Br Ba

Submitted by तृप्ती आवटी on 5 December, 2013 - 10:46

If you aren't watching "Breaking Bad" at the moment, you need to reconsider your life choices!

Braking-Bad--620x400.jpg

"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्‍या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!

ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch

ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm

ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad

http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki

साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music

गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/

http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0

ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.

brba.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या क्रेझी८ च्या भावाचे रिमेन्स क्लीन करताना (टब फुटण्याच्या ग्रोस सीननंतर) वॉल्टला ह्यूमन बॉडी कम्पोझिशनबद्दल ग्रेचेनबरोबर झालेली चर्चा आठवते. कार्बन इतके पर्सेन्ट, हायड्रोजन तितके पर्सेन्ट करत ९९.८८ पर्यंत गणित जमतं. उरलेले ०.१२ पर्सेन्ट काय असतील - 'सोल' असतील का वगैरे बोलणं होतं.

माणूस किती कळला असं वाटलं, किती कोष्टकं मांडली तरी एक तेवढा फ्रॅक्शनल पर्सेन्ट उरतोच आणि कधीकधी तोच मेजर चकवतो!

सायो, वीकेण्डच्या कामाचा बोर्‍या न वाजवू देता (;)) मी दोन एपिसोड्स् बघून संपवले .. मीही बळी पडलेच Br Ba च्या पॉप्युलारिटी ला .. Happy

>> त्या क्रेझी८ च्या भावाचे रिमेन्स क्लीन करताना (टब फुटण्याच्या ग्रोस सीननंतर) वॉल्टला ह्यूमन बॉडी कम्पोझिशनबद्दल ग्रेचेनबरोबर झालेली चर्चा आठवते. कार्बन इतके पर्सेन्ट, हायड्रोजन तितके पर्सेन्ट करत ९९.८८ पर्यंत गणित जमतं. उरलेले ०.१२ पर्सेन्ट काय असतील - 'सोल' असतील का वगैरे बोलणं होतं.

काल रात्री बघत होते S1E2 .. मध्येच झोप लागली की काय कल्पना नाही पण हे बघितल्याचं आठवत नाही ..

धन्यवाद सायो ..

आधीचा स्कूल टीचर लूक दिसला .. मला तो माहितच नव्हता ..

इनक्युरेबल लंग कॅन्सरचं पुढे काय होतंय वॉल्टर च्या ह्या नविन लाईफस्टाईल चॉइसमध्ये ह्याबद्दल उत्सुकता आहे .. मेथ कुकींग प्रॉसेस् मध्ये फुफ्फुसांवर काही अ‍ॅड्व्हर्स इफेक्ट होत नाही वाटतं (S1E2 पर्यंत तरी झालेला दिसला नाही ..)

त्या क्रेझी८ च्या भावाचे रिमेन्स क्लीन करताना (टब फुटण्याच्या ग्रोस सीननंतर) वॉल्टला ह्यूमन बॉडी कम्पोझिशनबद्दल ग्रेचेनबरोबर झालेली चर्चा आठवते. कार्बन इतके पर्सेन्ट, हायड्रोजन तितके पर्सेन्ट करत ९९.८८ पर्यंत गणित जमतं. उरलेले ०.१२ पर्सेन्ट काय असतील - 'सोल' असतील का वगैरे बोलणं होतं.

माणूस किती कळला असं वाटलं, किती कोष्टकं मांडली तरी एक तेवढा फ्रॅक्शनल पर्सेन्ट उरतोच आणि कधीकधी तोच मेजर चकवतो!
>>

बरोबर. मी अजूनही विचार करतो या सीनचा. हा सीन पदोपदी रायटर्स' क्यू वाटतो मला, ट्विस्ट असो किंवा नसो. उदा. वॉल्ट इलिअटची 'परत ये' ऑफर सोडून मेथकडेच वळतो, वॉल्टचं 'ग्रे मॅटर' सोडून कॅलिबरपेक्षा कितीतरी सुमार दर्जाची नोकरी करणं इ.

रिमेन्सवरून आठवलं, हायड्रोफ्लोरिक अ‍ॅसिड एवढं करोजिव नाही... NaOH (Sodium Hydroxide/lye), Aqua Regia (आम्लराज?) or mixture of acids (HCI+H2SO4 etc.) has to be used.

टुकोबद्दल No mention? Tight, tight, tight... Lol ़खूप कमी काळ पण intense!

'लॉस्ट'नं कदाचित सुरू केलं पण Br Ba मध्ये फ्लॅश-फॉरवर्ड टेक्निक खूपच प्रभावी आहे. त्याचप्रमाणे, टाईमलॅप्स शॉट्स... Maybe that's where it started 'growin on'.

If you aren't watching "Breaking Bad" at the moment, you need to reconsider your life choices
>>
Déjà vu Lol

१००!

yo!

मी काल सीझन २ एपिसोड्स ३ आणि ४ बघितले. चौथा पुन्हा संथ. कथा पुढे सरकलीच नाही. स्कायलर काकू चिडल्यात नवर्‍यावर.

जेसीबद्दल मी सायोच्या बोटीत. वाईट वाटतं त्याच्याबद्दल किंवा एकूणच वाईट मार्गाला लागलेल्या मुलांबद्दल.

वॉल्टर हाय स्कूल टीचर का होतो ते मिस झालं बहुतेक माझ्याकडून. सुरूवात एकदम चांगली करून मग असं लो प्रोफाइल करियर का निवडलं आहे त्याने?

ईगो प्रॉब्लेम्समुळे असा उल्लेख आला आहे. एकूणात ही इज नॉट अ टीम प्लेयर. मोअर ऑफ अ मॅवरिक.
त्या एलिअटने कॅन्सरचं कळल्यावर ऑफर केलेला जॉबही त्याच कारणासाठी नाकारतो. जी कंपनी फॉर्म करण्यात आपला ब्रेन होता तिथे साधा एम्प्लॉयी म्हणून जायचं, तेही दयाबुद्धीने ऑफर केलेला जॉब घेऊन, त्यात कंपनीची मालकीण एक्स-गर्लफ्रेन्ड असताना - इज अ बिग डील फॉर हिम!

इज अ बिग डील फॉर हिम >>>> It is a big deal! मी पण नसते गेले. आय लाइक वॉल्टर Happy

त्यापेक्षा मेहनतीनं "स्वयंपाक" केलेला बरा Wink

Lol

अरे का काढला हा बाफ? उजळणी करायला लागते आहे. Happy Sad

काल टुको आणि त्याच्या नंतरचा एपिसोड्स परत बघितले. टुको खायला बनवत असताना टी व्ही वर चाललेले असते काहीतरी पण वातावरण अशक्य tense आहे. Those 15-20 minutes are just amazing!

Fugue state चे कारण आणि त्याच्या अनुषंगाने काहीही पटले नव्हते, कालही नाही. एवढ्या सोप्या रितीने?

जेसीचं कॅरॅक्टर सगळ्यात आवडलं, दुसर्या सीझनपर्यंत. त्याचं कॅरॅक्टर पहिल्या एक-दोन भागांकरताच, maximum पहिल्या सीझनमध्येच होतं. छोट्यामोठ्या चकमकीत तो मरणार होता पहिल्या सीझनच्या शेवटी. त्याच सुमाराला रायटर्सनी स्ट्राईक केला. मग ते कॅरॅक्टर तरलं. एरन पॉल त्याच्या करिअरचं श्रेय त्या स्ट्राईकला देतो. अशा कॅरॅक्टरचं शेवटी ...

सॉल आला का? गिव इट अप फॉर हिम प्लीज!!

काल १५ मिन्टं उशीर झाला उठायला. आज ४५ मिन्टं. व्यसनाधीनतेचे परिणाम असे भोगावे लागतात.

आवटेनबर्ग >>> Biggrin

तरी काल एकच एपिसोड बघितला. उरलेल्या वेळात इंस्टंट माहेराला आग्रह करत होते. त्यांनी दोन एपिसोड्स बघून सोडून दिलं म्हणे. ही काय पद्धत झाली ? Proud

चमन, WWची सुरुवात अ‍ॅक्च्युअली ह्यूगोला (शाळेतला जॅनिटर) पकडून नेतात तेव्हाच होते असं नाही वाटत तुला? Happy

हो स्वाती बरोबर आहे.
प्लेटचा तुकडा सापडत नाही तेव्हा तो क्रेझी८ चं काय करायचं ते तो ठरवून टाकतो (जे आधी प्रयत्न करूनही त्याला जमत नाही) तेव्हाच पहिली झलक दिसते. पण त्याच्या फॅमिलीसाठी त्याच्यातल्या खरा वॉल्टर (गॉफा मधला मायकल आणि के मधला 'धिस वन टाईम' सीन सारखा) कधीच मरत नाही ते अगदी गॅसोलीनचा वास मारणार्‍या कारपेटसाठी फालतू स्पष्टीकरण देण्यापर्यंतच्या वेळेपर्यंत सुद्धा.... हे ही खरंच. वॉल्टर जिवंतच राहतो आणि म्हणून जेसी सुद्धा.

'हाऊस ऑफ कार्ड्स' फ्यान आहेत का? धागा ऊघडू का? त्याबद्दलही प्रचंड आहे बोलण्यासारखं.

>> वॉल्टर जिवंतच राहतो आणि म्हणून जेसी सुद्धा.
अ‍ॅक्च्युअली सगळ्यांनाच तसे कंगोरे आहेत. (हा स्पॉइलर आहे, पण) उदा. स्कायलरने बेनेकेकडची नोकरी आधी का सोडलेली असते हे घरी (बहीण वगळता) सांगितलेलंच नसतं हे मला कालच स्ट्राइक झालं. पुढचा प्रवास मग नवलाचा वाटत नाही. मरी शॉपलिफ्टर आहे. प्रत्येकाला ती डार्क साइड आहेच आणि मुख्य म्हणजे ते ती एन्जॉयही करतात आपापल्या लेव्हल्सवर.
आता वापरून गुळगुळीत झालेलं वर्णन असतं तसा परिस्थिती हा इथे शत्रू नाहीच. म्हटलं तर प्रत्येकजण स्वतःचा शत्रू आहे.

किती ते स्पॉइलर्स Happy त्यांच्या फेसबुक पानावर पण एक स्पॉइलर इमेज आली आहे Happy

मला कालच वाटलं होतं की १५के एका वेळी या रेटने कधी जमायचे पैसे पण ती इमेज बघून बरं वाटलं Wink

Pages