Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चकणाच आहे तो श्री मला
चकणाच आहे तो श्री
मला बर्याचदा तो चकणाच दिसतो
आणि त्याचं हसणं मला अति कृत्रिम वाटत...
नेहमी तसाच हसतो, तशीच मान वळवतो आणि तसाच डोळे मोठे करतो!
खुष झालाय का आश्चर्यचकित तेच कळत नाही.
इतकं सोडलं तर गोडेय तसा दिसायला तो
रिया आता मी निट बघेन श्रीकडे.
रिया आता मी निट बघेन श्रीकडे. दुसऱ्या सिरीयलचे आहे पण चकणेपणावरून आठवलं, ती स्पृहा आहेना एलतिगोमधली खूपदा चकणी बघते असे मला वाटते.
श्री कधीच का नाही दाढी
श्री कधीच का नाही दाढी करत?
बादवे आता ते 'काहीही हां श्री' आता जाम बोर व्हायला लागलेय.
खुष झालाय का आश्चर्यचकित तेच
खुष झालाय का आश्चर्यचकित तेच कळत नाही>>
अंजली दाढी केल्यावर तो
अंजली दाढी केल्यावर तो मेंगळट/ लहान दिसत असेल कदाचित
(माझ्या प्रोजेक्टमधला एक मुलगा कधीच दाढी करत नाही का तर त्याला म्हणे लोकं विचारतात की १२ नंतर काय करायचा विचार आहे? )
असो!
बादवे आता ते 'काहीही हां श्री' आता जाम बोर व्हायला लागलेय.>>>>+
१
तशा बर्याच गोष्टी आता बोर होईला लागल्यात या मालिकेतल्या... अगदी शरयुचं सारखं सारखं गोष्टी विसरणंही !
हां शक्यता आहे रिया
हां शक्यता आहे रिया
फॉर अ चेंज आता रोहं ला किचन
फॉर अ चेंज आता रोहं ला किचन मधे काम द्या रे. सारखं आपलं नाकावर चष्मा लावून तु. क टाकत पेपर वाचन बंद झालं म्हणावं. जरा भाजी वगैरे निवडायला घ्या आता.
ती डायनिंग टेबलवरची भलीमोठी ताटं पितळेची आहेत काय? असं कोणत्या घरात एवढा सरंजाम नेहमी मांडलेला असतो.
बरं मांडलाय तो मांडलाय पण
बरं मांडलाय तो मांडलाय पण त्यात कधी कुणी जेवतानाही दिसलेलं नाही. नुसती उपडी टाकलेली असतात किंवा एखादी आई फडकं घेऊन पुसत असते.
>>ती डायनिंग टेबलवरची भलीमोठी
>>ती डायनिंग टेबलवरची भलीमोठी ताटं पितळेची आहेत काय?<<
आयला मला वाटलं होतं कि सोन्याची आहेत. गोखल्यांचं काय सांगणार, खुप मोठ्ठा माणुस...
(शंकेला जागा आहे, सोन्याचे असते तर मामाने ताट नाहि तर वाटी, चमचे तरी नक्कीच पळवले असते पहिल्याच भेटीत...)
बुधवार दि. २० नोव्हेंबर २०१३
बुधवार दि. २० नोव्हेंबर २०१३ : अपडेट
~ आजचा भाग म्हणजे जान्हवीचे दोन्ही घराकडून रक्तदाब वाढविण्याचाच प्रकार. पिंट्या काहीही उत्तरे देत आहे. सोमवारी येऊन सांगतो असे म्हणतो.... फोनवर म्हणून चिंताग्रस्त झालेली जान्हवी नवर्याला म्हणते, "श्री, आपण आत्ताच्या आता त्याच्याकडे जाऊ या आणि पाहुन येऊ या, नेमका तो काय करीत आहे..." याला श्री शांतपणे विरोध करतो, म्हणतो, "जान्हवी, त्याने सांगितले ना फोनवर की तो सोमवारी तुला भेटायला येणार आहे....मग सोमवारपर्यंत आपण त्याला वेळ दिला पाहिजे. अशा स्थितीत आत्ता त्याला गाठणे म्हणजे तो चिडीला पडेल आणि मग तुलादेखील त्रासच होईल..." कशीबशी समजूत घालतो बायकोची. इकडे सदाशिवराव आणि शशीकलबाई यांच्यात पिंट्यावरून ताणतणाव वाढीव पातळीवरील चालूच आहे.
सकाळी ऑफिसला जाण्यापूर्वी श्री जान्हवीला केस आवरत असताना पाहतो...इतकी ती फ्रेश दिसत असते की मग श्री ला तिच्याविषयी साहजिकच प्रेम वाटते....तो तिच्याजवळ जातो....तिला जवळही घेतो, पण तितक्यात सरसूमावशी हसतहसत आत येते, नित्याप्रमाणे ह्या दोघांची चेष्टा करते आणि श्री ला नाष्ट्यासाठी खाली घेऊन जाते {हे फार बालिश झाले आहे हल्ली....इतक्या मोठ्या उद्योगाचा हा चीफ एक्झेक्युटिव्ह ऑफिसर, मालकच....लग्न झालेला...तर अगदी लहान मुलागत त्याची अवस्था करून ह्या बायका त्याला अगदी चमच्याने नाष्टा देत आहेत हे पाहणे कठीण आहे....]....जाताना जान्हवीला म्हणते, :"तू देखील ये खाली लगेच..तुझ्यासाठी एक सरप्राईझ आहे...." श्री विचारतो पण मावशी म्हणते 'तू चल खाली, तिथेच तुला कळेल...". ते दोघे जातात तर इकडे शशीकलाबाई जान्हवीला फोन करून परत पिंट्या रडगाणे गाते, "तो रात्री दारु पिऊन आला होता...." वास्तविक प्रेक्षकांना हा प्रसंग दाखविला नाही, त्यामुळे आई म्हणते तितकेच. मग ह्याच बाई लबाडीने जान्हवीला म्हणतात, "तूच आता जावईबापूना सांगून पिंट्याला त्यांच्या बिझिनेसमध्ये चिकटवून दे...". जान्हवी शक्य तितका आवाज ताब्यात ठेवते....म्हणते, "आई, तू शांत बैस, अशा बाबतीत श्री ला विचारणे बरोबर नाही... मी प्रथम पिंट्याशी बोलते....". इकडे घरात शशीकलाबाई पंखा लावायला जातात तर लाईट नाही....लाईट का नाही ? तर तीन महिने वीज बिल भरलेले नाही असे सदाशिवराव थंडपणे बायकोला सांगतात....शशीकलाबाई बिल शोधून काढतात तर ते असते चार हजार रुपये. "माझ्याकडे इतके पैसे कुठे आहेत ? आता बिल कुठून भरायचे ? उद्याच जान्हवीकडे पाठवून देते, भरेल ती." असेल मूर्खासारखे विधान ऐकून सदाशिवराव चिडतात, बायकोला बोलतात, "परत या घरात जान्हवीकडून पैसे आणते असे म्हणायचे नाही.....तुला माझी आणि पिंट्याची शपथ आहे....ती नोकरी करीत होती त्यावेळी दरमहा तुला पैसे द्यायची, ते तू बॅन्केत ठेवत होतीस ते मला माहीत आहे. त्यातील काढ आणि बिल भर...."
गोकुळमध्ये श्री बाबांचा नाष्टा सुरू आहे....आणि जान्हवी सोडून पाच बायका त्याच्या भोवती कोंडाळेच करून उभ्या आहेत....उगाचच तो कसे खात आहे हे बघत....ते चालू असतानाच त्याला 'जान्हवीने नोकरी करावी असा आम्ही ठराव केला आहे..." ही बातमी देतात...श्री ला आनंद होतो....तोपर्यंत जान्हवी खाली येते.... हा बॅग कोट घेऊन बाहेर पडतो...पाचही आया शाळेला चाललेल्या पोराला टा-टा करतात तसा प्रकार करीत आहेत, आणि बिचारी जान्हवी ते पाहात आहे सुन्नपणे. मग मावशी जान्हवीला खुर्चीवर बसायला सांगते आणि तिला नोकरीची अनुमती ही बातमी सासू देते....जान्हवीच्या चेहर्यावर कसलेच भाव नाहीत कारण तिच्या डोक्यात पिंट्याच आहे. इकडे मावशी "तू सोमवारपासून कामावर हजर हो..." अशी सूचना करते तर 'नको, सोमवारपासून नको...मला एक महत्वाचे कामा आहे..." असे ती म्हणताच बेबीआत्या आणि इंदूवहिनी तिच्यावर डोळे मोठे करून "म्हणजे आम्ही हिला नोकरीला परवानगी दिली याचे काहीच वाटत नाही असे दिसते...' असे म्हणत तिथून निघून जातात.
मामा, मस्तच.
मामा, मस्तच.
या सगळ्या बायकांची एकावेळी
या सगळ्या बायकांची एकावेळी मोट बांधणे कठीण जातय बहुतेक...कारण आज ब्रेकफास्ट भरवताना टेबलाभोवती शरयू नव्हतीच. तिचे वेगळे शॉट्स घेऊन टाकलेले लगेच लक्षात येत होतं.
पिंट्याच्या घरातले शॉट्स पण बरेचदा आकाशातून घेतात.
असल्या ढोबळ चुका शोनाहो !
श्री कधीच का नाही दाढी
श्री कधीच का नाही दाढी करत?>>> स्वतच्या लग्नात पण नाही केली....
काल बेबी आत्या आणि त्या
काल बेबी आत्या आणि त्या इंदूवहिनीची चिडकी reaction पहिल्यांदा पटली.
आधीच तिच्याबद्दल मत बरे नाही त्यात एवढी नोकरी करायला परवानगी दिली आणि हिची अशी थंड प्रतिक्रीया. अर्थात तिला इतर कसले tension आहे ह्याची कल्पना त्यांना नसल्याने त्यांच्या चिडक्या प्रतिक्रीया पटल्या.
अशोक मामा, अन्जुच्या जोडीला
अशोक मामा, अन्जुच्या जोडीला मी पण आहे हं शाकाहारी पण तिखटखाउ.....
श्री कधीच का नाही दाढी
श्री कधीच का नाही दाढी करत?>>>
तो घरच्या आणी ऑफिसच्या कामातच busy असतो वेळ भेटत नसेल बिचाऱ्याला.......
श्री कधीच का नाही दाढी
श्री कधीच का नाही दाढी करत?>>>> त्याला Raw look का काय म्हणतात....आमच्या office मधे असे बरेच जण आहे.हिंदी शिरेल मधे हिट्ट आहे असला look.
बादवे आता ते 'काहीही हां श्री' आता जाम बोर व्हायला लागलेय.>>> अनुमोदन..
>>ती डायनिंग टेबलवरची भलीमोठी ताटं पितळेची आहेत काय?<<
आयला मला वाटलं होतं कि सोन्याची आहेत. गोखल्यांचं काय सांगणार, खुप मोठ्ठा माणुस... स्मित ..:G
अवनी... "...तिचे वेगळे शॉट्स
अवनी... "...तिचे वेगळे शॉट्स घेऊन टाकलेले लगेच लक्षात येत होतं....." ~ राईट ऑब्झर्वेशन. मागे एकदा रोहिणीताईदेखील हॉलमध्ये नसताना सुना तिच्याशी बोलताहेत असे दाखविले होते आणि मग आजीचे शॉट्स स्वतंत्रपणे घेऊन संपादनासोबत जोडले गेले. तारखांच घोळ असला की असे प्रकार करावे लागतात, त्यात नवे काही नाही. एडिटिंगच्या कौशल्यातून तुकडे सांधले जातात व्यवस्थित.
श्री ची दाढी ~ हा प्रश्न मालिकेच्या सुरुवातीला पडला होता; पण आता सवय झाली आहे श्रीरंगरावांना अशाच स्थितीत पाहाण्याची....उद्या सफाचाट करून आला पडद्यावर तर ओळखणारही नाही....जशी जान्हवीला सतत साडीत पाहणे पटले नाही, तद्वतच.
मुग्धा ~ गॉश्श्श....तूही शाकाहारी ? मग तुम्हाला कोल्हापूरात कोण शाकाहारी खायाला घालणार....पोरींनो ? अर्थात तरीही तू केव्हाही ये....करतो काहीतरी व्यवस्था....पोकळा, मेथी, शेपू, कांद्याची पात...इ.इ.
अशोक मामा अहो शाकाहारात काय
अशोक मामा अहो शाकाहारात काय फक्त पोकळा, मेथी, शेपू, कांद्याची पात हेच असत काय?हे म्हणजे गोडाच्या शिर्या सारखच झाल तुमच.
श्री ची दाढी ~ हा प्रश्न मालिकेच्या सुरुवातीला पडला होता; पण आता सवय झाली आहे श्रीरंगरावांना अशाच स्थितीत पाहाण्याची....>>>> मी श्रीला एका शिरेलीत सफाचाट असलेला पण पाहीला आहे त्यामुळे इथे प्रथम दाढीत पाहताना अवघडले होते. कसाही राहीला ना तरी गोडच आहे हो आमचा श्री
पोकळा....ही भाजी खाऊन खूप
पोकळा....ही भाजी खाऊन खूप वर्षे झाली मामा.....ती खायला मिळणार असेल तर मीही येईन कोल्हापूरला..
आता खूप पकवताहेत काहीतरी
आता खूप पकवताहेत
काहीतरी वेगळे दाखवले पाहिजे मालिकेत..........
परन.... आज केली आहे आमच्या
परन.... आज केली आहे आमच्या घरी....पोकळ्याची भाजी....लसूण घालून्,,,,मिरचीची फोडणी देवून.... झकास वास सुटला आहे....भाकरी आहेच....तू आणि मुग्धा या कोल्हापूरला....शिवनेरी ने.
जानवि..... कथानक आता एका तबकडीवरून दुसरीकडे जाईल अशी आशा निर्माण झाली आहे....एकतर पिंट्या आणि दुसरी म्हणजे जान्हवीच्या नोकरीची सुरुवात....बॅन्केतील स्टाफ पाहिल्याशिवाय आणि गीताचा दंगा पाहिल्याशिवाय खरेच बरे वाटणार नाही.
वुई ऑल मिस हर सो मच !
परन.... आज केली आहे आमच्या
परन.... आज केली आहे आमच्या घरी....पोकळ्याची भाजी....लसूण घालून्,,,,मिरचीची फोडणी देवून.... झकास वास सुटला आहे....भाकरी आहेच....तू आणि मुग्धा या कोल्हापूरला....शिवनेरी ने.>>> काय हो मामा... उपासाच्या दिवशी काय आमंत्रण देताय हो?
बॅन्केतील स्टाफ पाहिल्याशिवाय आणि गीताचा दंगा पाहिल्याशिवाय खरेच बरे वाटणार नाही.
वुई ऑल मिस हर सो मच !>>>> अगदी अगदी
परन.... आज केली आहे आमच्या
परन.... आज केली आहे आमच्या घरी....पोकळ्याची भाजी....लसूण घालून्,,,,मिरचीची फोडणी देवून.... झकास वास सुटला आहे....भाकरी आहेच...>>>> तोंडाला पाणी सुट्ले मामा..........
पोकळा....?? ही कोणती
पोकळा....?? ही कोणती भाजी,पालेभाजी आहे का? पुण्यात कोणत्या नावाने मिळते?
पोकळा पालेभाजी आहे. कोल्हापूर
पोकळा पालेभाजी आहे. कोल्हापूर येथे पोकळा पालेभाजी बारा महिने मिळते,पुण्याचे काही माहित नाही .या भाजीला लाल देठ असतात.पानं पाने हिरवी असतात.लाल माठ पाले भाजीला लाल देठ व पानं पण लाल असतात.पोकळा पालेभाजी देठा सगट निवडून घ्यावी...
रानभुल.... आमच्या कोल्हापूर,
रानभुल....
आमच्या कोल्हापूर, सांगली, सातारा, बेळगाव भागात ही पालाभाजी खूप प्रसिद्ध आहे....नेहमी मिळते.
खाली फोटो देत आहे....त्यावरून तू ओळखू शकशील....मात्र पुण्यनगरीत या भाजीला काय म्हणतात ते येथील सदस्या सांगू शकतील :
रानभुल.... तसेच ही निवडलेली
रानभुल....
तसेच ही निवडलेली पोकळ्याची भाजी.....इथे चटणी दाखविली गेली आहे. मात्र आम्ही हिरव्या मिरच्या [न ठेचता....केवळ तुकडे करून] घालतो....शिवाय लसणाची फोडणी आहेच.
मामा मला फार आवडते ही भाजी
मामा मला फार आवडते ही भाजी
हो...जानवि...कोल्हापूरातही
हो...जानवि...कोल्हापूरातही खूप प्रसिद्ध आहे....स्वस्तही मिळते....काल तर मी ५ रुपयाला एक या दराने दोन घेतल्या...त्याचवेळी मेथी १० रुपये होती.
वरील फ़ोटोत शेंगदाण्याचे कूट दिसते....पण इकडे कधी असे कूट घालत नाहीत....चटणीही मी कधी पाहिली नाही. मिरच्याच, लसूण....अन चवीपुरते मीठ.... बस्स....झाली भाजी.
Pages