Submitted by सुप्रिया जाधव. on 12 September, 2013 - 15:02
आयुष्याच्या वळणांवर
उमलतात खरी !
भावनांचं खत, रक्ताचं पाणी
फवारुनही गळतात सारी !
नकळत अलवार
एक तरी फुलावं !
निरागस जाणिवांनी
तरारून डोलावं !
खोलवर रुजावीत
पाळं-मुळं !
मनभर पसरावं
आत्मीयतेचं जाळं !
जरासाच मिळता
विश्वासाचा टेकू !
हारून स्वतःला
तन-मन झोकू !
संशयाची अमरवेल
मूळापासून उपटावी
नात्याच्या वेलीला
फळं-फुलं लगडावी
-सुप्रिया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आतिउत्तम कविता फार सहज
आतिउत्तम कविता
फार सहज उगवलीये मनातून ही काव्यलतिका
भावनांचं खत, रक्ताचं
भावनांचं खत, रक्ताचं पाणी
फवारुनही गळतात सारी !<<<
गहिरा भाव!
वैवकु, बेफिजी धन्यवाद
वैवकु, बेफिजी धन्यवाद !
-सुप्रिया.
संशयाची
संशयाची अमरवेल....
जबरदस्त.._/\_
धन्यवाद !
धन्यवाद !
सुर्रेखच ....
सुर्रेखच ....
सुप्रियाताई सुरेख
सुप्रियाताई सुरेख कविता.
आवडलीच.
फार सहज उगवलीये मनातून ही
फार सहज उगवलीये मनातून ही काव्यलतिका>>>वाचताना हाच भाव मनात आला.
सुंदर!
नेहमीप्रमाणेच दर्जेदार कविता
नेहमीप्रमाणेच दर्जेदार कविता ..
शेवटच्या ओळी विशेष भावल्या .:)
(No subject)
छान कविता.... अगदी सहज
छान कविता.... अगदी सहज उमटलेली.
धन्यवाद मंड्ळी !!
धन्यवाद मंड्ळी !!