उर्मी विझली कचरा जाळू

Submitted by बेफ़िकीर on 29 November, 2011 - 09:38

उर्मी विझली
कचरा जाळू
बोकड कापा
मी मी नाही?

पेनासाठी
चावट मांड्या
फाकत पीती
ओघळ शाई

डोहामध्ये
मैथुनमंथन
प्रबोधनाचा
डिंक मुखाला

अवघड खेडे
पेलत पळती
या प्रतिभेचे
कुंटणखाने

ये चल मृत्यो
या श्वासाला
वा ठर खोटा
जगासारखा

किंवा मग या
शब्दांमध्ये
लाटा नाचव
कुजक्या कुजक्या

अंतिम सत्ये
गटारगंगा
आणि मुलामे
अत्तरफाये

कुत्रे वाघुळ
घुबडे कोल्हे
माणुस उंदिर
काहीबाही

-'बेफिकीर'!

गुलमोहर: 

Pages