Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नोकरी करणारी घरात जान्हवी
नोकरी करणारी घरात जान्हवी एकटीच असतांना ती गेल्यावर घर कस चालावं ह्या बद्दल जान्हवीचा काय विचार होता? काय प्लान होता? >>>>>>>>> मला तर वाटत होत की लग्नाआधीच जान्हवी या विषयावर श्रीशी बोलेल, लग्नानंतरही मी जॉब सुरु ठेवेन आणि पिंट्या कमावता होई पर्यंत माझ्या आई वडीलांना आधार देईन इ.इ.... पण............... मग स्वतःलाच समजावले की ही सिरीयल आहे.....
स्निग्धा.... जान्हवीने श्री
स्निग्धा....
जान्हवीने श्री ला हे सांगितले आहेच.....[आता त्या भागाची लिंक कशी शोधायची हे माहीत नाही, पण दोघे हॉटेलात बसले आहेत आणि ती आपल्या नोकरीचा विचार त्याच्यासमोर मांडते....म्हणजे "बाबांच्या ऑपरेशनसाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते तू द्यावेस असे मला कधीच वाटणार नाही, म्हणून मी नोकरी करते...." यावर श्री लागलीच होकारही देतो. बाकी आपला भाऊ कमावता होईल हे तिने गृहित धरले आहे असे मानले पाहिजे. लग्न करू इच्छिणार्या प्रत्येक बहिणीला तसे वाटत असतेच....त्याशिवाय भाऊदेखील नोकरीबाबत गंभीर होत नाही.
मी ही सिरियल नेहेमी बघत नाही,
मी ही सिरियल नेहेमी बघत नाही, कधी लवकर घरी गेलेच तर चालू असते म्हणून बघते , पण अधून मधून इथले अपडेट्स वाचते. मामा छान लिहिता. या सीरियल मधल्या खूपश्या गोष्टी पटत नाहीत.
कोणत्याही सिरियल मधे मुलगी(नायिका) कितीही समंजस दाखवली तरी प्रेमात पडली की लगेच लग्न करते. भले तिचे कुटुंबावर कितीही प्रेम असुंदे. जान्हवी एवढी समंजस, प्रेमळ वैगरे दाखवली आहे, मग लग्न झाल्यावर फक्त आपल्याच पगारावर चालणारे घर नंतर कसे चालेल एवढा विचार पण मनात येत नाही का? आपल्या भावाचे शिक्षण चालू आहे, वडीलांचे ऑपरेशन करायचे आहे तरी नोकरी करण्यासाठी सगळ्यांच्या परमिशन ची वाट पहातेय. असे कॅरॅक्टर डोक्यात जाते. लग्न झालेल्या मुली जेवढ्या आत्मीयतेने सासरच्या माणसां बद्दल विचार करतात, त्यांना न दुखवण्याचा प्रयत्न करतात (ते कितीही वाईट वागले तरी) तेवढा विचार आपण ज्यांच्या बरोबर आयुष्य घालवले त्यांच्याबद्दल का नाही करत?.
सामी....धन्यवाद. आता तुझ्या
सामी....धन्यवाद.
आता तुझ्या प्रतिसादातील मुद्द्याबाबत खुलासा करतो. श्री सोबत ओळख होणारी जान्हवी तू पाहिलेली नसावीस बहुतेक. त्याच्याशी संबंध येण्यापूर्वीच पहिल्या दोन भागातच तिला लग्नासाठी पाहायला एक कुटुंब येते. आईवडील आणि मुलगा असे तिघे असतात.....शशीकलाबाई त्या आईला घेऊन किचनमध्ये जातात, तर सदाशिवराव वडिलांना चाळ दाखवायला नेतात....पिंट्या तिथे बाजूलाच बसलेला आहे. तर जान्हवी व तो नवरामुलगा यांच्यातील संवाद असा आहे. जान्हवी त्याला म्हणते, "मी तुम्हाला एक सांगते. या घरात मीच एकटी मिळविती आहे, वडील अपघातामुळे घरीच असतात तर भावाला नोकरी नाही....तर जर आपले लग्न ठरले तर माझा पगार मी इथे घरी दिला तर चालेल का तुम्हाला ?" यावर तो मुलगा चटदिशी उत्तर देतो, "काय हरकत असणार नाही माझी ? तुझाच पगार देणार आहेस ना ? चालेल मला....".
अर्थात हे लग्न ठरत नाही ही बाब अलाहिदा....पण एवढ्यावरून जान्हवी आपल्या लग्नानंतर हे घर कसे चालणार याचा विचार करतेच. शिवाय श्री सोबत झालेले लग्न म्हणजे प्रेमविवाहच आहे...आणि तिचे घर कुणावर चालते याची जाणीव त्याला असल्याने तोही सासूला पैसे देतो.....असे हे सारे लॉजिक आहे.
मामा... जान्हवि खोटे बोलते
मामा...
जान्हवि खोटे बोलते म्हनुन आजि सासु ईतके रामायण - महाभारत करते.... ( जान्हवि चा राग .इ.. ) आनि आता तर श्रीच चद्रहारा वरुन . पैसा वरुन खोटे बोलत आहे ... ं मग आता काय होनार आहे ...श्रीच काय माहित..??? आणी सिरियलच पण..:-(
पण मामा मग एवढी समजुतदार
पण मामा मग एवढी समजुतदार मुलगी, लग्नानंतर नोकरी साठी परवानगीची वाट का बघत बसते ? प्रेम विवाह झाला म्ह्ण्जे वडील, भाऊ वैगरे दुय्य्म होतात का?
सामी आधीच्या कथेनुसार ते
सामी आधीच्या कथेनुसार ते कॅरेक्टर सजमूतदार होतं.. (असा आपला प्रेक्षकांचा समज करून दिला होता) आता ते ढासळू लागलंय. येऊन जाऊन काय तर त्याच त्याच परंपरा पुढे चालू रहातात.
नविन सुनेने सासरच्यांच्या मनाविरूद्ध काहीही करू नये. जे करायचे ते परवानगीनेच. इन्डिव्हिज्युअॅलिटी नामक काही प्रकार आपल्या भारतात कधी अस्तित्वातच येणार नाही का?
पण मामा मग एवढी समजुतदार
पण मामा मग एवढी समजुतदार मुलगी, लग्नानंतर नोकरी साठी परवानगीची वाट का बघत बसते ? प्रेम विवाह झाला म्ह्ण्जे वडील, भाऊ वैगरे दुय्य्म होतात का? >>>>>> हेच मला म्हणायचय मामा आणि श्रीला माहिती आहे कि जान्हवी स्वाभिमानी आहे, आधी नोकरी करण्या विषयी बोलण झाल आहे, तर त्यानेच लग्नाआधीच आपणहून आपल्या आई, आजी इ.ना हे सांगायला नको? तिने विचारणं, सांगण हा तिचा मोठेपणा झाला. हुश्श.... खुप बोलले.
दक्षिणा, म्हणुनच मला ' एका
दक्षिणा, म्हणुनच मला ' एका लग्नाची दुसरी गोष्ट' आवडायची. त्यातली मुक्ता बर्वे खूपशी खरी वाटायची. जे आहे ते अस आहे, बस. स्वतःला लग्नानंतर चेन्ज करणे हा प्रकार तिथे न्हवता, आणि चेन्ज व्हायचच असेल तर स्वत:च्या मर्जिने, कुणाला दाखविण्यासाठी किंवा इम्प्रेस करण्यासाठी नाही.
मटा मध्ये बहुतांची अंतरे
मटा मध्ये बहुतांची अंतरे मध्ये कोणी तरी लिहिले होते .जानव्ही सदानकदा रडका चेहरा करून वावरते. स्वैपाकघरात काही करताना दाखवले नाही. छोट्या आईला तिच्या हातात पैसे बघून हे कशाकरता विचारणारी जानव्ही लग्नात इतका महागाचा हाराबद्दल स्वताच्या आईला काही विचारात नाही इ इ आज काल पेपर मध्ये बहुतांची अंतरे मध्ये बहुतांशी मराठी मालिकांबद्दल लिहिलेले असते :0
सोमवार दि. २५ नोव्हेंबर २०१३
सोमवार दि. २५ नोव्हेंबर २०१३ : अपडेट
~ आज प्रथमच श्री ची आई नर्मदाबाई त्याच्यावर पूर्ण नाराज झालेल्या दिसल्या. चंद्रहाराची आपल्या मुलाने काहीतरी गल्लत केल्याचे त्याना जाणवले आहे आणि इतक्या चांगल्यारितीने चाललेल्या घराची घडी परत तुझ्यामुळे विस्कटून जाते की काय अशी मला आता भीती वाटत आहे असे त्या श्री ला सांगतात. आज प्रथमच श्री तिच्यासमोर कसलाही खुलासा देत नाही, किंबहुना मुखातून एकही शब्द काढत नाही. तिथून तो कसाबसा उठतो आणि सरसूमावशीच्या देवघरात जातो. ती तिथे तिची नित्याची देवपूजा करीत बसलेली असते त्यामुळे श्री च्या हाकांना ती प्रथम प्रतिसाद देत नाही. पण त्याची आतुरता पाहून ती आपले जप थांबविते आणि त्याला विचारते, "बोल...काय सांगण्यासाठी आला आहेस ?" त्यावर श्री मन घट्ट करून चंद्रहाराचा विषय काढतो आणि त्याच्याविषयी आपल्याला काहीतरी प्रथमच खोटे बोलायला हवे हे तिला सांगतो....[इथले दोघांचे संवाद मूक दाखविले आहेत....म्हणजे श्री आपला त्याबाबतीतील डाव सरसूमावशीला सांगत आहे....]. मावशी घाबरते आणि म्हणते, "अरे श्री, पण असे मी आईआजीना कसे सांगू ? एकतर मला खरे काही त्यांच्यासमोर बोलता येत नाही....आणि तू तर चंद्रहाराविषयी खोटे बोलायला सांगत आहेस... मी हे कस निभावून नेऊ...." तरीही श्री वरील प्रेमाखातर ती तयार होते; आणि जिथे बेबीआत्या व आईआजी बसल्या आहेत त्या रूममध्ये जाते. बेबीआत्या आणि सरसूमावशी यांच्यात नेहमीप्रमाणे शब्दयुद्ध झडते आणि अर्थातच तो त्यांच्या कुटुंबातील नित्याचा भाग असल्याने ते युद्ध लटकेच असते. मात्र ज्यावेळी आईआजी सरसूला विचारतात, "श्री ने तुला चंद्रहार दिला आहे का ?" याला झटदिशी 'हो...' असे उत्तर सरसूकडून आल्यावर प्रथम बेबीआत्यालाच झटका बसतो....तिचा विश्वासच बसत नाही. पण सरसू हार माझ्याकडे आहे हेच सांगत बसते....आणि आजी मध्ये पडून बेबीआत्याला थांबविते....'जर श्री ने तिला हार दिला आहे असे ती सांगते, तर मग तीन हारांचा विषय आता मिटला...." यावर सरसू आनंदाने तिथून जाते, पण बेबीआत्या म्हणते, "पण आई यात मला काहीतरी वेगळेच दिसते..." त्यावर आजी म्हणतात, "आपण आपल्याच घरातील स्त्री वर असा संशय घेणे ठीक नाही...आत तो विषय नको....पण मला श्री शी बोलायचे आहे ते त्याने त्याच्या सासूला खर्चासाठी दिलेल्या पैशाबाबत....". दुसरीकडे सरसूमावशी जिन्यात आल्यावर श्री तिला थांबवितो..उत्सुकतेने संवाद विचारतो....आणि सरसूने सारे काही व्यवस्थित केल्याचे सांगितल्यावर त्याला आनंद होतो...आणि मग तो सुटकेचा सुस्कारा टाकतो....व जान्हवीकडे निघतो.
इकडे जान्हवी आपल्या रूममध्ये श्री ची वाट पाहात आहे आणि त्याच्या अपराधीपणाच्या वर्तनाला ती बरोबर टिपते. ती त्याला त्याबद्दल विचारतेही...हाराचाही विषय काढते, पण तो फक्त 'अगं तो विषय संपला आता....हार मिळाला ना सरसूमावशीकडे....काळजी नको." अशी पळवाटीची उत्तरे देतो. श्री चे वर्तन जान्हवीला परत कोड्यात टाकते. त्याअगोदर तिने घरी सदाशिवरावांना फोन केलेला असतो. त्यांच्या तब्येतीची चौकशी तर करतेच पण पिंट्याचा विषय काढल्याक्षणीच सदाशिवराव त्याच्याविषयी काहीही चांगले बोलण्याच्या मनःस्थितीत नाहीत. फक्त "जानू तुझी तू तिथे काळजी घे..." असाच सल्ला देतात.
आज ना पिंट्या ना त्याची आई कथानकात आल्या. उद्या भागीरथीबाई "तू तुझ्या सासूला खर्चासाठी पैसे दिले आहेस....त्याबाबत मला विचारायचे आहे...श्री" या वाक्याने त्या विषयाची सुरुवात करतील.
आता फक्तमामांच्या अपडेट्स
आता फक्तमामांच्या अपडेट्स वाचण्यासारख्या राहिल्या आहेत ह्या मालिकेमधे
मावशीचं नावं सरसू आहे का?
आता फक्तमामांच्या अपडेट्स
आता फक्तमामांच्या अपडेट्स वाचण्यासारख्या राहिल्या आहेत ह्या मालिकेमधे>>> +१११ मी सिरीअल पाहिली तरी अपडेट पण न चुकता वाचते.
मावशीचं नावं सरसू आहे का?>>> अग नाही बहुतेक सरूमावशी म्हणतात म्हणजे सरस्वती नाव असावे.
मामा, श्री एक खोटे लपवायला
मामा, श्री एक खोटे लपवायला किती जणांना खोटे बोलायला लावणार आहे त्यापेक्षा हा विषय आधीच व्यवस्थित सोनाराशी बोलून हाताळू शकला असता.
बाबांचे ऑपरेशन १ महिन्यात करायला हवे असा उल्लेख ही सिरीयल चालू झाली तेव्हा पहिल्या आठवड्यात वगैरे केला होता, अजूनही ऑपरेशनकडे विशेष कोणी लक्ष देत नाहीये, जान्हवीने जबाबदारी घेऊन एव्हाना ऑपरेशन होऊन बाबा मस्त चालायला लागलेले दाखवायला हवे होते.
अन्जू अगं ते डॉक्टर परदेशी
अन्जू अगं ते डॉक्टर परदेशी गेले आहेत म्हणे. हे बाकीचे सगळे घोळ दाखवायचे होते ना त्यामुळे डॉ. ना पाठवून दिले वाटतं.
ओके अंजली धन्यवाद. बाबांचे
ओके अंजली धन्यवाद. बाबांचे ऑपरेशन एका महिन्याच्या आत होणे जरुरी आहे असा उल्लेख होता, जर लवकरात लवकर करणे गरजेचे होते तर मुबई-ठाण्यात बरेच मोठे डॉक्टर आहेतना? ते दुसऱ्या ठिकाणी करायचे. पहिल्यांदा इतकी हातघाई दाखवली की त्यासाठी जान्हवी अनिलशी घाईघाईने लग्न करायला निघाली होती आता बाबांना लाईटली घेत आहेत.
हो आता सगळे मुद्दे
हो आता सगळे मुद्दे विसरल्यासारखेच दाखवतायत. नोकरीचे परत काय झाले आता कुणास ठाऊक?
हो आता सगळे मुद्दे
हो आता सगळे मुद्दे विसरल्यासारखेच दाखवतायत. नोकरीचे परत काय झाले आता कुणास ठाऊक?>>>>> अग अंजली आपला इथे मंगळवार सुरु झाला तरी मालिका अजुन रवीवारातच आहे, म्हणजे अजुन सोमवार उजाडुन पिंट्याची भेट व्हायची आहे. त्या भेटीत काही गोंधळ असतील तर त्यासाठी अख्खा आठवडा जाउन पुढच्या आठवड्यात या मॅडम नोकरीचा विचार करतील, कारण सासवांशी बोलताना म्हणाली होती जान्हवी की मी श्री आणि बोरकर सरांशी बोलुन ठरवते काय ते...... अजुन बराच वेळ लागेल तिला ऑफिस जॉइन करायला.
मालिकेला गुर्हाळ असंही एक
मालिकेला गुर्हाळ असंही एक उपनाव द्यायला हवं( हे खरं तर सर्वच सिरियल्सना लागू पडतं)
पटापट सगळं पुढे सरकतंय. झटझट जानू ने नोकरी जॉइन केलिये, श्रीने धडाधड आईआज्जीला तोंडावर सांगितलंय कि चंद्रहार चोरीला गेला ऐनवेळी सुचलं नाही म्हणून दुसरा केला. रूपये ५० हजार सासूला दिले कारण ती मागायला आली. इ.
असं चित्र कधी दिसणार?
मेन कल्प्रिट तर ती हटंगडी आहे. सगळ्यांवर कंट्रोल हवा तिला. हापिसात काय चाललंय? घरी काय चाललंय. कोण नोकरी करणार काय करायचं आहे? झालं सगळं जा आता म्हणावं काशियात्रेला.
श्री इतकं मोठ्ठं एम्पायर सांभाळतोय, हार्वर्ड मध्ये शिकलाय म्हणे मग त्याच्या कर्तृत्वावर जराही विश्वास नाही? बरं पर्सनल अकाऊंटमधून ५० काढले तर आज्जीला काय करायचं आहे? गर्लफ्रेंडसवर उडवले असते तर गप्पच बसली असती ना? नाही. पण जान्हवी आणि तिच्या फॅमिलिचं काही आलं की मॅडमचं डोकं फिरलंच. काही झालं की फोडा जान्हवीवर खापर. कै चाल्लंय काय?
आणि इतकं आयुष्य पाहूनही ही बाई एका माणसावरून अख्ख्या घराण्याचा तर्क का काढते? एका हाताची बोटं सारखी नसतात, एका फॅमिलितली सगळी माणसं सारखी कशी असतील? सगळी गुरं एकाच काठीने हाकण्यात काय पॉईंट आहे?
मेन कल्प्रिट तर ती हटंगडी
मेन कल्प्रिट तर ती हटंगडी आहे. सगळ्यांवर कंट्रोल हवा तिला. हापिसात काय चाललंय? घरी काय चाललंय. कोण नोकरी करणार काय करायचं आहे? झालं सगळं जा आता म्हणावं काशियात्रेला. राग>>:D
मेन कल्प्रिट तर ती हटंगडी
मेन कल्प्रिट तर ती हटंगडी आहे. सगळ्यांवर कंट्रोल हवा तिला. हापिसात काय चाललंय? घरी काय चाललंय. कोण नोकरी करणार काय करायचं आहे? झालं सगळं जा आता म्हणावं काशियात्रेला
गर्लफ्रेंडसवर उडवले असते तर गप्पच बसली असती ना? नाही. पण जान्हवी आणि तिच्या फॅमिलिचं काही आलं की मॅडमचं डोकं फिरलंच. काही झालं की फोडा जान्हवीवर खापर. कै चाल्लंय काय?>>>>
Yala Satvik santap mhanave ka?aapan khupach bhavanik drushtya guntat jato malikanmadhye ase mala vatate.
दक्षे दक्षे अग हो हो कित्ती
दक्षे दक्षे अग हो हो कित्ती चिडशील ग?
मेन कल्प्रिट तर ती हटंगडी
मेन कल्प्रिट तर ती हटंगडी आहे. सगळ्यांवर कंट्रोल हवा तिला. हापिसात काय चाललंय? घरी काय चाललंय. कोण नोकरी करणार काय करायचं आहे? झालं सगळं जा आता म्हणावं काशियात्रेला. +++११११
आणि इतकं आयुष्य पाहूनही ही बाई एका माणसावरून अख्ख्या घराण्याचा तर्क का काढते? एका हाताची बोटं सारखी नसतात, एका फॅमिलितली सगळी माणसं सारखी कशी असतील? सगळी गुरं एकाच काठीने हाकण्यात काय पॉईंट आहे?++++ complete गंड्लय हे character
सगळ्याच व्यक्तीरेखा गंडत
सगळ्याच व्यक्तीरेखा गंडत चालल्यात .....बेबीच त्यातल्यात्यात बरेचदा तिच्या भूमिकेला साजेसा विचार करतेय......सरू आणि शरू ही विनोदी पात्रे....आणि ती कॉपी कॅट इन्दूआई......
पुरुषोत्तम श्री पण आता खोटं बोलून काय काय घोळ घालणार ....
जे जे दाखवतील ते बघत रहावे ||
मामांचे अपडेट्स वाचावे ||
प्रतिदिन
दक्षिणा....छान आणि रोखठोक
दक्षिणा....छान आणि रोखठोक लिहिले आहेस.... आशा आहे की 'होसूमीयाघ' यातील टीमपैकी कुणीतरी तो प्रतिसाद वाचावा आणि मंदेला सांगावा..... काहीतरी फरक होईल ही आशा.
बाकी....सार्या भाच्यांनी जे
बाकी....सार्या भाच्यांनी जे लिहिले आहे ते मला मंजूर आहेच....मी जरी अपडेट देत असलो तरी ते त्रयस्थपणे देणेच गरजेचे असते....म्हणजे पडद्यावर जे दाखविले जाते ते प्रथम शब्दबद्ध करणे आणि नंतर त्या अनुषंगाने इथे चर्चेला आलेल्या मुद्द्यांचाही विचार करणे.
आता बाकी कथानक 'गोकुळ' बाहेर आले पाहिजे....म्हणजे जान्हवी बॅंकेत नोकरीवर येणे, सदाशिवरावांच्या पायाचे ऑपरेशन आणि पिंट्याचे भविष्य याकडेही कथानक वळले पाहिजे.
आता बाकी कथानक 'गोकुळ' बाहेर
आता बाकी कथानक 'गोकुळ' बाहेर आले पाहिजे>>>> +११११
जान्हवी श्री तर कधी बाहेर फिरायला बिरायला पण जाताना कधी दाखवले नाहीत. लग्न झाल्यापासून आपले घरकोंबडेच दोघेही.
दक्षुतै.. चिल माडी!! आपण
दक्षुतै.. चिल माडी!!
आपण बोलुन सिरीयल पुढे गेली असती तर आठवड्यात संपली असती माबोकर कृपेने..
अंजली .. बाहेर जायच राहु दे .. त्यांच नुकतच लग्न झालाय असं तरी वाटतयं का .. इतके प्रश्न नि खोटी उत्तरे ह्यात अडकलेत नुसता..
पण काहिही दाखवतायत..रटाळ नि स्लो एकदम... एक प्रश्न मग सहा आयांचे चेहरे मग त्यांचे अजुन सहा प्रश्न ..
मग श्री .. त्याची सात वेगळी उत्तरं .. मग पुन्हा सहा आयांचे चेहरे .. मग जान्हवीचा .. परत एक प्रश्न ..
इतक्या ठिकाणी बघुन कॅमेर्याची मान जागेवरच नसेल राहात .. तोपर्यंत संपला एक भाद .. वैताग :रागः
मंगळवार दि. २६ नोव्हेंबर २०१३
मंगळवार दि. २६ नोव्हेंबर २०१३ : अपडेट
~ आज मालिकेच्या नायकाने खोटेपणाची कमाल केल्याचे दाखवायचे होते, ते काम त्याने अजिबात न कचरता केले...आता त्याचे हे खोटे बोलणे काहीशा फलदायी कामासाठी होते असे मानले तरी त्याच्या बोलण्यावर एका उद्योगधंद्याच्या कर्तबगार बाईनी इतक्या सहजपणे विश्वास ठेवावा ही बाब न पटण्यासारखीच...पण तरीही 'महायुद्ध होणार' ही जी वावडी दोन भागापूर्वी उठली होती ती फुसकीच ठरली. नर्मदाबाई, इंदूबाई आणि बेबीआत्या या तिघींनी श्री ला आईआजीच्या खोलीत पाठविले आणि आपण बाहेर थांबल्या. आजीला पाहून श्री ने आपल्याला किती आनंद झाला आहे हे दाखविले कारण आजीच्या ओंजळीत खोबरेल तेलाची वाटी होती. मग आजीलाही नातवाविषयी भरभरून प्रेम आले आणि त्या त्याच्या केसांना तेल लावून डोक्याला मालीश करू लागल्या. मग सुखनैव तिथे बसलेल्या श्री कडे आजींनी जान्हवीच्या आईने ऑफिसमध्ये येऊन शिवडेमॅडमकडे दिलेल्या बिलांची चौकशी चालू केली शिवाय श्री वर बॉम्बगोळा म्हणून ५० हजार रुपयांचाही जाब विचारला. श्री इथे काही वेळ गडबडला....आता काय उत्तर वा खुलासा द्यायचा याचा आराखडा तो मनोमनी तयार करू लागला. आजीशी आता खोटे बोललेच पाहिजे अशी वेळ आली आहे. काही तयारी त्याने केली आहे पैकी एक म्हणजे जान्हवीच्या आईने दिलेली बिले. त्याबाबत, "अगं आजी, त्यानी ती बिले शिवदेमॅडम यांच्याकडे दिली हे मी मान्य करतो, पण ती यासाठी दिली की जान्हवी इकडे आली आहे आणि मुलगा काही काम करत नसल्याने त्यांच्याकडे आता ही कामे करायला माणूस नाही, मग आमच्या ऑफिसमधील कुणी अशा कामासाठी जात असेल तर त्याच्याकडून ही बिले भरायला पाठवून द्या.....इतकेच.." [वास्तविक यावेळी आजीच्या चेहर्यावर हे सारे खोटे आहे असे भाव उमटल्याचे दिसते, पण त्या काही बोलत नाहीत...]. आजी मग पुढचा प्रश्न विचारतात..."ठीक आहे. पण मला असेही समजले की तू त्या बाईला पन्नास हजार रुपये रोख दिलेस ? ते खरे असेल तर कशासाठी दिले ?". इथे श्री ला उमजते की हा सारा कारभार शिवदेमॅडम यांचा आहे कारण त्यानाच माहीत होते की पर्सनल अकौंटमधून पैसे काढले आणि शशीकलबाईंच्यासमोरच पाकिटात भरले होते. आता हा चापातून कसे सुटायचे यावर श्री विचार करतो आणि त्याच्या नजरेसमोर नंदन येतो....तो पैशाच्यावेळी तिथे असतोच....श्री मग मनी काहीतरी आखून सांगतो, "आजी ते पन्नास हजार मी नंदनला दिले....त्याला हवे होते."....यावर आजी म्हणतात, 'अरे नंदनने मागील महिन्यातच एक लाख रुपये घेतले होते....आणि आता परत पन्नास हजार ?...". श्री ची चाल..."लागत असतील त्याला...म्हणून दिले....". आजीना समाधान झाल्याचे दिसले....मग हा वीर श्री बाहेर येतो. तिथे ह्या तिघी आया उत्सुकतेने त्याची वाट पाहात उभ्या आहेत...त्याना हा हसतमुख चेहर्याने 'सारे काही ठीक आहे. आईआजीनी काही विचारले नाही..." असे सांगतो व तिथून निघतो.
रुममध्ये जान्हवी त्याची आतुरतेने वाट पाहात आहे हे खरे, पण ती खूप घाबरलेली आहे. श्री आत आल्यावर त्याला दिसते की जान्हवीची अवस्था फार बिकट झाली आहे. तो तिला आणखीनच घाबरवितो....आजीला सारे काही समजले आहे...त्या चिडल्या आहेत, वगैरे वगैरे.... सुरुवातीला जान्हवी रडकुंडीला येते मग श्री तिला जवळ घेऊन 'विसरुन जा....आजीने काहीही विचारले नाही...' असे सांगून हसवितो. जान्हवी त्याला लटक्या रागाने मारतेही....तो प्रसंग दिग्दर्शकाने चांगला रंगतदार केला आहे.
रात्री...परत जान्हवीचा फोन पिंट्याला आणि तो त्याने न घेणे....दोनतीन प्रयत्नानंतर तो घेतो....काय काम आहे ? असे काहीशा उद्धटपणे विचारतोही....जान्हवी त्याला आम्ही तुझ्याकडे येत आहोत असे सांगते. श्री देखील पिंट्याला तू आता कुठे आहेस त्याचा पत्ता दे म्हणून सांगतो. पिंट्या पत्ता देतो...तो गोकुळ परिसरातीलच असल्याने "तू तिथेच थांब...आम्ही दोघे येत आहोत.." असे सांगून श्री व जान्हवी त्याच्याकडे जातात....तिथून त्याला ते आपल्या घरी आणतात....दार उघडतात, तर समोर बेबीआत्या आहे.
मामा अपडेट्स वाचायलाच आले.
मामा अपडेट्स वाचायलाच आले. श्रीचे बिचाऱ्या नंदनच्या नावावर खोटे बोलणे किती चुकीचे आहे. श्री असेच करत राहिला तर तो खोटेपणात रुतणार.
Pages