व्हिडियोमधे दिल्या प्रमाणे...
व्हिडियोमधे दिल्या प्रमाणे...
http://youtu.be/CLmOJFRpDMg
२ टेबलस्पून धणे
१ टेबलस्पून जीरे
६ लवंगा
१ टेबलस्पून काळे मिरी (दाणे)
४/५ दालचिनीचे तुकडे
२ टेबलस्पून तेल
हा मसाला तेलावर परतून घ्या.....
१ मध्यम कांदा चिरून
४ लसूण पाकळ्या
१/२ इंच आले
३/४ हिरव्या मिरच्या
१ वाट्या खवलेला नारळाचा कीस.
१/२ टेबलस्पून मीठ
हा मसाला त्यावर घालून तपकिरी होईपर्यंत परता.
दिड टीस्पून लाल तिखट
पाव टीस्पून हळद
१/२ वाटी ओली कोथिंबीर.
हे त्यात टाका आणि भाजून घ्या. सगळी मिळून १७/२० मिनिटे लागतील.
हे मिश्रण थंड करून घ्या , आणि थंड झाल्यावर मिक्सरमधे वाटून घ्या.
तेल/ हिंग/मोहरी/कढीपत्याची फोडणी करा.
त्यावर भाजाणे टाका....
आता यात..
२ वाट्या काळे वाटाणे भिजवून मिठाबरोबर उकडून टाकता येतील (एक शिट्टी काढल्यावर २५/३० मिनिटे बारीक गॅसवर शिजवा).
किंवा
२ वाट्या कुळीथ भिजवून मिठाबरोबर उकडून टाकता येतील (एक शिट्टी काढल्यावर १५/२० मिनिटे बारीक गॅसवर शिजवा).
किंवा
एक डझन साफ केलेल्या कुर्ल्या/चिंबोर्या शिजवता येतील.
किंवा
दिड पाऊंड कोलंबी शिजवता येईल...
थोडं पाणी टाकून कालवणाची Consistency करून घ्या.
८/१० आमसुलं किंवा २ टीस्पून आगळ घालून ढवळा.
उकळी आल्यावर गॅस बंद करा..
याला भाजाण्याची आमटी म्हणतात. आणि माझ्या मते ती एक दिवस नीट मुरल्यावर खूप छान लागते.
आंबोळी, तांदळाचे वडे, भाकरी, चपाती, भात यापैकी कशाबरोबरही खाऊ शकता...
आधीच्या पाककृती:
पास्ता : http://www.maayboli.com/node/45955
बाळ बटाटे: http://www.maayboli.com/node/45519
कोवळा फणसः http://www.maayboli.com/node/42083
भाजाणे म्हणजे काय? (अजून
भाजाणे म्हणजे काय? (अजून व्हिडिओ पाहिला नाहीये)
मस्त! मस्त! मस्त!
मस्त! मस्त! मस्त!
कोकणात लोक काय करतात यावर मी
कोकणात लोक काय करतात यावर मी काही बाफवर चर्चा वाचल्या तेव्हा...
कोकणात २ प्रकारच्या आमट्या केल्या जातात (हिरव्या आणि भाजाण्याच्या).
१. हिरवी आमटी - खरं तर ही दिसायला पिवळसर असते पण यात ताजं खोबरं न भाजता वापरतात.
त्याबरोबर हळद/तिखट/चिंच घातली जाते. हे सगळं वाटून (गोळी) आमटीला लावली जाते.
(माझी पापलेट रेसिपी या प्रकारची आहे - मायबोली दिवाळी अंक).
शेवग्याचा शेंगा, कच्ची कैरी, भाजलेले सांडगे, टोमॅटो, मासे, आंबाडा, हिरवी मिरची अश्या बर्याच गोष्टी
या हिरव्या आमटीत घालून ( एकावेळी एकच) आमटी केली जाते.
जेव्हा एकादा कोकणी 'आज सांडग्याची आमटी खाल्ली' असे म्हणतो तेव्हा ती हिरवी आमटी असते.
२. भाजाण्याची आमटी - ही दिसायला तपकिरी, काळपट असते कारण ताजं खोबरं भाजून घालतात.
एकदा भाजाणे तयार झाले की यात बर्याच गोष्टी करता येतात.
मटण, चिकन, कुर्ल्या, कोलंबी इत्यादी.
सगळ्या प्रकारच्या उसळ्या (काळे वाटाणे, कुळिथ, चवळी, वालीचे दाणे, वालाचे दाणे इत्यादी).
मश्रूम, शेवरं असल्या भाज्याही यात करता येतात..)
व्हिडिओ पाहिला. मस्तच आता
व्हिडिओ पाहिला. मस्तच
आता करुन बघते.
cant type Marathi just
cant type Marathi
just watched and followed the recipe for hulage!
बघूनच तोंडाला पाणी सुटलेय .
बघूनच तोंडाला पाणी सुटलेय . पण हा व्हिडियो सेव्ह कसा करायचा ?
शेवग्याचा शेंगा, कच्ची कैरी,
शेवग्याचा शेंगा, कच्ची कैरी, भाजलेले सांडगे, टोमॅटो, मासे, आंबाडा, हिरवी मिरची अश्या बर्याच गोष्टी
या हिरव्या आमटीत घालून ( एकावेळी एकच) आमटी केली जाते.
जेव्हा एकादा कोकणी 'आज सांडग्याची आमटी खाल्ली' असे म्हणतो तेव्हा ती हिरवी आमटी असते.>>>>>>
नाही हं. शेवग्याचा शेंगा, कच्ची कैरी, भाजलेले सांडगे, टोमॅटो, मासे, आंबाडा, यामधे आम्ही लालमिरची/ तिखट घालतो.खोबरं न भाजता वापरतो.फक्त कोलंबीच्या आमटीत फोडणीत हिरवी मिरची असते.
बाकी पा.कृ. मस्त!
देवकी.. सांगण्याचे तात्पर्य
देवकी.. सांगण्याचे तात्पर्य हेच की 'हिरवी आमटी म्हणजे न भाजलेले खोबरे घातलेली आमटी'...
(हिरव्या मिरच्यांचीही हिरवी आमटी होते)....
शुम्पी: करा करा असेच Follow करा... तुमची आमटी मस्त होवो.
सातू: व्हिडियो Save कशाला? YouTube वर आहे आणि इथे लिंक आहे. पुढेमागे हरवला तर जरा शोधल्यास सहज सापडेल, नाही का?
एक सूचना: या व्हिडियोत केलेले भाजाणे (म्हणजे सुरूवातीचा भाग मिक्सर पर्यंत) हे दोन पदार्थांसाठी आहे.
पुढे काळ्या वाटाण्याबरोबर घालताना निम्मे घातले आहे.
उरलेले शेजारी शिजत असलेल्या कुर्ल्यांचा कालवणात गेले...
(अचानक कमी कसे झाले असे वाटू नये म्हणुन सांगतो).
मस्त मसाला आहे. धन्यवाद, इतका
मस्त मसाला आहे. धन्यवाद, इतका सविस्तर व्हीडीओ दिल्याबद्दल.
छान झाली आमटी/उसळ.
छान झाली आमटी/उसळ. धन्यवाद!
एक सुचवू का?
व्हिडिओमध्ये म्युझिकैवजी बोलायला सांगा बुवा योगिनीतैंना. जी लिहिलेली कार्ड आहेत तेच बोला म्हनजे व्हिज्युअल आणि ऑडिओ अशी आमची नीट रिव्हिजन होते.
म्युझिक ऐवजी फोडणी चुरचुरल्याचा, परत्ल्याचा, वाटल्याचा आवाज मला आवडेल जास्त.
म्युझिकैवजी बोलायला सांगा
म्युझिकैवजी बोलायला सांगा बुवा योगिनीतैंना. <<<< त्या व्हिडियोवर बोलायला बघत नाहीत (एरवी नॉनस्टॉप बोलतात म्हणा) आणि मी घरच्या कपड्यात होतो
बॅकग्राऊंडला कन्या माझ्यावर टीपी करत होत्या. तेव्हा सगळ्यांचे आवाज बंद करायला धून वापरली.
विचार होता की जर कुणाल्या आवडल्या तर आपल्याला आवडलेल्या सोप्या पाककृती एक एक करून इकडे टाकायच्या. (पण एकंदरीत प्रतिसाद बघता दुकान बंद करण्याची वेळ लवकरच येईल असं दिसतंय... )
दुकानात येणार्यांपेक्षा
दुकानात येणार्यांपेक्षा दुकानात न येणार्यांचा मान ठेवताय तुम्ही जास्त.
(येऊद्यात कृत्या)
दुकानात येणार्यांपेक्षा
दुकानात येणार्यांपेक्षा दुकानात न येणार्यांचा मान ठेवताय तुम्ही जास्त. >>> अगदि
फक्त एक विनंती प्रिंटस काढता येतील अश्या फाॅर्मॅट मधे येऊ द्या़़ ़ ़़़ ़ रेसिपी करताना सोपे जाते
तुमच्या विनंतीस मान - सातू -
तुमच्या विनंतीस मान - सातू - आणि इतर...
लिहीलेली रेसिपीही टाकलेली आहे...
खुप धन्यवाद गोगा़़़़ ़़़
खुप धन्यवाद गोगा़़़़ ़़़ ़़़ ़ ़ ़
आवशीचो घोव; ह्याका भाजाणे
आवशीचो घोव; ह्याका भाजाणे म्हणतंत? आम्ची "हि" त्येका मसाल्याचा वाटप म्हणता. ता नेम्का संपला तर आमका पास्तो खावाक लागता, म्हणुन चांगला लक्षात रव्हला हा....
आवशीचो घोव; ह्याका भाजाणे
आवशीचो घोव; ह्याका भाजाणे म्हणतंत?<<< राज ह्याका भाजाणां म्हणतत. भाजाण्याचां कालवाण/आमटी/सांबारां (वालीचे दाणे, चवळी, काळे वाटाणे) ...