Submitted by सखा on 20 November, 2013 - 02:24
मनी अकारण
उफाळता भीती
खुंटली प्रगती
समजावी
उज्वल भविष्य
दिसते अंतरी
अनाठायी तरी
भीती का रे?
करू नको करू
द्विधा मनस्थिती
हतबल किती
तुज वाटे
होईल ते पाहू
पडू उभे राहू
स्वत: साठी जगू
आयुष्यात
वटारते डोळे
भीती हि फुसकी
लाथ एक दे की
पेकाटात
-सत्यजित खारकर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अतिशय सुरेख....
अतिशय सुरेख....
धन्यवाद मानिनी!
धन्यवाद मानिनी!
विषय आवडला. भाषा पण छानच पण
विषय आवडला. भाषा पण छानच पण अभंगाचा फॉर्म घेतल्यामुळं या थोडं विषयाशी विसंगत वाटतंय.
>> होईल ते पाहू
पडू उभे राहू
हे मस्तच