ध्यान (ओशोची पत्र कविताअनुवाद)

Submitted by डॉ.विक्रांत प्र... on 18 March, 2013 - 07:04

ध्यानातून काहीही मिळवायची
“आकांक्षा ”
सर्व प्रथम मनातून काढून टाका .
अगदी सहज पणे ध्यान करा .
जे घडायचे ते घडू द्या .
एक दिवस अगदी सहज
सारे काही घडू लागेल.
प्रयत्नांनी ध्यान कधीच होत नाही .
खरतर ,
प्रयत्न हाच अडथळा असतो
प्रयत्नात आणि अभ्यासात
एक प्रकारचा तणाव असतो
एक प्रकारची अपेक्षा असते
अगदी शांतीची अपेक्षा सुद्धा
अशांती निर्माण करते
हा तणाव जायला हवा.
ज्या क्षणी हे पटते
दैवी शक्तीचे अवतरण होते.
“मी हे करतो”
हे वाटणेच थांबवा.
त्या ऐवजी अनुभूत करा.
मी मला, स्वत:ला
त्याच्या हवाली करत आहे.
हेच समर्पण आहे.
स्वत:चे संपूर्ण समर्पण करा.
जेव्हा हे कराल तेव्हाच
अगाध रिक्त्ततेच प्रवेश होईल.
शरीर आणि श्वास शांत होईल.
तुम्ही म्हणाल ,
“हे तर मनाने सुद्धा घडते!”
पण जेव्हा मन जाते,
तेव्हा जे घडते,
ते अवर्णनीय असते.

अनुवाद--विक्रांत प्रभाकर
http://kavitesathikavita.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विचार आवडले.

“हे तर मनाने सुद्धा घडते!”
पण जेव्हा मन जाते,
तेव्हा जे घडते,
ते अवर्णनीय असते.

ह्यात मन जाते म्हणजे काय, हा प्रश्न पडला.

धन्यवाद ,सुनिताजी,समीरजी,
<<<<ह्यात मन जाते म्हणजे काय, हा प्रश्न पडला.>>>>ध्यानात मनाच अस्तित्व नष्ट होते.थोडक्यात मनाच्या बंदिशाळेतून सुटका .जोवर आपण मन असतो वा मनात असतो .तोवर ध्यानात नसतो.

"अ-मन" अवस्थेचं सुरेख वर्णन केलंय .....

बरेच जण मेडिटेशन म्हणजे चिंतन /मनन वा एकाग्रता समजतात

पण एकाग्रता म्हणजे कॉन्स्ट्रेशन - एका वस्तूवर मन केंद्रित करणे

चिंतन म्हणजे काँटम्प्लेशन - एका विचाराभोवतीच फिरत रहाणे, एकच विचार घोळवणे

आणि मेडिटेशन/ ध्यान म्हणजे नो माईंड स्टेट - निर्विचार अवस्था

भाषांतर छान झालेय.

चित्तशुध्दीशिवाय ध्यान लागत नाही व ध्यानाशिवाय चित्तशुध्दी होत नाही असे हे त्रांगडे आहे. तरीही ध्यान करत जा असेच सर्व संत सांगतात. कारण ध्यान कधिही लावता येत नाही तर ते कृपेमुळे लागते व जे प्रयत्न करीत असतील त्यांचेच लागते.
एकदा हे लक्षात आले की ध्यान लागावे म्हणून प्रार्थना करणे इतकेच आपल्या हातात आहे बाकी काहीही आपल्या हातात नाही हे कळते व साधनेतील ताण निघून जातो. किंवा दुसर्‍या श ब्दात सांगायचे झाल्यास ताणरहित साधना सुरू होते.