Submitted by कविन on 28 November, 2013 - 23:36
थेंब थेंब मुरू दे
माती मधे जिरू दे
बी त्यात रुजू दे
कोंब त्याला येऊ दे
कोंब असा वाढू दे
पान त्याला फुटू दे
माझ्या उंची येव्हढी
फांदी त्याची वाढू दे
फांदी फांदी नटू दे
फुलांनी हसू दे
थोडी फूलं देवाला
थोडी मला मिळू दे
(लेकीला - बी ते झाड हा सायन्स मधला पाठ शिकवताना गंमत म्हणून रचलेली कविता. ही म्हणून बघता बघता तिच्या पटकन लक्षात राहिली आणि मग तो प्रश्न आमचा फार प्रयास न करता लक्षात राहिला.)
(पूर्वप्रकाशीतः बालनेटाक्षरीचा ई दिवाळी अंक - धम्म धमाका -२०१३)
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त!
मस्त!
किती मस्त लिहिलीस कवे...
किती मस्त लिहिलीस कवे... आवडेश!
धन्यावाद चनस, बागे बागे,
धन्यावाद चनस, बागे
बागे, सानुचा अभ्यासातला इंटरेस्ट कायम रहावा म्हणून काहीना काही असं करावच लागतं ग. पर्यायच नाही दुसरा
छान.... सहज, साध्या शब्दातली
छान.... सहज, साध्या शब्दातली बालसुलभ कविता.
फारच सुंदर, गोड-गोड बोलगाणे
फारच सुंदर, गोड-गोड बोलगाणे .....
छान!
छान!
ग्रेट, सुरेखच! लेकीच्या
ग्रेट, सुरेखच! लेकीच्या निमित्ताने सगळ्याच गरजूंना केवढी क्रिएटीव्ह मदत केली आहेस तू
आमच्यासाठीही सोप्पं करून टाकलंस एकदम.
मस्त!
मस्त!
छानच आहे ग कविता.
छानच आहे ग कविता.
कविता आवडली!
कविता आवडली!
येस तरीच कुठे वाचली आहे असे
येस
तरीच कुठे वाचली आहे असे वाटत होते
मस्तय
ग्रेट! अगदी
ग्रेट!
अगदी 'गवताचंपातंवार्यावरडोलतं डोलतानाम्हणतंखेळायलाचला' चा फील आला.
आवडले गाणे .
आवडले गाणे .
खूपच गोड!!!
खूपच गोड!!!
गोड आहे बालनेटाक्षरीची लिंक
गोड आहे
बालनेटाक्षरीची लिंक मिळेल का?
मला 'राधाची स्ट्रॉबेरी'ची पण
मला 'राधाची स्ट्रॉबेरी'ची पण आठवण झाली...
खूप गोडुली आहे. मुलांना असे
खूप गोडुली आहे. मुलांना असे सायन्स शिकवायला तुझ्यासारखी आई पाहिजे कविता, मस्तच.
सुंदर कविता
सुंदर कविता
(No subject)
मनापासून धन्यवाद सिंडरेला,
मनापासून धन्यवाद
सिंडरेला, ही बालनेटाक्षरीची लिंक. त्यावर त्यांच्या बर्याच अंकांच्या लिंक/पीडीअॅफ फाईल्स उपलब्ध आहेत
http://balnetakshari.blogspot.in/
गजानन, 'गवताचंपातंवार्यावरडोलतं >> हे मी 'गवताचं पातं वार्यावर डोलतं" च्या ऐवजी 'गवताचंपातंवा" असं एकत्र वाचलं आणि चंपाचा नक्की काय संबंध असावा असा विचार करत बसले. मग कळलं
खूप गोडुली आहे. मुलांना असे
खूप गोडुली आहे. मुलांना असे सायन्स शिकवायला तुझ्यासारखी आई पाहिजे कविता, मस्तच.



>>>
अनुमोदन!
खुप मस्तय हे
खुप खुप दन्स
तू प्रायमरी शिक्षकांक्चं काम खुपच सोप्प करतेयेस
ही कविता सुद्धा मी आईच्या शाळेत शेअर करेन
मस्तच आजच वाचून दाखवते
मस्तच
आजच वाचून दाखवते लेकाला.