Submitted by Mandar Katre on 1 November, 2013 - 12:23
दिवाळी तोंडावर आली असतानाच एक बातमी आली, अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे शेरीफ कार्यालयात काम करणाऱ्या आरती गुप्ते नामक NRI मराठी महिलेने जमीन विक्रीच्या पैशात अफरातफर केल्याने फेडरल कोर्टाने तिला ३ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे
.
प्रतिष्ठित INFOSYS ला देखील व्हिसा घोटाळा प्रकरणी अमेरिकन कोर्टाने ३० ० कोटी डॉलर्स चा दंड ठोठावला आहे . आयटी मध्ये देखील हैद्राबाद मधून मोठ्या प्रमाणावर बोगस अनुभव प्रमाणपत्रे देण्याचे प्रकरण उघडकीस आलेले होते.
महाराष्ट्रीय NRI आज अमेरिका आणि इतर देशात उज्ज्वल यश मिळवून भारताचे नाव रोशन करत असताना अशा प्रकारच्या बातम्या ऐकून खेद वाटला .
भविष्यात परदेशात भारतीयांची ओळख fraud अशी होऊ नये ,अशी अपेक्षा !
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लोकहो, ही जून महिन्यातली
लोकहो,
ही जून महिन्यातली बातमी आहे. आत्ता का बरं चर्चेस येते आहे? १६ सप्टेंबरास सुनावणी होणार होती. ती आत्ता संपली असावी.
http://www.fbi.gov/philadelphia/press-releases/2013/houston-woman-convic...
फिलाडेल्फिया शेरीफ स्थावरे (रियल इस्टेट) का विकतो? कोणी प्रकाश टाकला तर बरं होईल.
आ.न.,
-गा.पै.
रच्याकने :
हे आरती गुप्त्यांचं स्थळ सापडलं. http://www.aartigupte.com
बहुधा हीच ती व्यक्ती आहे.
गामा पैलवान यांच्या वेलकम
गामा पैलवान यांच्या वेलकम बॅकबद्दल काँग्रेसलेसन ! एक शरमेची बाब सेटल झाली.
कात्रे आणि चित्रे जुळे भाऊ का ? ( चुलत असतील )
यात नक्कीच "हात" असणार बरोबर
यात नक्कीच "हात" असणार
बरोबर ना कात्रे साहेब
मंदार कात्रे, १००% सहमत
मंदार कात्रे,
१००% सहमत
अरे कायदा बदलला वाटते. नाही
अरे कायदा बदलला वाटते. नाही तर गुप्तेंना तेथल्या जेलमधूनही लोकसभा लढवता आली असती. भ्रष्ट मंडळीला आपल्याकडे भरपूर स्कोप आहे.
गा. पै. तुम्ही संकेत स्थळ
गा. पै. तुम्ही संकेत स्थळ दिलेल्या आरती गुप्ते वेगळ्या आणि या वेगळ्या.
शेरीफ सेल ही अमेरीकेतील सामान्य पद्धत आहे. बँक फोरक्लोजर, टॅक्स सेल वगैरे कारणाने कोर्टाने जजमेंट दिले की त्यानुसार पैशाची वसूली करण्यासाठी प्रॉपर्टीवर कबजा करून त्याची खुल्या लिलावात विक्री करणे हे काम शेरीफचे ऑफिस करते.
यात आरती गुप्ते या भारतीय वंशाच्या आहेत ही बाब महत्वाची नाही तर अशा अफरातफरीसाठी शेरीफच्या ऑफिसातील व्यक्तींवर गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा झाली, प्रकरण रेंगाळत पडले नाही.
स्वाती२, आरती गुप्ते वेगळ्या
स्वाती२,
आरती गुप्ते वेगळ्या आहेत हे सांगितल्याबद्दल आभार.
>> अशा अफरातफरीसाठी शेरीफच्या ऑफिसातील व्यक्तींवर गुन्हे दाखल होऊन त्यांना शिक्षा झाली, प्रकरण
>> रेंगाळत पडले नाही.
एका अर्थी तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण शेरीफ कचेरीचे नियम मुद्दामून शिथिल ठेवलेले आहेत की काय अशी शंका येते. हे भ्रष्टाचाराच्या हिमनगाचं टोक आहे हे कोणीही सहज सांगेल. आरती गुप्ते हा चिमुकला मासा आहे. खरे गुन्हेगार वेगळेच आहेत. ते असंख्य आरती गुप्त्यांची खोगीरभरती करू शकतात. त्यांना कोण हात लावणार. घरोघरी मातीच्याच चुली!
आ.न.,
-गा.पै.
वि.सू. : वाचकांनी कृपया चालू प्रतिसाद हे आरती गुप्त्यांच्या भ्रष्टाचाराचं समर्थन मानू नये.
विसू बद्दल धन्यवाद.
विसू बद्दल धन्यवाद.
यात आरती गुप्ते या भारतीय
यात आरती गुप्ते या भारतीय वंशाच्या आहेत ही बाब महत्वाची नाही >>>
महत्वाचं सांगितलं बाई तुम्ही. बातमीत शकीला शेख असं नाव असतं तर बातमीखाली काय प्रतिकिया असत्या हे सांगायला नकोच.
गुप्ते म्हणजे देशस्थ की
गुप्ते म्हणजे देशस्थ की कोकणस्थ?
आयटी मध्ये देखील हैद्राबाद
आयटी मध्ये देखील हैद्राबाद मधून मोठ्या प्रमाणावर बोगस अनुभव प्रमाणपत्रे देण्याचे प्रकरण उघडकीस आलेले होते.
>>
हैद्राबाद आय. टी. मध्ये अनेक गोष्टींसाठी (कु)प्रसिद्ध आहे, जसे बोगस टेलिफोन इंटरव्यू देणे, बोगस अनुभवाची प्रमाणपत्रे (अगदी पे स्लिपपण), बोगस सर्टिफिकेशन देखील
मागे अमेरिकेत एका तेलगू आय्.टी. व्यावसायिकाने खूनदेखील केल्याची बातमी आली होती.
जाऊ द्या... अमेरिकेतल्या आय.
जाऊ द्या... अमेरिकेतल्या आय. टी. मधल्या देसी बोगस प्रकरणांविषयी वेगळा धागा काढलेला बरा. 'कन्सलटन्सी' ह्या नावाखाली जे बोगस प्रकार चालतात ते किस्से रात्र जागवण्याईतके मनोरंजक आहेत.
आणखी एक शरमेची बाब. सामूहिक
आणखी एक शरमेची बाब.
सामूहिक बलात्कारानंतर महिलेचे डोळे काढले
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=L38BT
काश्मीर:तिरंगा फडकाविल्याने
काश्मीर:तिरंगा फडकाविल्याने बंद पाडले चित्रिकरण
http://www.esakal.com/Tiny.aspx?K=G382D
काय चाललय काय हे ? आपण कुठं राहतो ? भारतात कि पाकिस्तानात ?
अत्यंत शरमेची बाब आहे ही.
अत्यंत शरमेची
अत्यंत शरमेची बाब
http://zeenews.india.com/marathi/news/pune-western-maharashtra/52-year-o...
यात आरती गुप्ते या भारतीय
यात आरती गुप्ते या भारतीय वंशाच्या आहेत ही बाब महत्वाची नाही >>>
या प्रकरणात भारताचं नाक कापलं गेलं नाही.
केव्ह्ढा फरक दृष्टीकोणातला !! का बरं ?