संस्थानिकांच्या गढ्या... नेमक्या कुणाच्या?

Submitted by संजिव पिल्ले on 9 November, 2013 - 09:09

भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे.

http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India

भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला.

मुघल साम्राज्याचे इतर तुकडेही असेच नष्ट झाले.. म्हणजे इंग्रजांनी गिळले. लखनौ (अवध) चा नबाब वाजिद अली हाही इंग्रजांपुढे पराभूत झाला. जेंव्हा त्याला इंग्रज पकडून घेऊन जात होते, तेंव्हा त्याने त्याच्या भावना व्यक्त करायला चार ओळी खरडल्या. सैगलपासून पार भिमसेनजींपर्यंत सर्वांनाच त्या ओळीनी भुरळ घातली.

बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए

चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें)

मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ...

आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश

जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ...

मुघल संपले. त्यांच्या इमारती, राज्ये, पैसा हे सर्व इंग्रजांच्या मालकीचे झाले.

पुढे १९४७ साली इंग्रजही देश सोडून गेले आणि त्यान्नी इंग्लंडला नेलेलं जरी आपल्याकडून गेलं, तरी भारतातील गंगाजळी, भारतातील स्थावर मालमत्ता , इतर उद्योगधंदे , इतर शासकीय संपत्ती ही भारतातच आणि भारताच्या मालकीचीच राहिली.

त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं.

पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्‍याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत. १९४७ साली संस्थानिकांनी आपली प्रजा लोकशाहीच्या मांडीवर बसवली , पण राजकोष आणि राजमहाल हे भारतात विलीन झाले का? उदाहरणार्थ, आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा हा आजही संस्थानिकांचीच खाजगी मालमत्ता आहे. का, ही त्यांची अर्जित प्रॉपर्टी होती? इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे?

मुघलांचे वाडे सरकारचे झाले.

शिवाजी महाराजांचे किल्ले सरकारजमा आहेत.

इंग्रजांच्या वास्तूही सरकारजमा आहेत.

पेशवाई शनिवारवाडा हाही पेशव्यांचा खाजगी राहिलेला नाही.

मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले? की, संस्थानिकांपासून आपल्याला अजून स्वातंत्र्य मिळालेच नाही?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान धागा काढलेला आहे.
पुण्यात पेशवाई बुडाली. अर्थात मराठ्यांचे राज्य संपले. उत्तर हिंदुस्थानापर्यंत वाढवलेले राज्य संपले. पुढे इंग्रजांनी वारसाहक्क कायदा आणून ज्या संस्थांनांना वारस नाही अशी संस्थांने खालसा केली. यात अनेकांची संस्थाने रद्द होऊन इंग्रजांनी सरकार जमा करून घेतली. एकछत्री अंमल आणण्यासाठी इंग्रजांनी ही संस्थाने खालसा केली. इंग्रजांची या मागे दूरदृष्टी होती. एकतर ही संस्थाने मनमानी पद्धतीने कारभार करत होती. त्यात संस्थानांच्या मिळकती या पुढील वारसांना आपोआप वारसा हक्काने मिळत गेल्या. उत्तरेत संस्थाने उभारलेल्या शिंदे, होळकर यासारख्या पेशवेकालीन सरदारांनी संस्थाने खालासा होऊन ही तशी आपल्याकडे कशी टिकतील याचा प्रयत्न केलेला आहे. पुण्यातील महादजी शिंदे यांच्या छत्री (समाधी)साठी इंदोरमधील शिंदे घराण्यातून आजही देखभाल दुरुस्ती खर्च केला जातो.
माझ्या पाहण्यात पुण्यातील काही जुने वाडे, गढ्या आहेत. ज्यांची देखभाल, दुरुस्तीचा खर्च परवडण्यासारखा नसल्याने त्यांची केवळ खंडरे होऊन पडली आहेत. ज्या टिकून आहेत त्यांचा वापर खासगी मालमत्तेसारखा होत आहे. काहींनी अशा वाड्यात, गढ्यामध्ये हॉटेल टाकून त्याचा वापर एैशोआरामासाठी केलेला आहे. चांगले दाम मोजून अशा किल्लेवजा गढीत मुक्कामासाठी आपणास जाता येते. खरे तर हे सर्व वाडे, संस्थाने रद्द करून त्यांचा चांगला वापर करणे गरजेचे आहे . मात्र, सरकार जमा झालेल्या वास्तूंची तरी सध्या बिकट परिस्थिती आहे.

ज्या टिकून आहेत त्यांचा वापर खासगी मालमत्तेसारखा होत आहे. <<< या मालमत्ता खाजगीच आहेत ना , इंग्रजांच्या सत्तेपुर्वी आणि स्वातंत्र मिळाल्या नंतर्ही कित्येक वर्षे त्यांचा वारसदारांचा राबता / निवास त्या वाड्या / गढ्यांमधे आहे तर त्या मालमत्ता सरकारी कश्या.

पेशवाई संपवल्या नंतर शनिवार वाडा व अन्य काही मिळकती इंग्रजांनी जप्त केल्या, त्याची मालकी इंग्रजसरकारची झाली व जाताना इंग्रजसरकार कडून ती फुकटच भारतसरकारच्या पदरी पडली

ferfatka,

१.
>> पुण्यात पेशवाई बुडाली. अर्थात मराठ्यांचे राज्य संपले.

पुण्यातली पेशवाई आणि मराठ्यांचे राज्य या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मराठ्यांच्या राज्याचे अधिकृत (पण नामधारी) संचालक सातार्‍याचे छत्रपती होते. पुण्याची पेशवाई ही मराठ्यांच्या राज्याचा एक (महत्त्वाचा) भाग होती. पेशवाई बुडेपर्यंत बाकीची मोठी मराठा राज्ये (इंदूर, ग्वाल्हेर, बडोदे, तंजावर इत्यादि) इंग्रजी जोखडाखाली आली होती. मात्र पेशवाई जशी 'बुडाली' तशी ही राज्ये 'बुडली' नाहीत. फार काय औंध आणि भोर ही संस्थानेही टिकून राहिली, पण पुणे नामक संस्थान उत्पन्नही झाले नाही.

हे असं का, याबद्दल माझी काही मतं आहेत. पण त्याची चर्चा इथे नको. हवंतर खाजगीत करूया. Happy

२.
>> एकतर ही संस्थाने मनमानी पद्धतीने कारभार करत होती.

माझ्या माहितीप्रमाणे झाशीवाले मनमानी करीत नव्हते. दत्तकविधान नाकारल्याने ते खालसा करण्यात आले होते. मनमानीच्या कारणाखाली काही किरकोळ खालसे झाले असतीलही. पण इंग्रजी धोरणांत हा प्रमुख मुद्दा नसावा. प्रजेच्या भल्यासाठी वगैरे इंग्रजांनी संस्थाने खालसा केली नसावीत. वैर म्हणाल तर संस्थानिकांचं आपापसांत आपापसांत होतंच.

आ.न.,
-गा.पै.

इथे आकडे मिळाले ..

पण हे आकडे वार्षिक आहेत की मासिक?

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=10150897556945269&id=2...

http://en.wikipedia.org/wiki/Privy_Purse_in_India

कुरुंदवाडकरांना सुमारे ५०००० असा आकडा आहे. अजुन दोन त्यांचीच घराणी आहेत. ही पेन्शन १९४७ ते ७१ या काळात मिळत होती. त्या काळातील चलनाचा विचार केला तर ५०००० आकडा कमी नाही.

नतद्रष्ट लोक आहेत हे. लोकांची जबाबदारी लोकशाहीवर झटकली. महालही गिळले आणि वर पेन्शनही. इंदिरा गांधींनी equality for all citizens हा मुद्दा पुढे करुन यांची पेन्शन बंद करुन टाकली.

हैद्राबादच्या निजामाने इंग्रजांकडून इंजिनियरिंगची पुस्तके घेऊन ती ऊर्दूत भाषांतरीत केली होती, असे ऐकून आहे. एका तरी हिंदु संस्थानिकाने इतका शहाणपणा दाखवला होता का?

भारतातल्या कोणत्याही हिंदू राजाने कधिही इतर धर्मीयांची देवळो फोडली नाहीत, इतर धर्मीयांच्या ज्ञानाचे स्रोत नष्ट केले नाहीत (जशी तक्षशीला नष्ट केली), जबरदस्तीने धर्म बदलायला लावला नाही, धर्म बदलाला नाही म्हणुन त्यांच्या बायकांवर अत्याचार, जाळपोळ, सामुहिक हत्या केल्या नाहीत, इतर धर्मियांची राजवाडे आणि देवळे तोडुन तिथे आप्ल्या धर्माचे प्रार्स्थनास्थळ बांधले नाहीत, इतर धर्मीयांना काफिर म्हणुन जिहाद पुकार्ला नाही.
, असे ऐकून आहे. एका तरी xxxx संस्थानिकाने / राजाने / टोळीवल्याने इतका शहाणपणा दाखवला होता का?

बनारस हिंदु विद्यापीठ स्थापन्यात म्हॅसुर आणि इतर संस्थानांचा महत्वाचा वाट होता.
गुजराथेत सयाजिरावांनी आणि महारष्ट्रात शाहु महारजांनि शिक्षण प्रसारात महत्वाची भुमिका बजावली.

हैद्राबादच्या निजामाने इंग्रजांकडून इंजिनियरिंगची पुस्तके घेऊन ती ऊर्दूत भाषांतरीत केली होती, असे ऐकून आहे.>>>>>>>>>>>>>>>>>>हे कौतुकास्पद आहे

आणि त्याच संस्थानाने हिंदुंवर अत्याचार करुन स्वतंत्र भारताविरूद्ध युद्ध पुकारले होते हे तर लॅच कॉतुकास्पद असेल नॅ?

आणि त्याच संस्थानाने हिंदुंवर अत्याचार करुन स्वतंत्र भारताविरूद्ध युद्ध पुकारले होते :

तोच तर या धाग्याचा विषय आहे. निजाम आणि जुनागडवाल्यांनी सरळ सरळ युध्हच पुकारले होते. आपल्या ताब्यातील प्रांत जाऊ न देणे हेच तर राजाचे काम असते ना हो? त्यामुळे त्यांचा निर्णयात निदान ट्रान्सपरन्सी तरी होती.

याउलट, बहुतांश हिंदु संस्थानिकांनी आधी इंग्रजांकडून पेन्शन खाल्ली आणि देश विकला.

नंतर देश स्वतंत्र होतोय म्हटले तर याच लोकांच्या टोळक्याने वल्लभ भाई पटेलांवर दडपण आणून राजमहाल आपल्या ताब्यात रहातील आणि शिवाय भरघोस पेन्शन मिळेल याची व्यवस्था केली. राजा हे बिरुद वापरायचीही त्यात परवानगी मागितलेली होती.

१९६३ सालीही पेन्शन बंद व्हायची चिन्हे होती. पण खुद्द नेहरुंनी 'सरकारने आपला शब्द पाळावा' असे कारण दाखवून पेन्शन सुरु ठेवली. अर्थात तेंव्हा हा विषय AICC म्हणजे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीमध्ये चर्चेला आला होता, देशाच्या संसदेत बहुदा आला नव्हता.

त्यानंतर इंदिरा गांधींनी जेंव्हा पेन्शन बंद करण्यासाठी पहिले बिल १९६९च्या सुमारास आणले तेंव्हा त्याला पहिला विरोध संस्थानिकप्रेरित भाजपाच्या लोकांनीच विरोध केला होता आणि इंदिराबाईंना तेंव्हा माघार घ्यावी लागली होती.

त्यानंतर इंदिराजींनी दुसरा प्रयत्न १९७१ साली केला. पुन्हा बिल आणले. त्यात त्या जिंकल्या आणि संस्थानिकी बांडगुळांची पेन्शन बंद झाली. लोकशाहीत इक्व्यालिटी ऑफ सिटिझन आहे, जुना राजा म्हणून कोणालाही आता पेन्शन द्यायची गरज नाही, हे सुप्रीम कोर्टानेही मान्य केले आणि पेन्शन बंद केली. राजांचे किताब , बिरुदेही नष्ट झाली.

संस्थानिकांनी खाल्लेल्या पेन्शनबद्दल / जागेबद्दल भाजपा किंवा हिंदुत्ववाले चकारही बोलत नाही, ते त्याचमुळे. कारण हेच लोक त्या बिलाचे मुख्य विरोधक होते. आणि आज, हेच भाजपावाले सरदार पटेलांचा उंच पुतळा उभा करणार आहेत ! Proud Rofl भाजपाच्या विनोदबुद्धीला दाद द्यायला हवी. Proud

जोपर्यंत संस्थानिकांच्या ताब्यातील जनतेच्या असलेल्या जागा ( संस्थानिकांच्या आपकमाईच्या जागा अर्थातच संस्थानिकांच्याच राहू देत. ) भारत सरकारला मिळत नाहीत, तोवर आपले स्वातंत्र हे अर्धवटच आहे, असेच खेदाने म्हणावे लागेल.

ज्याने देशाविरुद्ध सरळसरळ युद्धच केले तो निजाम देशद्रोही ( त्यात तो हरला/ मेला/ पळाला, हा मुद्दा अलाहिदा.) का लाखोकरोडोची पेन्शन दिलीत तरच संघराज्यात येऊ असे दडपण आणणारे इतर संस्थानिक जास्ती देशद्रोही? का, दोघेही सारखेच देशद्रोही ?

वा वा फारच गोड बोलत आहात Happy
एक शंका - तुम्ही म्हणता त्या संस्थानिकांमधे मध्य भारतातील एक संस्थान, जे मुळचे मराठी आडनाव असलेले नंतर तिकडेच स्थायिक झाल्याने नाव जरासे बदलले, अजुनही अफाट संपत्ती आहे, राजकारणात पण शिरलेले आहेत तर हे असे संस्थानिक पण या यादीत येऊ शकतात का ? Happy

लक्ष्मी गोडबोले,

१.
>> ज्याने देशाविरुद्ध सरळसरळ युद्धच केले तो निजाम देशद्रोही ( त्यात तो हरला/ मेला/ पळाला, हा मुद्दा
>> अलाहिदा.) का लाखोकरोडोची पेन्शन दिलीत तरच संघराज्यात येऊ असे दडपण आणणारे इतर संस्थानिक
>> जास्ती देशद्रोही? का, दोघेही सारखेच देशद्रोही ?

निजाम जास्त देशद्रोही. त्याच्या रझाकारांनी निरपराध प्रजेची कत्तल केली.

२.
>> त्यात त्या जिंकल्या आणि संस्थानिकी बांडगुळांची पेन्शन बंद झाली.

संस्थानिकांची भारताला गरज उरली नाही. याच न्यायाने भ्रष्ट कारभाराचीही जनतेला गरज नाहीये. संस्थानिकांचा पैसा मंत्र्यांच्या घरात जाऊ लागला, हे आम्हाला दिसतंय. थोडक्यात काय एक बांडगूळ जाऊन दुसरं आलं.

३.
>> त्याला पहिला विरोध संस्थानिकप्रेरित भाजपाच्या लोकांनीच विरोध केला होता आणि इंदिराबाईंना
>> तेंव्हा माघार घ्यावी लागली होती.

त्यावेळी भाजप होता? Uhoh अधिक माहिती मिळाली तर बरे पडेल.

आ.न.,
-गा.पै.

>>संस्थानिकांचा पैसा मंत्र्यांच्या घरात जाऊ लागला, हे आम्हाला दिसतंय. थोडक्यात काय एक बांडगूळ जाऊन दुसरं आलं.

गापै, मी जे म्हणतो आहे त्यांच्याकडे तर अजुनही पुर्वीच्या काळच्या इस्टेटी, राजवाडे, शस्त्रे, इ. सगळेच्या सगळे अबाधित आहे, त्याचा भलताच अभिमान आहे, आणि वर राजकारण, मंत्रीपदे हे तर चेरी ऑन टॉप ऑफ आइस्क्रिम आहे.

ल.गो. यादी ठीक आहे हो, पण यातले मी म्हणतो त्याप्रमाणे किती लोक पुर्वीचा इतमाम सांभाळून आहेत ते पण सांगा ना, प्लिज प्लिज.

तुम्ही बहुतेक जामोप्याची काकू, मावशी, आजी, इ. कोणी आहात असे का वाटत आहे ? Uhoh

त्यावेळी भाजप होता?

इंदिराबाइंना विरोध करणारा गट हा सॅफ्रॉन पॉवर होता, हे सत्य आहे. त्याचीच पिल्लावळ म्हणजे भाजपा ना? की भाजपा आपल्या बापाला / आज्ज्याला विसरला? Proud http://www.bjp.org/about-the-party/history?u=bjp-history म्हणून मी भाज्पा शब्द वापरला.

जे लोक स्वतःला अखंड हिंदुत्ववादी / अखंड हिंदुस्तानवादी म्हणून वतःच्या टिमक्या वाजवतात, ते लोक खरे तर अखंड पेन्शनवादी होते. हे बघा .. आमच्या कुरुंदवाडचे संस्थानिक .....

http://en.wikipedia.org/wiki/Kuruntwad

कुरुंदवाडच्या इतिहासात पहिली सर्कस काढणारे छत्रे , पं. विष्णू दिगंबर पलुस्कर आणि डी व्ही पलुस्कर, भू गंधर्व रहिमतखान असे हिरे होऊन गेले. पण त्यांच्या स्मरणापेक्षा कुरुंदवाडच्या संस्थानिकाला इंग्रजांच्या कुठल्या राजाने कोणत्या पदव्या दिल्या याचेव स्मरण जास्त आहे. Proud असले राजे स्मरणात राहण्यापेक्षा सरणावर जायच्याच लायकीचेच आहेत. एकीकडे रविंद्रनाथांसारख्या दिग्गज माणसाने इंग्रजांना त्यांची पदवी परत केली हा इतिहास आणि एकीकडे स्वातंत्रानंतरही इंग्रजांच्या पदव्यांबाबत स्वतःच्या टिमक्या वाजवणारी घराणी.

गामा,

कोणी नुक्सान जास्त केले, हा हिशोब इतका सोपा नसतो.

वैद्यकीय क्षेत्रातील दोन उदाहरणे देतो...

१. एका माणसाला एका दरोडेखोराने समोरुन येऊन त्याचे हातपाय तोडले. म्हणजे दरोडेखोराच्या वेशात त्याने दरोडेखोरीच केली.

२. एका माणसाला तुझे ऑपरेशन करतो, असे खोटे सांगून डॉक्टरने त्याची किडनीच काढली.

पहिला म्हणजे निजाम, दुसरा म्हणजे तुमचा संस्थानिक..

आता सांगा कोण धोकादायक?

आपल्या ताब्यातील प्रांत जाऊ न देणे हेच तर राजाचे काम असते ना हो? त्यामुळे त्यांचा निर्णयात निदान ट्रान्सपरन्सी तरी होती >>> इतके दिवस मला वाटत होते की प्रजेचे हित पाहणे आणि त्यानुसार निर्णप घेणे हे राजाचे काम असते. बहुसंख्य प्रजेला स्वतंत्र भारतात सामिल व्हावेसे वाटत होते तिकडे दुर्लक्ष करुण स्वतःच्या खाजगी फायद्याचे युद्द पुकारुन , इंग्रजांना ३०० करोड लाच देउन तुमच्या या टोळिवाल्याने काय पराक्रम केला?
अनेक हिंदु राजांनाही स्वतंत्र रहावेसे वाटत होते, पण जनतेचा कल लक्षात घेऊन ते भारतात सामील झाले.
बाकी तुमच्या इतर शंकांचे निरसन करण्यासाठी नंदिनी यांची पोस्ट वाचा.

एखाद्या राजाने त्यांना मिळालेल्या पदव्या मिरवल्याने तुमची का जळते? जोपर्यंत त्यांच्या अशा वागण्याने इतर कुणाचेही नुकसान होत नाही, तोपर्यंत हा त्यांचा खाजगी मामला आहे. तुमच्या शांतताप्रिय धर्माचे राजे यापेक्षा खालच्या थराला जातात.
आणि त्यांच्या या मिरवण्यात बिभत्सपणा कुठे आहे? तुम्हाला सहन होत नसेल तर त्यांच्या विकी पेजवर, त्यांच्या गावात जाउ नका ना?

एखादा डोक्टर काही कारणास्तव जुने क्लिनिक बंद करत असेल आणि नव्या ठिकानी जाताना, जुने नको असलेले सामान भंगारात, जुन्या बाजारात विकत असेल तर याला तो डॉक्टर कसा स्वार्थॉ आहे, साध भंगारातले पैसे ही सॉडवत नाहीत त्याला अस म्हणणार का? की त्याने रुग्णांची कशी सेवा केली यावरुन त्याच्याबद्दलच मत बनवणार?

जुने नको असलेले सामान भंगारात, जुन्या बाजारात विकत असेल तर याला तो डॉक्टर कसा स्वार्थॉ आहे, साध भंगारातले पैसे ही सॉडवत नाहीत त्याला अस म्हणणार का? की त्याने रुग्णांची कशी सेवा केली यावरुन त्याच्याबद्दलच मत बनवणार?

बाप रे!!!!!! म्हणजे संस्थानिकाने त्याचे राज्य संघराज्यात घालणे आणि मोडीच्या दुकानात किडूक मिडूक विकणे.. हे दोन्ही सारखे की काय? Proud

Proud

आमचा मेंदू गंजलेला नाही की कुणी संस्थानिकाने त्याची मोड घालून यावी. Happy

तुम्ही वर एक लिन्क दिलेली आहे ती नुसतीच संस्थानांची यादी आहे.
यातले किती लोक राजकारणात शिरले आणि त्यात कोणत्या पक्षात जास्त आहेत याची पण यादी असेल ना तुमच्याकडे ?

लगोबाय,

>> इंदिराबाइंना विरोध करणारा गट हा सॅफ्रॉन पॉवर होता, हे सत्य आहे

संस्थानिकांचे सर्वपक्षीय स्नेही होते. म्हणून पहिल्या वेळेस तनखाबंद विधेयकास १९६९ साली संसदेत अपेक्षित बहुमत मिळाले नाही.

इंदिरा गांधींना गुंगी गुडिया बनवणारे म्हाताऱ्यांचे पंचक त्यांचे खरे शत्रू होते. जनसंघाचा संबंधही येत नाही इथे. उगीच आपलं काहीही ठोकून द्यायचं.

इंदिरा गांधींनी थेरडेपंचकाचा दालमिया केल्यावर १९७१ साली बहुमताने तनखे बंद झाले. त्याकरिता २६ वी घटनादुरुस्ती केली गेली.

आ.न.,
-गा.पै.

लगोबाई, पिल्ले, कोणी किती खाल्ले पिल्ले याचा तौलनिक अभ्यास करायचा झाला तर स्वातन्त्र्योत्तर राजकारण्यांना वगळून चालणार नाही. नॉई म्हणजे नॉई.

Pages