Br Ba

Submitted by तृप्ती आवटी on 5 December, 2013 - 10:46

If you aren't watching "Breaking Bad" at the moment, you need to reconsider your life choices!

Braking-Bad--620x400.jpg

"ब्रेकिंग बॅड" ही अमेरिकन टीव्हीवर सहा सीझन्समध्ये प्रसारित झालेली मालिका. वॉल्टर व्हाइट हा एक साधारण आयुष्य जगणारा 'फॅमिली मॅन'. उपचारांपलीकडे पोचलेल्या फुफ्फुसांच्या कर्करोगाचे निदान होते आणि वॉल्टरचे आयुष्य बदलून जाते. हायस्कूलमध्ये रसायनशास्त्र शिकवणारा शिक्षक आणि त्याच्या आयुष्यात येणार्‍या ब्रिलियन्ट घडामोडी म्हणजे 'ब्रेकिंग बॅड'!

ब्रेकिंग बॅड अधिकृत - http://www.amctv.com/shows/breaking-bad/where-to-watch

ब्रेकिंग बॅड क्रू - http://www.imdb.com/title/tt0903747/fullcredits?ref_=tt_ov_st_sm

ब्रेकिंग बॅडबद्दल अधिक माहिती - http://en.wikipedia.org/wiki/Breaking_Bad

http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki

साऊंडट्रॅक - http://breakingbad.wikia.com/wiki/Music

गिलिगनची मुलाखत - http://www.writermag.com/2013/06/19/raising-hell/

http://www.youtube.com/watch?v=5ujPobTnOB0

ब्रेकिंग बॅडबद्दल गप्पा मारण्यासाठी हा धागा.

brba.jpg
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पैली! Proud

अलीकडे बर्‍याच काळात (म्हणजे उदा. 'लॉस्ट' संपल्यानंतर) कुठलीच मालिका इतकी उत्कंठावर्धक/थरारक आणि हृदयस्पर्शी वाटली नव्हती.

'ब्रेकिंग बॅड' हा साधारणपणे 'अध:पतन' या अर्थी वापरला जाणारा बोलीभाषेतला शब्दप्रयोग आहे असं म्हणता येईल. अर्थातच तोच मालिकेचा 'ग्राफ' आहे. पहिल्या भागात दिसलेलं 'सौजन्यशील, मवाळ, मध्यमवर्गीय शाळामास्तर वॉल्ट आणि त्याचं साधंसरळ प्रेमळ उबदार कुटुंब' हे चित्र मालिका संपताना दिसणार नाही हे नावावरून कळतंच. पण तो प्रवास ज्या पद्धतीने रंगवला आहे त्यात सगळी मजा आहे.

अतिशय क्रिस्प आणि स्मार्ट पटकथा. गंभीर अंतःप्रवाहाला धक्का न पोचवणारे खुसखुशीत, प्रसंगी विनोदीही संवाद आणि घटना, परफेक्ट कास्टिंग आणि सगळ्याच लहानमोठ्या कलाकारांचा उत्तम अभिनय ही सगळी भट्टी जुळून येणं अवघड असतं. ते इथे झालं आहे.

मी पहिल्या सीझनचे दोन भाग बघितलेत आतापर्यंत. पहिला भाग एकदम फास्ट झाला आहे. दुसरा जरा संथ. दुसर्‍या भागातला नवरा-बायको सोनोग्राफिसाठी जातात तेव्हा स्कायलर वॉल्टला क्वेश्चन करते तो सीन मला आवडला भयंकर.

स्वातीला अनुमोदन. पहिले दोन तीन भाग बघताना जरा कंटाळा आला, मालिका संथ, वॉल्ट शामळू वाटला वगैरे बरीच कारणं होती. पण हळूहळू कसं गुंतायला झालं ते कळलंच नाही.
मी ही आता पुन्हा सुरू करावं ह्या विचारात आहे.

हे आधी टीपापात लिहिलं होतं:
मालिकेतली आणखी एक आवडलेली गोष्ट म्हणजे कथानायक गुन्हा करायला लागला (आणि त्याचं कारण कितीही हृदयद्रावक असलं) तरी संपूर्ण सीरियलमधे कुठेही क्राइम, अन्डरवर्ल्ड, ड्रग्ज या गोष्टी ग्लोरिफाय केलेल्या नाहीत.
सहसा आपल्याला कथा 'आवडते' तेव्हा त्यातल्या किमान एका पात्राशी आपण आयडेन्टिफाय किंवा रिलेट करायला लागतो. इथे पात्रांची वर्तणूक ग्लोरिफाय न करता त्यांच्याशी आयडेन्टिफाय करायला लावायचं अशी एक तारेवरची कसरत लेखकांनी साधली आहे.

मी टायटल 'बेकींग ब्रेड' असं वाचलं आणि सिंडीने ब्रेड बेकींग वर बाफ काढलाय म्हणून बघायला आले Proud

अलीकडे बर्‍याच काळात (म्हणजे उदा. 'लॉस्ट' संपल्यानंतर) कुठलीच मालिका इतकी उत्कंठावर्धक/थरारक आणि हृदयस्पर्शी वाटली नव्हती. >> लॉस्ट बद्दल +१. मी ब्रेबॅ सुरु केली नाहीये अजुन, पण घरी त्याची पारायणं झाली आहेत Proud

तेच की Proud

मो, शुभ काम मे देरी क्युं? मृणला पण घे सोबत Happy रच्याकने, घरच्यांना सांग या बाफवर यायला.

मी दोन भागांत कंटाळलो आणि पुढे अजून पाहिलेले नाही. मला काही मित्र नेटाने बघ म्हणत आहेत. बघू. पहिला भाग जबरी होता, पण दुसरा काही विशेष वाटला नाही.

फा, बघ बघ. इट विल ग्रो ऑन यू.
मलाही पहिले २-३ भाग बघताना 'इतकी काही ग्रेट वाटत नाही (दाजी उगाचच कौतुक करतात. नेहमीचंच आहे. सीरियलच असं नाही! मागे नाही का त्या... :P)' असं वाटलं होतं, मग कधी मी हुक झाले कळलंच नाही.

तेवढ्यातही फटका मारायचा चान्स काही सोडला नाही Lol
बघणार्‍र्‍यांनी काय काय बघून वैताग आला ह्याची नोंद करून ठेवावी. आपण नंतर मतं जुळवू Wink

स्वाती, सायो :).

हो पुढे पाहणार आहेच. बर्न नोटिस पाहू लागल्याने त्यात बराच इंटरेस्ट आलेला आहे, पण हे ही पाहीन जरा 'हुक' होईपर्यंत.

हॅन्क त्याच्या माणसांना 'लुक्स लाइक अल्बुकर्की हॅज अ न्यू किंगपिन' म्हणून सांगत असतो तेव्हा वॉल्ट अजागळासारखा (सायोच्या आवडत्या ड्रेसमधे) ब्रशिंग करताना दाखवला आहे. ते जाम फनी आहे.

Breaking Bad, Yo!

२००८ पासून कलीग्ज, मित्र सांगत होते 'अरे चांगला आहे शो, Don't miss it!' पण वेळ यावी लागते... फिनालेच्या अगोदर दोन आठवडे पुण्यातल्या मित्राने WhatsApp वर अक्षरशः वैताग आणला सांगून सांगून ... मी आपलं त्याला 'हिरोज' च कसा भारी शो होता वगैरे (कारण वेळ काढून बघितलेला तोच होता, रिसेंटली 'शेरलॉक') म्हणून गप्प बसवत होतो. मग तो शनिवार आणि त्यादिवशी रात्री पहिले दोन भाग बघितले. मग बघतच राहिलो. पुढच्या रविवारी फिनाले! तर तोपर्यंत सर्वच्या सर्व ६१ भाग बघितले, दिव्य, केवळ दिव्य होते ते... मी फक्त Br Ba मय होतो. फिनालेला करंट... फारच वरचा क्लास अनुभव होता. रट्ट्याच्या बाबतीत सर्वोत्तम. अभ्यास, सबमिशन्स, काम याच्याउपर ... फिनालेनंतर त्याच मित्राला विचारलं 'शेवट सांगू का?' Happy काय सुख वाटलं! आहा, तो तिकडून 'मी ऑफलाईन आहे. मला फोनपण नको करू नकोस' वगैरे गयावया.

सगळे interviews, मेकिंग आता बघून झालेलं आहे. साऊंडट्रॅक पण फारच भारी...इतकं 'वैविध्य' क्वचितच.. अभी आपुनके पास है ये सब!

http://breakingbad.wikia.com/wiki/Music

विकीपेक्षा http://breakingbad.wikia.com/wiki/Breaking_Bad_Wiki मी जास्त रेफर केली.

सर्व जेव्हा संपलं तेव्हा एकदम शांत शांत वाटलं. "शेवटी त्याच्या ओठांवर हास्य तरळलं/विलसलं" वगैरे - exactly that feeling!

थोडेसे इंग्रजीत जे शेअर केले होते -

"Not sure about the greatest crime drama ever but it keeps you on the edge of your seat!

Sometimes, writers suck from the character development standpoint. Maybe because we are now watching continuously instead of every week. You will also notice, as you progress with the seasons, that they miss obvious things that have to be covered. Won't ruin with the spoilers ;).

Casting is amazing. Just on this, show wins it all!

Acting carries the show all the way.

Direction... Sometimes great sometimes sloppy!

Hidden messages are awesome, of course you learn them afterwards on the net.

ABQ and the atmosphere is right there. Last time such haunted experience was in 'No Country for Old Men'. Southwest grows on you.

Season 5 second half... Finished last night. Right on, last seven episodes were intense! That's what I call 'amazing' Yo. For me personally, the show has redeemed itself in the last season."

जर पूर्वग्रह न ठेवता बघतच राहिलात (मला आवडणारच नाही वगैरे) तर फारच चांगला शो आहे. Something you cannot miss in your life! Yes, for sure!

'शेवट' समाधानकारक ...

सध्या इथे पहिले काही भाग चर्चेत दिसतात.

जेसीचं व्हॉईस मेल ग्रिटींग - "Yo yo yo. 148-3 to the 3 to the 6 to the 9, representing the ABQ, what up, biatch? Leave it at the tone!" Lol मला माझं ग्रिटींग असं पाहिजे. मेल्स मध्ये फोनच्या जागी लिहिलंपण आहे.

वॉच आऊट फॉर 'टुको सालमांका'!

खूप पुढे येईल, पण वॉल्टरचं Ozymandias चं रेन्डिशन! My all all time favorite. ब्रायन क्रॅन्स्टन इज आऊट ऑफ धिस वर्ल्ड (आर. जे. मिटी - वॉल्टर ज्युनिअर - ब्रायनच्या नावाचा टॅटू काढून घ्यायला तयार होता). काय आवाजतला बेस, ती कविता, फिनालेच्या अगोदर प्रोमोज मध्ये दाखवायचे. बास, बास... या 'च' साठी केला अट्टाहास!

जेसीचं व्हॉईस मेल ग्रिटींग जबरी आहे Biggrin

भारी पोस्ट. विजिगीषुला ब्रेबॅ फॅन क्लबचं अध्यक्षपद दिलं पाहिजे.

मला ते टायटल्समधे केमिकल सिंबॉल दिलेले पण भारी आवडलेत.

विजिगिषुंना फ्यानशिरोमणी किताब द्यायला हवा. Happy

>> Last time such haunted experience was in 'No Country for Old Men'
द्या टाळी! कोएन ब्रदर्स आणि कधीकधी टेरॅन्टिनोची आठवण अनेकदा झाली!

पुरूषांना bitch म्हटल्याचं ह्यातच पहिल्यांदा पाहिलं. जेसीच्या तोंडातलं 'ट्रू दॅट' वगैरेही भारी आहे.

बघणार, बघणार. ब्रे.बॅ. बघणार!

माल्कमच्या अचरट बापाच्या भूमिकेनंतर ब्रायन क्रॅन्स्टन इतक्या (दुसर्‍या) टोकाची भूमिका करतोय, ते बघायचंय. म्हणूनतरी सुरवात करणार.

भलतंच फॅन फॉलोविंग झालं की .. ह्यावर विचार करण्यात येईल ..

फक्त तो जो प्रॉटॅगॉनिस्ट आहे (वॉल्ट?) त्याच्या दाढी-मिशा आणि टक्कल (:हाहा:) आणि एकूणच चेहेरा मला भारीच वियर्ड वाटतो .. Uhoh

Pages