Submitted by गुलबकावली on 24 October, 2013 - 02:02
ग्रामपंचायत हद्दित येत असलेल्या जमिन आणि घर खरेदीसाठी माहिती हवी आहे. तसेच ह्यासाठी कर्ज कुठुन मिळेल.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पठाण सावकार डीएच एफ
पठाण
सावकार
डीएच एफ एल
मुथ्थूट फायनान्स
सहकारी संस्था / बँका
ग्रामपंचायतीच्या हद्दितल घर
ग्रामपंचायतीच्या हद्दितल घर लीगल असत का? मग त्याला राष्ट्रीय बँका कर्ज का नाही देत? अस घर कुणी तोडत का अनाधिकृत ठरवून? उदा. महानगरपालिका. तुमचा काय मत आहे, अस घर विकत घ्याव का? हे घर तुम्ही विकत घेताना कोणती काळजी घ्यावी?
ग्रामपंचायत हद्दीतले घर
ग्रामपंचायत हद्दीतले घर पूर्ण्पने लीगल असते. गावामधे एवढे लोक राहतात ते काय अनधिकृत म्हणून राहतात की काय? महानगरपालिकेचा ग्राम पंचायतीशी डायरेक्ट संबंध नसतो, ते घर पाडू शकत नहीत. अर्थात अनधिकृत बांधल्यास ग्रामपंचायत घर पाडू शकतेच.
ग्रा पं हद्दीतील सर्व घरांना राष्ट्रीय, खाजगी बँका कर्ज देतात त्याखेरीज हाऊसिंग लोन वालेदेखील कर्जे देतात. जमीन घेताना एन ए जमीन हवी असल्यास तशी घ्यावी, शेतजमीन विकत घेण्यासाठी काही निकष आहेत त्यानुसराच ती घेता येते.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
प्रतिसादाबद्दल धन्यवाद नंदिनी.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद पण
प्रतिसादाबद्दल धन्यवाद
पण शाहिर, डीएच एफ ने नाहि सांगितले. कारण आमची तिथे शाखा नाहि म्हणून.....
जागा अलिबाग - चौल भागात आहेत. एन ए आहे. घर + वाडी अशी आहे. काहि माहित असेल तर कळवा.
धन्यवाद.....
स्टेट बँकेत चौकशी करा. बरेचदा
स्टेट बँकेत चौकशी करा. बरेचदा लहान गावातून त्या भागातल्या अर्बन बँकाही लोन देतात.
नाहि स्वाती स्टेट बँकेने
नाहि स्वाती स्टेट बँकेने सगळ्य्यात आधी हात वर केले. कारण ग्रामपंचायत मधे आम्हि लोन देत नाहि....:(
वाडी असेल तर वाडीचे उत्पन्न
वाडी असेल तर वाडीचे उत्पन्न वगैरे दाखवून लोन मिळते का तेही पहा.
समिता, तुम्ही कुठल्या
समिता, तुम्ही कुठल्या ब्रांचमधे चौकशी केलीत? लोनसाठी गावामधल्या ब्रांचमधे चौकशी करावी लागेल. स्टेट बॅक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र या बँका खात्रीने ग्रामपंचायत भागात लोन देतात.
एन ए असेल तर मिळेल कर्ज. टाऊन
एन ए असेल तर मिळेल कर्ज. टाऊन प्लॅनींगचा अभिप्राय बघा ना त्यात असतील अटी ई. कदाचित चौल गावठाण (गावातला रेसिडेंशियल एरीआ) मधील नसेल ही जागा. पण एन ए असेल तर कटकट होणार नाही.
नंदिनी, सध्यातरी मी स्थानिक
नंदिनी, सध्यातरी मी स्थानिक भागात नाहि केली चौकशी. पण करून बघते....धन्यवाद.