Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी पण तुमच्याच बोटीत
मी पण तुमच्याच बोटीत
श्रीच्या प्रबोधनाचे लक्ष्य
श्रीच्या प्रबोधनाचे लक्ष्य जान्हवी नसून प्रेक्षक असावेत असा माझा अंदाज.
अनिल आपटेचा सामना कसा करायचा(छेडछाडीचा मुकाबला), लग्नानंतर नाव कशाला बदलायचे, साड्याच का नेसायच्या, नोकरी करायची अशी प्रबोधनपुस्तिकेतील चार प्रकरणे.
आता जान्हवीला प्राधान्याने पिंट्याच्या मागे लागावे लागेल. मग चाळीच्या पाडापाडीमुळे उद्भवणारे प्रश्न . यात सांधेबदल शस्त्रक्रिया कधी होणार?
(No subject)
मंगळवार दि. १९ नोव्हेंबर २०१३
मंगळवार दि. १९ नोव्हेंबर २०१३ : अपडेट
~ भावाच्या काळजीत गुंतलेली बहीण जान्हवी चाळीतील आपला मित्र मनिष याच्यासमवेत त्याच्याबाबतीत विषय छेडते. पण तो सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. पण जान्हवी मनिषला साहजिकच ओळखत असल्याने तिला उमजून येते की हा काहीतरी लपवत आहे. ती आग्रह करते...त्यावर तो उत्तरतो, "हे बघ जान्हवी, त्याचे माझे याच प्रश्नावरून चांगलेच भांडण झाले आहे. मी त्याला एकदोनदा मध्यरात्रीनंतर एकटाच येताना जाताना पाहिले होते. त्यावेळी मी त्याला म्हणालो की चल तुला बाईकवरून सोडतो...पण त्या सूचनेवर उलट तोच माझावर घसरला, चिडला...तुला काय करायचे माझ्या भानगडीत ? असे काहीतरी बेताल बोलत होता. मग मीच म्हटले...होऊ दे शांत, नंतर बोलू. मग काल तुझ्याच आईबाबांनी त्याच्या संदर्भात चौकशी करण्यासाठी मला घरात बोलावून घेतले म्हणून मी वर गेलो होतो, बोलत होतो...तोच पिंट्या आत आला...तो आल्याआल्या काकूनी त्याला बोल लावणे सुरू केले... त्यावेळी मला तिथे पाहून साहजिकच त्याला मीच या दोघांना त्याच्याबाबतीत चुगली केली असणार हा त्याने ग्रह करून घेतला....मग माझ्याशी तो भांडला..." यावर जान्हवी संतप्त होते आणि पिंट्या आल्यावर त्याला या सर्वाचा जाब विचारणार असे म्हटल्यावर मनिष तिला 'जान्हवी दमाने घे....उगाच हायपर होऊ नकोस अशाबाबतीत. श्री देखील येऊ दे....मग तुम्ही बोला....आता मी निघतो." असे म्हणून तो तिथून निघून जातो. नंतर श्री आल्यावर त्याच्यासाठी शिर्याचे जेवण केले जाते....तो जेवत असतानाच शशीकलाबाई कुठून तरी पिंट्याचा विषय काढते, ते सदाशिवरावांना आवडत नाही....मग बिल्डिंग पाडली जाणार आहे ही बातमीदेखील जान्हवीची आई जावयाला सांगते...तेही बाबा व जान्हवीला पसंत पडत नाही. पण श्री म्हणतो काळजी करू नका मी पाहतो यात काय करायचे ते....शशीकलबाईला काय...हेच हवे असते.
"गोकुळ" मध्ये आज पाचही स्त्रिया आपापल्या कामाची वाटणी लेखी स्वरूपात करीत बसल्या आहेत. चर्चेच्या ओघात "जान्हवीने नोकरी करावी की नको ?" ह्या प्रश्नाबाबत मतदान होते. इंदूवहिनी आणि बेबीआत्या नकार म्हणून हात वर करतात....तर सरस्वती व शरयू होकार म्हणून हात वर करतात. दोन विरुद्ध दोन मते होतात, मग या चौघीही नर्मदाबाईकडे पाहतात....दोन्ही पार्टीज आपल्या बाजूने मत द्या असे तिला विनवितात. पण आजीनी मुलीनी नोकरी केली पाहिजे असे मत कालच व्यक्त केले असल्याने नर्मदाबाईदेखील जान्हवीने नोकरी करावी असा कौल देतात आणि तीन विरुद्ध दोन असे मतदान होते. ते पाहून मग इंदूवहिनीदेखील "मग मी तरी वेगळ्या मताची का राहू...? करू दे नोकरी जान्हवीला..." असे म्हणत होकाराचा हात वर करतात, तर बेबीआत्यासुद्धा "मलाही जान्हवीने नोकरी केलेली चालेल..." असा पवित्रा घेते...याचा अर्थ आता जान्हवीने बॅन्केत नोकरीला जायला तयार व्हावे.
रात्री श्री व जान्हवी घरी परततात...येताना बंगल्याच्या दारातच जान्हवी श्री ला 'आपण जेऊन आलो आहे असे प्लीज आत सांगू नकोस...कारण यानी नक्की आपल्यासाठी जेवण केले असणार आणि करून वाट बघत असतील...." सुरुवातीला श्री नाही नाही म्हणतो...पण जान्हवीचा आग्रह पाहून होकार देतो....आत सासवा जेवणासाठी वाट पाहात असतातच. दोघेही भूक लागल्याचे सांगतात आणि हातपाय धुवून लागलीच खाली येतो असे सांगून तिथून निघून जातात. वर रूममध्ये जान्हवी पिंट्याला फोन करते....तो लागतो....एके ठिकाणी कार वॉश करीत असतो....पण बहिणीला मी काय करीत आहे ते सांगत नाही....अभ्यास करीत आहे...काम करीत आहे, अशीच उडवाउडवीची उत्तरे देतो....फोन बंद झाल्यावर जान्हवी शेजारी उभा असलेल्या श्री ला सांगते "श्री, तो खोटे बोलत होता....आपण प्लीज उद्या त्याच्याकडे जाऊ या...".
आता उद्या.
ओह तो कार वॉश करत असतो का?
ओह तो कार वॉश करत असतो का? माझा हा भाग चुकला शेवटचा.
हो...अंजली, कार वॉशिंगचे काम
हो...अंजली, कार वॉशिंगचे काम चालू असतानाच जान्हवीचा फोन येतो....त्यावेळी तो रडतोही....बहिण रडण्याचे कारण विचारते तर हा बोलतो...."काही नाही, सर्दी झाली आहे ना...त्यामुळे थोडा आवाजात फरक पडलाय..."
ओह बिचारा घरच्यांच्या
ओह बिचारा घरच्यांच्या आरडाओरड्याने कामाला लागलेला दिसतोय.
ओ.... छान छान पिंट्याला
ओ.... छान छान पिंट्याला वाममार्गाला लावायची दुर्बुद्धी मंदेला झाली नाही यातच मिळवली. नाहितर आमच्या जानुच काही खर नव्हत. कित्ती कित्ती म्हणुन टेंशन घ्याव हो पोरीने? सासरी सासवांची मन जिंकण्याच, माहेरी बाबांच ऑपरेशन, आई तर उधळलेलीच आहे आणि त्यात पिंट्या वाममार्गाला लागला असता तर जान्हवीची अलका कुबल व्हायला वेळ नसता लागला. पिंट्याच पण कौतुक बहिणीची मान खाली जाईल अस काही करत नाही यासाठी
तिकडे राहीबाच्या सौर्याला म्हणाव बघ बघ जरा..... पिंट्याकडुन शिक काहीतरी.....
मुग्धा.... आता हा राहीबाचा
मुग्धा....
आता हा राहीबाचा सौर्या कोण ?
तरी एक बरे झाले....पाचही सासूबायांनी एकमुखाने जान्हवीला बॅन्केत नोकरीसाठी जाण्यासाठी परवानगी दिली आहे....आता त्यामुळे तरी मॅनेजर बोरकर, गीता आणि अन्य स्टाफ यांचे आगमन होईल पडद्यावर.... ती सारी चेहरे हसरी असल्यामुळे बरे वाटेल मालिका पाहताना..... गोखल्यांचे स्वयंपाकघर आणि बेडरुम्स पाहून पाहून वैताग आलाय.
जान्हवीचं लोन sanction झालय
जान्हवीचं लोन sanction झालय आणि ते फेडायला नोकरी करणे गरजेचे आहे असे काल बोलणे झाले. पण लोनच्या त्या पैशाचे काय केले अजून operation तर झाले नाही
नताशा....ते २ लाख रुपये
नताशा....ते २ लाख रुपये मॅनेजर बोरकर यांच्या पर्सनल अकौंटवरच आहेत....श्री ने गुपचूप ती रक्कम त्याना दिली आहे....त्यामुळे 'लोन' हे प्रकरण झालेलेच नाही....जान्हवीला फक्त वाटते बॅन्केने तिचा अर्ज मंजूर केला आहे. आता ऑपरेशन केव्हा होणार ? याचे उत्तर सदाशिवराव आणि जान्हवी यांच्याकडेच असणार.
मामा.. आता हा राहीबाचा
मामा..
आता हा राहीबाचा सौर्या कोण ? >> राधा हि बावरि मधला सौरभ
आता हा राहीबाचा सौर्या कोण
आता हा राहीबाचा सौर्या कोण ?>>>> मामा तुम्हाला माहित नाही हे बरेच आहे...कारण तुम्ही फक्त "होणार सून मी या घरची" ही एकच सिरियल पहाता....सौर्या म्हणजे राधा ही बावरी या सिरियल मधला सौरभ आहे....
मुग्धा.... आता हा राहीबाचा
मुग्धा....
आता हा राहीबाचा सौर्या कोण ?>>> मामा, आपल्या लाडक्या मालिकेच्या आधी राधा ही बावरी नावाची मालिका लागते. त्यातला हा सौरभ धर्माधिकारी..... उडाणटप्पु, खुशालचेंडु या क्यॅटेगरीतली सगळी विशेषण याला लागु होतात. लाडोबा आहे. बारावी नापास आहे. डोक्याने भडकु आहे. बेकार आहे आणि भरीत भर म्हणुन स्वतःपेक्षा वयाने मोठ्या डॉक्टरशी लग्न केलय आणि होउ घातलेला बाप आहे. त्याच घरही आर्थिक संकटात आहे सध्या आणि याला आत्ता कुठे सिरीयसनेस येतोय.....
मामा तुम्हाला राहीबा - राधा
मामा तुम्हाला राहीबा - राधा हि बावरि माहित नाहि, नाहि तेच चांगल नाहि तर त्याचे पण अपडेट्स द्यावे लागतिल तुम्हाला.
नको राधा हि बावरि चे अपडेट्स
नको राधा हि बावरि चे अपडेट्स अजिबात नको...
ओ.... छान छान पिंट्याला
ओ.... छान छान पिंट्याला वाममार्गाला लावायची दुर्बुद्धी मंदेला झाली नाही यातच मिळवली. नाहितर आमच्या जानुच काही खर नव्हत. कित्ती कित्ती म्हणुन टेंशन घ्याव हो पोरीने? सासरी सासवांची मन जिंकण्याच, माहेरी बाबांच ऑपरेशन, आई तर उधळलेलीच आहे आणि त्यात पिंट्या वाममार्गाला लागला असता तर जान्हवीची अलका कुबल व्हायला वेळ नसता लागला.>>>> उधळलेली आई >>>+१...:G
बाबाना जेव्हा कळेल पिंट्या कामाला जातोय तेव्हा त्याना बरं वाटेल आणी त्या दोघाचे सुर जुळुनही येतील कदाचीत.आईला मात्र असल काम अजीबात आवड्णार नाही.(जावई एवढे श्रीमंत असताना....तेव्हा अजुन एक आक्रस्ताळा एपीसोड पहायला सज्ज व्हा मंडळी!!
रात्री श्री व जान्हवी घरी परततात...येताना बंगल्याच्या दारातच जान्हवी श्री ला 'आपण जेऊन आलो आहे असे प्लीज आत सांगू नकोस...कारण यानी नक्की आपल्यासाठी जेवण केले असणार आणि करून वाट बघत असतील...." सुरुवातीला श्री नाही नाही म्हणतो...पण जान्हवीचा आग्रह पाहून होकार देतो....>>> हे पाहुन मला आमच्या लग्नानंतरचे दिवस आठ्वले,सासर दुसर्या गावी,थोडक्या वेळेत थोरामोठ्यना,मित्रमंड्ळी ना भेटाव लागायचं, सगळ्यानी आग्रह करुन काही ना काही खाउ पिउ घातल असायचं,सा बांनी लाड्क्या लेकासाठी आवडीचा स्वंयपाक केलेला असायचा,आणी त्यांना आम्ही "नाही" म्हणु शकायचो नाही.इथे आल्यावर मग diet mode on !
<पण लोनच्या त्या पैशाचे काय
<पण लोनच्या त्या पैशाचे काय केले अजून operation तर झाले नाही>
ऑपरेशनचा जान्हवीला कमी सांगितलेला खर्च बँकच डॉक्टरला देईल असे तिला सांगितलेले आहे.
वर तिने दिलेले रिफंडचे पोस्ट डेटेड चेक्स जमाच करायचे नाहीत असाही प्लान आहे.
बँकेत काम करणार्या व्यक्तीच्या असे चेक्स जमा झाले नाहीत ही गोष्ट लक्षात येणार नाही हे अशक्य आहे. तसेच बँकेचे नियम काय आहेत हे माहीत नसावे हेही कठीण आहे. आता सहकारी बँकेत असे काटेकोर नियम नसतात वगैरे पळवाट असल्यास कल्पना नाही.
पण एक चांगले झाले पिंट्याला
पण एक चांगले झाले पिंट्याला स्वतःला जबाबदारी समजली..... बहिण घरातून बाहेर गेल्यावर
अहो येइल की तिच्या लक्षात.
अहो येइल की तिच्या लक्षात. आताच लक्षात येणार नाही कसं म्हणताय? नंतर लक्षाता आल्यावरच कळेल ना तिला की श्री नेच ए सगळं केलय.
लगेच कसे लक्षात आलेले दाखवतील
लगेच कसे लक्षात आलेले दाखवतील थोडा वेळ जाऊद्या.. दोन चार एपिसोड सुद्धा वाढतील....
बाबाना जेव्हा कळेल पिंट्या
बाबाना जेव्हा कळेल पिंट्या कामाला जातोय तेव्हा त्याना बरं वाटेल आणी त्या दोघाचे सुर जुळुनही येतील कदाचीत.आईला मात्र असल काम अजीबात आवड्णार नाही.(जावई एवढे श्रीमंत असताना....तेव्हा अजुन एक आक्रस्ताळा एपीसोड पहायला सज्ज व्हा मंडळी!!>>> अगदी
थॅन्क्स भाच्यांनो..... ते
थॅन्क्स भाच्यांनो..... ते राही सौर्याचे रहस्य उलगडून दाखविल्याबद्दल...... आणि होय...मी 'होणार सून....' ही एकच मालिका पाहतोय....त्यामुळे अपडेट्सदेखील तितकेच येतील इथे.
भ्ररत.... एकदा का जान्हवी बॅन्केत आली की मग तिच्या अर्धवट राहिलेल्या सार्याच कामांना गती मिळेल असे मला वाटते....त्यात मग ऑपरेशन, बॅन्क लोन, पिंट्याचे भवितव्य....आदी बाबी असतील.
आणि हो....पिंट्याच्या वरच्या रुमध्ये मामाची ट्रंक पडून आहे असा त्या कुटुंबात एक संवाद झाला होता. शंका येते की मामाने केलेल्या चोर्यातील सारा ऐवज त्या ट्रंकेत असू शकेल..... पुढे बेबीआत्या आणि आजी 'चंद्रहारां' बाबत एक चौकशी करणार आहेतच.
मामाने चोरलेला चंद्रहार
मामाने चोरलेला चंद्रहार मिळाला की बाबा आणि पिंट्या आईचा विरोध न जुमानता जान्हवीला सांगणार. जान्हवी तो आईआजींना देणार.
आता दोन ऑप्शन्स :
अ) जान्हवीच्या निर्भीड प्रामाणिकपणामुळे आईआजींच्या मनातला तिच्याबद्दलचा गैरसमज दूर होणार.(ब) चोरत्या मामामुळे जान्हवी आणखी गाळात रुतणार.
(ब) चोरत्या मामामुळे जान्हवी
(ब) चोरत्या मामामुळे जान्हवी आणखी गाळात रुतणार.>>>> असेल. तशीही आईआज्जी हलक्या कानांची आहे.
नाही. ती तिचे सोर्सेस आणि
नाही. ती तिचे सोर्सेस आणि रिसोर्सेस वापरून खातरजमा करून घेतेच. जसे जान्हवी विवाहित आहे का हे तिने तपासले. पण जान्हवीच्या खोटारडेपणाचा आणि आईच्या असंस्कृतपणाचा त्यांना फर्स्ट हँड अनुभव आहे.
बाय द वे ज्या त्या शिरेलित
बाय द वे ज्या त्या शिरेलित गोड म्हणून फक्त साजूक तुपातला शिराच का करतात म्हणे? दुसरे पदार्थ संपले का दुनियेतले?
अगं दक्षिणा....दुसरे पदार्थ
अगं दक्षिणा....दुसरे पदार्थ संपले नसतील..... पण तुमचा श्री पडला गोखल्यांचा आणि जान्हवी सहस्त्रबुद्धयाची.... मग याना कोल्हापूरी मटणकोंबड्यामासे कसे चालतील ? तेव्हा द्यायचा जावयाला तर साजूक तुपातीलच शिरा देणार ना.
अगं दक्षिणा....दुसरे पदार्थ
अगं दक्षिणा....दुसरे पदार्थ संपले नसतील..... पण तुमचा श्री पडला गोखल्यांचा आणि जान्हवी सहस्त्रबुद्धयाची.... मग याना कोल्हापूरी मटणकोंबड्यामासे कसे चालतील ? तेव्हा द्यायचा जावयाला तर साजूक तुपातीलच शिरा देणार ना.>>>> एक नंबर मामा
गोड म्हणून कोल्हापूरी
गोड म्हणून कोल्हापूरी मटणकोंबड्यामासे ??
आणि गोखले-सहस्त्रबुद्धे असो की अजून कुणी. घरात रवा, साखर, दूध आणि तूप या सहज उपलब्ध होणार्या गोष्टी असतात आणि त्यातून पटकन ऐनवेळी शिरा करता येतो. चला आता पटकन श्रीखंड /गुलाबजाम/ बासुंदी किंवा जिलेबी 'करु' किंवा 'आणू' असे म्हटले तर किती हसे होईल हे त्यांना माहितेय म्हणून साजूक तुपातला शिरा.
Pages