Br Ba

Submitted by तृप्ती आवटी on 5 December, 2013 - 10:46

If you aren't watching "Breaking Bad" at the moment, you need to reconsider your life choices!

Braking-Bad--620x400.jpg

"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्‍या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!

ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch

ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm

ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad

http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki

साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music

गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/

http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0

ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.

brba.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सशल, विकि पेज वाचलं नाहीस का?

Cranston gained 10 pounds to reflect the character's personal decline and had the natural red highlights of his hair dyed a regular brown. He collaborated with costume designer Kathleen Detoro on a wardrobe of mostly neutral green and brown colors to make the character bland and unremarkable, and worked with makeup artist Frieda Valenzuela to create a mustache he described as "impotent" and like a "dead caterpillar".

Happy 'बियाच' फार कॉमन आहे आता. गँग साईन्स सकट. असो.

फॅनशिरोमणि, अध्यक्षपद वगैरे सर्व 'शो'चं यश आहे. Happy मी जरा 'आली लहर, केला कहर' केला.

प्रत्यक्षात, मेथम्फेटमिन इतकं हॉरिबल ड्रग आहे. Poor man's cocaine!

अजरामर भूमिका, सिनेमे नेहेमी माफिया, गँगस्टर, ड्रग्ज शी निगडीत जास्त (?) असतात का? किंवा का असतात? अँटी-हिरो जास्त भावतात?

ऑन अ लाइटर नोट, जिमी फॅलनचं 'जोकिंग बॅड' पाहिलं आहे का? दुसर्या-चौथ्या सिझनपर्यंत कॅरॅक्टर्स कळणार नाहीत पण जेसीकरता प्लीज!

"ब्रेकिंग बॅड" माझी सर्वात आवडती मालिका. सगळे सिझन्स पाहून झालेत.
विजिगीषु - तुम्हाला अनुमोदन.
आम्हीही अगदी वीकेंड "ब्रेकिंग बॅड" मॅराथॉन करून फायनल सिझन च्या आधीचे सिझन्स बघितले.

Walter white and all the cast rocks !!

अरारा ब्रेकिंग बॅडचे एवढे फ्यान ईथे आहेत माहितच नव्हते. प्रहचहंड, जहबहराट मालिका. ज्याने कोणी क्रॅन्स्टनचे नाव वॉल्टरच्या भुमिकेसाठी पहिल्याने सुचवले असेल त्याला कास्टिंगसाठी ऑस्कर द्यायला हवा. पिंकमनचं कॅरेक्टर अफाट. हँक किंवा जेसीची अवस्था बघून किंवा वॉल्ट एखादं घाणेरडं षडयंत्र अंमलात आणतांना अगदी 'प्लीज डोन्ट, प्लीज डोन्ट' असं खुर्चीच्या काठावर बसून ओरडावं आणि सगळ्यासाठी वॉल्टला शिव्या द्याव्यात ईथपर्यंत त्याचा थरार अनुभवला.
ब्रेबॅ संपल्यानंतर ऊतारा म्हणून 'मॉडर्न फॅमिली' चालू केली पण ती लवकरच बोर झाली.

वॉल्टर प्लीज कमबॅक

chaman, some are still watching for the first. Spoilers nakot pls.

गिलिगन मुळे ब्रायन कास्ट झाला. प्रोड्युसर्स 'माल्कम'मुळे साशंक होते. गिलिगननं सोडलं नाही. एकदम कपोला-पचिनो आठवले गॉडफादरच्या वेळचे.

केला केला संपादित केला पटकन.
स्पॉयलर साठी माफ करा. एवढे पंखे बघून एकदम आनंदाचं भरतं आलं. ११वी १२वी केमेस्ट्री वर फोकस केला असता तर भविष्य किती ऊज्वल असतं हे अजूनच प्रकर्षानं जाणवलं. ह्या दु:खावर फुंकर घालण्यासाठी अश्या आनंदाची शाल ओढून घ्यायची अजून काय.

सहावा सीझन? नाय बा अजून.

टॉम सेलेकच्या 'जेसी स्टोन' नंतर 'वॉल्टर व्हाईट' एकदम फेवरीट . त्या ब्लू ब्लड मध्ये बघवत नाही पण टॉम सेलेक.

मला अगदी ब्रेबॅमधल्या आपल्या त्या ह्याची आठवण झाली. Proud
(सहावा एपिसोड बघितलास की म्हणजे कशाची ते सांगेन. :P)

मला वॉल्टर आणि हँक मधला हा संवाद प्रचंड आवडतो. त्याला बरेच छुपे कंगोरे आहेत, पण वरवरचा अर्थही थेट आहे.

Walter: I have spent my whole life scared – frightened of things that could happen, might happen, might not happen. Fifty years I spent like that. Finding myself awake at three in the morning. But you know what? Ever since my diagnosis, I sleep just fine.
Hank: Hmmm...okay.
Walter: What I came to realize is that fear, that's the worst of it. That's the real enemy. So, get up, get out in the real world and you kick that bastard as hard as you can right in the teeth.

--------------------------------------------------------------------------------

एका अमेरिकेन सारखं आयुष्य जगणं म्हणजे नुसतं व्यक्ती स्वातंत्र्य ऊपभोगणं आणि स्थिरस्थावर आयुष्य जगणं असंच नाही तर कुठल्याही अवघड प्रसंगाला भिती आणि प्रसंगी परिणामांची तमा न बाळगता सामोरं जाण्याचा एक नैसर्गिक गुण अंगी बाणवणं. अगदीच 'रेड नेक' नाही पण सरळ, साध्या आयुष्यातही धाडसी आणि निर्भयी असणं हेही ओघानं आलंच. हे काय नवीम आजच्या युगाचं किंवा पहिल्यांदाच सांगितलेलं तत्वज्ञान नाही आणि जगातल्या प्रत्येकालाच ते स्थलकालाच्या मर्यादेपलिकडे लागू पडतंच.

काही वर्षांपूर्वी अफ्रिकेत अपहरण होऊन मारल्या गेलेल्या आपल्या प्रिय मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी एक साधा मुलगा प्रचंड साहस दाखवत जे काही करतो त्याबद्दल एक सत्यकथा वाचली होती.
'विंटर्स बोन' किंवा 'बॉईज डोन्ट क्राय' मधल्या कथानायिकेंची मानसिकताही ह्याच विचारसरणीतून आल्यासारखी वाटते.

चमन Happy

नाही हो ताई! वरच्या प्रतिसादात काही फोडाफोड नाही केलीये. सगळे भांडे कल्हई (कल्हईचा केमिकल फॉर्म्यूला माहितीये मला Happy ) करून फडताळात मांडून ठेविले आहेत.

स्वाती, ते वरती लिहिलं ते कितीही पटत असलं तरी आपण नक्की चुकीची गोष्टं ग्लोरिफाय करत नाहीये ना असं मानसिक द्वंद्व कायम चालू राहतं आणि मग तेव्हा मायकल आणि के मधला संवाद प्रकर्षाने आठवतो.

Michael: My father is no different than any powerful man, any man with power, like a president or senator.
Kay Adams: Do you know how naive you sound, Michael? Presidents and senators don't have men killed.
Michael: Oh. Who's being naive, Kay?

हा ऊलटा 'अशोका' प्रवास कुठे नेऊन सोडेल काही कळत नाही.

म्हणूनच स्मायली टाकली. Happy
हॅन्क वॉल्टला क्यूबन सिगार ऑफर करतो तो सीन आठवतो का? इट्स फनी हाऊ थिन दॅट लाइन इज!

तिसरा आणि चौथा एपिसोड एका मागून एक बघितले. तिसर्‍या भागात पण सुरूवात जरा ग्रोस आहे. ब्रेड क्रस्ट कापून देणे आणि गार्बेज कडे लक्ष गेल्यावर एक मेख लक्षात येणे एकदमच भारी. त्यानंतरचा सीन खतरनाक आहे. तो दात घासतानाचा सीन पण बघितला Happy वॉल्टर जुनियरचं काम आवडायला लागलं आहे मला.

हँकला सिरियसली घ्यावं की नाही? ते जरा टाइमपास कॅरेक्टर वाटलं मला.

२७ डिसेंबरला दुपारी १२ वाजल्यापासून ३० डिसेंबरला रात्री १२.४५ वाजेपर्यन्त AMC वर या शो चे marathon आहे. पहिल्या पायलट एपिसोड पासून प्रत्येक एपिसोड दाखवणार आहेत.

Pages