१/२ किलो कारली..
१०० ग्राम तीळ ..
प्रत्येकी १-१ टेबल-स्पुन धणे,जिरे,व मोहोरी ..
लसुण पाकळी ७-८..
१/४ टी स्पुन हिंग मसाल्यासाठी व १/४ चमचा हिंग फोडणी साठी..
१/२ टी स्पुन प्रत्येकी आमचुर पावडर व साखर..
१ टी स्पुन ति़खट..२/३ हिरव्या मिरच्या..[आवडीनुसार..]
मीठ-चवीनुसार अंदाजाने..
तेल-१ टी स्पुन मसाल्यासाठी.२ टेबलस्पुन भाजी-फोडणी साठी..
१/४ टी स्पुन हळद
१..कारली स्वच्छ धुवुन उभी चीर देवुन प्रत्येकी २/३आडवे तुकडे करुन घ्यावे..
[साले खरवडुन काढु नये तसेच मीठ लावुन ठेवु नये..]
२.कढईत १ टी स्पुन तेल तापवुन त्यात तीळ,धणे,जीरे,मोहोरी,परतुन घ्यावे..गॅस बंद करुन त्यात लाल तिखट,आमचुर.साखर्,हिरव्या मिरचीचे तुकडे लसुण पाकळी चे तुकडे घालुन पुन्हा थोडेसे परतावे...
३..मिक्सर मधे हे मिश्रण वाटुन घ्यावे व अर्धे कारल्यात भरुन अर्धे तयार भाजीत वरुन पेरण्यासाठी ठेवावे..
४..२ टेबल स्पुन तेलात हिंग-मोहोरी-जिरे घालुन फोडणी करावी ..हळद घालावी..भरलेली कारली त्यात घालुन परतावी..कढईवर झाकण ठेवुन त्यात थोडे पाणी घालुन वाफेवर,मंद आचेवर ही कारली शिजु द्यावी..एक दोन वेळा अधुन मधुन हळुवार परतावी..
५.. कारली शिजत आली कि उरलेला मसाला पेरुन एक वाफ आणावी..
१..कारल्याचे साल खरवडायचे नाही ..बिया कडक असल्यास काढाव्या..
२..तेलाचे प्रमाण कमी करायचे असेल तर---- मसाला बिनतेलाचा कोरडाच भाजुन वाटा..भरलेली कारली कुकरच्या डब्यात ठेवुन झाकण ठेवुन २ शिट्या काढुन शिजवुन घ्यावी..१ टी स्पुन तेलाची फोडणी करुन त्यात परतावी..
३..पाणी घातलेले नसल्याने भाजी टिकाउ आहे..
४..तितकी कडु लागत नाही..
५.तशी कृति अगदी साधी आहे पण चव खुपच छान..
मसाला जरा वेगळा, चांगला
मसाला जरा वेगळा, चांगला वाटतोय. करुन बघणार.
धन्यवाद.
रेसिपी सार्वजनिक नाही.
अरे वा! नक्की करून बघणार.
अरे वा! नक्की करून बघणार. (मोहरी बरीच पडते आहे की यात.)
छान रेसिपी , सुलेखाताई.
छान रेसिपी , सुलेखाताई.
आवडली ही कृती. मी नक्की करून
आवडली ही कृती. मी नक्की करून पाहेन.
छान
छान
स्वाती,मसाल्यात मोहोरी जास्तच
स्वाती,मसाल्यात मोहोरी जास्तच आहे अन त्यानी भाजीला चव येते..
छान आहे रेसिपी. तेल कमी
छान आहे रेसिपी. तेल कमी लागण्यासाठी मायक्रोवेव्हमध्येपण थोडं पाणी शिंपडून वाफवून घेता येतं.
आर्च्,मावे..सारखेच सोलर कूकर
आर्च्,मावे..सारखेच सोलर कूकर मधे बिन-तेलाची भरली कारली केली अप्रतिम चव आली..
मस्त आहे रेसीपी. करुन बघीन.
मस्त आहे रेसीपी. करुन बघीन.
खरेच, अगदी वेगळा मसाला. आणि
खरेच, अगदी वेगळा मसाला. आणि कारल्याची भाजी थोडी कडू लागायलाच हवी की.
आमच्या ऑफ़िसमधे जवळजवळ पाकातली कारली असतात.
दिनेशदा,या भाजीचे विशेष
दिनेशदा,या भाजीचे विशेष म्हणजे कडूपणा जाणवतच नाही मीठ लावुन पाणी काढले नाही/कडु सालं खरवडली नाहीत तरीही..
असेच दुसरी एक पद्धत-कारल्याच्या चकत्यांच्या इतका कांदा चिरुन फोडणीत घालायचा लगेचच कारली ,तिखट्,मीठ्,धनेपुड घालुन भाजी मंद आचेवर करायची ..कडु लागत नाही..
मस्त वेगळी रेसिपी आहे, करुन
मस्त वेगळी रेसिपी आहे, करुन बघायला हवी.
छान
छान
छान रेसेपी.
छान रेसेपी.
मसाल्यात तीळाचे प्रमाण थोडे
मसाल्यात तीळाचे प्रमाण थोडे कमी केल्यास अशी भाजी पथ्यकर होईल.
वेगळ्या प्रकारची. नक्की करुन
वेगळ्या प्रकारची. नक्की करुन पाहीन.
आमच्या कडे ही कारले आणि
आमच्या कडे ही कारले आणि बटाट्यांच्या काचर्यांची भाजी होते, आता याप्रकारेही करून बघेन.
मस्तंय! कारली जीव की प्राण
मस्तंय! कारली जीव की प्राण आहेत. नक्की केली जाईल ही भाजी.