१० (टेन) लिस्ट

Submitted by योग on 17 November, 2013 - 06:09

१७ नोव्हेंबर २०१३.

१० (टेन) लिस्टः

'भारतरत्न' 'सर' सचिन यांच्या निवृत्ती भाषणास जेमेतेम २४ तास ऊलटलेत आणि एव्हाना सचिन साठी पुढील करियर क्षेत्रे ई. बद्दलचे अनाहूत सल्ल्ले येवू लागले आहेत. सचिन च्या भारतरत्नाचे क्रेडीट 'पृथ्वी' वरील शक्य त्या सर्व नाव, गाव ई. मधून भ्रमण करू देखिल लागले आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा ट्विट वटवटीस ऊधाण येईलच. 'सचिनेरीया' झालेल्या देशात एकही माध्यम आणि एकही कागद 'सचिन' नावाच्या शाईने ओला झाल्या खेरीज राहिला नसेल. हा सचिनोत्सव असाच चालू रहावा असे वाटत असतानाच मात्र खुद्द स्वतः सचिन च्या मनात आणि घरात आज काय भावना असतील याचे औत्सूक्य कायम आहे.

एका अर्थाने सचिन साठी हा अनुभव 'परतोनी पाहे' प्रकारात मोडणारा असेल यात शंका नाही. Happy व्यावहारीक अर्थाने सर्व आयुष्य साखर वेचण्यात घालवलेल्या मुंगीला आता मात्र साखर वेचायला धडपडायचे नाही, निव्वळ साखर बघून खुष व्हायचे आणि मस्त वारूळात पाय ताणून दोन घटका आराम करायचा असे सांगण्या सारखेच आहे. किंवा २४ वर्षे तलवार चालवणार्‍या सेनापतीला आता चढाई करायची नाही, फक्त लढाई पहायची (सल्लागार म्हणून भूमिका बजावयाची) असे सांगण्यासारखे आहे. पण, दौर्‍यावर गेलेल्या बाबासाठी धाय मोकलून रडणारी पाच वर्षाची मुलगी आता शोडष वयात तेच बाबा आपल्यावर 'लक्ष ठेवून आहेत' म्हणून जरा कचरली असेल हे सर्व बाबा लोकं मान्य करतील? एरवी कांदे बटाट्याचे भाव किती, असल्या चिंता नसलेला नवरा आता 'घरातील आवडत्या ब्रँडचा चहा संपत आलाय गं' असे नेमकी सकाळी चहाच्या वेळी सांगून बायकोला ऊगाच(?) जरा राग आणेल हे बायका मान्य करतील? त्यावर ' मग येताना जरा तुम्हीच घेऊन या की' असे ती वैतागून म्हणेल हे नवरे मान्य करतील..? '२४ वर्षे खेळलास तरी हौस भागत नाही तुझी, आत बंद कर तो टिव्ही आणि जेवायला ये बघू' असे लाडक्या सचिन ला आजही त्याची आई खडसावेल हे सर्व आया लोकं मान्य करतील..? अगदी हेच प्रश्ण व अनुभव भविष्यात सर सचिन यांच्या वाट्याला नाही आले तरी असेच सांसारीक व्यापाचे व कौटूंबीक जिव्हाळ्याचे प्रश्ण व अनुभव त्यांच्या वाट्याला येतील यात शंका नाही. अगदी अब्जावधी नाण्यांचा व हृदयांचा मालक असलेल्या या माणसाला मुलीचे लग्न, मुलाचे करीयर या अशा खास भारतीय संस्कारीत चिंता सतावणार नाहीत असे म्हणता येणार नाही, याची थोडीशी झलक त्यांच्या कालच्या आभार प्रदर्शनातून दिसलीच आहे. अगदी पुस्तकी व्यावसायिक भाषेत Sachin is the ultimate product of a complete value based system, and hence he will have to strive to continue to maintain the quality and the brand value. ज्या क्षितीजावर तो मावळलाय त्यावरून 'खाली' ऊतरणे आता त्याला कधीच परवडणारे नाही.

असो. माझ्या सारख्या यःकश्चित माणसाच्या सल्ल्याची त्याला गरज नाहीच पण तरिही निव्वळ प्रेमापोटी, १०डुलकर साहेबांना हे काही आगाऊ विनंतीवजा १० सल्ले:

१. राजकारणाच्या वाट्याला चुकूनही जाऊ नये, अगदी आम्ही बिनविरोध निवडून दिले तरी. या एका बाबतीत आम्हा मतदारांच्या एकत्रीत बुध्यांकापेक्षा साहेबांचा अनुभव व जाण अधिक आहे.

२. खास आपल्या मातीचे खेळ जसे खो खो (?) कब्बडी, कुस्ती (?) ई. साठी काहितरी कायमस्वरूपी भरीव योगदान वा योजना करण्याचे मनावर घ्यावे, ऑलरेडी घेतले नसेल तर.

३. आता बराच वेळ ऊपलब्ध असेल तेव्हा एक आत्मचरीत्र लिहीण्याचे/लिहून घेण्याचा संकल्प सोडावा.

४. शक्य तितक्या, जमतील तिथे, अनेक मराठी मुलाखती द्याव्यात. सुरूवात मायबोली पासून करायला हरकत नाही. Happy

५. रियालिटी शोज मधून अजीबात वारंवार दिसू नये. 'करोडपती' मध्ये चालेल. Wink

६. तुमच्या सर्व श्रद्धा स्थानांचा आदर बाळगून ही विनंती करू इच्छीतो की गली मुहल्यातील, गादीवरील, व आश्रमातील सर्व x x बाबांच्या चमत्कारांपेक्षा २२ यार्डातील तुमचे अनेक चमत्कार अगदी १००% 'सच्चे' आहेत. आमच्या या श्रध्देस तुम्हीच जपावे.

७. २२ यार्डांच्या देव्हार्‍यात आम्ही तुमची स्थापना केली आहे. आमचा 'सच्चीssssन सचीन...' हा धावा तुमच्यासाठी प्राणवायू असेल तर बदल्यात क्रिकेट मध्ये १०० अपराध भरले तर वेळेप्रसंगी तुम्ही सुदर्शनचक्र सोडायला मागे पुढे पाह्णार नाहीत एव्हडीच अपेक्षा आहे. क्रिकेट ला धर्म मानणार्‍या आमच्या डी एन ए मध्ये अनेक पिढ्या ' यदा यदा ही धर्मस्य...' हे ठाम पेरले गेलेले आहे, कृपया त्याचा मान राखावा.

८. फेरारी मधून पहाटेस फिरणारा सचिन पेक्षा आता शिवाजी पार्क ला पहाटे जॉगिंग राऊंड मारणारे साहेब आम्हाला हवे आहेत... खरेच सांगतो आजही तुमच्या तसे अचानक भेटण्याची सर ही 'पहिल्या' प्रेयसीच्या मिठीत घाबरत घेतलेल्या 'पहिल्या' चुंबनालाही नसेल!

९. एखाद दोन रस्ते, ऊद्याने, ई. ना तुमचे नाव वगैरे दिले जाईल(च). त्यावरून ऊगाच नसता गदारोळ व अनावश्यक वाद ऊठेल. पेक्षा असले काही कृपया कुणी करू नये असे ठामपणे तुम्ही सांगून टाकावे. त्यापेक्षा भारताच्या क्रिकेटचा ईतीहास सांगणारे एखादे जागतिक दर्जाचे असे म्युझियम बांधायच्या कामात पुढाकार घ्यावात. शपथेवर सांगतो, तुमच्या एका शब्दासाठी इतकी गंगाजळी जमा होईल की विनाकारण सरकारची मर्जी व लुडबूड संभाळून घ्यायची गरज भासणार नाही. हे कृपया आमच्या हयातीतच झाले तर अनंत ऊपकार होतील.

१०. सर्वात शेवटी, सर्वांग सुंदर व्यायाम, आरोग्य, पर्यावरण जतन ई. सर्वाच्या दृष्टिकोनातून, सायकलिंग हे अतीशय ऊत्तम साधन, वाह्न आहे हे मान्य असेलच असे गृहीत धरतो. (कारण गेल्याच वर्षी माझ्या पुणेकर पुतण्याने तुम्हाला खास सायकल भेट दिली.) आपल्याकडे चालायला पदपाथ नाहीत ही बिकट समस्या आहे हे माहित आहे तरिही, सायकलिंग चे हे असे काही देशव्यापी स्वरूपात प्रशीक्षण, वापर, अवलंबन असे काही करता येईल का याचा जरूर विचार करावा. यात खास पुणेकर तुम्हाला विशेष मदत करतील यात शंका नाही. Happy

आणि वरील सर्वातील अगदीच काहीच नाही करावेसे वाटले तर किमान एक संध्याकाळ आमच्या सारख्या सच्च्या किशोरदा भक्ता बरोबर त्यांचीच गाणी ऐकण्यात घालवावीत एव्हडीच नम्र विनंती. आप सिर्फ हुकम करो मेरे आका, बंदा हाजीर है!

१० लिस्ट मोठी आहे, पण तुमच्यासाठी अगदीच अशक्य नाही. तूर्तास It is our turn to retrun the favors, सो तुम्ही मस्त आराम करावात व लाड कौतूक पुरवून घ्यावेत.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सचिन ने बिग बॉस मधे एक दिवस घालवावा.........

किमान एक जण तरी स्वच्छ चारित्र्याचा .. शांत मनाचा.. दिसेल बिग बॉस च्या घराला. Happy

अरे देवा !! आवरा !!!!!
आधी रिटायर हो म्हणून ओरडा.. आता हे कर ते कर म्हणून सल्ले ! एकंदरीत सचिनच्या डोक्याचा ताप'योग' काही संपत नाही..

परवा तो 'सच' है वाला लेख वाचून वाटलं होतं की गाडी रुळावर आली.. पण ही तर आणखीच घसरलेली दिसतेय.. !

'स्टार स्पोर्टस'च्या एका कार्यक्रमात आत्तांच शेन वॉर्नला विचारलं गेलं ' निवृत्तिनंतर सचिनला काय फरक जाणवेल ? '. " I am sure he will get all the offers under the sun but he will select only the one he really loves ", हें होतं वॉर्नचं उत्तर.

bhaau,
agadI! am sure, amongst other works which he already devotes lot of his time to, such as charity, schools, etc. he will forever stay conncted with his passion- which is cricket. But I sincerely believe he can have a far reaching impact in other aspects/fields as well.

But I sincerely believe he can have a far reaching impact in other aspects/fields as well.
<<< then why not politics?

रि टायरमेंट अप्डेटः " आज उठलो चहा बनवला आणि बायको बरोबर आरामात मस्त ब्रेकफास्ट केला.
टाइम्स नुसार. लवकर शॉवर घेण्याची गरज नाही हे एकदम लक्षातच आले नाही. पेज दोन पाच सहा पंद्र्हा व सतरा वर अजून बातमी.

विख्यात फुटबॉलपटू पेले निवृत्त झाल्यानंतर बर्‍याच वर्षानी एका मोठ्या कंपनीने त्याची एक 'वर्ल्ड टूर' स्पोन्सॉर केली. अनेक देशात [ मला वाटतं भारतातही तो आला होता ] फुटबॉल खेळणार्‍या मुलाना प्रेरणा व प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना होती. त्या टूरसंदर्भात त्याची प्रतिक्रिया होती - ' खेळत असताना जगभर फिरलो पण जग नाही पाहिलं. रोज सकाळी उठलं कीं नवीन होटेलची रूम, खिडकीतून बाहेर दिसणारा नवीनच परिसर ..... कडेकोट बंदोबस्तात बसमधून मैदान, नवीन संघाबरोबर सामना.. स्टेडियममधला जल्लोश..... परत हॉटेल... पॅकींग.. विमान प्रवास ... ! जग फिरण्याचा, तिथल्या लोकांशीं संवाद साधण्याचा खरा आनंद मीं आतां अनुभवतोय !!'
मला वाटतं सचिनलाही मोकळा श्वास घेण्याचा, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेण्याचा दोन तपं नाकारला गेलेला अधिकार माध्यमानी व आपणही आतां त्याला बहाल करायला हवा.

मला वाटतं सचिनलाही मोकळा श्वास घेण्याचा, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेण्याचा दोन तपं नाकारला गेलेला अधिकार माध्यमानी व आपणही आतां त्याला बहाल करायला हवा. >>
भाऊ हे होण मात्र अवघड आहे .
सचिन ला "सचिन" असण विसरता येईल कदाचित पण इतराना नाही Happy

सचिनला विसरणं मलाही शक्य नाहीय [ मीं कांही भूतपूर्व अमेरिकन प्रेसिडेंट किंवा मार्गारेट थॅचरही नाही ; त्यामुळे मला 'अल्झायमर' व्हायची शक्यता कमीच !! ]. पण, मला आठवत, एका ऑलिम्पीक गोल्ड मेडॅलिस्ट जिमनॅस्ट मुलीचं वाक्य - " मीं खूप आनंदात आहे ! कारण, आतां मीं खूप आईसक्रीम खाणार आहे जें इतकीं वर्षं मला नाकारण्यात आलं !!! "

सचिन ला "सचिन" असण विसरता येईल कदाचित पण इतराना नाही > +१ सगळेच सुयोग एकसाथ मिळत नसतात हे सचिनला देखिल मान्य असेल. Happy