Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता अन्य सासूमाया जान्हवीला
आता अन्य सासूमाया जान्हवीला रात्री आलेल्या भावाबद्दल आम्हाला का सांगितले नाही याचा जाब विचारतील उद्या.>>इंदू काकू चिडते त्यावरून.. आता आला घरी, थांबला थोडावेळ मग निघून गेला....एव्हढ्या रात्री प्रत्येकीच्या खोलीचे दार वाजवत बसणार का? त्यापुढे ह्या बायका रात्रभर गप्पा मारणार का?
इथे गैरहजेरी असल्याने अपडेट्सही देता येणार नाहीत.>> ...पण मामा तुमचा प्रवास सुखाचा होवो.
मामा, happy journey. काळजी
मामा, happy journey. काळजी घ्या तब्येतीची प्रवासात, एन्जॉय करा. तुमचे अपडेट्स नसल्याने चुकल्यासारखे वाटेल.
मामा अपडेट्स मस्त.
मामा अपडेट्स मस्त. बेबीआत्याला, आजीने झापले, बरे झाले.
मालिकेचे भवितव्य - १. काल
मालिकेचे भवितव्य -
१. काल आईआजीने माझा श्रीवर विश्वास आहे असे सूतोवाचं केले, आता श्रीचा खोटेपणा कळला की शरयूच्या नवर्यासारखं श्रीला / श्री + जान्हवीला घराबाहेर काढणार......
२. पिंट्याला श्री नोकरी देणार, त्याच्या हातून काहीतरी अफरातफर होणार - जान्हवी घराबाहेर
अजून आठवेल तसं लिहेन
पिंट्या बहिणीकडे पाहून
पिंट्या बहिणीकडे पाहून म्हणतो, "बापाला तरी माझी काळजी कुठे आहे वा होती ? त्याना तर फक्त एकच मुलगी...तू !".>>>>> मामा यानंतर तो म्हणतो की "लहानपणी आई म्हणायची की मला भाकरीच्या तुकड्यावर घेतल आहे ते आता खर वाटायला लागल आहे." अगदी खर खर सांगु का या सीनमध्ये तिघांनीही अभिनयाची कमाल केली आहे. सतत दुर्लक्षित गेल्यामुळे आत खोलवर दुखावला गेलेला मुलगा पिंट्याने छान उभा केला काल.... वरील वाक्याने बहिणीच्या काळाजात उठलेली कळ जान्हवीनेही छान व्यक्त केली.... आणि या सगळ्या संभाषणाने अचंबित झालेला श्री सुद्धा छान मांडला..... अस मला तरी वाटल.....
मामा हॅप्पी जर्नी तुम्हाला
मामा हॅप्पी जर्नी तुम्हाला तब्येतीची काळजी घ्या....
मामा यानंतर तो म्हणतो की
मामा यानंतर तो म्हणतो की "लहानपणी आई म्हणायची की मला भाकरीच्या तुकड्यावर घेतल आहे ते आता खर वाटायला लागल आहे." अगदी खर खर सांगु का या सीनमध्ये तिघांनीही अभिनयाची कमाल केली आहे. सतत दुर्लक्षित गेल्यामुळे आत खोलवर दुखावला गेलेला मुलगा पिंट्याने छान उभा केला काल.... वरील वाक्याने बहिणीच्या काळाजात उठलेली कळ जान्हवीनेही छान व्यक्त केली.... आणि या सगळ्या संभाषणाने अचंबित झालेला श्री सुद्धा छान मांडला..... अस मला तरी वाटल.....>>>>>>>>+१.
मामा यानंतर तो म्हणतो की
मामा यानंतर तो म्हणतो की "लहानपणी आई म्हणायची की मला भाकरीच्या तुकड्यावर घेतल आहे ते आता खर वाटायला लागल आहे." अगदी खर खर सांगु का या सीनमध्ये तिघांनीही अभिनयाची कमाल केली आहे. सतत दुर्लक्षित गेल्यामुळे आत खोलवर दुखावला गेलेला मुलगा पिंट्याने छान उभा केला काल.... वरील वाक्याने बहिणीच्या काळाजात उठलेली कळ जान्हवीनेही छान व्यक्त केली.... आणि या सगळ्या संभाषणाने अचंबित झालेला श्री सुद्धा छान मांडला..... अस मला तरी वाटल....>>>>>=१००००००
कालचा भाग बघून माझ्या
कालचा भाग बघून माझ्या नवर्याचे वक्तव्य - आता कुठल्यातरी भागात शरयूला कोरड्या उलट्या होताना दाखवतील
अति ताणल की तुटतं हे
अति ताणल की तुटतं हे मालिकेच्या लेखकाला माहिती नाहिये का? किती ते ताणाव???
पिंट्याचे काय चाललेय हे दाखवण्यासाठी चार एपिसोड
बर शरयू बाई खरच विसरभोळ्या आहेत की फक्त आपलं गुपीत सांभाळण्यासाठी सगळं चाललय?
शरयूला कोरड्या उलट्या >>>>>>>
शरयूला कोरड्या उलट्या >>>>>>> हो हो अगदी होईल असं.
मामा happy journey...... take
मामा happy journey...... take care
बर शरयू बाई खरच विसरभोळ्या
बर शरयू बाई खरच विसरभोळ्या आहेत की फक्त आपलं गुपीत सांभाळण्यासाठी सगळं चाललय?>> मलापण असेच वाट्त...
आता कुठल्यातरी भागात शरयूला
आता कुठल्यातरी भागात शरयूला कोरड्या उलट्या होताना दाखवतील >> मंजूडे मान गये.
जान्हवीच्या आईवडिलांच्या
जान्हवीच्या आईवडिलांच्या संयमित वातावरणातील शांततापूर्ण चर्चा मस्त असतात.
जान्हवीच्या आईवडिलांच्या
जान्हवीच्या आईवडिलांच्या संयमित वातावरणातील शांततापूर्ण चर्चा मस्त असतात>>> अगदी बरोबर
जान्हवीच्या आईवडिलांच्या
जान्हवीच्या आईवडिलांच्या संयमित वातावरणातील शांततापूर्ण चर्चा मस्त असतात.>> ति शांततापूर्ण चर्चा फक्त वडींलाचि असते ...आई तर बघावे तेव्हा ओरडतच बोलत असते...( वडील तर मस्तच अभिनय करतात).
( आज अशोकमामा नाहित तर
( आज अशोकमामा नाहित तर हा धागा आज शांत शांत आहे. (
कुणीतरी काल काय झाले ते
कुणीतरी काल काय झाले ते update दयाना please...........
मी टाकु का थोड्या वेळाने
मी टाकु का थोड्या वेळाने अपडेट? चालेल? आत्ता जरा कामात आहे
ok
ok
कालच्या भागाचे अपडेट्सः
कालच्या भागाचे अपडेट्सः २८/११/२०१३
कालच्या भागाची सुरुवात जान्हवी आणि बाबांच्या फोनने झाली. जान्हवीचे बाबा पिंट्याच्या उशीरा येण्याबद्दल खंत व्यक्त करतात, तेव्हा काल पिंट्या आपल्याबरोबर असल्याचे ती सांगते व पिंट्यावर विश्वास दाखवुन तो जे करतो आहे त्यात त्याला मदत करावयास सांगते. इकडे गोखल्यांच्या घरी समस्त सासुमंडळी एकत्र येउन पिंट्याविषयी चर्चा करत असतात. जान्हवीला पिंट्या कुठे आहे अस विचारल्यावर तो गेल्याच समजत आणि इंदु (मोठी आई) फुरंगटुन बसते. पिंट्याने घरातल्या कोणाची चौकशी न केल्याबद्दल खटकल्याचे सासुला सांगते. या भागात प्रथमच मोठी आई स्वत:च्या पदरच बोलत असताना दाखवली आहे. नाहीतर आत्तापर्यंत एखाद्याची री ओढणे यापलिकडे काहीच बोलली नाहिये. सहस्त्रबुद्धेंच्या घरी पिंट्या मामाच्या बॅगेत मिळालेल्या चंद्रहाराबाबत काहीतरी गहन विचारात असल्याचे दाखवले आहे. त्याच्या उशीरा येण्यावरुन आईशी बोलताना तो आपण बिझनेस करणार असल्याच सांगतो. बाहेर जाण्यासाठी खाली येताना बाबा रघुअण्णांबरोबर नवीन जागा बघायला जाणार असल्याच समजल्यावर पिंट्या ती जबाबदारी स्वतःवर घेतो. शशिकलाबाई नेहमी प्रमाणे चाळीतुन बंगला/फ्लॅटमध्ये जायची स्वप्न भंग होत असल्याचे बघुन व कमावती मुलगी लग्न करुन घरातुन गेल्यामुळे चिडलेल्या आहेत आणि जावयाला लुटायच्या विचारात आहेत. पिंट्या त्यांना कडक शब्दात श्रीला त्रास न देण्याबद्दल सुनावतो.
जान्हवी मोठ्या आईची माफी मागायला तिच्या खोलीत गेली असता तिला तिच्याकडुन प्रथमच सोन्याच्या जरीच्या साडीबद्दल आणि चंद्रहाराबद्दल समजत आणि ती विचारात पडते.
लोकहो, मामांच्यासारखे खुसखुशीत अपडेट्स देता आले नाहियेत मला. पण घरकाम, स्वयंपाक यातुन जमेल तस बघितल आणि तेच इथे मांडले आहे. काही गोष्टी राहुन गेल्या असतील तर कृपया सांगाव्यात.
चु, भु. द्या. घ्या.
मुग्धा. मस्त अपडेट ..
मुग्धा. मस्त अपडेट ..:)
मुग्धा मस्त ग....मामांची कमी
मुग्धा मस्त ग....मामांची कमी जाणवली नाही....घारुअण्णा नाही गं ते शेजारचे...दुसरं कायतरी नाव आहे...मला पण आठवेना बघ....घारुअण्णा हे तर राहिबा मध्ये आहेत ना.....
.घारुअण्णा नाही गं ते
.घारुअण्णा नाही गं ते शेजारचे...दुसरं कायतरी नाव आहे...मला पण आठवेना बघ....घारुअण्णा हे तर राहिबा मध्ये आहेत ना.....>>>>> त्यांचे रघुअण्णा
अरे हो हो... बरोबर मी एडिटते
अरे हो हो... बरोबर मी एडिटते लगेच.. आणि अपडेट्स आवडल्यबद्दल धन्स.
काय झाल. थंड का पडला हा धागा?
काय झाल. थंड का पडला हा धागा? अपडेट्स नाही आवडले की मामांचे अपडेट्स नाहित म्हणुन सगळ्यांनी मालिका बघितली काल?
मस्त अपडेट मुग्घा. बाकी
मस्त अपडेट मुग्घा. बाकी मालिका संथ गतीने चालू आहे अगदीच
बाकी या स्लॉटमधे मी जोधा अकबर आणि बालिका वधू बघते हल्ली. खर्जातला अकबर आणि तत्ववेत्त्याच्या आवेशातली जोधा मस्त लुटुपुटुची लढाई खेळत असतात.
मी बघतीये रोज पण जान्हवीच्या
मी बघतीये रोज पण जान्हवीच्या रडाकेपणाचा आता कंटाळा आला आहे.
हो ना. तिला आजे सासु, एक चुलत
हो ना. तिला आजे सासु, एक चुलत सासु आणि आते सासु यांची मन जिंकलेली दाखवायची आहेत ना? मग काहितरी करा म्हणाव मंदेला. नुसत रडायला लावतोय तिला,
काहितरी ईंटरेस्टींग होईल म्हणुन बघायला बसाव तर जानु आपली मुसुमुसु पोझिशनमध्येच असते.
Pages