नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छे! फारच stereotypical झाली ही सिरीयल! आज काल मी बघत नाही ही सिरीयल इथे अपडेट्स वाचते फक्त.
अशोकमामा, अगदी मनापासूनचा सल्ला Happy तुम्ही ही तुम्हाला बोअर व्हायला लागले तर सिरीयल बघणं बंद करा!

जान्हवी श्री तर कधी बाहेर फिरायला बिरायला पण जाताना कधी दाखवले नाहीत. लग्न झाल्यापासून आपले घरकोंबडेच दोघेही.>>>> श्री कमीत कमी ऑफिसच्या निमित्ताने तरी बाहेर पडतो, पण जान्हवी अजिबातच नाही.

जान्हवी दिसायला खूप सुंदर आहे सावळी असली तरी तेजस्वी आहे..... nice looking....
पण रडका चेहरा करते तेव्हा ती जास्त Over react करते. Sad Sad Sad Sad Sad Sad

श्री खोटं बोललेलं अजिबात आवडले नाही...खरे काय ते सांगून टाकायचे होते...एकतर आईआजी ने खोटं बोलणार्या तिच्या मुलाला घराबाहेर हाकलले आहे....आणि आजपर्यंत दाखवलेल्या श्रीच्या स्वभावाला हे शोभत नाही..."जान्हवी ही एकमेव कमावती मुलगी त्यांच्या घरातली आपण लग्न करून आणल्यामूळे, यावेळेस मी बिले भरली, तिच्या आईला घरखर्चाला पैसे दिले..यापुढे जान्हवीच नोकरी करुन त्यांचे काय ते बघेल, पिंट्याला नोकरी लागेपर्यंत"...असे तो आईआजीला सांगू शकला असता.......पिंट्याला मिळालेल्या चन्द्रहाराचे पण पुढे काहीच दाखविले नाही..चंद्रहाराबद्दल सहाजणी अगदी शेंगदाणे-फुटाण्याच्या गप्पा मारल्यासरख्या मारतात....

जिज्ञासा....

मी तुमचा राग समजू शकतो.....आणि मलाही अपडेट लिहिताना जाणवते की 'अरे आजच्या भागातील जो प्रकार आवडला नाही...किंवा अमान्य वाटण्यासारखी जी उदाहरणे झाली....उदा. नातवाने सांगितलेली खोटी कारणे आजीने खरी मानणे....ती इथे कशी शब्दबद्ध करावी ?" इ.इ. - पण मुद्दा असा की आता या मालिकेत इतके आपण गुंतलो आहोत की परवाच्या एका भागात श्री ची गैरहजेरी होती....ती खटकली....तसेच जान्हवीने केवळ त्याच्या बेडरूममध्ये हातात मोबाईल घेऊन बसणेही स्वीकारण्यासारखी बाब नाही. सुरुवातीच्या भागापासून ती तेजस्वी दाखविली आहे....'स्त्री ने मनात आणले तर ती काय करू शकत नाही ?" असले उदगार ऐकून श्री तिच्यावर मोहीत झाला आहे....तेव्हा अशी मुलगी लग्नानंतर 'गोकुळ' मध्ये त्या सहा स्त्रियांचा अनुनयच करत बसली आहे हेही विचित्र वाटते.

अशा बर्‍यात डाव्याउजव्या बाजूंवर लिहिता येईल....पण शेवटी मालिकेविषया तसेच श्री व जान्हवी या दोन पात्रांबद्दल वाटत असलेली आपुलकी विचारात घेता मालिका पाहाणे आलेच....असे वाटते.

कालचा भाग संपताना जान्हवी एकदम बावळट दाखवली. श्री पिंट्याला म्हणतो "तू तिथेच थांब...आम्ही दोघे येत आहोत.." तर जान्हवी रडक्या सुरात म्हणते "हा मला उद्या भेटायला नाही का म्हणतोय"
Uhoh आता नवरा लगेच भेटायला घेऊन जातोय तर हा काय हीचा प्रश्न???

कालचा भाग संपताना जान्हवी एकदम बावळट दाखवली. श्री पिंट्याला म्हणतो "तू तिथेच थांब...आम्ही दोघे येत आहोत.." तर जान्हवी रडक्या सुरात म्हणते "हा मला उद्या भेटायला नाही का म्हणतोय">>>> मला वाटल होत की श्री म्हणेल तिला "आता आपण जातोय ना त्याला भेटायला, मग तु उद्याच काय घेउन बसलीस?" पण नाही समजुतदार म्हणजे तरी कित्ती? जरा तरी रिअ‍ॅलिस्टीक दाखवा राव! आमच्याइथे स्वारी आमची अक्कल काढुन मोकळे झाले असते.

मुग्धा Happy

जान्हवी आता खूप नाटकी वाटते आहे. पिंट्याला (आधीच नाव पिंट्या!) सारखं बाळा, बाळा करणं तर अतीच वाटतं. तिचे बाबाच काय ते खरेखुरे वाटतात. बोअर होतेय ही मालिका.

जान्हवी आता खूप नाटकी वाटते आहे. पिंट्याला (आधीच नाव पिंट्या!) सारखं बाळा, बाळा करणं तर अतीच वाटतं. तिचे बाबाच काय ते खरेखुरे वाटतात. बोअर होतेय ही मालिका. > अनुमोदन

जान्हवी आता खूप नाटकी वाटते आहे. पिंट्याला (आधीच नाव पिंट्या!) सारखं बाळा, बाळा करणं तर अतीच वाटतं. तिचे बाबाच काय ते खरेखुरे वाटतात. बोअर होतेय ही मालिका. > अनुमोदन .

आशूडी....

"....सारखं बाळा, बाळा करणं तर अतीच वाटतं....."

अगदी योग्य निरीक्षण. "बाळा...बाळा" काय ? जान्हवी मुळात पंचविशीची मुलगी.....पिंट्या भाऊ असला तरी ताडमाड वाढलेला....चाळीत आणि इतरत्र गावरान दंगा घालणारा टग्या पोरगा....आपट्याच्या अंगावर गेलेला, त्याला घराबाहेर काढलेला युवक तो.....पाचवेळा बारावीला बसलेला....इतके सदगुण त्याच्यात असल्यावर कुठली बहीण त्याला ’बाळा, बाळा...उगी उगी...डोळे पूस पाहू’ असे म्हणत बसेल हे पटत नाही.

त्यामुळे जान्हवी हे पात्रच आता अगदी पडेल होत चालले आहे.....[पण काय करणार ? मालिका तर पाहिलीच पाहिजे, अखेरपर्यंत]

त्यामुळे जान्हवी हे पात्रच आता अगदी पडेल होत चालले आहे.....[पण काय करणार ? मालिका तर पाहिलीच पाहिजे, अखेरपर्यंत]>>>> म्हणजे आता मालिका बघणे बंद केले तरी चालेल....मामा अपडेटस टाकणार अखेरपर्यंत..ते वाचता येतील....तसेपण मामांचे अपडेटस जास्ती चांगले असतात मालिकेपेक्षा....

एकिकडे मनस्वीपणाचे डांगोरे पिटणारा श्री इतक्या सराईतपणे आज्जीशी खोटं बोलतो?
सो कॉल्ड मोठ्या संकटांना (अनिल आपटे इ.) सामोरी जाणारी जान्हवी पिंट्या भेटत नाही या गोष्टीने इतकी ढासळावी?
त्याची पुढची भेट सोमवारी, मग आठवडाभर घरी झोपा काढण्यापेक्षा जरा त्याच्या मागे फिरून माहिती काढावी ना. सगळे आपले हातावर हात धरून नुसती चिंता करतो विश्वाची या अविर्भावात.

सरू मावशीला चंद्रहार दिला.. झालं? कुणी पहायाला नाही मागत? Uhoh खास करून भोचक आई आज्जी? आणि पार्शियालिटीला काही हद्द? जान्हवी घसा कोरडा करून काही सांगत असली तर ही बाई ठार ऐकणार नाही. पण श्री ने सांगितलं नाही पैसे दिलं. झालं ठेवला मॅडमनी विश्वास.

ही अशी कर्तबगार माणसं प्रसंगी मुर्खासारखी वागतात हे पटत नाही.

मुग्धा :स्मित:>>>> ऑर्किड हे नक्की कशासाठी ऑर कशामुळे आलेल स्मित आहे बरे? जरा कळेल का?

परन....मुग्धा....अन्जू....अंजली...

तुम्ही मालिका पाह्यचे थांबवू नका, प्लीज ! असेही होईल की अचानकच नाट्यमय होऊन जाईल कथानक आणि जान्हवी ही केवळ बडे घर की बहु न राहता ख-या अर्थाने स्त्री शक्तीचे उदाहरण बनेल.

दक्षिणा..... "कर्तबगार माणसं प्रसंगी मुर्खासारखी वागतात हे पटत नाही." ~ बरोबर. इथे माझी एक शंका अशीही आहे की रोहिणी हट्टंगडीसारखी सर्वार्थाने ज्येष्ठ असलेली अभिनेत्री प्रसंगी दिग्दर्शक देवस्थळी आणि लेखिका कुलकर्णी यांच्यासोबत भरकटत चाललेल्या कथानकाविषयी चर्चा करत नसतील का ? त्यांचा तितका दरारा असेलच की सेटवर.

मंदेच्या आधीच्या सिरेलीत सुद्धा विक्रम गोखलेंसारख्या अभिनेत्याने अश्या पद्धतीने काम केलच होते कि

यांच्यासोबत भरकटत चाललेल्या कथानकाविषयी चर्चा करत नसतील का ?>> Happy असं करत नसतं कोणीच कोणत्याच सेटवर.

रीअली ? सेटवरील घाईगर्दीत या कलाकारांचे कॅमेरा ऑन होण्यापूर्वीचे काही फोटो पाह्यला मिळाले होते मला... त्यावेळी यांच्या हातात स्क्रीप्ट होते व ते वाचत असताना दिसत होते.....त्यावरून तर्क बांधला की त्यामध्ये रोहिणीसारख्या अभिनेत्रीला काही खटकत असेल तर त्या देवस्थळींसमवेत सुधारणेच्या दृष्टीने काही बोलत असतील. पण तसे दिसत नाही खरे.

स्क्रिप्ट वाचतात ते संवाद पाठ करण्यासाठी मामा, आणि कॅमेरा कुठला आहे, कुठे बघायचे आहे इत्यादीसाठी. काही खटकलं, तरी ते सांगायची ती जागाही नसते आणि वेळही नसतो कोणाला. मालिका भयंकरच टॅन्जन्ट जायला लागली, तर टीआरपीवरून दिग्दर्शक आणि लेखक काही बदल करत असावेत. कलाकार यात काहीच ढवळाढवळ करत नाहीत. प्रोफेशनल असतं ते सगळं Happy

रोहिणी हट्टंगडीसारखी सर्वार्थाने ज्येष्ठ असलेली अभिनेत्री प्रसंगी दिग्दर्शक देवस्थळी आणि लेखिका कुलकर्णी यांच्यासोबत भरकटत चाललेल्या कथानकाविषयी चर्चा करत नसतील का ? >>>> अशोक मामा रोहिणीबाईंनी या आधी 'चार दिवस सासुचे' नावाच्या एका महामालिकेत याच प्रकारच पात्र उभ केल होत. ही मालिका नंतर इतकी भरकटली होती की खुद्द दिग्दर्शकाला सुद्धा आठवत नसेल की मालिका काढायचा सुरुवातीचा उद्देश काय होता..... अनंत पात्र होती या मालिकेत. मालिकेतील काही पात्र कधी अती चांगली आणि कधी अती वाईट अस टोकाच वागायची...... तिथे त्या काही करु शकल्या नाहीत तर ही तर आत्ता कुठे सुरु झालीय....

तुम्ही मालिका पाह्यचे थांबवू नका, प्लीज ! असेही होईल की अचानकच नाट्यमय होऊन जाईल कथानक आणि जान्हवी ही केवळ बडे घर की बहु न राहता ख-या अर्थाने स्त्री शक्तीचे उदाहरण बनेल.>>>>> मी थांबवणार नाहिच्चे मालिका बघण... बाकी काही नाही तर श्रीला बघण्यासाठी तरी बघेन Wink पण मामा तुमच्या आशावादाला मानल.....

पौर्णिमा..... निश्चित्तच चित्रपट आणि दूरदर्शन मालिका यामध्ये जाणवण्यासारखा फरक म्हणजे चित्रपटांचे शूटिंग किती काळात पूर्ण व्हावे याची काही ठरलेली मर्यादा नसते, मात्र मालिका एकदा प्रसारित होऊ लागली की पुढील भागही पटापट चॅनेलच्या ताब्यात द्यावे लागत असणार.... यामुळेच कदाचित कलाकारांना मत प्रदर्शनाला वाव नसेल.

आमच्या कोल्हापूरात जयप्रभा आणि शांतकिरण स्टुडिओत चाललेले शूटिंग पाह्यला आम्ही तिघेचौघे मित्र जात असू.....त्यावेळी डॉ.श्रीराम लागू, विक्रम गोखले निळू फुले, रंजना, आदी ज्येष्ठ समजले जाणारे कलाकार शूटिंग चालू होण्यापूर्वी दिग्दर्शकांसमवेत अगदी सखोल चर्चा करत असताना दिसायचे, त्यानुसार सेटची मांडणी, संवाद यात बदलही केले जायचे.....त्यातही निळू फुले आघाडीवर. अर्थात हे सारे अगदी खेळकरपणाने चालत असे.

मुग्धा....

"...पण मामा तुमच्या आशावादाला मानल...."

~ हे बाकी खरंय मुग्धा.... शेवटी मानवजातीची जी काही भरभराट झाली आहे ती त्याला 'आशा' नामक टॉनिक मिळत गेले म्हणूनच.

मी हल्ली बघतच नाही पण मामांचे अपडेट्स आवडतात म्हणून इथे येते. श्रीचा खोटेपणा अतिशय चुकीचा आहे आणि आपल्यासाठी तो इतरांना खोटे बोलायला लावतोय हे पटत नाही मावशी आणि नंदनला कशाला खोटेपणात सामील करायचे. हल्लीच्या शब्दात सांगायचे तर श्री दुसऱ्याच्या नावावर खोटेपणाच्या पावत्या फाडतोय ते निषेध करण्यासारखे आहे. मालिका गंडत चाललीय.

जान्हवीचे लाडे लाडे बोलणे अति होत चालले आहे. सतत तिला इनोसंटसम्राज्ञी दाखवून काय साध्य करायचे आहे? श्री ऑक्स्फर्ड सोडा कुर्डूवाडीच्या कालेजातला यमबिये सुद्धा वाटत नाहीये. श्रीबाळामागे गोपिका दिवसभर धावत असतात. व धावून धावून दमून खोलीत आला की बायडी पण दोन गिरक्या मारून घेते त्याच्याभोवताली. हातंगडीबाई सतत भिंग घेऊनच असतात. शॅट, ही सिरिअल लईच बोअर होऊन राहिलीये आता....

सुमे Lol Rofl

बुधवार दि. २७ नोव्हेंबर २०१३ : अपडेट

~ आजचा भाग म्हणजे आमच्या जान्हवी बिचारीच्या रडण्याची कसोटी पाहाण्यासाठीच होता की काय अशी शंका यावी इतपत तिला रडविले गेले.....आणि कारण काय तर....परत तेच, पिंट्या. अगदी मध्यरात्री श्री व जान्हवी पिंट्याने जो पत्ता सांगितला आहे तिथे जातात. तो असतो रस्त्यावरील एक धाबा....तिथे बाकड्यावर बसून दोघेतिघे काहीतरी खाणेपिणे करत आहेत, तर ही तिघे चहा घेतात....चहा घेता घेता जान्हवी आपली चौकशी चालू करते. श्री बाजूला रस्त्याकडे पाहात....तर पिंट्या बहिणीची नजर चुकवत, शून्यात. जान्हवी त्याला क्रमाक्रमाने प्रश्न विचारते पण त्याला तो एकच उत्तर देतो....मी घरी जातो. त्यावर आता श्री देखील नाराज झालेला दिसतो व त्याला म्हणतो, "हे बघ, इथे असे उघड्यावर वाद घालणे आणि तुझ्या बहिणीने रडणे बरे दिसत नाही. तू आमच्यासमवेत घरी चल. तिथे व्यवस्थित बोलणे होईल...." पिंट्या यालाही अगोदर नकार देतो पण जान्हवीचा अवतार पाहून तो तयार होता व तिघे कारमधून बंगल्याकडे येतात. दार उघडताक्षणीच समोर बेबीआत्या उभी आहे. ह्या तिघांना मध्यरात्री घरी आल्याचे पाहून ती अर्थातच चौकशा करते....तेव्हा श्री सांगतो, "अगं, आम्ही कॉफी प्यायला गेलो होतो, तर तिथे हा गाठ पडला. जान्हवीला याच्याशी काहीतरी बोलायचे होते, म्हणून मग मीच म्हटले याला की चल तू घरी....". यावर आता बेबीआत्याने 'बरं..." म्हणायचे होते, पण तरीही ती श्री च्या झोपण्याची वगैरे चौकशी करते. श्री काहीबाही उत्तर देवून वेळ मारून नेतो व त्या दोघा बहीण भावाला घेऊन आपल्या रूममध्ये जातो. तिथे परत तेच मुद्दे...."तू काय करतोस...? मध्यरात्री नंतर घरी का येतोस ? बाबांची तुला काही काळजी नाही..." इथे मात्र पिंट्या बहिणीकडे पाहून म्हणतो, "बापाला तरी माझी काळजी कुठे आहे वा होती ? त्याना तर फक्त एकच मुलगी...तू !". इथे श्री देखील चमकून एकदा पिंट्याकडे तर एकदा जान्हवीकडे पाहतो. पिंट्या जान्हवीला जास्त बोलू देत नाही...."मी जातो आता...मी आल्याशिवाय बाबा झोपत नाहीत, हे तुला माहीत आहे...". जान्हवी गप्प बसते....तर श्री "याला मी सोडून येतो..." असे म्हणत त्याच्यासमवेत बाहेर पडतो..... [मला वाटले होते की, पिंट्या चंद्रहाराबाबत काहीतरी आपल्या बहिणीला सांगेल...पण तो का मुकाट बसलेला दाखविला ते काही कळले नाही...]

श्री परततो....पण त्या अगोदर गुपचूपपणे शरयू बाहेरून आली आहे आणि डोक्यातील गजरा काढून ती किचनमध्ये लपवीत आहे....श्री तिला अशा अवेळी पाहून तिची चौकशी करतो....तर ती नित्याची कारणे, "मला झोप येत नव्हती...मग जरा बाहेर फिरून आले...आता तहान लागली आहे, म्हणून पाणी पित आहे..." श्री ते मान्य करतो. शरयू तिथून लगबगीने निघून जाते. इकडे पिंट्या आपल्या घरात आला आहे. सदाशिवराव त्याला "आत जेवण वाढून ठेवले आहे, जेवून घे..." असे म्हटल्यावर 'मी बाहेर खावून आलो आहे...." असे म्हणत वर आपल्या खोलीकडे जातो. श्री त्याला मध्यरात्रीच फोन करतो, "उद्या तू माझ्या ऑफिसमध्ये ये....दहा मिनिटासाठी का होईना पण येच..." पिंट्या नेहमीप्रमाणे प्रथम नकार देतो; पण श्री आग्रह करतो, सांगतो, "अरे तुला बिझिनेस करायचा आहे ना काहीतरी ? तर त्या संदर्भात मी काही करू शकतो का त्यासाठी तू ये ऑफिसमध्ये, आपण बोलू...." असे म्हणून फोन ठेवून देतो.

बेबीआत्या सकाळी आपण चहा घेऊन आईआजीच्या रूममध्ये येते, चहा देत....आणि आजीला 'काल मध्यरात्री जान्हवीचा भाऊ आला होता....बरोबर श्री देखील होता...". यावर मात्र आजी तिच्यावर नाराज होतात. 'अगं अशा घरातील किरकोळ बाबीकडे तू किती आणि कशाला लक्ष देतेस ? तिचा तो भाऊ आहे, म्हणून आला असेल भेटायला....त्यात काही गैर नाही...आणि श्री समवेत ती कॉफी प्यायला बाहेर गेली यात काही चुकले असे मला वाटत नाही....मी तिला सून म्हणून अजूनी स्वीकारलेले नसले तर याचा अर्थ तिने काय करावे कुठे जावे....हे श्री ठरवेल...तू किंवा मी नाही....आणि अशा गोष्टींनी घरातील शांतता बिघडून जाईल. तू लक्ष देवू नकोस...." इतके सांगितल्यावर बेबीआत्या प्रथमच आईने त्यांची बाजू घेतलेली पाहून गप्प राहते.

आता अन्य सासूमाया जान्हवीला रात्री आलेल्या भावाबद्दल आम्हाला का सांगितले नाही याचा जाब विचारतील उद्या.

[......मंडळी...एक विनंती ~~ एका विवाहाच्या निमित्ताने मी गुरुवार ते सोमवार कोल्हापूर-पुणे-नगर-अजिंठावेरुळ-औरंगाबाद....मग परत पुणे, कोल्हापूर अशा प्रवासात असल्यामुळे उद्यापासून 'होणार सून मी या घरची' मालिका पाहू शकणार नाही. त्यामुळे साहजिकच इथे गैरहजेरी असल्याने अपडेट्सही देता येणार नाहीत....तरी आपल्या सदस्य बंधूभगिनीपैकी कुणीतरी ही जबाबदारी घेतल्यास मला आनंद होईल.....धन्यवाद....अशोक पाटील]

Pages