३० नोव्हेंबर २०१३ रोजी मायबोलीकर बंधू श्री. शैलेंद्र साठे आणि त्यांचे दोन जिवश्चकंठश्च मित्र श्री. अशोक गायकवाड आणि श्री. भालचंद्र फडणीस यांच्या समवेत कात्रज येथील सर्पोद्यान तथा राजीव गांधी झुओलॉजीकल पार्क इथे भटकण्याची संधी मिळाली. भटकताना मनमुराद क्लिकक्लिकाट चालूच होता. खरेतर अशोकदादांचा जबरी कॅमेरा, त्याची अद्ययावत लेन्स बघून मला प्रचंड कॉंप्लेक्स आला होता. कारण माझ्याकडे माझा नेहमीचा NIKON D5000 with 18-55mm lense होता. पण तो सगळा न्युनगंड अशोकदादा आणि भालचंद्रदादा यांच्याशी बोलताना निघून गेला. (भालचंद्र फडणीस नावाच्या त्या देखण्या माणसाला हे दोन्ही मित्र येता जाता बंड्या म्हणून हाक मारत होते, ते ऐकुन मात्र मला त्या दोघांचाही प्रचंड हेवा वाटत होता. अशी घरच्या नावाने हाक मारण्याइतके जवळचे मित्र वयाची चाळीशी उलटल्यावरही कायम असणे यासारखे दुसरे सुख नाही हो)
असो....
त्यामुळे नंतर सगळा संकोच बाजूला ठेवुन मी ही माझी १८-५५ सरसावली... आमचा मुख्य निशाणा होता जंगलच्या राजावर. अशोकदादांच्या लेन्सने टिपलेले त्या जंगलच्या देखण्या राजाचे राजस क्लोजप्स पाहताना प्रचंड जळजळ होत होती. आता सर्वात प्रथम पैसे बाजुला काढून चांगली लेन्स घ्यायची हे मनाशी ठाम ठरवले. तरी त्यातुनही राजेसाहेब जेव्हा आमच्यासारख्या नवशिक्यांवर कृपा करून थोडे अजुन जवळ, म्हणजे आमच्या १८-५५ च्या लेन्समध्ये बसतील इतक्या जवळ आले तेव्हा मात्र मी संधी सोडली नाही........
शेवटी जेव्हा आमची किव येवून राजेसाहेब अगदी जवळ आले तेव्हा टिपलेला एकमेव क्लोजप.....
विशाल कुलकर्णी
जबरीच विशालभाउ
जबरीच विशालभाउ
मस्तच........................
मस्तच.........................
मला ही अनुभवायचे आहे......नेक्स्ट टायमाला
अप्रतिम ...
अप्रतिम ...
जबरदस्त वॉव.. अगदी डोळे
जबरदस्त वॉव.. अगदी डोळे निवले पाहून. वाघ तो वाघच
वॉव ! देखण्या राजाचा देखणा
वॉव ! देखण्या राजाचा देखणा फोटो.
सही फोटो! राजांच राजपण...
सही फोटो! राजांच राजपण... आजपण उद्यापण!
मस्त ! देखणे आहेत अगदी
मस्त ! देखणे आहेत अगदी राजेसाहेब !!
अंगावर धारदार काळ्याशार
अंगावर धारदार काळ्याशार तरवारी घेऊन या जगात माझ्याशिवाय कोण आहे, असे गुर्मीत विचारणारा किंग ! रीअली ग्रेट विशाल.
WOW, विशालदा सुपर्ब. closeup
WOW, विशालदा सुपर्ब.
closeup एकदम कातिल.
शेवटचा फोटो लई जबरा!! कसली
शेवटचा फोटो लई जबरा!! कसली धारदार नजरये!!
शेवटचा फोटो अप्रतिम डोळे
शेवटचा फोटो अप्रतिम
डोळे भेदक आहेत. पण तशी जीभ बाहेर आली की वाकुल्या दाखवणार्या बाळाची आठवण येते.
भालचंद्र हे बहुद्धा माबोकर पण आहेत ना?
अरे कात्रज मध्ये बंदिस्त असला तरी तो वाघ अशी संधी सर्वांना देत नाही.
लोक तास तास भर उभा राहतात.
पण महाराज ढिम्मपणे बसलेले असतात.
काही लोकं अहो शुकशुक करुन बोलवताना ऐकलय मी स्वत:
लेन्स घे रे लवकर.
पर्वा मी तुला तेच विचारणार होतो पण गप्पांच्या ओघात विसरलो.
मला मी काढलेले ह्याच्या गोर्या भावाचे फोटु आठवले.
खालील लिन्क वर आहेत.
http://www.maayboli.com/node/9665
मस्त रे !! शेवटचा खल्लास
मस्त रे !! शेवटचा खल्लास आहे.
झक्याने तितक्यात स्वतःची
झक्याने तितक्यात स्वतःची रिक्षा फिरवून घेतली
शेवटचा फोटो चांगला आहेच. पण
शेवटचा फोटो चांगला आहेच. पण कॅमेरा अजून थोडा खाली असता तर खल्लास झाला असता.
विकु, सुपर्, सुपर आलेत
विकु, सुपर्, सुपर आलेत फोटोज..
मखमली किंग!!!! मस्त!!!
झकोबा, हो हे तेच माबोकर
झकोबा, हो हे तेच माबोकर फोटोग्राफर भालचंद्र
केदार, अरे तो सेकंदभर एका जागेवर थांबायला, त्यातुनही इतक्या जवळ यायला तयार नव्हता. एक क्षणभर काय तो आला असेल, तेवढ्यात संधी साधली. साहेबांनी लगेच पाठ फिरवली..
झक्या आम्हीपण जवळ-जवळ तास-दोन तास पिंजर्यासमोर उभे होतो
धन्यवाद मंडळी !!
मस्त ...
मस्त ...
मस्त !
मस्त !
अप्रतिम
अप्रतिम
किंग मस्त रे.. खासकरुन पैला
किंग मस्त रे.. खासकरुन पैला नि शेवटचा
धन्यु दोस्तानु
धन्यु दोस्तानु
सुपर्ब फोटो आहेत रे, विशाल
सुपर्ब फोटो आहेत रे, विशाल ..........
बापरे कसले कातील फोटो आहेत !
बापरे कसले कातील फोटो आहेत ! बोलती बंद !
बाप्रे!
बाप्रे!
भारीच आलेत ...
भारीच आलेत ...
व्वा! राजे फ़ारच छान दिसतायत !
व्वा! राजे फ़ारच छान दिसतायत !
दक्षे,
मनःपूर्वक आभार मंडळी
मनःपूर्वक आभार मंडळी
मस्तच फोटो, ढाण्या वाघ तो
मस्तच फोटो, ढाण्या वाघ तो ढाण्या वाघच