तर द्या म्हणून. आमच्या शेजारच्या घरी ती बाई तर हाउसवाइफ आहे. व एकच मुलगा. तरी तीन मेड्स आहेत. दोन वेळा पूर्ण ३००० स्क्वे फूट घराचा झाडू पोछा. आणि एक वरकामाची बाई आहे दिवस भराची तिला डायवर आणून सोडतो आणी परत घरी सोडतो. तीन लोकांच्या फॅमिलीत इतके काय काम निघत असेल? शी इज अ लकी लेडी. मी आजिबात दु:स्वास करत नाहीये. पण कुतुहल वाटले.
raajasee - point 1 aavadalaa.
raajasee - point 1 aavadalaa.
2,3,4,5 kela jatach. paN point 1 mastach,
बाईचे रेट्स प्रत्येक शहर,
बाईचे रेट्स प्रत्येक शहर, एरिया, घरची एकूण कामं, घरातील एकूण माणसं यावर डिपेन्ड असतात त्यामूळे कमी जास्त असं आपण ठरवू शकत नाही. ज्या अर्थी वल्लरिच ला त्या रेट मध्ये बाई मिळालिये म्हणजे एक तर तिथे त्या एरियात तो रेट असेल किंवा बाई खूप जुन्या असतील.
असो वल्लरीच तु एकदा समोर बसवून त्यांची अडचण समजून घेण्याचा प्रयत्न कर. मोस्टली दांड्यांचे कारण पगार वाढवलेला नसणे असे असू शकते.
राजसी काही पॉईंट्स साठी सेम
राजसी काही पॉईंट्स साठी सेम पिंच.
मी बाईच्या बाबतीत अत्यंत लकी आहे. माझं घर छोटं आहे. आणि काम ही तसं कमी असतं. ती कामाला लागली तेव्हापासून मी तिला १५०० देत होते याच महिन्यात १०० रूपये वाढवून १६०० केले. या पगारात ती माझ्या घरातली सर्व कामे करते. स्वयंपाक, माझा डबा, भांडी, केर, फरशी. आठवड्यातून एकदा सर्व फर्निचर पुसणे, अधून मधून झाडांना पाणी, कधीतरी फ्रिज साफ, खोबरं खवणणे, गुळ चिरणे, शेंगदाणे/रवा भाजणे. माझ्या घरी लागणारं गव्हाचं पिठ (कणिक) ती स्वतः आणते. (मी त्याचे वेगळे पैसे देते)
पण मी तिला खूप चांगली ट्रिटमेंट देते.
* पहिली गोष्ट मी तिला कामवाली न मानता घरच्या मेंबर प्रमाणे वागवते.
* रोज तिच्याशिवाय मी चहा पित नाही, तिला काहीतरी खाल्ल्याशिवाय सोडत नाही.
* माझ्या घरची किल्ली तिच्याकडे आहे, तिला कधीही येऊन काम करून जा असं सांगितलं आहे. फक्त स्वयंपाक मात्र वेळच्या वेळी करून जाते आणि नंतर येऊन केर फरशी वगैरे करते.
* कधी कधी रंग जाणारे कपडे वगैरे सुद्धा (४-५) धुते.
* तिला सुट्टीला कधीच नाही म्हणत नाही आणि पगार कापत नाही.
* रोज फरशी पुसलीच पाहिजे असा दंडक मी ठेवलेला नाही, उलट तिच म्हणते २ दिवस फरशी पुसली नाही आज पुसते.
* जुने कपडे, वस्तू तिला हवं का विचारते आणि देते.
* दिवाळीला एकदा थोडी कॅश, तिला साडी मुलिला मटेरियल आणि मुलाला १०० रूपये असे दिले होते.
* या दिवाळिला संपूर्ण पगार नाही दिला, फक्त हजार रूपये दिले.
बायांचे गणित थोडे निराळे असते. नाही म्हणलं तरी जितक्यास तितकं काम कुणीच करू शकत नाही. एखादं भांडं विसळून घेणे, कधी एखादा कप चहा करायला लावणे अशी कामं होतातच त्या बायांकडून. मला एक कळून चुकलंय की आपण ४ शब्द चांगले बोललो की त्या आपल्यावर जीव ओवाळायलाही तयार असतात. त्यांच्यावर विश्वास टाकला की त्यांना जबाबदारी वाटते आणि मग आपल्या घराची किंवा कोणत्याही वस्तूची त्या बायका आपल्या पेक्षा जास्ती काळजी घेतात.
पुण्यात - अॅट लिस्ट बावधन
पुण्यात - अॅट लिस्ट बावधन मध्ये पुर्ण वेळ कामवाली बाई चा रेट ६५०० पेक्षा जास्त नक्कीच नाहीये. - मी तेवढेच देतेय.
कोणी अगदीच गरजू असतात ते ७००० किंवा जास्त द्यायला तयार होतात. पण मग वेळेची अपेक्षा पण सकाळी ८
ते संध्याकाळी ८ अशी असते
त्यांचे राहणीमान आप्ल्यासारखे होण्यासठी जितके लागतील तितके पैसे देणे आपली जबाबदारी नाही,
घरकाम येण्यासाठी त्यांनी कोणतेही शिक्षण घेतलेले नसते, त्यासाठी पैसे खर्च केलेले नसतात.
तर किमान तगून धरण्यासाठी निम्न राहणीमानात आवश्यक असलेल्या गोष्टी चा ते अजून पैसे मिळवण्यासाठी वापर करतायेत.
अजून पैसे हवेत तर शिका, त्या कौशल्यावर आधारित नोकरी करा आणि मग राहणीमान सुधार्ण्याची अपेक्षा करा!
अर्थात कोणत्याही कामाचे मूल्य "सप्लाय अँड डिमान्ड" वर ठरते शिवाय रिप्लेसमेन्ट चे कष्ट किती त्यावर ठरते.
जर तुमच्या भागात कामवाल्या बायांची मागणी जास्त आणि पुरवठा कमी असेल तर अर्थात तुम्हाला त्यांच्या अटींवर सहमत व्हावे लागेल आणि त्या मागतील तितके पैसे पण द्यावे लागतील.
अरे हो Increment राहिले की
अरे हो Increment राहिले की वर्षभर काम केले की स्वतःहून पगारवाढ नाही मागितली तर मीच देते.
अमा, त्या बाईचे घर स्पॉटलेस स्वच्छ अस्ते का दिवसाच्या कोणत्याही प्रहरी?
सगळ्यांनीच मस्त सुचवले आहे...
सगळ्यांनीच मस्त सुचवले आहे... साती संपूर्ण सहमत सगळ्या पोस्टसाठी.
खरंच चांगली कामवाली आणि चांगला टेलर मिळणं नशीबातच असावं लागतं... पुन्हा आपले नी त्यांचे सूर जुळायला लागतात.
मी सुद्धा आधी कामाला असलेल्या मुलीला घरातल्या मेंबरप्रमाणे वागवायचा प्रयत्न करून पाहीलं, जेवताना तिच्या सोबतच जेवणं, तिला वेगळं ताट खाली बसवणं असं नाही... वाढूनही तिचं तीच घ्यायची हवंय ते...
नातेवाईकांच्या लग्नाला स्वता:बरोबरच नेणं, बाहेर फिरायला जाताना सोबत नेणं... पण नंतर लक्षात आलं अमा यांच्या म्हणण्यानुसार काही वेळेस लाईफस्टाईलची भुरळ पडतेय... मग मॉलमध्ये नेणं बंद केलं... सुरूवातीला कसं वागायचं तेच कळत नव्हतं अती गोड वागलं की त्याचा गैरफायदा घेणं, स्ट्रिक्ट वागलं की काम सोडून जाणं... मनस्ताप व्हायचा चांगलं वागूनही फसवलं की...
अर्थात याचंही गणित पतंगासारखंच असतं नेमकी ढील देता यायला हवी... अती खेचून नाही अती ढील देऊन नाही... जिथे आपल्या व्यवहारात बसत नाही तिथे तडजोड नाहीच... तेवढा वचक असावाच. वायफळ चौकश्या, गरजेशिवायच्या जास्तीच्या दांड्या, कामातील ढिलाई किंवा फारच अस्वच्छता (उन्नीस बीस चालतं तेवढं चालवून घावंच लागतं) अगदीच नाही चालणार. बाकी बोनस, कपडे सहमत. पण काहई मुद्द्यांवर ठाम असावं. मुख्यता बाई विश्वासू आणि स्वच्छ असावी.
राजसी, असेल बाबा, काय
राजसी, असेल बाबा, काय म्हायती. कधी बोलवले नाही तिने आत. लिफ्ट साठी उभेराहिले तर कसनुशी
हसते ती फक्त.
अजून पैसे हवे असतील तर शिका. >> कधी? त्यालाही पैसे लागतात. वेळ? तिचे स्वतःचे घर व मुले,
तब्येत? थोडा जास्त इन्क्लुसिव विचार व्हायला हवा. शीइज गिविन्ग यू अ सर्विस. पे मार्केट रेट्स.
मी घरी जाते तेव्हाही घामेजलेल्या थकलेल्या बायका कामावर रिपोर्ट करत असतात. कधी घरी जातील. घरचे बघतील मुलांपुढे अन्न ठेवतील? आणि घरातल्या बायका कसली कामे देतात डाळिंब सोलून घ्या. कपड्यांच्या घड्या करा. रोज जमीन धूवून पुसा. ह्याबाबतीत मला अमेरिका आवडते.
सम डिग्निटी ऑफ लेबर.
ह्या रात्रीच्या बायकांचे कामाचे शेड्यूल लिफ्ट ला १० मिन्ट उशीर झाला तरी गडबड्ते.
इन्फ्लेशन अॅडजस्टॅड सॅलरी द्यायला हवी असे वाट्ते का कोणाला?
दहा हजार घरकामाचे? कठिण आहे.
दहा हजार घरकामाचे? कठिण आहे. काही शंका विचारतो, कुणी उत्तर दिले तर आनंद होईल.
जेव्हा तुम्ही १० हजार देता तेव्हा तुमचे महिन्याचे उत्पन्न किती असते? निव्वळ उत्पन्न - (मायनस) कामाच्या ठिकाणी येण्याजाण्याचा खर्च, रोज ये जा करण्याची दगदग प्लस किती तासाचे काम असते? आय मीन हे करून जर हातात क्ष हजार उरतात तर १० बाईला देऊन उरताट तितक्यासाठी इतकी हाय-उपस करतो का आपण?
अ.मामी, १ शंका विचारू? रागावू नका, पण २ तास शांत डोके ठेवण्यासाठी डॉग वॉकर ठेवलाय, तर उरलेले २२ तास डॉग्ज का ठेवलेत?
निनिकुची पोस्ट
निनिकुची पोस्ट आवडली.

त्यांच्यामूळे आपल्याला एक तास फ्री मिळतोय म्हणून माझ्या एक तासाच्या कमाईएवढे पैसे मी नाही देऊ शकत.
उद्या अंबानी एका तासाला एक करोड कमवतात म्हणून त्यांच्या घरात एक तास लादी पूसायला एक करोड देतील काय?
आणि हो, मुलांची किंवा आजारी
आणि हो, मुलांची किंवा आजारी माणसांची सेवा करायला ठेवणार असाल तर त्या बाई/ माणसाची पूर्ण वैद्यकीय तपासणी करून ठेवा.
कारण मुलांच्या/ आजार्यांच्या बॉडी फ्लूईडशी या लोकांचा सतत संपर्क येणार असतो आणि सगळ्याच लोकांना स्वच्छतेच्या संकल्पना माहिती नसतात.
माझी एकदा फार मोठी चूक झाल्येय.
जेव्हा तुम्ही १० हजार देता
जेव्हा तुम्ही १० हजार देता तेव्हा तुमचे महिन्याचे उत्पन्न किती असते? निव्वळ उत्पन्न - (मायनस) कामाच्या ठिकाणी येण्याजाण्याचा खर्च, रोज ये जा करण्याची दगदग प्लस किती तासाचे काम असते? आय मीन हे करून जर हातात क्ष हजार उरतात तर १० बाईला देऊन उरताट तितक्यासाठी इतकी हाय-उपस करतो का आपण?<<< इब्लिस, मी दोनच महिन्यासाठी ठेवली आहे. आमच्याकडे कामाला बायका मिळत नाहीत. त्यात सेल्वीला जरातर्री इंग्रजी समजते. यापूर्वी वर्षभर हिलाच कूकिंग व इतर कामांचे पाच हजार देत होते. आता लेकीला सांभाळायचे जास्त देत आहे. माझ्या लेकीला सांभाळाअय्चे कष्ट विचारात घेता जास्तीचे पैसे अर्थातच जस्टीफाय होतात.
घर मोठे आहे, अंगण त्याहून मोठे, त्यामुळे ते साफ ठेवणे (आमच्याकडे हायवे जवळ अस्ल्याने प्रच्म्ड धूळ असते. दोनदा झाडून घेते ती) झाडे, फुलझाडे यांना पाणी घालणं, किचन स्वच्छ ठेवणं काही घरगुती सामान हवे असेल तर दुकानातून आणून देणं, ही सगळी कामं ती व्यवस्थितरीत्या करते. स्वयंपाक तर माझ्यापेक्षा उत्तम!!
जिथे काम करते आहे तिथे यायची जायची दगदग नाही. चालत जाऊन येऊ शकते, सध्या जे काम करते आहे ते पैशाहीपेक्षा "करीअरची" उत्तम संधी या दृष्टीने बघत आहे. त्यामुळे सेल्व्हीला एवढे पैसे देऊनही मी समाधानी आहे. मला घर आवरायचा, स्वच्छ करायचा, स्वैपाकाचा त्रास नाही. नवर्याचं शेड्युल विचित्र असल्याने त्यालापण घर सांभाळायची जबाबदारी घ्यावी लागत नाही. काम करून उरलेला वेळ मी माबोवर बागडू शकते.
माझ्यामते तुम्ही दोन बाई
माझ्यामते तुम्ही दोन बाई ठेवा.. एक आजीचे काम (नर्सिग) आणि दुसरं उरलेले घरकाम... कारण दोन्ही कामासाठि स्किल्स वेगळे आहेत.
बाकी कामवाली बाईचा अनुभव - एकदा नवीन मुंबईत या... त्यांचा राजेशाही थाट असतो... सगळ्या कामवाल्या बाई अर्ध्या तासाच्या वर काम करत नाही (महिना २००० रु २४ दिवस काम).. कपडे धुणारी कपडे सुकत घालत नाही.. स्वयंपाकी आवरुन ठेवत नाही... ते चारपेक्षा जास्त माणसे असतील तर ते घर घेत नाही... आम्ही तर एकीला रेल्वेच्या पासाचेपण पैसे द्यायचो..
हे पण डिमांड-सफ्लायवर चांलते.. दक्षिण मध्य मुबईत रेट कमी आहेत.. पण वेस्ट्ण लाइनवर रेट जास्त आहे.. हार्बर लाइनवर मानखुर्दपर्यत/ खारघरनंतर रेट कमी आहे...
मला अशी एक बारीकशी शंका येतेय
मला अशी एक बारीकशी शंका येतेय की कॉर्पोरेट सॅलरीजमुळे - आयटी इंडस्ट्रीसारख्या - घरकामाचेही दर मुंबईसारख्या ठिकाणी एवढे वाढले आहेत. पण ज्यांना अशा लेव्हलच्या कॉर्पोरेट सॅलरीज नसतील किंवा नवराबायको दोघंही मिळवते नसतील अशांना हे दर कितपत परवडतात? ते काय करतात? (माझं गृहितक चुकलेलं असू शकतं..)
जेव्हा तुम्ही १० हजार देता
जेव्हा तुम्ही १० हजार देता तेव्हा तुमचे महिन्याचे उत्पन्न किती असते? निव्वळ उत्पन्न - (मायनस) कामाच्या ठिकाणी येण्याजाण्याचा खर्च, रोज ये जा करण्याची दगदग प्लस किती तासाचे काम असते? आय मीन हे करून जर हातात क्ष हजार उरतात तर १० बाईला देऊन उरताट तितक्यासाठी इतकी हाय-उपस करतो का आपण?
<<<<<<< आपण कुठलंही काम करतो तेव्हा केवळ पैशाचा हिशोब असतो का? समजा, वरच्या सगळ्या वजाबाकीचं उत्तर दहा हजारच येतंय. म्हणजे, वरवर पाहता असं वाटेल की पहा जेमतेम दहा हजारांसाठी एवढी हाय-उपस चालू आहे, पण ज्या कामासाठी हे सगळं चालू आहे त्या कामातून त्या व्यक्तीला केवळ पैशांव्यतिरिक्त अजून काही मानसिक समाधान वगैरे मिळत नसेलच का? खेरीज रोज गरजेची असलेली पण मला फारशी न आवडणारी कामं आउटसोर्स करून मला माझ्या आवडत्या कामांना वेळ काढता येत असेल, तर त्यात चूक काय?
अ.मामी, १ शंका विचारू? रागावू नका, पण २ तास शांत डोके ठेवण्यासाठी डॉग वॉकर ठेवलाय, तर उरलेले २२ तास डॉग्ज का ठेवलेत?>>>>>>
हे तुम्ही अश्विनीमामींना विचारलं आहे, पण यावर माझे विचार लिहिते. २२ तास डॉग्ज घरात आपल्याबरोबरीने वावरत असताना त्यांच्यासाठी स्पेशल असा वेळ काढावा लागत नाही. त्यांना फिरायला घेऊन जायचे म्हटल्यावर आपणही तयार होणे, त्या त्या वेळेला बरोबर त्यांना नेणे, दिवसभर दमून आल्यावर लगेच पुन्हा तासभर चालायला जाणे हे एरवी धावपळीचा दिनक्रम असेल तर आउटसोर्स करावेसे वाटणे साहजिक आहे. दिवसभर कामावरून दमून आल्यावर घरातले लहान मूल स्वतःबरोबर मस्ती करायला सांगत असेल, तर 'आज नको, तू दुसरं काहीतरी खेळ, मी दमलो/दमले आहे' असे सांगितले जाणे आपण बघितलेले नसते का कधी? रोजची बाहेरची चक्कर ही कुत्र्यांची गरज असेल आणि आपले रुटीन जर व्यग्र असेल तर आउटसोर्सिंग हा योग्य निर्णय वाटतो मलातरी.
निनिकु आणी साती.. पोस्ट
निनिकु आणी साती.. पोस्ट आवडल्या.. पटल्या..
पण कदाचित एखाद्याच्या बाबतीत "अडला हरी.." अशी सिच्युएशन असू शकते. वी नेव्हर नो..
अर्थात म्हणुन "त्यांच्यामूळे आपल्याला एक तास फ्री मिळतोय म्हणून माझ्या एक तासाच्या कमाईएवढे पैसे मी नाही देऊ शकत." ह्याला १००% अनुमोदन.
आपल्याला मिळणारा सगळा पगार आपण त्यांना देणार असू तर त्यापेक्षा आपणच घरी राहून घरकाम करावे.. घरच्यांचा सहवास मिळतो.. स्वतःच्या सोयीने काम करता येते.. शिवाय मुंबईसारख्या ठिकाणी प्रवासाचा जो भयंकर शीण होतो तोही टळेल. अर्थात जर नोकरी फक्त अर्थार्जनासाठी केली जात नसेल तर इतर घटक महत्वाचे ठरतात. तरीपण इतके पैसे देणे पटत नाहीच.
जेव्हा तुम्ही १० हजार देता
जेव्हा तुम्ही १० हजार देता तेव्हा तुमचे महिन्याचे उत्पन्न किती असते? निव्वळ उत्पन्न - (मायनस) कामाच्या ठिकाणी येण्याजाण्याचा खर्च, रोज ये जा करण्याची दगदग प्लस किती तासाचे काम असते? आय मीन हे करून जर हातात क्ष हजार उरतात तर १० बाईला देऊन उरताट तितक्यासाठी इतकी हाय-उपस करतो का आपण? >>> आपण घरांत नसताना घरांतील सर्व ऐषारामाच्या गोष्टींचा उपभोग आपण घ्यायचा सोडून त्यांना मिळतो. माझ्या मुलाला संस्कार ती बाई देणार ..... इ. अचानक, मला त्या उर फुटेपर्यंत धावणार्या शेतकर्याची आठवण आली. तेव्हा मी नोकरी सोडली. नोकरी धरायच्या आधी मला जे वैषम्य वाटायच (कुलुपाच्या ऐवजी आपण घरांत आहोत) ते नाहीसे झाले. मी जे काही करते आहे ते ही तितकेच महत्वाचे आहे ह्याची जाणीव मला नोकरी करायला लागल्यावर झाली. पण हे ही तितकेच खरे आहे की प्रत्येकाच्या प्रायोरिटीज ( त्या चांगल्या/ वाईट, योग्य/अयोग्य नसतात) वेगवेगळ्या असतात आणि परिस्थितीपण.
आपण घरांत नसताना घरांतील सर्व
आपण घरांत नसताना घरांतील सर्व ऐषारामाच्या गोष्टींचा उपभोग आपण घ्यायचा सोडून त्यांना मिळतो.
>> मुळात किल्ली देण्याइतका विश्वास टाकावा अशी बाई मिळणेच फार अवघड झाले आहे. आजकाल "सावधान इंडिया" वर काय काय दाखवतात.
आपण कुठलंही काम करतो तेव्हा
आपण कुठलंही काम करतो तेव्हा केवळ पैशाचा हिशोब असतो का? समजा, वरच्या सगळ्या वजाबाकीचं उत्तर दहा हजारच येतंय. म्हणजे, वरवर पाहता असं वाटेल की पहा जेमतेम दहा हजारांसाठी एवढी हाय-उपस चालू आहे, पण ज्या कामासाठी हे सगळं चालू आहे त्या कामातून त्या व्यक्तीला केवळ पैशांव्यतिरिक्त अजून काही मानसिक समाधान वगैरे मिळत नसेलच का? खेरीज रोज गरजेची असलेली पण मला फारशी न आवडणारी कामं आउटसोर्स करून मला माझ्या आवडत्या कामांना वेळ काढता येत असेल, तर त्यात चूक काय? >>>>>>>> +१
इब्लिसांची पोस्ट वाचून हेच लिहिणार होते.
दुसरं बाळ झाल्यापासून ( खरंतर
दुसरं बाळ झाल्यापासून ( खरंतर प्रेग्नंट असल्यापासूनच) या ' मुलांना सांभाळणे +वरकाम' करणार्या बायका हा डोक्यातला सर्वात मोठा विषय होऊन बसला आहे माझ्यासाठी! या बाबतीत पगाराचंआणि कामाचं प्रमाणीकरण होणंआवश्यक आहे. मी ज्या कामाचे ८००० द्यायचे त्याच्याहून जास्त कामाचे माझी शेजारीण ५००० द्यायची. कारण काही नाही. हा हिचा रेट, तो तिचा रेट! ' अडला हरी' च्या भूमिकेत आपण असलो की काही इलाज नसतो. सध्याच्या ९ ते ६ च्या बाईंना मी जवळजवळ ११००० देते. (बंगलोर मध्ये). काम बरं आहे, पण मुख्य म्हणजे वेळेवर येतात, दांड्या नाहीत जवळजवळ आणि सांगू ते काम करतात. केर- फ़रशी- भांड्यांना एक आणि पोळ्यांना एक अशा अजून २ बायका आहेत. एकून आपलं परावलंबित्व कधी कमी होईल याची वाट पहायची!
आपण कुठलंही काम करतो तेव्हा
आपण कुठलंही काम करतो तेव्हा केवळ पैशाचा हिशोब असतो का? समजा, वरच्या सगळ्या वजाबाकीचं उत्तर दहा हजारच येतंय. म्हणजे, वरवर पाहता असं वाटेल की पहा जेमतेम दहा हजारांसाठी एवढी हाय-उपस चालू आहे, पण ज्या कामासाठी हे सगळं चालू आहे त्या कामातून त्या व्यक्तीला केवळ पैशांव्यतिरिक्त अजून काही मानसिक समाधान वगैरे मिळत नसेलच का? खेरीज रोज गरजेची असलेली पण मला फारशी न आवडणारी कामं आउटसोर्स करून मला माझ्या आवडत्या कामांना वेळ काढता येत असेल, तर त्यात चूक काय?>>> +१ आनंदी असणे महत्त्वाचे. बाकीच्या गोष्टी 'मटेरियल थिंग्स' आहेत.
मी नेहमी एक कंपॅरिझन करून
मी नेहमी एक कंपॅरिझन करून पाहते. आपण बौद्धिक काम करतो म्हणून आपल्याला पगार जास्ती मिळतो, घरकामाला स्किल लागत नाही (अॅक्चूली लागते) असो.. पण त्यांच्या कामात खूप कष्ट असतात. भल्या पहाटे उठून लांबून लांबून चालत येऊन रोज रोज तेच तेच काम करा. त्यातून सुटका नाही. आपल्याला हक्काच्या आठवड्यातून २ दिवस सुट्ट्या मिळतात त्यांना कुठे असतात? ८-१० घरची रोजची कामं. ये जा चालत, शिवाय घरची कामं. शिवाय कुठे कशी ट्रिटमेंट मिळेल काय माहिती. काय मोटिव्हेशन असणार अशा कामात ?
निदान आपल्या मूळे कुणाला तरी रोजगार मिळतोय ही बाब समाधानाची आहे. त्यातून त्यांचा घरचा थोडाफार भार हलका होतोय हेच समाधान आहे माझ्यासाठी.
सध्याच्या ९ ते ६ च्या बाईंना
सध्याच्या ९ ते ६ च्या बाईंना मी जवळजवळ ११०००० देते. (बंगलोर मध्ये)>> तुम्ही बहुधा एक शून्य जास्त दिलतं. ११,०००/- का? दरमहा? बरोबर आहेत. मी वीकेन्ड्स आणि सुट्टीच्या दिवसांसाठी मुलाला बघायला बाईला विचार्ले तर तिनी १०,०००/- सांगितले. मुलाला आमच्या बरोबर भाजीपाला, खरेदी मध्ये रस नसतो म्हणून शोधत होते. मला खूप वाटले आणि त्याने तो सांभाळणार्या बाईबरोबर राहणार नाही हे क्लियर केले. त्याच्या मते तो एकटा घरांत राहू शकतो.
सर्वात आधी वल्लरीतैंना लवकर,
सर्वात आधी वल्लरीतैंना लवकर, विश्वासू, हाताळू नसलेली, वाजवी पगार घेणारी, स्वच्छ व उद्धट नसलेली कामवाली मिळो ही शुभेच्छा.
*
धाग्यावर एकंदर डोमेस्टीक हेल्प व पगार ही चर्चा सुरू आहे, म्हणुन शंका विचारल्या होत्या. घरगुती मदतनीसास देण्याच्या पगाराबद्दलच्या माझ्या शंकेचा नेमका रोख वरदा यांनी पकडला आहे.
>> रोज गरजेची असलेली पण मला फारशी न आवडणारी कामं आउटसोर्स करून मला माझ्या आवडत्या कामांना वेळ काढता येत असेल, तर त्यात चूक काय?<<
यात चूक काहीच नाही, पण, १०० पैकी १० लोकांना १० हजार रुपये महिना देणे परवडते म्हणून त्या बेसिसवर अमुक जॉबच्या पगाराचे कॅलिब्रेशन व्हावे का?
मला समजा ३० हजार रुपये पगार १० ते ५ नोकरी २५ दिवस करून असेल, तर एक तासात मी सुमारे १७२ रुपये (निव्वळ) कमवतो. (कामाच्या ठिकाणी कँटीन असले तरी सब्सिडाईज्ड का होईना पैसे द्यावेच लागतात. किंवा डबा न्यावा लागतो इ.) त्याच हिशोबाने जर पोळ्यावाल्या बाई अर्धा तास कामाचे ३ हजार घेत असतील, तर महिन्यात ४ सुट्या धरून, २६ दिवसांचे, एकूण १३ तास काम महिन्याभरात करतात, त्यांना मी ताशी २३० रुपये देत आहे.
श्रमप्रतिष्ठा वगैरे बरोबर असले, तरी हिशोब बरोबर येतोय का?
श्रद्धाजी,
मुळात डॉग्ज का आहेत? हा तो प्रश्न होता. घरात कुत्रा असणे हे मुले असण्याइतकेच आवश्यक, असे माझे मत नसल्याने, कॉमन बेसिक प्रिमायस नाही. त्यामुळे माझ्या डोक्यात हा प्रश्न आला, की जर २ तास डोके थंड ठेवावे म्हणून त्यांना बाहेर पिटाळावेसे वाटते, व 'दॅट इज वर्थ इट' असे वाटते, तर मुळात त्यांना पाळावेच कशाला? असं काहिसं लॉजिक आहे माझं.
मला अशी एक बारीकशी शंका येतेय
मला अशी एक बारीकशी शंका येतेय की कॉर्पोरेट सॅलरीजमुळे - आयटी इंडस्ट्रीसारख्या - घरकामाचेही दर मुंबईसारख्या ठिकाणी एवढे वाढले आहेत. पण ज्यांना अशा लेव्हलच्या कॉर्पोरेट सॅलरीज नसतील किंवा नवराबायको दोघंही मिळवते नसतील अशांना हे दर कितपत परवडतात? ते काय करतात? (माझं गृहितक चुकलेलं असू शकतं..)>>>>>>>>>>>>>>>
वरदा, मी माझंच उदाहरण सांगते. सिंगापुरात सुरुवातीला जम बसण्याच्या काळात पार्टटाईम मेड बोलावण्याचे दरही जास्त वाटत असत. तेव्हा साफसफाई, स्वयंपाक, किराणा आणणे वगैरे सगळी कामं दोघं मिळून वाटून करत असू. दिनक्रमामध्ये हा वेळ या कामांमध्येच जाणार हे पक्के करून ठेवले होते. नंतर जेव्हा ते दर आवाक्यात आले तेव्हा काम काही वाढलेले/बदललेले नसूनही मेड बोलावू लागलो. त्या वाचलेल्या वेळात निव्वळ टीव्हीसमोर पसरून चहा घेत टीव्ही बघणे, हेसुद्धा बरे वाटायचे.
बाकीही अशी जी उदाहरणं पाहिली आहेत त्यात लोक आपापल्या प्रायोरिटीनुसार कामं आउटसोर्स करतात, असं पाहिलं आहे. म्हणजे कुणाला केवळ झाडू-फरशी पुसणे-डस्टिंग एवढेच आउटसोर्सिंग करणे परवडेल ते आवश्यक वाटलं तर तेवढं करतात, कुणाला त्याउप्पर पोळ्यांची बाई परवडते, कुणाला पूर्ण स्वैपाकाची बाई, कुणाला फुलटाईम मेड.. प्रत्येकाला परिस्थितीनुसार निवडायला पर्याय असतातच. आपल्याला सोयीस्कर असेल, पटेल तो निवडायचा.
आपण कुठलंही काम करतो तेव्हा
आपण कुठलंही काम करतो तेव्हा केवळ पैशाचा हिशोब असतो का? समजा, वरच्या सगळ्या वजाबाकीचं उत्तर दहा हजारच येतंय. म्हणजे, वरवर पाहता असं वाटेल की पहा जेमतेम दहा हजारांसाठी एवढी हाय-उपस चालू आहे, पण ज्या कामासाठी हे सगळं चालू आहे त्या कामातून त्या व्यक्तीला केवळ पैशांव्यतिरिक्त अजून काही मानसिक समाधान वगैरे मिळत नसेलच का? खेरीज रोज गरजेची असलेली पण मला फारशी न आवडणारी कामं आउटसोर्स करून मला माझ्या आवडत्या कामांना वेळ काढता येत असेल, तर त्यात चूक काय?>>> +१
मी सध्या जे काम करतेय त्यातून गेल्यावर्षीपर्यंत कामवाल्यांचे आणि प्रवासाचे इ. पैसे गृहीत धरले तर अगदीच हातखर्चापुरते + छंदापुरते पैसे कसेबसे मिळायचे. पण मला माझ्या रोज घराबाहेर काम करण्यासाठी पडायला मिळायचं/ लोकांशी प्रत्यक्ष भेटायला मिळायचं. घरी आल्यावर सुद्धा वरकामाला बाई असल्याने घरात असलेला पुर्ण वेळ पोराबरोबर खेळण्यात /पुस्तकं वाचण्यात /पेंटींग -क्राफ्ट करण्यात जायचा. त्यामूळे बर्याचदा न आवडणारी कामं करायला सुद्धा उत्साह यायचा.
पण २ तास शांत डोके
पण २ तास शांत डोके ठेवण्यासाठी डॉग वॉकर ठेवलाय, तर उरलेले २२ तास डॉग्ज का ठेवलेत?
मलाही अमाची पोस्ट वाचुन असेच वाटले एकदा... पण....
कुत्र्यांसार खा प्रेमळ दुसरा प्राणी नाही. मात्र मोठे कुत्रे असतील तर फिरायल नेणॅ डोके दुखी ठरते. माझ्या शेजा-यच्या अल्सेशियनला एकदा फिरवायला घेऊन गेले. मी त्याला फिरवण्यापेक्षा त्यानेच मला त्याच्यामागे फरफटवले.
नव्या मुंबईत रेट्स खरेच खुप जास्त आहेत. माझी बाई चार हजारात माझा सैपाक, घराची साफसफाई भांडी लादी करतेय . पण दुस-या घरी ती चारहजार फक्त जेवणाचे घेते आणि जेवणात काय काय करणार तेही आधी ठरलेले आहे. ह्या बाईकडॅ इतक्या कमीत करतेस आणि आम्हाला जास्त पैसे मागतेस म्हटले की ती सरळ सांगते ताईने मला विकत घेतलेय, तुम्ही नाही.
मी तिला वर राजसी ने लिहिलंय तसंच ठेवलंय. तिला कधीही पैशांची गरज लागली तर ती माझ्याकडेच येते. आणि मीही तिला देते. आपण नाही ऑफिसातुन सॅलरी अॅडवान्स घेत? मग यांना कोण आपल्याशिवाय कोण देणार? आपण कुठेतरी नोकरी करतोय तशा या बायकाही आपल्याकडे नोकरी करतात. त्यांच्या अडीअडचणीला आपण मदत करायलाच हवी. अर्थात सगळ्याच माझ्या बाईसारख्या केल्या मदतीची किंमत ठेवतात असे मात्र नाही.
Pages