नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी ही मालिका अगदी क्वचितच सर्फिंग करताना बघायचे, तो पाटकरांचा (अशोक शिंदे) नातजावई दाखवला होता, तुषार दळवीचा मुलगा असतो, वैदेहीचा बदला घ्यायला, तिच्या मुलीशी (अन्विताची मुलगी), लग्न करतो.

अच्छा...

मामा चोरटा आहे हे आधीच माहीत असते. मग तशी काळजी आधीच ( निदान जान्हवी आणि तिच्या बाबांकडून )किंवा नंतर शंका सुद्धा घेतली जात नाही हे पटत नाही . स्वभावाने सज्जन असणे म्हणजे बावळट असणे नाही.

नंतर शंका सुद्धा घेतली जात नाही हे पटत नाही . स्वभावाने सज्जन असणे म्हणजे बावळट असणे नाही. >>++१११

<पण श्री आपल्या पर्सनल अकाउंट्मधून काढतो ना पैसे? अ ओ, आता काय करायचं
असेच काहीसे शिवदे मॅडम सांगतात आईआजीला, असे आठवते आहे.>+१

<श्री....२८ वर्षाचा तर जान्हवी २५ वर्षाची आहे....असे उल्लेख अगोदरच्या भागात दोनतिनदा येऊन गेले आहेतच. त्यामुळेच म्हणावेसे वाटते की इतका मॅच्युअर युवक इतक्या बालिशपणे व्यवहार कसे करेल ? शिवाय अशा बाईशी की जिने लग्नापूर्वी त्याला घरात येऊ नका तुम्ही आमच्या....तसेच जान्हवीला भेटल्याचे मला आवडणार नाही अशी धमकीही दिली होती......लग्नात चंद्रहार चोरीला गेला होता....तो कुणी उचलला असेल याचाही अंदाज याला यायला नको का ? ते नाही.> थांबा आणि वाट पहा. ही मालिका आहे. प्रेक्षक पाहतात तोवर चालवायची असते. एकेका भागात एकेका प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावायला टी-२० सामना नाही. (नंतर इथले प्रतिसाद वाचूनच मालिकावाले सुधारणा करताहेत असेही लिहाल Wink )

हे होते प्रतिसादावरचे प्रतिसाद . आता मालिकेवरचे :
शशिकलाबाई शपथांनाही घाबरत नाहीत. बुप्रा असाव्यात.

शशिकलाबाईंना पैशासाठी जान्हवीकडे न पाठवता जावयाकडे पाठवणे हा मास्टरस्ट्रोक. या दोघांतले चतुरंगाचे सामने बघायला मजा येईल.

सध्या ज्या प्रकारे मालिका भरकटली आहे आमच्या घरी तर ही मालिका बघणे बंद केलय आम्ही

अती शहाणा श्री
बावळट जान्हवी
मुर्ख श्री ची सासु
आणि एकदम बिनडोक लेखक दिग्दर्शक

शिवदे मादाम च मला पटल. त्यांची दोन्ही कडून पंचाईत. सांगाव तरी पंचाईत न सांगाव तरी पंचाईत. एकीकडे श्री. दुसरी कडे भागीरथी म्याडम. शेवटी गृहउद्योग भागीरथी म्याडम चा आहे. त्यामुळे त्यांनी आजींच्या कानावर घालणे पटले .हो पुढच्या भागात पिंट्याला ट्रंकेत तो हार मिळणार आहे. आता भरपूर घोळ .खर तर आत्ता मालिकेतल नाट्य सुरु झालय

सध्या सासू(जाह्नवी ची आई ) डोक्यात जायला लागली आहे... काहीही दाखवतात .. एवढ कोणी वागत का.. ?? अतीच वाटत ...

श्रीला गुप चुप पैसे द्यायचे होते तर शिवादे मॅडम समोर तरी का दिलेत?

अतीच वाटत ... << सगळच जरा जास्तच अतीच आहे Proud
श्रीच वागणं, जान्हवीच रडणं, सासवांचा मुर्ख पणा, आई आज्जीच स्वभाव सगळच Happy

शुक्रवार दि. २२ नोव्हेंबर २०१३ : अपडेट

~ बर्‍याच दिवसांनी या भागात खर्‍या अर्थाने नाट्य पाहाण्यास मिळाले. श्री ने आपल्या सासूला चक्क ५० हजार रुपये पाकिटात घालून दिले आणि उलट "मी तुमचा मुलगाच आहे असे समजा आणि हक्काने मला सांगा...". त्यावर ती लबाड बाई आता आपल्या आयुष्याची चिंताच मिटली इतक्या समाधानाने ते पाकिट घेते...हा सारा प्रकार शिवदेमॅडम पाहातात आणि आपली नोकरीतील नैतिकता खर्‍या अर्थाने भागीरथीबाईशी बांधली गेली आहे या विचाराने त्या लागलीच त्याना फोन करतात....फोनवर सहस्त्रबुद्देबाईंनी ऑफिसमध्ये येऊन कोणती आणि किती बिले दिलीत हे तर सांगतातच शिवाय 'श्री सरांनी पर्सनल अकाऊंटवरून पन्नास हजार रुपये काढले आणि जान्हवीच्या आईला दिले...." इकडे साहजिकच भागीरथीबाईंचा संताप अनावर आणि त्या अस्वस्थ झाल्या [कुणीही झालेच असते...] तर तेवढ्यात बेबीआत्या आत येऊन सोनाराने दिलेले बिल व त्यातील आयटम्स यांची यादी देतात, तर त्यात तीन चंद्रहाराचा उल्लेख कसा काय ? असे आजी विचारतात. पैकी दोन आपणच सांगितले होते हे त्या कबूल करतात....त्यावर बेबीआत्या 'तिसरा हार श्री च्या सहीने देण्यात आला....' असा गौप्यस्फोट करते....परत आजी अस्वस्थ.

बेडरूममध्ये जान्हवी अंथरुण घालीत आहे तर श्री फोनवर कुणाशीतरी बोलत आहे. त्याकडे जान्हवीचे लक्ष जाते. श्री म्हणतो..."२ बीएचके आणि १२०० स्क्वे.फूटापर्यंत चालेल....तुम्ही रेट फिक्स करा आणि मला फोन करा....मी करतो फायनल...". उत्सुकतेने जान्हवी "काय चालले आहे ? कुणासाठी फ्लॅट ?"....त्यावर श्री गंमतीने तिला म्हणतो, "तुलाच..." यावर जान्हवी म्हणते, "मी हे घर सोडून जाणार नाही, श्री....मला सार्‍या आयांची मने जिंकायची आहेत...शिवाय तुला मी इथून घेऊन जाऊ शकतच नाही..." मग त्यावर तिला समजावणीच्या स्वरात श्री सांगतो, "तुझ्या आईबाबासाठी फ्लॅट घेत आहे...."......इथे मात्र आज जान्हवीने "श्री तू किती चूक करत आहेस याची तुला कल्पना नसेल....बाबा कोणत्याही परिस्थितीत त्या फ्लॅटमध्ये जाणार नाहीत. ते जावयाकडून एक रुपयाचीही मदत घेणार नाहीत. आयुष्यभर त्यानी प्रामाणिकपणे काम केले आहे....आणि आता निवृत्त आयुष्यात घर जात आहे म्हणून जावयाकडून घर घेणार नाहीत....तू त्याना सांगूही नकोस...." असे सांगितल्यावर श्री सुरुवातीला आपल्यापरीने युक्तीवाद करतो पण शेवटी त्याला जान्हवीचे म्हणणे पटते आणि तो माघार घेतो.

सहस्त्रबुद्धे यांच्या घरी शशीकलाबाई हजाराच्या त्या नोटा हावरटाप्रमाणे मोजत बसल्या आहेत. तोपर्यंत सदाशिवराव आत येतात. नोटा लपविल्या जातात. ते म्हणतात, 'रघुआण्णा आणि मी दोन खोल्यांचे घर बघून येतो..." त्यावर शशीकलाबाई आपल्याच गुर्मीत त्या रघुआण्णाशी आपली तुलना करू नका. त्यांचा जावई बॅन्केत आहे पण माझा जावई उद्योगपती आहे असे म्हणते....याचा अर्थ काय हे सदाशिवरावांना समजत नाही, ते विचारतात. त्याला उत्तर म्हणून ही मूर्ख बाई तितक्याच मूर्खपणाने म्हणते, "अहो आपल्या जावयाचा एवढा मोठा बंगला आहे त्यात इतक्या खोल्या आहेत, तर त्यातील दोन खोल्या तो आपल्याला देईलच ना...मग आपण तिथेच जाऊन राहू..." यावर प्रचंड संतापलेले सदाशिवराव बायकोच्या ह्या असल्या संधीसाधू स्वभावाला ताडताड बोलून पुन्हा जान्हवीचे इथे नाव घेऊन तिकडून पाण्याचा एक पेला जरी आणशील तर माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेव असे उग्र बोलतात व बाहेर पडतात.

तिसर्‍या हाराच्या कोड्यात पडलेल्या आजी आणि बेबीआत्या विचार करीत असताना इकडे पिंट्या काहीतरी कामासाठी मामाची ती ट्रंक खाली घेतो आणि उघडतो तर त्यातून चंद्रहार बाहेर येतो. उद्या तो घेऊन तो बहुतेक बहिणीकडे येईल असे वाटते.

पिंट्याला काही सांगण्याची संधी मिळणार नाही.
चोरीचा आळ पिंट्यावर येणार.(सोमवार पर्यंत पिंट्याशी बोलू नकोस इ. सेटिंग याच नाट्यासाठी असणार)

५००००० दिल्याचे जानू आणि तिचे बाबा दोघांनाही कळणार नाही. सगळाच आनंदी आनंद !

सध्या ज्या प्रकारे मालिका भरकटली आहे आमच्या घरी तर ही मालिका बघणे बंद केलय आम्ही >>>> अनुमोदन.. मलापण इतका कंटाळा आलाय. मालिका पाहम्यापेक्षा मी इथे येऊन फक्त अपडेट्स वाचते. आणि त्यावरच्या भन्नाट प्रतिक्रियासुद्धा Happy
पिंट्याला काही सांगण्याची संधी मिळणार नाही.
चोरीचा आळ पिंट्यावर येणार.(सोमवार पर्यंत पिंट्याशी बोलू नकोस इ. सेटिंग याच नाट्यासाठी असणार)
५००००० दिल्याचे जानू आणि तिचे बाबा दोघांनाही कळणार नाही. सगळाच आनंदी आनंद ! >>>> खरच आनंदी आनंद आहे ही मालिका आणि श्री तर खरचं महान आहे. Angry

शनिवार दि. २३ नोव्हेंबर २०१३ : अपडेट

~ आईआजी आणि बेबीआत्या त्या तिसर्‍या चंद्रहारामागील गौडबंगाल उलगडण्याच्या संवादात आहेत. आजी "माझा श्री असा नव्हता, पण जान्हवीशी लग्न करून तो तिच्या आहारी गेला आहे.....इतका खर्च आपल्या सासूला कसा काय देऊ शकतो...?" इथे बेबीआत्या चमकते. कारण तिला वाटत असते की आपण फक्त हाराविषयी बोलत आहोत....ती सखोलपणे चौकशी करायला सुरुवात करायला लागते तेव्हा कळते की जान्हवीच्या आईने श्री च्या ऑफिसमध्ये येऊन शिवदेमॅडमना बिले दाखवून पैसे घेतले आहेत आणि विशेष म्हणजे ते श्री ने दिलेसुद्धा. बेबीआत्या संतापते.....ती स्वभावाने कशीही दाखविली असली तरी आपल्याकडे सून म्हणून आलेल्या मुलीच्या आईने आमच्याकडेच येऊन घरखर्चाची बिले देणे ही बाब अशक्य कोटीतील असून मी त्याला पायबंद घालणार असे जे म्हणते ते पटते. तरी अजूनी बेबीआत्याला तिचा अवतार पाहून आजी पन्नास हजाराबाबत सांगत नाही. त्यामुळे आता फक्त तिसरा चंद्रहार हीच शोध मोहीम बेबीआत्या घेते. ती आजीला म्हणते, "मी घरातील सर्वानाच विचारते की श्री ने त्यांच्यापैकी कुणाला चंद्रहार दिला आहे का ?" त्याला आजी परवानगी देतात....पण बोलताबोलता त्या म्हणतातही, "श्री या प्रश्नामध्ये जान्हवीमुळे अडकला असेल तर मग घरात महायुद्ध होणार....". बेबीआत्या हेच वाक्य प्रथम शरयूला आणि क्रमाक्रमाने बाकीच्यांना सांगत जाते आणि चंद्रहाराबद्दलही चौकशी करते....शरयू आणि नर्मदाबाई अर्थातच नकार देतात. पण तिथेच उभी असलेली जान्हवी कावरीबावरी होते कारण तिला आपल्याला श्री ने लग्नाच्या आदल्या रात्री हरविलेला चंद्रहार दिलेला आठवते.....ती रुममध्ये श्री साठी चहा घेऊन येते आणि थेटच त्या चंद्रहाराबद्दल विचारते....तो गडबडतो, गोंधळून काहीही उत्तर देत राहतो. जान्हवीच्या लक्षात येते की हा काहीतरी खोटे बोलत आहे. पण तिला अधिकचे बोलायची संधी न देता नाष्ट्याच्या निमित्ताने खोलीतून बाहेर पडून तो किचनमध्ये येतो.....तिथे त्याची आई आणि बेबीआत्या बोलत असतात....सरस्वतीमावशी देवघरात पूजा करत बसली असल्याने तिचे मौनव्रत चालू असते त्यामुळे तिला हाराविषयी अजुनी विचारले गेले नाही. नर्मदाबाई श्री ला थेट हाराविषयी विचारतात आणि "आत्ताआत्ताच ह्या घरातील गोष्टी सुरळीत चालल्या आहेत असे वाटत असतानाच हे आता नवीनच काय निघाले हाराचे ?" असा प्रश्न श्री ला करतात. श्री तिथून सरसूमावशीच्या रूमकडे जातो.....तिथे तो तिच्याकडून हारासंदर्भात मदतीची अपेक्षा करतो...[हा भाग सोमवारी आहे]

इकडे पिंट्या घरात वरच्या मजल्यावर सद्याच्या त्याच्या परिस्थितीमुळे एकटात रडत बसला आहे. त्याला आईवडील आणि बहीण जे काही बोलले आहेत त्याची आठवण येत आहे....त्याच वैतागाच्या भरात शेजारी असलेली मामाची ट्रंक ठोकरून देतो.....ती उघडते, त्यातून काय बाहेर पडले हे पाहाण्यासाठी पिंट्या जवळ जातो तर त्याला मामाने चोरलेला चंद्रहार सापडतो.....आता कथानकाला काय वळण द्यावे लागेल हे त्याच्यावर अवलंबून असेल.

मामा मस्त. मला एक कळत नाही श्री चंद्रहार देतो तर त्याचे पैसे सोनाराला देऊन, हे माझ्या आजीला सांगू नका किंवा दुसऱ्या सोनाराकडून घेऊन यायला सांगू शकला असता गायतोंडेला, सोनाराकडची बिले घरी येणार हे प्रकरण आईआजीला कळणार हे गृहीतच धरायला हवेना?

हो ना जान्हवीच्या आइला पैसे देतांनाही कोणी नसतांना देता आले अस्ते.

नोकरी करणारी घरात जान्हवी एकटीच असतांना ती गेल्यावर घर कस चालावं ह्या बद्दल जान्हवीचा काय विचार होता? काय प्लान होता? ती त्यासाठी नोकरी करणार होती पण मग तोपर्यंत काय?

अन्जू....अगदी बरोबर. एकतर हार गुपचूप आणणे गरजेचे होते....तसा आणलाही गेला. पण पैसे तर नंदनने रोख दिलेले नाहीतच....क्रेडिटवर खरेदी झाली. मग असा व्यवहार खुद्द श्री यानेच लग्नाच्या दुसर्‍या तिसर्‍या दिवशी बाहेरच्या बाहेर मिटवायला हवा होता. म्हणजे परत तो नंदनकडे तेवढी रक्कम देऊन त्या हाराची किंमत मुख्य बिलात घेऊ नका असे सांगू शकला असता.....त्याच्या पर्सनल अकांउंटमधून तो ५०,०००/- रुपये काढून जर सासूबाईला शेंगदाणे फुटाणे खरेदी करायला दिल्यासारखे देतो तर हाराचेही देऊच शकला असता.

आता अशा या बावळट सी.ई.ओ. मुळे त्या बिचार्‍या जान्हवीची लक्तरे निघणार....पिंट्याने जर हार परत केला नाही तर.

तसेही असेल....होऊ शकेल अदिति....पण मेहरबानी करून त्याने आपल्या आईला तो हार दाखविला नाही म्हणजे मिळविली.

पिंट्याचा व्हिलन करू नका, मी जरी हल्ली बघत नसले तरी मला रोहन गुजर आवडतो, माझे मन तुझे झाले मध्ये पण आहे तो, चांगले काम करतो.

सरूमावशी सांगतील की हार माझ्यासाठी आणला होता. मग हार हरवलाय म्हणूनही सांगतील. पिंट्याकडे हार निघाला (तशीच शक्यता जास्त) की आगीत तेल.

Pages