नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बहुतेक रोहिणी हट्टंगडी सुट्टीवर जाणार असाव्यात किंवा तारखा नसतील म्हणून हा प्रपंच केला असावा.>>> शक्य आहे. महीनाभरात त्यांच्या मुलाचे लग्न आहे.

Janhavi evadhi changali saadi nesunach jhopate he baghayala vichitra vatata Sad

हो काल मलाही तेच वाटलं. सुरवातीला तर गाऊन मधे दाखवली होती गोखल्यांच्या घरी.

चीकू....आणि अंजली....

अगदी योग्य निरीक्षण आहे तुमचे.....मलाही ते रात्री खटकले होते....पण अपडेटमध्ये मुद्दामच टाकले नाही तसे. इथे कुणीतरी म्हणायचे, "अहो मामा, झोपतात काही स्त्रिया साडी नेसूनही...!" म्हणून गप्पच बसलो.

पण चाळीतल्या त्या घरात तिच्या अंगावर गाऊनच असायचा आणि त्यामुळेच ती अस्सल घरेलू मुलगी वाटायची. श्री जेव्हा तिला त्या गाऊनमध्ये पाहतो, त्यावेळी ती नुकतीच आंघोळ वगैरे आटपून, केसांना टॉवेल गुंडाळून काम करीत असते आणि श्री ला पाहून लाजून पिंट्याच्या मागे लपते.....श्री जाम खूष होतो तिच्या त्या रुपड्यावर.

बिचारी गोखल्यांकडे आली आहे आणि बेकार अवघडून गेली आहे.

बुधवार दि. १३ नोव्हेंबर २०१३ : अपडेट

~ आजच्या अपडेटचे एकमेव वैशिष्ठ्य म्हणजे गोखल्यांच्या किचनमधून कॅमेरा अन्यत्र कुठे गेला नाही, एकदाच तो श्री जान्हवीच्या बेडरुममध्ये गेला....तेही ही नूतन बायको नूतन नवरा ऑफिसला चालला आहे घाईने म्हणून आग्रहाने प्रेमाने बळेच नाष्टा खायाला लावत आहे हे दाखविण्यासाठी....सूर्यकांत शेतावर चालला आहे आणि जयश्री गडकर "वाईच भाकरी भाजी खावूनच जावा की..." असे दाराआडून सांगत आहे, त्याच पद्धतीवर.

बाकी, कालच्याच प्रसंगापासून आज शरयूची तो लपाछपीचा रडका डाव पुढे चालू होता. दरवाजा उघडून जान्हवी तिला आत घेतलेल्या क्षणापासून शरयू तिला चिकवून रडतभेकत तोचतोच भीतीचा मुद्दा उगाळत आहे आणि जान्हवी तिला शांत करण्याचा प्रयत्न....दहा मिनिटे हाच कार्यक्रम. शेवटी शरयू आपल्या खोलीत जाते तर जान्हवी आपल्या. सकाळी हीच छोटी आई श्री हाक मारत आहे म्हणून त्याच्याकडे येते तर त्याने चार पाच प्रिंटेड ड्राईंग कागद आणलेले असतात. त्यावर एखाद्या विसराळू व्यक्तीने आपले हसे होऊ नये म्हणून काय काय विसरले जाते आणि ते तसे होऊ नये म्हणून काय केले पाहिजे याच्या सूचना टाईप केलेल्या आहेत....त्यातील सारी कलमे शरयूसाठीच असल्याने तिला आनंद होतो. श्री आणि जान्हवीने ही युक्ती केल्याचे पाहून तिला आनंद होतो. खाली किचनमध्ये सासूसमोर जान्हवी तो कागद किचनच्या भिंतीवर चिकटविते. नर्मदाबाईला तो प्रकार छान वाटतो...थोड्या वेळाने शरयू तिथे येते आणि परत त्यावरच चर्चा.

इकडे वर लिहिल्याप्रमाणे श्री ऑफिसला जात आहे, फोन येताहेत...आणि जान्हवी त्याला नाष्टा करून जा म्हणत हातात प्लेट घेउन त्याच्या मागेमागे फिरते....मधूनच एखादा चमचा त्याच्या तोंडात कोंबते, तो घास चावतचावत फोनवर बोलतो....आणि गडबडीत जान्हवीला म्हणतो, "ठेव ते...मला नको, मला गेलेच पाहिजे." ते ऐकून जान्हवीचे डोळे पाण्याने भरून येतात....बाहेर पडणारा श्री ते पाहतो...कळवळतो, परत येतो....आणि नाष्ट्याची ती प्लेट संपवितो..... हे नित्याचे पतीपत्नी दर्शन ठीक आहे, पण जान्हवीला आता अशी ड्युटी मिळणार असेल तर ती देखील अन्य सहा स्त्रियांसारखीच होणार अशी चिन्हे आहेत.

बेबीआत्याला किचनमध्ये पोस्टर लावण्याचा प्रकार इंदूआईकडून समजतो आणि ते काम जान्हवीने केले आहे हे कळाल्यावर तिचा परत भडका होतो. घरामध्ये जे काही बदल करायचे ते आजीच्या मताने विचाराने करायचे आहेत असे ठरलेले असताना जान्हवीने हा आगावूपणा केला आहे असे तिचे उग्र मत आणि ती ऐकविते इंदूआईला....त्यातरी मान डोलावण्याखेरीज काहीच करत नाहीत.

बेबीआत्या रागारागाने खाली आली आहे....किचनमध्ये जान्हवी, नर्मदाआई, इंदूआई, शरयू सार्‍याजणी आहेत आणि त्यांच्यासमोर ती अद्वातद्वा बोलत ती पोस्टर्स काढते आणि जान्हवीकडे खुनशी नजरेने पाहात फाडून टाकते....तिच्या या कृत्याला कोणतीही सासू अडवित नाही, ही खरेतर खटकणारी बाब...पण पाहू उद्या.

इथे कुणीतरी म्हणायचे, "अहो मामा, झोपतात काही स्त्रिया साडी नेसूनही...!" म्हणून गप्पच बसलो.>>> पण जरीच्या साड्या नेसून नाही झोपत हो.

नताशा ~ येस्स्स.... तुझं अगदी बरोबर आहे..... एकतर साडी [तेही आजच्या मुंबईतील आधुनिक मुलीने] नेसून झोपणे संभवत नाहीच....त्यातही जरीची, म्हणजे अतीच झाले..... देवस्थळी कशाला घाबरतात हे समजत नाहीच.....[शिवाय रात्र दाखविताना तो पौर्णिमेचाच चंद्र दाखविणे चालू आहेच.....म्हणजे गोखल्यांच्या घरी जी काही आदळाआपट चालू आहे ती फक्त पौर्णिमेलाच होते की काय अशी शंका येत आहे.]

शिवाय रात्र दाखविताना तो पौर्णिमेचाच चंद्र दाखविणे चालू आहेच.....म्हणजे गोखल्यांच्या घरी जी काही आदळाआपट चालू आहे ती फक्त पौर्णिमेलाच होते की काय अशी शंका येत आहे.] Proud ते काहीतरी म्हणतात ना की मानसीक रोगाचा परीणाम पौर्णिमेच्या वेळेस जास्त असतो तसे असेल Proud

अहो अशोक मामा हे टिव्हीवाले कोणत्याही दिवशी पौर्णिमेचाच चंद्रच दाखवतात, हिंदी मालिकांमधुन जेव्हा करवा चौथ साजरा होत असतो तेव्हाही यांच्या आकाशात पूर्ण चंद्रच उगवलेला असतो. लहानपणी मला तेच खर वाटायच नंतर जेव्हा समजल की करवा चौथ ही आपल्याकडची दिवाळीच्या आधीची येणारी चतुर्थी आहे तेव्हा खरच दया आली या लोकांची आणि आपल्यासारख्यांची पण की हे काहीही दाखवतात आणि आपण कोणताही आक्षेप न घेता बघतो. कथानक अतिरंजित असण वगैरे गोष्टी ठीक आहेत पण चौथ म्हणुन पौर्णिमा दाखवणे जरा अतीच आहे.

जान्हवीने तिचा Job लवकर join करायला हवा.बाबान्चे opertaion करायचय तिला, हे विसरलीये का?
साडीत अजुन किती दिवस वावरणार? Sad
बाकि शरयूसाठी poster ची idea छान, आहे त्या परीस्थीत जान्हवी शरयूला मदत करायचा प्रयत्न करतिये.तीन सासवाना स्वताकडे वळ्वण्यात यश आलय पण अजुन तीन सासवा विरुद्ध आहेत तिच्या

BTW,हे छोटी आई,मोठी आई, आणी एका लग्नाची तीसरी..मध्ये मोठे बाबा....डोक्यात जात अगदी.
सरळ काकू,आजोबा म्हणता येत नाही का?आपल्या मराठीत कितीतरी छान नावे आहेत Uhoh

मुग्धा....

"....करवा चौथ ही आपल्याकडची दिवाळीच्या आधीची येणारी चतुर्थी आहे...."

~ विघ्नेश्वराला संकष्टीच्या दिवशी जान्हवी आणि श्री निघाले आहेत आणि आकाशात पौर्णिमेचा चंद्र चमकतो आहेत असे पाहायला मिळेल की अशी धास्ती वाटत आहे.....दाखवतीलदेखील....काय नेम नाही.

~ विघ्नेश्वराला संकष्टीच्या दिवशी जान्हवी आणि श्री निघाले आहेत आणि आकाशात पौर्णिमेचा चंद्र चमकतो आहेत असे पाहायला मिळेल की अशी धास्ती वाटत आहे.....दाखवतीलदेखील....काय नेम नाही.>>>>> अगदी अगदी. नुसत नाही वाटेतच रस्त्यावरचे लाईट जातात आणि मग पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात हे दोघे संकष्टीच्या दिवशी देवळात सुखरुप पोचल्याच पण दाखवतील Lol

विघ्नेश्वर = विघ्न + ईश्वर , बरोबर ना ? ह्याचा अर्थ काय होईल - विघ्न हरणारा की विघ्न आणणारा ? आयडीयली विघ्न हरणारा असाचं हवा.

परमेश्वर, महेश्वर ह्या सारखा विघ्नेश्वर शब्द बरोबर आहे का ?

प्राजक्ता.....चांगली अभ्यासू विचारणा केली आहेस. आपण एरव्हीही गणेशाच्या कुठल्याही मंदिरात जाताना त्याचे नाव काय आहे [जे दर गल्ली बदलत असते] इकडे सहसा लक्ष देत नाही....कारण शेवटी आपल्यासाठी गणेशाची मूर्ती महत्वाची असते....आमच्या कोल्हापुरातील रंकाळा तलावाशेजारी 'खणेश्वर' म्हणून गणपतीची एक प्रसिद्ध मूर्ती आहे.....त्याचे नाव 'खणेश्वर' का पडले ? तर ती मूर्ती तलावाशेजारी असलेल्या एका खणीत सापडली म्हणून.

आता तू विचारलेल्या शंकेला अनुसरून सांगता येईल की..... विघ्न = obstacle, hindrance. या अर्थाला मनी ठेवून विघ्नेश्वर या नामाकडे पाहिले तर "विघ्न दूर करणारा ईश्वर तो विघ्नेश्वर" असाही घेता येईल.

शब्दछटा कितीही प्रकारच्या निर्माण करता आल्या तरी ईश्वरासाठी आयोजित केलेले नाव चांगलाच अर्थ सुचवित असणार हे खरेच.

मामा दोन दिवसांचे अपडेट्स वाचायला आले. दोन दिवस नव्हते, माहेरच्या सर्व कुटुंबाबरोबर अंबेजोगाई-परळी वैजनाथला सहकुटुंब गेले होते म्हणून मायबोलीवर नव्हते दोन दिवस.

आता जान्हवीने बाबांच्या ऑपरेशनचे बघायला हवे त्या एकट्या पिंट्यावर न सोडता जातीने स्वतः धावपळ करून बाबांचे ऑपरेशन करून घ्यायला हवे आणि काही दिवस त्यासाठी माहेरी राहायला हवे असे माझे वैयक्तिक मत.

@ अशोकमामा, धन्यवाद, माझ्या शंकेचं निरसन केल्याबद्दल.

तुमचे अपडेटस खूप डिटेल्ड असतात आणि मालिका बघूनही वाचावेसे वाटतात Happy

अन्जू...

ऑडिटच्या निमित्ताने एकदा बीड आणि परभणीला जायला लागले होते....त्यावेळी रात्री मुक्कामाला पी.डब्ल्यू.डी.च्या गेस्ट हाऊसवर असताना तेथील अटेंडन्टने बोलताबोलता परळी वैजनाथ अगदी तीसपस्तीस किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगितले होते. फार मोह झाला होता त्यावेळी ऑडिट संपल्यानंतर तिथे जायला. पण सरकारी गाडी घेऊन तिकडे जाणे मला खटकले होते....त्यामुळे पुढे केव्हातरी नक्की येऊ परळीच्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यायला असे ठरविले.....आणि इतक्या वर्षानंतरही तो योग अजूनी आलेला नाही. असो.

जान्हवीपुढे आता काम आहे ते घरातील सासवांचे दिशाहिन जगणे योग्य सुस्थिती करणे....शरयूचा नंबर लागलेला आहेच....ती दुसरी बेबीआत्या फार फणकार्‍याची आहे, तिच्याही नवर्‍याला बोलावून आणून ही मालमत्ता त्याच्याच ताब्यात दिली पाहिजे....दुरुस्तीसाठी. तिकडे पिंट्याचाही काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असे वाटते.... त्यामुळे बाबांचे ऑपरेशन पुढे गेले असावे.

प्राजक्ता_शिरीन....

थॅन्क्स....मला हे आवडले की तू मालिका पाहूनची अगत्यपूर्वक अपडेट्सही वाचतेस....खरे सांगायचे झाल्यास यामुळेच मलाही ते लिहायला आवडते.

तिकडे पिंट्याचाही काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असे वाटते.... त्यामुळे बाबांचे ऑपरेशन पुढे गेले असावे.>>> मला उलटेच वाटते. पिंट्या काही कामधाम करत असेल self respect मिळवण्यासाठी. स्वतःला प्रूव करण्यासाठी.

नाही नताशा.... परवाच्या एका कार्यक्रमामध्ये पिंट्या काहीतरी संशयास्पद काम करण्यासाठी रात्रीच्या अंधारात झोपडपट्टीमार्गे चालला असल्याचे दाखविले गेले....त्याच्या तशा हालचालीमुळे मोटार सायकलवरून जाणारा मनिष थांबवितो....विचारणा करतो....पिंट्या उडवाउडवीची उत्तरे देतो....त्यामुळे मनिष त्याला 'मी हे जान्हवीला फोनवरून सांगणार...' असे म्हटल्यावर पिंट्या त्याच्यावरच उखडतो...आणि तिरीमिरीने तिथून निघून जातो.

त्यामुळे कामधाम करत असेलच तर ते सेल्फ रीस्पेक्ट मिळविणारे असेलच असे वाटत नाही.

...ती दुसरी बेबीआत्या फार फणकार्‍याची आहे, तिच्याही नवर्‍याला बोलावून आणून ही मालमत्ता त्याच्याच ताब्यात दिली पाहिजे....दुरुस्तीसाठी. >>>>>LOL Lol
खरच आहे,बेबीआत्याला लवकर घराबाहेर काढले पाहीजे,मोठ्या आईला तर तसही स्वताच मत नाहीये,वारा वाहिल तशि मत बदलत असते.मग काय जान्हवि आणी आजीची जुगल्बन्दी! शेवट गोग्गोड!
या घरातल्या बायकाना स्वयपाक्,स्वछ्ता आणी श्रीच्या मागे मागे फिरणे याव्यतिरीक्त उद्योग नाहि.
उपदेशाचे डोस पाजण्यार्या म.दे. नेमके काय दाखवयचे आहे काही कळत नाहि.

स्वयपाक्,स्वछ्ता हे ठीक आहे पण श्रीच्या मागे मागे कशाला फिरायचे? अगदी बेडरूम आवरायला वगेरे Angry

हो हे जरा अतिच आहे. लग्न झालेल्या नविन जोदाप्याच्या खोलीत सरळ सरळ घुसायाच म्हणजे काय? Angry

तिकडे पिंट्याचाही काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे असे वाटते.... त्यामुळे बाबांचे ऑपरेशन पुढे गेले असावे.>>> मला उलटेच वाटते. पिंट्या काही कामधाम करत असेल self respect मिळवण्यासाठी. स्वतःला प्रूव करण्यासाठी.>>+१

या घरातल्या बायकाना स्वयपाक्,स्वछ्ता आणी श्रीच्या मागे मागे फिरणे याव्यतिरीक्त उद्योग नाहि.>>>हो ना, स्वतःच्या आवडी-निवडी, छंद असे काही नाहीच. जान्हवीलाच त्यांच्या मागे काहितरी काम लावावे लागेल असे वाटते.

गुरुवार दि. १४ नोव्हेंबर २०१३ : अपडेट

~ आज बरेच दिवस वाट पाहात असलेली शाब्दिक झुंज पाहाण्यास मिळाली. चार स्त्रिया शरयूसाठी लावलेली ती सूचनांची पोस्टर्स किचनमध्ये वाचत आहेत, मजा घेत आहेत...जान्हवीही हसत आहे....आणि तितक्यात बेबीआत्या आगडोंब घेऊन तिथे अवतरते आणि पहिल्या झटक्यात भिंतीवरील तो कागद टरकावून जान्हवीकडे थेट पाहात अशी काही लाखोली वाहते की बस्स. जान्हवी बरेच दिवस रडलेली दाखविली नव्हती....ती आज दाखविली. गोखल्यांच्या घराची बेअब्रू करून टाकणारी ही पोस्टर्स किचनमध्ये लावण्यापूर्वी तू आईआजीची परवानगी घेतली नाहीसच पण अन्य स्त्रियांना विचारून निर्णय का घेतला नाहीस. तुझ्यामुळे या घरातील दौर्बल्य इतरांच्या लक्षात येईल...त्यामुळे आमची अब्रू जाईल...इ.इ..... तोफमाराच करीत होती बेबीआत्या आणि तिला या स्त्रिया मुकाटपणे पाहाण्यापलिकडे काहीच करू शकत नव्हत्या....अंती बेबीआत्या तो सूचनांचा कागद टराटरा सर्वासमोर फाडते आणि परत जान्हवीकडे जळजळीत कटाक्ष टाकून तिथून निघून जाते.

संध्याकाळी श्री आल्यावर त्याला दिसते की बेबीआत्या एकटीच हॉलमध्ये येरझार्‍या घालत आहे. तो तिला कारण विचारतो पण बेबीआत्या बाकी काही सांगण्यापूर्वी थेटच सांगते, "श्री हे बघ मी आज गोष्टीबद्दल तुझ्या बायकोला फार बोलले...तुला राग आला नाही ना ?" या प्रश्नाला उत्तर म्हणून श्री बोलतो, "होय...आला राग." आत्या त्याच्याकडे पाहते तेव्हा तो म्हणतो, "पण राग आला तो तू जान्हवीला बोललीस त्याबद्दल नव्हे तर तू म्हणालीस 'तुझ्या बायकोला..." मग जर ती माझी बायको असेल तर तुझी कुणीच नाही का ? आणि जर तू तिला एखाद्या कारणास्तव बोलली असशील तर ते कारण योग्यच असणार याची मला खात्री आहे...तरीही एक तुला सांगतो तिने जे केले ते माझ्या सांगण्यावरून, तो निर्णय तिचा एकटीचा नव्हता...." आणखीही बरेच या अनुषंगाने बोलणे होते....पण श्री वर निघून जातो...आणि मग बेबीआत्यालाही मग काहीतरी चुकल्यासारखे वाटते आणि ती श्री ला चहा देण्याच्या निमित्ताने त्याच्या रूममध्ये जाते. तिथे जान्हवी रडत उभी असते. श्री न बोलता तिथेच असतो. आत्या श्री ला चहाचा कप देता देता जान्हवीकडे पाहते आणि "जान्हवी, आय अ‍ॅम सॉरी, खरी चूक श्री ची आहे ज्याने तुला तो सल्ला दिला....मी तुला उगाच बोलले" असे म्हणते पण जान्हवी "अहो आत्या उलट मीच तुमची माफी मागितली पाहिजे...कारण त्या कागदांबद्दल मी कुणालाच विचारले नाही...."...तरीही बेबीआत्या माफी मागून तिथून निघून जाते.....जान्हवीला माहीत असते की श्री ने जाणीवपूर्वक 'मी सांगितले तिला...' असे खोटे बोलून तिच्या चुकीवर पांघरून घातले आहे. ती खुलते.

इकडे बर्‍याच दिवसांनी शेवटी शशिकलाबाई घरी आल्या आणि आल्याआल्या सख्ख्या भावाने आपल्याला कसे फसविले बापाच्या इस्टेट प्रकरणात याचा पाढा सदाशिवरावांच्या पुढे मोठ्या आवाजात वाचतात. त्याना यात काहीच गम्य नसते....तोपर्यंत पिंट्या येतो आणि आईला आवाज खाली करून बोलत जा...चाळीत राहतो आपण, लोक काय म्हणत असतील...अशा दोनचार उपयुक्त सूचना करतो; पण त्या ऐकतील तर ! उलट त्याच पिंट्याला तू काही काम करीत नाहीस, भिकेला लागशील एक दिवस...असे अद्वातद्वा बोलतात, ते ऐकून पिंट्या आल्या पावली परत बाहेर पडतो.

'गोकुळ' वर आता जान्हवीने पंजाबी ड्रेस घालण्याचा कार्यक्रम. छानच दिसत होती जान्हवी.... [मला तर मालिकेचे सुरुवातीचे तिच्या नोकरीचे प्रसन्न दिवस आठवले....साडीवर कित्येक भाग पाहिल्याने आज इतक्या दिवसानंतर तिला पंजाबी ड्रेसमध्ये पाहणे सुखदायक होते...] नर्मदासासू आणि सरुमावशीही तिला पाहून आनंदित होतात आणि खाणाखुणा करीत तिला खाली ये म्हणतात...पण ही बया घाबरते कारण समोरच आजी पेपर वाचत बसलेल्या आहेत....दोन्ही सासवा तिला प्रोत्साहन देतात आजीच्या समोर येण्याचे....आजीचे लक्ष या दोन सासवांकडे जाते...त्याना कळत नाही की नेमका काय पोरकटपणा चाललाय. त्या चहा मागतात....तो नर्मदाबाईच देतात....जान्हवी पुढे येतच नाही....घाबरून परत वर पळून जाते.

आजी नंतर आपल्या रूममध्ये गेल्यावर जान्हवी आणि या दोघी किचनमध्ये हसत गप्पा मारीत असतात. आता जान्हवीच्या अंगावर तोच ड्रेस आहे....हसणे चालू असतानाच इंदूआई तिथे येते आणि नर्मदा व सरस्वतीला "तुम्ही आता सांभाळून वागा....तुमच्या डोळ्यांवर जी काही झापडे आली आहेत ती बाजूला काढा..." असे काहीतरी अगम्य बोलते....हा भाग उद्या दाखविला जाईल.

Pages