पत्रिकेवरुन व्यक्ती स्री की पुरुष ओळखा, जिवंत कि मृत ओळखा हे आव्हान डॉ अब्राहम कोवूर या भारतात जन्मलेल्या व श्रीलंकेत स्थायिक असलेल्या बुद्धीप्रामाण्यवादी चळवळीचा जनक असलेल्या माणसाने जगभरात जाहीर दिले होते.अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तीच परंपरा आजही पुढे चालू ठेवली आहे.आज ते आव्हान २१ लाखांचे आहे.अजून कोणत्याही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नाही.काही ज्योतिषांना हे आव्हान स्वीकारता येत नाही याची खंत आहे. ज्येष्ठ ज्योतिषी श्री श्री भट पत्रिकेवरुन स्त्री कि पुरुष या बद्दल आपल्या ज्योतिषाच्या गाभार्यात या पुस्तकात याबाबत म्हणतात," खरे तर ज्योतिषाची शास्त्रीयता सिद्ध करुन देण्यासाठी आणखी आकडेवारी जमा करण्याची किंवा आव्हाने स्वीकारण्याची गरजच उरली नाही.१० पत्रिका देउन त्यातले मुलगा की मुलगी सांगा असा प्रश्न विचारला जातो.' भारतीय ज्योतिष' या हिंदी पुस्तकात या विषयी एक नियम आहे.त्यात थोडा बदल करुन एक नियम प्रचलित आहे तो मुलुंडचे श्री नाडगौडा यांनी कळवला आहे तो असा:-
जन्मलग्न,जन्मकालीन गुरु,सूर्य व राहू यांच्या राशींची बेरीज करावी. त्याला तीनाने भागावे; बाकी शून्य किंवा एक उरला तर पत्रिका मुलाची असते.दोन उरले तर स्त्री ची असते." त्यांनी उदाहरण म्हणुन इंदिरा गांधी व संजय गांधी यांच्या पत्रिकेचा ताळ्यासाठी वापर केला आहे.इंदिरा गांधी:- जन्मवेळेस कर्क लग्न + वृश्चिक रवी+ धनु राहू+ वृषभ गुरु महणजे 4+8+9+2=23 23/3 =7 व बाकी 2 उरली म्हणुन स्त्री. संजय गांधी:- मकर लग्न+ वृश्चिक रवी+ धनु राहू + तुला गुरु म्हणजे 10+8+2+7=27 27/3 = 9 बाकी 0. या नियमाची प्रचीती 60 टक्क्याहून अधिक येते असे म्हटले आहे. या नियमांची छाननी करायची झाली तर पुढे पळवाट सुद्धा आहे. ते म्हणतात," लग्न व रव्यादि ग्रह राशी संधीवर असताना नियम लागू पडत नाही म्हणुन बहुधा प्रमाण कमी पडते."
वस्तुत: संख्याशास्त्रीय दृष्ट्या यदृच्छेने स्त्री का पुरुष हे ओळखण्याचे प्रमाण ५० टक्के आहे. त्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.भटांनी दाखवलेला नियम हा तपासायचा झाल्यास 'संधी' ची पळवाट आहे, भट म्हणतात कि या नियमाची प्रचीती ६० टक्क्याहून अधिक येते तर त्यांनी काही असा प्रयोग केला आहे का? ज्याची आकडे वारी उपलब्ध आहे का?. २००८ मधे झालेल्या आमच्या फलज्योतिष चाचणीचे वेळी देखील भटांनी चाचणीतील संख्याशास्त्र विभागाचे प्राध्यापक सुधाकर कुंटे यांना भेटून या चाचणीचा पडताळा घ्या असे सांगितले होते. कुंटे सरांनी चाचणीतील डेटा ला तो नियम लावून पाहिला होता. पण त्याचे प्रमाण ५० टक्क्यापेक्षा अधिक आढळून आले नाही. हा चाचणीचा अधिकृत भाग नसल्याने तो प्रसिद्ध केला नाही.अथवा त्याची वाच्यता ही झाली नाही.आमच्या खाजगी बैठकीत मात्र याची चर्चा झाली होती.दुर्देवाने कुंटे सरांचे अकाली निधन झाले व तो विषय तिथेच थांबला. इतर ज्योतिषांना देखील भटांचा हा नियम चाचणीसाठी वापरावा असे वाटत नाही. कारण त्याला सार्वत्रिक ज्योतिष मान्यता नाही.फलज्योतिषाला विज्ञानाच्या चौकटीत बसवण्याचा आग्रह हा इतर ज्योतिषांना पसंत नाही.
( ब्लॉगवर पूर्व प्रकाशित)
>>हे वाक्य सांगून तुम्ही
>>हे वाक्य सांगून तुम्ही अभ्यासक अ ने अचूक वर्तवले असं सांगताय. त्यावर काय बोलणार ?<<
वाक्यरचना पहा, त्यातील अवतरण चिन्हे पहा. मग कोण काय म्हणतय ते (कदाचित)लक्षात येईल.
>>२ तासाच्या फरकात एका दिवशी
>>२ तासाच्या फरकात एका दिवशी एकाच शहरात कितीतरी मुले जन्म घेतात ह्याचा अर्थ ते एक तर सगळे मुलगे किंवा मुली.असे आढळून येत नाही त्यामुळे हा नियम म्हणून वापरताच येणार नाही.<<
अगदी बरोबर हेच लॉजिक ज्योतिषातिल इतर नियमांबाबतही लावता येईल. वर साती ने एक जुळ्या मुलांची ताजी केस दिली आहेच.
पुन्हा, पुन्हा तेच तेच
पुन्हा, पुन्हा तेच तेच रिकामटेकडे विचार,
ज्योतिष शास्त्रात नुसती कुंडली / पत्रीका पाहुन पुरुष वा स्त्री वा - - - हे सर्व सांगू शकतो. त्यासाठी अभ्यास हवा
अभ्यास, धागाकार साहेब !
हे सांगू शकत नाही असं ही ठामपणे कोण म्हणतं ?
//बरोबर हेच लॉजिक ज्योतिषातिल
//बरोबर हेच लॉजिक ज्योतिषातिल इतर नियमांबाबतही लावता येईल//
हेच लॉजिक लावून आपल्या आधीच्या लोकांनी काही नियम विकसित केले जसे लग्न कुंडली हि ठोकळ असते म्हणून नवमांश वगेरे पहिले जाते त्यामुळे २ तासातील लोकाची लग्नकुंडली जर एक असेल तरी बाकी बरेच फरक बाकी कुंडल्यामध्ये असतातच .
काही लोक फक्त टीका न करता त्यातील दोष व उणीवा शोधून काढतात व नवीन पद्धत विकसित करतात . त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे " कृष्णमुर्ती पद्धती" . ह्या मध्ये अगदी १/२ किंवा १ मि जन्मवेळेतील फरकाने पत्रिकेत फरक पडतो . ह्या पद्धती मध्ये बरेच वेळा अचूक उत्तरे मिळतात . आता ह्या पद्धती मध्ये ज्या उणीवा आहेत त्या काही विद्वान लोकांनी अभ्यासून दूर केल्या पाहिजेत .
कोणतेही शास्त्र हे अगदी परिपूर्ण नसते . तर बर्याच अभ्यासाने व अनुभवाने ते पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयन्त केला पाहिजे.
त्यामुळे टिंगल न करता जे चांगले आहे ते घेतले पाहिजे आणि ज्योतिषशास्त्र हे परिपूर्ण नसले तरी त्याचे अनुभव लोक घेत असतातच त्यामुळेच ते टिकून आहे व म्हणूनच तुम्ही आम्ही त्यावर चर्चा करत आहोत.
फक्त काही भोंदू लोकापेक्षा जास्तीत जास्त विद्वान व अभ्यासू मंडळीची यात गरज आहे.
//////अस कस म्हणता अन्विताताई
//////अस कस म्हणता अन्विताताई तुम्ही? त्याशिवाय "ज्योतिष" हे शास्त्र कसे सिद्ध होणार? हे नै विचारले तर ज्योतिषीव्यक्तिन्ना "कुडमुड्या" कसे ठरविता येणार? ///
लीम्बुतींबू , अगदी बरोबर!
कुंडलीवरुन सगळ्या गोष्टी
कुंडलीवरुन सगळ्या गोष्टी सांगता येतात हा जो समज आहे तो काही लोकांमधे अगदी दृढ आहे.
>>>> १००% खरे आहे.
------------------------------------
त्यांना असे वाटते त्यात काय एवढे चांगल्या ज्योतिषाला सांगता येईल जिवंत कि मृत, स्त्री कि पुरुष?
>>>>>>>>> अगदी बरोबर सांगता येईल, खरे आहे.
----------------------------------
समंजस ज्योतिषांना हे मान्य आहे कि असे काही सांगता येत नाही. या ज्योतिषाच्या मर्यादा आहेत.
>>>>>>>>>> ह्याच ज्योतिष्याच्या मर्यादा आहेत ह्या बद्दल १००% ग्वाही देऊ शकाल ?
उगीच समंजस असा शब्द ठेवुन कृपया ठाम मते बनवु नका. मी प्रत्यक्ष बघितलं आहे, खरा ज्योतिषी काय असतो ते.
-------------------------------------------------
मिलिंदा | 17 October, 2013 - 10:45
काय आहे, की ज्योतिषावर विश्वास नसताना तुम्ही त्याच विभागात बाफ उघडताय (अजून एक) याचं नवल वाटतंय.
इथे कोणीही येऊन काय लिहीणे अपेक्षित आहे ? नेहमीची चार डोकी येणार, वैयक्तिक हल्ले करणार आणि त्यात झालाच तर नक्की कोणता मुद्दा सिद्ध होतो ?
>>>>>>>> सहमत.
----------------------------------------------------
सज्जन हो ! नमस्ते
>>मी प्रत्यक्ष बघितलं आहे,
>>मी प्रत्यक्ष बघितलं आहे, खरा ज्योतिषी काय असतो ते.<<
अशा ज्योतिषांविषयी अधिक माहिती दिली तर आवडेल. वर उधृत केलेले मुद्दे अशा ज्योतिषांना पत्रिकेच्या आधारे सांगता येत असतील तर ती ज्योतिष वर्तुळात नक्कीच महत्वाची गोष्ट ठरेल.२१ लाखाची आव्हानाची भाषा ही काही लोकांना उद्दामपणाची वाटते.पण हा मुद्दा आवाहनाचा म्हणूनही घेता येईल. कारण अशा प्रयोगाची नोंद ज्योतिषाच्या इतिहासात होईल. प्रयोगाची अचूकता अगदी १०० टक्के पाहिजे असे नाही. १० टक्के टॉलरन्स हा पकडला असतो. अंनिस वगैरे बाजूला ठेवुन हा प्रयोग ज्योतिष वर्तुळात देखील करता येईल.
"ज्योतिष शास्त्रात नुसती
"ज्योतिष शास्त्रात नुसती कुंडली / पत्रीका पाहुन पुरुष वा स्त्री वा - - - हे सर्व सांगू शकतो. त्यासाठी अभ्यास हवा"
{त्यांना असे वाटते त्यात काय एवढे चांगल्या ज्योतिषाला सांगता येईल जिवंत कि मृत, स्त्री कि पुरुष?
>>>>>>>>> अगदी बरोबर सांगता येईल, खरे आहे. }
राजपूर यांच्या वरील मतांवर मायबोलीवरील नेहमीचे ज्योतिषप्रेमी/समर्थक यांची मते व्यक्त झाली नाहीत. त्यांना मनातून पक्के माहित आहे स्त्री की पुरुष वा जिवंत कि मृत हे कुंडलीवरुन सांगता येईल व अनुभवास येतील असे कोणतेही ठोस नियम ज्योतिषात नाहीत. परंतु तसे सांगण्यास ते धजावत नाही म्हणा वा त्यांना तसे सांगणे नकोसे वाटते म्हणा. अर्थात हे माझे निरिक्षण आहे.त्यात माझे पूर्वग्रह असू शकतात. ज्योतिष हे विज्ञान नाही असे सिद्ध झाल्याने फार काही फरक पडत नाही हे मी या ज्योतिषाच काय करायचं? या धाग्यात सांगितले आहेच. एकतर तुम्ही 'आमच्या' बाजूचे असा किंवा 'त्यांच्या' बाजूचे असा, if you are not with us you are with them अशी विचारश्रेणी समाजात आढळते. या निमित्ताने मला गिरिश कुबेरांच्य लोकसत्तातील पराजयदशमी या लेखाची आठवण आली. असो ! व्यक्ति तितक्या प्रकृती हे एकदा मान्य केले की त्रास होत नाही.
व्यक्ती जीवंत किंवा मृत हे
व्यक्ती जीवंत किंवा मृत हे ओळखण्यासाठी हाताची नाडी पहा
स्त्री किंवा पुरुष ओळखण्यासाठी काय पहाव हे काय सांगायला पाहिजे काय .................
कुंडल्या किंवा भविष्य याकडे करमणूकीच्या पलिकडे पाहू नका , त्रास होण्याची शक्यता जास्त........
>>>> राजपूर यांच्या वरील
>>>> राजपूर यांच्या वरील मतांवर मायबोलीवरील नेहमीचे ज्योतिषप्रेमी/समर्थक यांची मते व्यक्त झाली नाहीत <<<<<
मत व्यक्त करावे अशी गरज मलातरी वाटली नाही, उगीच काये दरवेळेस प्रतिक्रिया देत बसायच्या?
असो.
जातक जिवंत वा मृत / स्त्री वा पुरुष (वा अन्य) आहे की कसे हे विचारायला आजवर तरी माझ्याकडे कुणी जातक आला नाहीये. असल्या तर्हा अन्नीसवाल्यान्नाच सुचणार. अन जे करायला जायची गरजच नाही तिकडे मी का वळू?
बाकी जिवंत की मृत/स्त्री वा पुरुष राहूदेच्च बाजुला, जातक "सुंदर" आहे की "कुरुप" हे देखिल कुंडलीवरुन "अभ्यासाविनाच" सहजासहजी सांगता येत नाही घाटपांडेसाहेब. अन अभ्यासाकरता तितक्या प्रकारच्या व्यक्तिंच्या तितक्या कुंडल्या नजरेखालून गेल्या असाव्या लागतात जे अशक्य अस्ते. बहुषः माझ्याकडे कुम्डली घेऊन येणार्या व्यक्ती चारचौघांसारखेच दिसत अस्तात, लाखात एक उठुन दिस्णारी जाऊदेच, दहाजणीत उठुन दिसणारी व्यक्तिही माझेसमोर येत नाही, कारण एकच, सुंदर असायला कुंडलीत "शुक्र" जबरा लागतो, अन शुक्र जबरा अस्तो, तेव्हा जोडीने आर्थिक स्थितीही भरभक्कमच, किमान "ज्योतिषाकडे" जावे लागावे अशी नसते. तेव्हा एखादि सुंदर व्यक्ति ज्योतिषाकडे येणे हा दुर्मिळातील दुर्मिळ योग असतो, मग काय कप्पाळ अभ्यासणार "सुंदरांच्या वर्सेस कुरुपांच्या" कुम्डल्या अन सांगणार की अमकी कुंडली कुरुप व्यक्तिचि आहे अन तमकी सुंदर?
अर्थात्च, पुन्हा तेच की ज्या बाबी समजुन घेण्याची गरज जातकालाही नसते, त्यागोष्टी अन्निसवाल्यान्नी इतकेतितके लाख रुपये लावुन आव्हाने दिली तरि त्याचा काय उपयोग?
नाही त्याचा उपयोग शास्त्राला की नाही ज्योतिषीव्यक्तिला!
त्यापेक्षा भारतात जन्मणार्या अन मरणार्या प्रत्येक व्यक्तिच्या जन्ममरणाच्या "वेळेची" नोन्द जरी ठेवण्याचि व्यवस्था केलीत, अन तुरुंग/वेड्याम्ची इस्पितळे/ व्यसनमुक्ति केंद्रे येथिल कैदी/पेशण्ट याम्चा डाटा जरी गोळा केला तरी "ज्योतिष शास्त्रामधे" संशोधनाचे, ग्रंथामधे दिलेल्या ग्रहयोगांचे प्रत्यक्षात परिमाण तपासण्याचे बहुमोल काम होईल. पण तसे होणे नाही, नाही सरकारी पातळीवर (तसे केले तर तो हिन्दुत्ववादी भगवा अजेण्डा ठरतो अशी बोम्ब मारणारे कमी नाही) अन नाही संस्थात्मक/अन्निसच्या पातळीवर (कारण त्यान्चा उद्देशच बायस्ड्/पूर्वग्रहदुषित असल्याने ते असला डाटा वगैरे गोळा करण्याच्या/अभ्यासण्याच्या भानगडीत पडत नाहीत, त्यांचा सोप्पा मेनू की आव्हाने द्या, त्याचि प्रसिद्धी करा, अन जास्तीत जास्त पब्लिकच्या मनात "ज्योतिषाबद्दल" किमान किंतू तरी निर्माण करा - अन दुसरीकडे वाढत्या किन्तुयुक्त पब्लिकच्या रेट्याने हवे ते कायदे करुन घ्या!) असो.
सुंदर असायला कुंडलीत "शुक्र"
सुंदर असायला कुंडलीत "शुक्र" जबरा लागतो
>> म्हणजे नक्की काय? माझ्या हातात आत्ता माझी पत्रिका आहे. तर माझा शुक्र जबरा आहे कि नाही हे ओळखायला मी आता काय पाहू?
सुंदर असायला कुंडलीत "शुक्र"
सुंदर असायला कुंडलीत "शुक्र" जबरा लागतो
>> म्हणजे नक्की काय? माझ्या हातात आत्ता माझी पत्रिका आहे. तर माझा शुक्र जबरा आहे कि नाही हे ओळखायला मी आता काय पाहू?
>>>>>>>>>>> आरसा
>>> तर माझा शुक्र जबरा आहे कि
>>> तर माझा शुक्र जबरा आहे कि नाही हे ओळखायला मी आता काय पाहू? <<<<
कुन्डली कशाला घेतलीत? त्यापेक्षा आरशात बघा लग्गेच कळेल, लोकांच्या कौतुकाच्या नजरांत बघा
बायदिवे, ती माहिती इथे "ज्योतिषशास्त्रविरोधकान्च्या मध्ये" देणार नाही. सॉरी.
>>त्यापेक्षा भारतात
>>त्यापेक्षा भारतात जन्मणार्या अन मरणार्या प्रत्येक व्यक्तिच्या जन्ममरणाच्या "वेळेची" नोन्द जरी ठेवण्याचि व्यवस्था केलीत, अन तुरुंग/वेड्याम्ची इस्पितळे/ व्यसनमुक्ति केंद्रे येथिल कैदी/पेशण्ट याम्चा डाटा जरी गोळा केला तरी "ज्योतिष शास्त्रामधे" संशोधनाचे, ग्रंथामधे दिलेल्या ग्रहयोगांचे प्रत्यक्षात परिमाण तपासण्याचे बहुमोल काम होईल.<<
हे तर मान्यच आहे. ज्योतिषाच्या संख्याशास्त्रीय चाचणी च्या वेळी मतिमंद वा हुषार मुलांच्या पालकांनी दिलेली जन्मवेळ प्रमाण मानूनच कुंडल्या तयार केल्या गेल्या. आपल्याकडे जन्मदाखल्यावर जन्मवेळ लिहिण्याची पद्धत कुठे? जे जन्म हॉस्पिटल मधे होत नाहीत त्यांचे काय? असे अनेक प्रश्न आहेत.
आणि पत्रिकेवरुन स्त्री पुरुष, जिवंत मृत सांगता येते कि नाही हा मूळ मुद्दा आहे. त्याची गरज नाही हा वेगळा मुद्दा आहे. मूळ मुद्याविषयी काहीच बोलत नाही. सांगता येत असेल तर सांगता येते असे म्हणावे, सांगता येत नसेल तर सांगता येत नाही असे म्हणावे एवढा साधा मुद्दा आहे.
>>>>> >>>>>>>>>>> आरसा
>>>>> >>>>>>>>>>> आरसा <<<<<
सस्मित, अन या हजरजबाबीपणाकरता "बुध" जबरा लागतो बर्का!
सस्मित, अन या हजरजबाबीपणाकरता
सस्मित, अन या हजरजबाबीपणाकरता "बुध" जबरा लागतो बर्का! >>>>>>>> लिंटीं, मी बरीच्शी हजरजबाबी आहे तर माझा बुध जबरा असावा. कारण बुध्वारी तसही बांगडा, सुरमै, पाप्लेट असं जबरा खाणं खाते मी
>>सुंदर असायला कुंडलीत
>>सुंदर असायला कुंडलीत "शुक्र" जबरा लागतो,<<
आमच्या कुंडलीत शुक्र नेपच्चून तुळेत नवमस्थानी आहे. आम्ही कुठे दिसायला सुंदर?
आरसा
आरसा
आम्ही कुठे दिसायला सुंदर?
आम्ही कुठे दिसायला सुंदर? <<< कलत्राला विचारा
>>>> कारण बुध्वारी तसही
>>>> कारण बुध्वारी तसही बांगडा, सुरमै, पाप्लेट असं जबरा खाणं खाते मी <<<<
ओह्हो, अस म्हणतात की "मासे" खाणेही बुद्धिला "तल्लख" बनविते
>>>>आमच्या कुंडलीत शुक्र नेपच्चून तुळेत नवमस्थानी आहे. आम्ही कुठे दिसायला सुं>>>><<<< हे कळून तुम्ही काय करणार आता (या वयात) घाटपांडे साहेब?
अन दुसर्यान्ना कळूनही काय उपयोग?
प्रकाश, धजावण्याचे ह्यात
प्रकाश,
धजावण्याचे ह्यात काहिच नाही. बाप दाखव नाहितर श्राद्ध कर असा जो हेकेखोरपणा ईथे दाखवला जातो, त्यात मला किंचीतही रस नाही.
मी जे पाहिले ते आणखीन ज्यांनी पाहिले तेव्हढेच आम्हाला शास्त्रावर विश्वास ठेवायला पुरे आहे,
ईथी कोणी त्यावर विश्वास ठेवो वा न ठेवो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. ज्यांना सांगावेसे वाटेल त्यांना वेळ आल्यावर सांगेनच.
तोपर्यंत ईथली घमेंडी, हेकेखोर, खोचक, कुजकट टवाळी चालू दे.
बाकि , if you are not with us you are with them अशी विचारश्रेणी समाजात आढळते >>>>>> हा तुमचा
विचार, माझा नाही, माझ्यासाठी ह्याच समाजात काही असेही आहेत ज्यांना कुठल्याच मंचावर येण्याची ईच्छा
नसते, कारण त्यांची विद्या आणी क्षमता आपल्या सारख्या सामान्य माणसाच्या बौद्धिक पातळीच्या कैक पटींनी
श्रेष्ठ असल्याने त्यात कोणत्याही प्रदर्शनाची गरज नसते...............
ओढुन ताणुन धागा सुरु करायचा आणी कोणी सरळपणे बोलला रे बोलला, कि टवाळ्या सुरु करायच्या अश्या
गोष्टी तुम्हाला जास्त शोभतात, तेव्हा मी जर प्रतिसाद दिला नाही तर कुतर्कवादी भाषा न वापरता तिथेच थांबाल
तर तुमची वाखाणणी करणार्यांत एकाची आणखी भर पडु शकली असती.
बट प्रॅक्टिकली यू आर द वन हू प्रुव्ह्ड इट दॅट if you are not with us you are with them.........पुरावा तुमचा
प्रतिसादच आहे.
आता तुम्हाला कोणाचे विचार वा प्रतिसाद पटले नाहीत तर उगाच डिवचू नका, तुम्ही विचारसरणिचे, प्रतिसादाचे
शब्द पाहुन डिवचता, पण ज्याला डिवचता तो खरोखरीच कोण आणी काय आहे हे जाणुन घेतल्या शिवाय असे
पुन्हा करु नका.
नमस्ते.
या आव्हानांना ज्योतिषी कधीच
या आव्हानांना ज्योतिषी कधीच प्रतिसाद देणार नाहीत. जन्म, मृत्यु, लिंग, वय यासारख्या ठळक गोष्टीही सांगता येत नसतांना तुमच्या गुंतागुंतीच्या समस्यांवर (लग्न कधी होणार, मूल कधी होणार, आजार कसा बरा होणार, सांपत्तिक स्थिती कशी सुधारणार, नोकरी लागेल की नाही वगैरे) हे लोक बिनधास्त ठोकताळे देत असतात. सामान्य लोक भाबडे असतात, ते यांच्यावर विश्वास ठेवत जातात. हा भाबडेपणा हे यांचे भांडवल आहे, आणि नजिकच्या भविष्यकाळात तरी या भांडवलाचा अजिबात तुटवडा पडणार नाही, हे स्पष्ट आहे.
तरीही असे लेख येत रहावेत.
कुछ खार कम कर गये, गुजरे जिधर से हम...
राजपुर जी मला माफ करा पण
राजपुर जी मला माफ करा पण आपल्या मतांवर इतरांचे काय मत आहे ते खुलेपणाने व्यक्त करण्यासाठी ते आवाहन होते, आव्हान नव्हे.मला स्वतःला यात काही डिवचले आहे असे वाटत नाही. शक्यतो माझा प्रयत्न हा संयमित पणे व्यक्त होण्याचा असतो. मतभिन्नता राखूनही चर्चा करता येते. मी माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी डॉ नरेंद्र दाभोलकर व वराहिमिहिर ज्योतिष विद्यापीठाचे ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांचा जाहीर वादसंवाद हा कार्यक्रम २००१ साली घडवून आणला होता. असे वादसंवाद वैचारिक जगतात नवे नाहीत. ते यापुर्वीही होत होते व इथुन पुढे ही घडत राहतील.
ज्ञानेश आजच दै.सकाळ मधे (
ज्ञानेश
आजच दै.सकाळ मधे ( पुणे आवृत्ती) वाचकांच्या पत्रात प्रा. य.ना.वालावलकर यांचे फलज्योतिष ही अंधश्रद्धाच असे मत व्यक्त करणारे पत्र आले आहे. प्रा. य.ना.वालावालकर हे कठोर बुद्धीवादी म्हणुन ओळखले जातात.
त्याचा दुवा http://epaper.esakal.com/sakal/24Oct2013/Normal/PuneCity/page6.htm
अवांतर- सकाळ ने कुंडलीचे चित्र छापताना वैध कुंडली तरी घ्यायची होती.
>>>> आजच दै.सकाळ मधे ( पुणे
>>>> आजच दै.सकाळ मधे ( पुणे आवृत्ती) वाचकांच्या पत्रात <<<<<
काऽऽऽशऽ........"कालच डब्ल्युडब्ल्युडब्ल्युडॉटमायबोलीडॉटकॉम वर ज्येष्ठ विचारवंत ह.भ.प. लिम्बुटिम्बुमहाराज यांचा फलज्योतिष अचुक असते असे मत व्यक्त करणारा परिच्छेद लिहून आला आहे. ह.भ.प. लिम्बूटिम्बुमहाराज हे अभ्यासू ज्योतिषी म्हणून ओळखले जातात." असे संदर्भ कधी कुठल्या वर्तमानपत्रात केव्हा दिले जातील तो सुदिन!
(No subject)
श्री श्री भट यानच्या बद्दल
श्री श्री भट यानच्या बद्दल महिति मिलेल क?
माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा
माझ्या माहितीप्रमाणे त्यांचा पत्ता हा ३/६ एव्हरेस्ट सोसा. प. दिनदयाळ मार्ग डोंबिवली (प) ठाणे असा आहे.
त्यांनी महाराष्ट्र ज्योतिष परिषद अशी संस्था काढली आहे. ते बरेच ज्येष्ठ ज्योतिषी आहेत.
श्री श्री भट yancha add. or
श्री श्री भट yancha add. or phone no. milel ka?
thank you so much prakash sir
thank you so much prakash sir
Pages