नाती....

Submitted by सुप्रिया जाधव. on 12 September, 2013 - 15:02

आयुष्याच्या वळणांवर
उमलतात खरी !
भावनांचं खत, रक्ताचं पाणी
फवारुनही गळतात सारी !

नकळत अलवार
एक तरी फुलावं !
निरागस जाणिवांनी
तरारून डोलावं !

खोलवर रुजावीत
पाळं-मुळं !
मनभर पसरावं
आत्मीयतेचं जाळं !

जरासाच मिळता
विश्वासाचा टेकू !
हारून स्वतःला
तन-मन झोकू !

संशयाची अमरवेल
मूळापासून उपटावी
नात्याच्या वेलीला
फळं-फुलं लगडावी

-सुप्रिया.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

संशयाची अमरवेल....
जबरदस्त.._/\_

Happy