मदत हवी (एक्झिमा, सोरायसिस)

Submitted by सगुना on 5 December, 2013 - 03:40

मला मागील वर्शा पासुन स्किन्चा problem चालु झाला. सुरवातीला हाताच्या बोटावर् नखाभोवतीची skin कट
होऊ लागली. नतर तळपायावरची skin काळी पडू लागली. skin spec. dr. ची treatment चालू आहे. आतातर तळ्हात व तळपायावरची स्किन dry होते चीरे देखील पड्तात. खुप त्रास होतो. clop-s ointment,hydromax emollient lotion लावायला dr. दीले. खाज येत असेल तरच ebasil ही गोळी आहे. पोटातुन घेण्यासाती कोन्तेही औषध नाही तर हा problem कसा कमी होईल? please घरगुती, आयुरवेदीक /होमीओपेथीक/अलोपेथीक ऊपाय/ औषध सागा. हाता पायाची रफ स्किन बघवत नाही

(please ignore spelling mistake)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्कीन स्पेशालिस्टची ट्रीटमेन्ट चालूच ठेव. तू निश्चित बरी होशिल.

डॉ नी ग्लिसरीन साबण नाही का दिला?

डॉ सुचना पाळा.
क्रीम्स लावा.
फरक पडेल.

मल सौम्य स्वरुपात हा त्रास व्हायचा आधी , तो ही फक्त हिवाळ्यातच.
डॉ च्या सुचनेनुसार ग्लायसेब (अंधुक आठवण) हा साबण आणि अंघोळ झाल्यावर लावायला दिलेली क्रीम ह्याने खुप फरक पडला.

डॉ.,राजसी,कविन, झकासराव धन्यवाद...खूप बरे वाटले
डॉ.नी सुरवातीला hydrate साबण दीला नतर ग्लायसेब चालू केला पण तो मला सुट नाही झाला स्किन्ची खुप आग होत होती मग परत hydrate चालू आहे जो आजपय्र्त. क्रीम्सतर लावतेच , आतातर थडीमुळे मोजे देखील वापरते. फरक मात्र जाणवत नाही. हिवाळ्यात त्रास होणार अस डॉ. बोलले पन सारखे हात-पाय खाजतात त्याचा मात्र वेताग आला

सगुणा,

युरिया बेस्ड क्रिम आणि लोशन मुळं खूप फरक पडतो. डॉ. च्या सल्ल्यानं वापरा.

मला एक्झिमा आहे पण तो उन्हानं ट्रिगर होतो. अगदी कोवळ्या उन्हातही मी सनस्क्रीन लावलं नाही तर लगेच प्रॉब्लेम चालू होतो. हात्,मान आणि नाक हा एरिया लगेच अ‍ॅफेक्ट होतो.

तुमचा एक्झिमा कशानं ट्रिगर होतो ते नोट करा ( आहार, वातावरण, इतर प्रसाधनं, कपडे, स्ट्रेस इ. ), आणि त्या गोष्टी टाळण्याचा प्रयत्न करा.

अ‍ॅलोपॅथीच्या डॉक्टरांनी मला ' ही गोष्ट बरी नाही करू शकत पण नक्कीच कंट्रोल करू शकतो' असं सांगितलं आहे.

होमिओपॅथी सुद्धा ट्राय करून बघा, माझ्या ओळखीतल्या बर्‍याच लोकांना होमिओपॅथीचा अतिशय चांगला अनुभव आहे एक्झिमा बाबत.

रामदेवबाबा टिव्हीवर काही काही प्राणायाम प्रकार केल्यानं सोरायसिस बरा होतो असं म्हणतात. मी सातत्यानं केले नाहीत प्राणायाम पण तुम्ही इच्छा असेल तर जरूर करून बघा.

गाईच्या दुधाचं तूप लावणे.... (चांगलं भरपूर कढवलेलं) हमखास ऊपाय आहे. फक्त आधी थोड्याश्या भागावर लावून काही रीअ‍ॅक्शन येत नाही याची खात्री करून घ्या..

पक्कं निदान झालंय का? कारण एक्झिमा असेल तर स्कीन स्पेशालिस्टची ट्रीटमेंट ओके आहे. पण सोरायसिस हा ऑटोइम्यून डीसीज आहे. त्यासाठी वेगळा डॉ. लागेल.

हो एक्झिमाच आहे. कालच डॉ कडे विजिट्ला गेले होते. थडीत थोडा त्रास होतोच पन cantrol मध्ये आहे अस बोलले. स्किनला scrub करु नका व भावुक होऊ नका असा सल्ला दीला

तुमचे योग्य उपचार सुरू आहेत असे दिसते. थोडा संयम ठेवा, अपर्णा यांनी सांगीतल्याप्रमाणे कुठल्या गोष्टींनी त्रास वाढतो ते नोट करा आणि टाळा. मुख्य म्हणजे 'डॉक्टर शॉपिंग' करणे टाळा.
शुभेच्छा.

सगुना, सोरायसिस निघाला नाही हे फार चांगले झाले. डॉक्टरांचे सर्व उपाय चालू ठेवाच. घराबाहेर पडताना सतत सनकोट वापरत चला, ज्यायोगे, जी त्वचा उघडी असते ती हवेच्या संपर्कात येणार नाही. तसंच फक्त कॉटनचे कपडे वापरा.
खूप शुभेच्छा!