Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अंजली_१२: आज्जीबाई कायम
अंजली_१२: आज्जीबाई कायम वैतागलेल्या असतात....हो ना....पण त्यांचा हेकेखोरपणा थोडा बाजूला ठेवून पाहिला तर काय एकेक नग आहेत त्या आज्जींच्या सुना....त्यातल्या त्यात नर्मदाबाई आज्जींच्या अनुपस्थितीत बर्यापैकी संयमित, समजूतदार आणि विचारी वाटतात..पण आज्जीबाई समोर असल्यातर शेपूट घालतात. शरयूबाई स्वभावाने छान पण त्यांचा विसराळूपणा ऊतू जात असतो. इंदूबाई म्हणजे शुद्ध नंदीबैल.ह्या बाई मात्रं विशेष डोकं उठवणार्या कॅटॅगरीतल्या आहेत.
ही एकच सून असती आज्जींना तरी त्या कायम कावलेल्या 'मोड' मध्येच असत्या. वर आणखी दोन सरस्वती आणि बेबी ही 'कन्या' रत्नं आहेतच.
नव्या सुनेकडून ह्या सगळ्यांचे मतपरिवर्तन होते वगैरे दाखवणे अपेक्षित आहे वगैरे सगळे मान्य आहे..पण आज शहरात काय किंवा खेड्यात काय, तसंच गरीब / मध्यमवर्गीय / श्रीमंत घराण्यांमध्ये काय, सून लग्नाआधी नोकरी करत असेल आणि त्याच गावात सासर असेल तर लग्नानंतर ती नोकरी पुन्हा करेल हे नॉर्मली स्वीकारलेलं / गृहीत धरलेलं असतं. सर्वसामान्यपणे तुला नोकरी करायची असेल तर जरूर कर नसेल तर नको असंच सांगितलं जातं. अर्थात काही टोकाची भूमिकावाले अपवाद असतातच.
कैच्यकै चालुये. जान्हवीचे
कैच्यकै चालुये.
जान्हवीचे लग्ना आधीचे ड्रेस बरे असायचे. आता तो निळा आणि कालचा गुलाबी अगदीच भ्यानक वाटले.
ह्म्म कदचित नवी नवरी म्हणुन
ह्म्म कदचित नवी नवरी म्हणुन असेल तसे ..
काही दिवसांनी येतिल जरा अजुन नॉर्मल कपडे...
जान्हवीचे लग्ना आधीचे ड्रेस
जान्हवीचे लग्ना आधीचे ड्रेस बरे असायचे. आता तो निळा आणि कालचा गुलाबी अगदीच भ्यानक वाटले. - मला पण अगदी असेच वाटत होते . लहान मुलींचे असतात तसे वाटत होते.रंग & प्याटर्न पण
सस्मित... हा "भ्यानक" शब्दं
सस्मित... हा "भ्यानक" शब्दं खूप म्हणजे खूप आवडला. टायपो-बियपो नाहीच. नवीनच शब्दं. भयानक पेक्षा हा "भ्यानक" एकदम "भ्भॉ...." करून समोर येतोय.
"भ्यानक"....दाद, मलाही प्रथम
"भ्यानक"....दाद, मलाही प्रथम टायपोच वाटले....पण आता डोक्यात प्रकाश पडला की सस्मित हुशार आहे आणि तिने सचिन स्टाईलने सिक्सर मारली आहे....जान्हवीच्या ड्रेस रंगसंगतीला..... खरं तर कथानकात फ़ोनवर ती जाणून असते की घरी काही तरी विचित्र विपरित प्रकार घडला आहे, त्याशिवाय बाबा मध्यरात्री फ़ोन करून अचानक बंद करणार नाहीत....मग असे असेल तर सकाळी उठून त्यांच्याकडे अतिशय काळजीने पळणारी मुलगी इतके भडक रंगाचे, नजरेत येणारे कपडे घालणार नाही..... ऑफिसच्या काळात जे ड्रेस वापरीत असे त्यातील एक चालला असताच.
दाद , मामा
दाद , मामा
ऑफिसच्या काळातील कपडे घरीच
ऑफिसच्या काळातील कपडे घरीच ठेवून आली असेल जान्हवी.. त्यामुळे लग्नाच्या वेळी घेतलेले नवीन ड्रेसच तेव्हढे असतील वापरायला.. त्यामुळे तिला सूट द्यायला हरकत नाही सध्या तरी कपड्यांच्या बाबतीत... गृहप्रवेश करताना नंतर बॅग दाखवली का तिच्या बरोबर घरात आलेली जुन्या कपड्यांसकट???
नवे कपडे श्रीने आणलेत
नवे कपडे श्रीने आणलेत
मी सध्या बघतच नाही, इथे मात्र
मी सध्या बघतच नाही, इथे मात्र येते मामांचे अपडेटस आणि बाकीच्या प्रतिक्रिया वाचायला, काल जरासे बघितले, आजी सांगत होती बाकी आयांना की तुम्ही स्वतः निर्णय घ्यायला शिका, हे वाक्य मला पटले. सगळ्या बाबतीत आजीलाच विचारायचे, आता श्रीच्या आईला जर वाटत असेल, सुनेने नोकरी करावी तर आता त्यांनी बिनधास्त तिला परवानगी द्यावी.
मला एक कळत नाही ज्याच्या
मला एक कळत नाही ज्याच्या त्याच्या आयुष्यात स्वतःचा निर्णय चालवणार्या भागिरथी बाई आहेत तरी कोण? त्यांना व्यक्तिस्वातंत्र्य वगैरे काही कळत नाही का? स्वतःच्या सुना आणि मुलिंना संरक्षण दिलं म्हणजे त्यांचं आयुष्य त्यांनी विकत घेतलंय का? आणि ह्या बाया पण अगदी तुम्हाला चालेल ना वगैरे अशा भाषेत बोलतात. इतकी डिरेक्टिव्ह लँग्वेज का? :रागः
रोहिणी हट्टंगडीचं पात्रं अतिशय गंडलेलं आहे. आणि जान्हवीचं कॅरेक्टर उठून दिसावं म्हणून या बायांना अतिरंजित दाखवलं असेल तर महाकठिण आहे, प्रयोग सपशेल फसलेला आहे.
dakshina: bingo!
dakshina: bingo!
श्रीच्या सर्व आया कणाहीन
श्रीच्या सर्व आया कणाहीन दाखवल्यात. मुळात जान्हवीने नोकरी करु का? ड्रेस घालू का? हे विचारले हा तिचा मोठेपणा आहे. मोठया एकत्र कुटुंबात लग्न एकाशी, संसार मात्र सगळ्यांशी, तसे जान्हवीचे चाललेय.
नोकरी करु का? ड्रेस घालू
नोकरी करु का? ड्रेस घालू का?>>> पण मूळात हे प्रश्न विचारावेतच का? म्हणजे हे काही विचारण्यासारखे प्रश्न आहेत का? समाजात चुकीचा संदेश जातो अश्यामुळे.
जान्हवी बावळटच आहे झालं...
येस मंजू. मलाही असेच
येस मंजू. मलाही असेच वाटते.
ह्या गोष्टीसाठी मुळात परवानगी वगेरे घेणे जरा अतीच होते.
लग्नानंतर फार काही घडलेच नाही
लग्नानंतर फार काही घडलेच नाही या सिरीयलमधे....त्यामूळे बोअर होत आहे.......
खरं तर श्री जान्हवीला म्हणत
खरं तर श्री जान्हवीला म्हणत असतो की ह्या गोष्टी - ड्रेस घालू का, नोकरी करू का - विचारायची गरज नाहीये, पण गुणी सून जान्हवी नाही विचारणार असं होईल का
मंजूडी..... "जान्हवी बावळटच
मंजूडी.....
"जान्हवी बावळटच आहे...." ~ आत्ताची तिची भूमिका पाहिली की हे पटते; पण झाले आहे असे की ती मनाने थोडीशी खचलेली आहेच. अशासाठी की ती जाणते अगदी पहिल्या दिवसापासून या घरात तिचे स्वागत झालेले नाही....[पहिला दिवस म्हणजे....ती ज्यावेळी चेकबुक घेऊन येते....खोटे बोलते....आणि आजी तिला "परत तुझे तोंड मला दाखवू नकोस" असे फटकारते त्यावेळे पासून....] शिवाय लग्नात तर तिने पाहिलेले आहेच एक शरयू सोडली तर तिचे स्वागत कुणीच केलेले नाही. शिवाय नवरा दिवसभर घरी नाही....सबब कोणत्याही विषयात तिला मोकळेपणाने वागण्याचे स्वातंत्र्य नाहीच.....शिवाय तो बेबीआत्याचा घार्या डोळ्याचा दरारा तिला खातच आहे....त्यामुळे ती सध्या जे वर्तन करताना दिसते ते बावळपटपणाचे वाटणे स्वाभाविक आहे.
मी ही मालिका बर्यापैकी
मी ही मालिका बर्यापैकी नियमित बघते.
लग्नाआधीचे प्रसंग बघता जान्हवीचा मूळ स्वभाव अगदी बाणेदार वगैरे दाखवला आहे. त्याला अनुसरून तिचं आताचं वागणं (म्हणजे हे दोन प्रश्न) सुसंगत वाटत नाहीत. तिने ठामपणे श्रीला लग्नाआधीच सांगितलेलं आहे की वडिलांच्या ऑपरेशनचं कर्ज फेडण्यासाठी ती नोकरी करणार आहे. मग आता त्याबद्दल आजेसासूची परवानगी घेण्याचा संबंध काय? आणि त्यासाठी इतर सासवांची ढाल कशासाठी? श्रीला पुढ्यात घालून काय सोक्षमोक्ष लावून टाकण्याचा प्रसंग जास्त शोभला असता.
काळाप्रमाणे बदल सिरियलमध्ये
काळाप्रमाणे बदल सिरियलमध्ये दाखवत नाहीत, आत्ताच्या पिढीला बऱ्यापैकी समजून घेणारे सासू-सासरे मिळतात, ड्रेसच काय हल्ली वेस्टर्न पेहराव जास्त असतो, ९०टक्के घरात तरी कोणीही विरोध करत नाही, आधीच्या पिढीत स्त्रियांना नोकरी करूनपण एवढे स्वातंत्र्य नव्हते, त्याच पिढीतील स्त्रिया स्वानुभवावरून आपल्या सुनांचा बहुतेक सर्व बाबतीत आदर करतात, त्यांच्या विचारांचा मान राखतात, हे चित्र दिसते माझ्या आजूबाजूला आणि नातेवाईकांतपण, ही वास्तवता सिरीयलमध्ये दाखवत नाहीत.
मग आता त्याबद्दल आजेसासूची
मग आता त्याबद्दल आजेसासूची परवानगी घेण्याचा संबंध काय? आणि त्यासाठी इतर सासवांची ढाल कशासाठी? श्रीला पुढ्यात घालून काय सोक्षमोक्ष लावून टाकण्याचा प्रसंग जास्त शोभला असता.<<<<<
माझ्या मते तरी प्रश्न "तिने बाहेर नोकरी करावी का घरातल्या बिझनेसमधे लक्ष घालावे" हा उभा केला असता तर योग्य ठरला असता. किंबहुना, जाह्नवीसाठी हे एक नवीन आव्हान ठरले असते. कारण इथे तिच्यासमोर भागीरथीबाईंचे कर्तुत्व मॅच करायची जबाबदारी आली असती आणि मालिका किचन-हॉलमधून बाहेर पडून ऑफिसमधे जास्त घडली असती.
पण मग "किचन पॉलिटिक्स" कसं दाकह्वत बसणार? आणि बहुतेक प्रेक्षकांना तेच तर पहायचं असतं ना!!!!
करेक्ट! तिने 'मी नोकरी करणार'
करेक्ट!
तिने 'मी नोकरी करणार' हे जाहिर केल्यावर आजीबाईंनी 'घरच्या व्यवसायात लक्ष घाल' असं सुचवावं असं मला वाटतंय. ऑफिसात त्रास द्यायला ती मॅनेजरीणबाई आहेच
Maazaa saaDeebaabatchaa
Maazaa saaDeebaabatchaa anubhav thoDaa vegaLaa ahe. gharee gelyavar lihite. Mobile varun neet jamat nahi ahe.
जान्हवीला सहा सासवांची मने
जान्हवीला सहा सासवांची मने जिंकून घ्यायची आहेत ना?
जान्हवी बँकेत तडफदार आहे. पण नात्यातल्या कोणालाही दुखवायला ती तयार नाही. अनिल आपटेशी लग्नाला तयार झाली होतीच ना?
<म्हणजे हे काही विचारण्यासारखे प्रश्न आहेत का? समाजात चुकीचा संदेश जातो अश्यामुळे.> यावर श्रीने प्रागतिक प्रबोधन केले होते. जान्हवीचे कंडिशनिंग स्ट्राँग आहे. शरयूने विचारायचे कशाला, सरळ ऑफिसला जाते असे म्हटल्याचे आठवते.
बरं. श्रीला रोजच्या रोज ऑफिसला जायला उशीर का आणि कसा होतो? लग्नानंतर रोमान्स करण्यात वेळेचे भान राहात नाही म्हणावं, तर लग्नाआधीही तीच स्थिती होती.
यावर श्रीने प्रागतिक प्रबोधन
यावर श्रीने प्रागतिक प्रबोधन केले होते.>>> पण उपयोग शून्यच ना?
जान्हवीच्या बँकेत लग्नाच्या
जान्हवीच्या बँकेत लग्नाच्या रजेनंतर जॉईन कधी करणार असे काही विचारले नाही का? की तिच्या बॉसच्या म्हणण्याप्रमाणे गोखले साहेब म्हणजे मोठा माणूस. मग कधीही जॉईन झाले तरी चालेल
स्वतःचेच हपीस असेल तर उशीर
स्वतःचेच हपीस असेल तर उशीर होतोच कसा?
जान्हवीच्या बँकेत लग्नाच्या
जान्हवीच्या बँकेत लग्नाच्या रजेनंतर जॉईन कधी करणार असे काही विचारले नाही का?>> बरोबर नताशा. पण ती सुट्टी एक्स्टेंड करत बसली असेल बहुतेक. बँकेत असल्यामुळे आणि ती स्वत: शिस्तीची असल्याने सुट्ट्या बर्याच साठल्या असतील
हॅ हॅ डी. डिसेंबरात हे
हॅ हॅ डी. डिसेंबरात हे फीलिन्ग जास्त तीव्र होते. माझ्या पण १४ इ एल्स आहेत. समजू शकते.
अमा, माझ्याही ५ सीएल ३१
अमा, माझ्याही ५ सीएल ३१ डिसेंबरपुर्वी संपवायच्या आहेत
मी पण शिस्तीची आहे, फालतू सुट्ट्या घेत नाही
Pages