पत्रिकेवरुन स्त्री कि पुरुष?

Submitted by प्रकाश घाटपांडे on 17 October, 2013 - 10:11

पत्रिकेवरुन व्यक्ती स्री की पुरुष ओळखा, जिवंत कि मृत ओळखा हे आव्हान डॉ अब्राहम कोवूर या भारतात जन्मलेल्या व श्रीलंकेत स्थायिक असलेल्या बुद्धीप्रामाण्यवादी चळवळीचा जनक असलेल्या माणसाने जगभरात जाहीर दिले होते.अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तीच परंपरा आजही पुढे चालू ठेवली आहे.आज ते आव्हान २१ लाखांचे आहे.अजून कोणत्याही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नाही.काही ज्योतिषांना हे आव्हान स्वीकारता येत नाही याची खंत आहे. ज्येष्ठ ज्योतिषी श्री श्री भट पत्रिकेवरुन स्त्री कि पुरुष या बद्दल आपल्या ज्योतिषाच्या गाभार्‍यात या पुस्तकात याबाबत म्हणतात," खरे तर ज्योतिषाची शास्त्रीयता सिद्ध करुन देण्यासाठी आणखी आकडेवारी जमा करण्याची किंवा आव्हाने स्वीकारण्याची गरजच उरली नाही.१० पत्रिका देउन त्यातले मुलगा की मुलगी सांगा असा प्रश्न विचारला जातो.' भारतीय ज्योतिष' या हिंदी पुस्तकात या विषयी एक नियम आहे.त्यात थोडा बदल करुन एक नियम प्रचलित आहे तो मुलुंडचे श्री नाडगौडा यांनी कळवला आहे तो असा:-

जन्मलग्न,जन्मकालीन गुरु,सूर्य व राहू यांच्या राशींची बेरीज करावी. त्याला तीनाने भागावे; बाकी शून्य किंवा एक उरला तर पत्रिका मुलाची असते.दोन उरले तर स्त्री ची असते." त्यांनी उदाहरण म्हणुन इंदिरा गांधी व संजय गांधी यांच्या पत्रिकेचा ताळ्यासाठी वापर केला आहे.इंदिरा गांधी:- जन्मवेळेस कर्क लग्न + वृश्चिक रवी+ धनु राहू+ वृषभ गुरु महणजे 4+8+9+2=23 23/3 =7 व बाकी 2 उरली म्हणुन स्त्री. संजय गांधी:- मकर लग्न+ वृश्चिक रवी+ धनु राहू + तुला गुरु म्हणजे 10+8+2+7=27 27/3 = 9 बाकी 0. या नियमाची प्रचीती 60 टक्क्याहून अधिक येते असे म्हटले आहे. या नियमांची छाननी करायची झाली तर पुढे पळवाट सुद्धा आहे. ते म्हणतात," लग्न व रव्यादि ग्रह राशी संधीवर असताना नियम लागू पडत नाही म्हणुन बहुधा प्रमाण कमी पडते."
वस्तुत: संख्याशास्त्रीय दृष्ट्या यदृच्छेने स्त्री का पुरुष हे ओळखण्याचे प्रमाण ५० टक्के आहे. त्यासाठी ज्योतिषाची गरज नाही.भटांनी दाखवलेला नियम हा तपासायचा झाल्यास 'संधी' ची पळवाट आहे, भट म्हणतात कि या नियमाची प्रचीती ६० टक्क्याहून अधिक येते तर त्यांनी काही असा प्रयोग केला आहे का? ज्याची आकडे वारी उपलब्ध आहे का?. २००८ मधे झालेल्या आमच्या फलज्योतिष चाचणीचे वेळी देखील भटांनी चाचणीतील संख्याशास्त्र विभागाचे प्राध्यापक सुधाकर कुंटे यांना भेटून या चाचणीचा पडताळा घ्या असे सांगितले होते. कुंटे सरांनी चाचणीतील डेटा ला तो नियम लावून पाहिला होता. पण त्याचे प्रमाण ५० टक्क्यापेक्षा अधिक आढळून आले नाही. हा चाचणीचा अधिकृत भाग नसल्याने तो प्रसिद्ध केला नाही.अथवा त्याची वाच्यता ही झाली नाही.आमच्या खाजगी बैठकीत मात्र याची चर्चा झाली होती.दुर्देवाने कुंटे सरांचे अकाली निधन झाले व तो विषय तिथेच थांबला. इतर ज्योतिषांना देखील भटांचा हा नियम चाचणीसाठी वापरावा असे वाटत नाही. कारण त्याला सार्वत्रिक ज्योतिष मान्यता नाही.फलज्योतिषाला विज्ञानाच्या चौकटीत बसवण्याचा आग्रह हा इतर ज्योतिषांना पसंत नाही.
( ब्लॉगवर पूर्व प्रकाशित)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पत्रिकेवरुन व्यक्ती स्री की पुरुष ओळखा, जिवंत कि मृत ओळखा हे आव्हान डॉ अब्राहम कोवूर या भारतात जन्मलेल्या व श्रीलंकेत स्थायिक असलेल्या बुद्धीप्रामाण्यवादी चळवळीचा जनक असलेल्या माणसाने जगभरात जाहीर दिले होते.अंधश्रद्धा निर्मुलन समितीने तीच परंपरा आजही पुढे चालू ठेवली आहे.आज ते आव्हान २१ लाखांचे आहे.अजून कोणत्याही ज्योतिषाने हे आव्हान स्वीकारले नाही.काही ज्योतिषांना हे आव्हान स्वीकारता येत नाही याची खंत आहे.

जर कोणी अनिसचे कार्यकर्ते असतील तर त्यांनी महाराष्ट्र ज्योतिष परिषद आणि अनिस यांच्यातला पत्रव्यवहार उघड करावा. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेने हे आव्हान काही वर्षांपुर्वी काही अटी घालुन स्विकारले आहे.

या अटींवर अनिस ने गुळणी धरली आहे.

वाद विवाद करण्याची ही जागाही नाही आणि धागा ही नाही.

आजही हे आव्हान खुले आहे.मुळात असे स्त्री की पुरुष, जिवंत की मृत या गोष्टी ज्योतिषाधारे आजतरी सांगता येत नाही हे उघड व ढळढळीत सत्य आहे. याची जाणीव सूज्ञ ज्योतिषांना ही आहे. जर उद्या तसे सांगता येते हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झाले तर आम्ही भुमिकेत बदल करु.

>>> त्यांचा फोन नं ही मिळाला आहे हा घ्या 9320719190<<<<

प्रकाशजी, हे जर पब्लीक रेकॉर्ड असेल तर म्हणजे हा नंबर आधिच जाहीररित्या प्रकाशित केला गेला असेल तर ठीक पण हा नंबर खासगी ठेवला असेल व काही निवड्क लोकांनाच दिला जात असेल तर मात्र काही चूक आहे.

तुम्हाला तो नंबर कदाचित साक्षात श्री श्री. श्री, भटांनीच दिला असेल असे असले तरी केवळ तुम्हाला तो नंबर माहीती आहे म्हणून फोनधारकाच्या परवानगी शिवाय तो जाहीर करणे, हे एखाद्याच्या खासगी गोष्टि उघड केल्या सारखे आहे, भारतात हे चालते, लोक तेव्ह्ढे गांभिर्याने घेत नाहीत ,कायदेकानूही तेव्हढे सक्षम नाहीत पण परदेशात असे कृत्य हा एक दखलपात्र गुन्हा होऊ शकतो. (ईमेल अ‍ॅड्रेस, रहिवासाचा पत्ता, अशा वरकरणी साध्या वाटणार्‍या गोष्टीही यात मोडतात).

सुहास जी ही माहिती जाहिर आहे. धनुर्धारी मासिकात त्यांच्या लेखाखाली त्यांचे नाव पत्ता फोन नं ही माहिती प्रत्येक वेळी दिली असते.
व्यक्तिगत मी स्वतः पारदर्शी आहे, माझी माहिती ही जाहीर असते. त्याचा अद्याप मला त्रास झाला नाही उलट उपयोगच झाला आहे. अर्थात मी तसा आहे म्हणुन इतरांनीही तसे असले पाहिजे असे अजिबात नाही.
भारतात जनहितार्थ एखाद्याची तथाकथित खाजगी माहिती सर्रास उघड केली जाते.माहितीचा दुरुपयोग वा सदुपयोग वा निरोपयोग हे आपल्या सदसदविवेकबुद्धीवर अवलंबून असते.
एखाद्या ची माहिति लोकांपर्यंत पोहोचणे कधी कधी त्या व्यक्तीला हवच असत इतरांनाच त्याच्या प्रायवसीचा भंग झाल्याचा त्रास होतो. संवादोत्सुक व सुसंवादी माणसे त्याचा बाउ करत नाहीत असे माझे निरिक्षण आहे.

>>>सुहास जी ही माहिती जाहिर आहे. धनुर्धारी मासिकात त्यांच्या लेखाखाली त्यांचे नाव पत्ता फोन नं ही माहिती प्रत्येक वेळी दिली असते.<<<

प्रकाशजी तुम्ही म्हणता तशी ही माहीती आधि पासूनच जाहीर (पब्लीक) असेल तर काही हरकत नाही, आणि तसे डिसक्लेमर मी माझ्या पोस्ट्च्या पहिल्याच वाक्यात टाकले होते.

खासगी माहीती उघड झाली तर या माहीतीचा कोण कसा दुरुपयोग करेल आणि कोणाला कसा व काय त्रास होऊ शकेल हे सांगता येणार नाही. ,आपण ते ठरवू शकत नाही . टेली मार्केटिंग वाले हा असा दुरुपयोग करतात हा आपला सर्वांचा रोजचा अनुभव आहे, 'गुगल' सारखी प्रतिष्ठीत (?) संस्था आपल्या 'सर्च' या खासगी गोष्टीचा किती चुकीच्या मार्गाने उपयोग करत आहे हे ही आपण पाहतो अनुभवतो आहोतच,

तेव्हा लोकांच्या सदसदविवेकबुद्धी वर न विसंबता होता होईतो आपल्या खासगी माहीतीचे संरक्षण करणे हिताचे आणि हे करताना कळतनकळत आपण दुसर्‍याची खासगी माहीती उघड करु नये हे ही ओघानेच आले.

मी परदेशात बरिच वर्षे वास्तव्य केले. आहे आणि 'आयडेंटीटी थेफ़्ट' या गंभिर गुन्ह्याची तयारी अशी खासगी माहीती गोळा करण्यातून होते हे मी बघितले आहे.

बाकि कोणाची माहीती उघड करायची , मुळात हेकृत्य माहीती उघड करणे असे आहे का , त्या व्यक्तीला ते हवेच होते इ. अंगाने आपण जे काही लिहले आहे ते आपले मत आहे, त्याबद्दल मला काही आक्षेप नाही, ते तुम्ही आणि ती संबघित व्यक्ती जाणे.

आपला अनुभव चांगला असेल पण सगळ्यांनाच चांगला अनुभव येईल असे नाही, आपल्या हातून कळत नकळत असे काही होऊ शकते आणी कदाचित त्याचे गंभिर परिणाम होऊ शकतात हे बर्‍याच जणांना माहीती नसते असा माझा अनुभव आहे म्हणून हा पंक्तीप्रपंच , आपल्याला दुखावण्याचा , टोचण्याचा हेतू नव्हता.

मला वाटते हा विषय आपण ईथेच थांबवूया , नाही तर व्हायचे काय मूळ चर्चेचा विषय बाजूला पडायचा आणी याच्यावरच रणधुमाळी !

तर मंड्ळी चर्चा पुढे चालू ठेऊया,विषय आहे: जन्मपत्रिके वरून स्त्री का पुरुष?

वरील चर्चेत फक्त स्त्री लिंग व पुरुष लिंग याचाच विचार केला आहे. तृतीयपंथी चा विचार केला नाही. नुकतेच एका ज्योतिष विषयक दिवाळी अंकात पत्रिकेवरुन तृतीयपंथी पण सांगता येतो असे अनुभवासकट एका ज्योतिषाने सांगितले आहे.

धागा वरती आणण्यासाठी ही प्रतिक्रिया
किती सर्वसामान्य लोकांना अस वाटत की खर्‍या ज्योतिषाला पत्रिकेवरुन स्त्री की पुरुष, जिवंत की मृत हे सांगता यायला हवे?

>>> किती सर्वसामान्य लोकांना अस वाटत की खर्‍या ज्योतिषाला पत्रिकेवरुन स्त्री की पुरुष, जिवंत की मृत हे सांगता यायला हवे? <<<<
माफ करा प्रकाशराव, पण मी एक ज्योतिषी म्हणून माझ्याकडे, स्वतःची /पोराबाळांची/बायकोची वगैरे कुंडली दाखवायला येणार्या लोकांना ते स्वतः/पोरेबाळे/बायको हे सर्व स्त्री की पुरुष, जिवंतहेत की मेलेत असे प्रश्न "ज्योतिषाकडून" कुंडलीद्वारे सोडवुन घ्यावेसे वाटत नाहीत, की नाही त्यांचे/त्यांच्या पोराबाळांचे/त्यांच्या बायकोचे लिंग काय आहे अन ते जिवंत आहेत की मेलेलेत हे कुंडलीवरुन जाणुन घ्यायची गरज पडत... , आजवर तरी असा अनुभव सामान्य लोकांकडून नाही आलाय. Proud

तशा प्रकारची आव्हाने देण्याची (बे)अक्कल फक्त अन्निस/बुप्रा वाल्यांचीच असू श़कते.... Wink
हां, आता "माझे पती सौभाग्यवती" वगैरे टाईपच्या सेरियल्स जास्त बघण्यात आल्या असल्यास कुणा सोमागोम्यालाही हा प्रश्न पडू शकतो हे मला मान्य बर्का.... Happy Wink

किती दिवस धागा वर ठेवणे अपेक्षित आहे तुम्हाला? Happy

प्रकाशजी, प्रश्न फार ट्रीकी आहे. ट्रीकी म्हणजे खवचट, खोडसाळ ह्या अर्थी.

सामान्य लोकांना म्हणजे कोणाला? त्यांच्या वाटण्याने नक्की काय सिद्ध होईल? समजा ९० टक्के लोकांना असं वाटलं की जोतिषाला सांगता यायला पाहिजे तर पुढे काय?

कुंडलीवरुन स्त्रीपुरूष-जीवंतमृत सांगणे तेवढेच निरर्थक आहे जेवढे मार्कशीटवरुन कोणत्या कंपनीत नोकरी मिळेल हे सांगणे. बाकी ज्यांचे प्रश्न जेन्युइन असतात त्यांना उत्तरे मिळतात. परिक्षा पाहू जाता फळ मिळणे नाही.

कापोच्या कुणाची नाही, पण काल्/आजचि गोचर प्रश्न कुंडली असावी, सायंकाळचे ५ ते ६.३० ही वेळ दिली असावी.

ते चंद्र मंगळ शनि एकत्र आहेत ना, चंद्र जाईल हो पुढे, पण शनिमंगळ पुढले पाच/सहा महिने गोंधळ घालणार आहेत असे मेदिनीय ज्योतिषी म्हणताहेत.
बदल, अनपेक्षित बदल, दीर्घकालीन परिणाम करणारे बदल , उद्याच्या दूरगामी बदलांचा पाया रचणारे बदल....... मग ते राष्ट्राच्या द्रुष्टीने असो वा व्यक्तिच्या.... काही ना काही ठोस महत्वाच्या घटाना अनुभवास याव्यात असे हे ग्रहमान आहे.

किती सर्वसामान्य लोकांना अस वाटत की खर्‍या ज्योतिषाला पत्रिकेवरुन स्त्री की पुरुष, जिवंत की मृत हे सांगता यायला हवे?

मला तरी असं वाटत नाही. हे सांगता येत नाही म्हणजे तुमचे ज्योतिष्यशास्त्र झुटे असे वाटत नाही.
मूळ ज्योतिष्यशास्त्राची विशेष माहिती नाही. ते नक्की काय आहे हे जाणुन घेण्याची उत्सुक्ता मात्र आहे. मग ते खरे असो अथवा थोतांड.

देशाची कुंडली पण असते काय?
म्हणजे बनवता येते का? त्यावरुन देशाचं भविष्य - होणार्‍या मुख्य उलाढाली वगैरे सांगता येतील का?

कापोच्या कुणाची नाही, पण काल्/आजचि गोचर प्रश्न कुंडली असावी, सायंकाळचे ५ ते ६.३० ही वेळ दिली असावी. >>> गोचर प्रश्न कुंडली हे काही कळाले नाही. या पत्रिकेसोबत आणखी काही हवे असल्यास ते देईन. ज्या व्यक्तीची कुंडली आहे तिला मी ओळखतो. (व्यक्ती हे लिंगनिरपेक्ष समजावे :फिदी:).

यावरून काय काय सांगता येतं एव्हढंच जाणून घ्यायचं आहे.

साधारण पणे १९६० सालाच्या आसपास ऑगस्ट महिन्यात जन्माला आलेल्या व्यक्तीची ही कुंडली आहे. ( साल चुकेल पण ऑगस्ट महिना चुकणार नाही हे सांगायला ज्योतिषाची आवश्यकता नाही असे घाटपांडे म्हणतील परंतु अंशात्मक पत्रीकेशिवाय जन्मतारिख आणि साल वर्तवता येत नाही ) स्वभावाने बहुदा तापट असावी. तुळ लग्नामुळे तापट असली तरी संयमी असावी. लग्नातील नेपच्युन आणि केतु यामुळे व्यक्तीमत्व गुढपणाकडे झुकते आहे. पुरुषाची पत्रीका असावी असा कयास आहे.

या व्यक्तीने बँक किंवा तत्सम आर्थीक उलाढाली होतात अश्या ठिकाणी आयुष्यभर नोकरी करुन व्यावसायीक उंची गाठली असावी. कर्केचा गुरु फसवा असतो त्यामुळे नोकरी संदर्भातले विधान चुकुही शकते.

सुर्य - शुक संयोगाने नाटकात काम करणे इ आवड असावी.

सप्तमातला राहु, सप्तमेश मंगळ तोही केतु आणि नेपच्युन याच्या योगात शिवाय शुक्र रवि, हर्षल च्या सानिध्यात यामुळे वैवाहीक जीवन फारसे सुखदायी नसावे. ह्या व्यक्तीच्या आयुष्यात अनेक स्त्रीया आल्या असाव्यात ( किंवा स्त्री असल्यास पुरुष ) हा पुरुष असल्यास याने अनेक भाबड्या स्त्रीयांना आपल्या नादी लावले असे म्हणले तर वावगे ठरु नये. महादशा अंतर्दशा नसल्यामुळे नेमके सांगता येणार नाही.

आयुष्यात अनेक शत्रुंचा सामना करुन त्यांना भुईसपाट करण्याचे कर्तुत्व ह्या व्यक्तीच्या ठायी आहे/होते. साम- दाम- सर्व मार्गाने इप्सीत साध्य करण्याची कला ह्या व्यक्तीकडे उपजत आहे.

सांगा काय बरोबर आहे ? ही व्यक्ती अस्तीत्वातच नाही असही कोणी म्हणेल. हाच मुद्दा महाराष्ट्र ज्योतिष परीषदेने लाऊन घरला होता. ज्योतीष शास्त्र नाही असे म्हणणार्‍या काही व्यक्ती आणि संस्था यांच्याशी महाराष्ट्र ज्योतिष परीषदेने काही अटींवर ( व्यक्ती हयात आहे किंवा नाही हा दावा ) स्विकारला होता.

ह्या संबंधीचा पत्रव्यवहार मज्योप च्या डोंबिवली कार्यालयात उपलब्ध आहे. ह्या अटी त्या व्यक्तींला/ संस्थेला मान्य होत्या किंवा नव्हत्या ह्याचा खुलासा कधीच झाला नाही.

खर तर मानव पृथ्वीकर असे नाव खरे आहे किंवा नाही ह्याचा शोध घेतल्या शिवाय ह्या पत्रीकेला आणि विषयाला हात घालायचा नव्हता. पण बोलकी पत्रीका समोर आल्यावर गप्प बसणे जमत नाही. बरेच वेळेला भविष्य चुकु शकते यामुळे फार झाल तर माझी बदनामी होईल. पण यामुळे ज्याला भविष्याबाबत प्रश्न आहे असा जातक ज्योतिषाकडे जायचे बंद करणार नाही याची खात्री आहे.

नितिनचंद्र, धन्यवाद!
ऑगस्ट महिना, पुरुष, तापट परंतु संयमी स्वभाव, हे बरोबर आहे.
बाकी सगळी गंमत आहे.

सर्वसामान्य याचा अर्थ जे ज्योतिषी नाहीत वा ज्यांना ज्योतिषशास्त्रा विषयी फारसे माहित नाही असे लोक.ते जातक असतीलच असे नाही.
लिंबूटिंबू याच धाग्यात राजपूर यांनी वर प्रतिक्रिया दिली आहे ती आपण वाचली असेलच. या प्रश्नाची जातकाला गरज वाटत नाही हा मुद्दा वेगळा आहे. या गोष्टींचा उहापोह मी माझ्या ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातून सुसंवाद या पुस्तकात केला आहेच.आपण ज्योतिषी वा ज्योतिष अभ्यासक या नात्याने सांगा की असे सांगता येते की नाही?
>>कुंडलीवरुन स्त्रीपुरूष-जीवंतमृत सांगणे तेवढेच निरर्थक आहे जेवढे मार्कशीटवरुन कोणत्या कंपनीत नोकरी मिळेल हे सांगणे.<<
नानाकळा आपली तुलना समर्पक वाटत नाही. समजा मार्कशीटवरुन कोणत्या कंपनीत नोकरी मिळेल या प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास असे सांगता येत नाही असे देता येते.तसे कुंडली वरुन स्त्री पुरुष जिवंत मृत असे सांगता येते की नाही? येत असल्या हो सांगावे येत नसल्यास नाही सांगावे. असे सांगता यावयास हवे असे वाटत असल्यास तसे म्हणावे.

हा धागा वर काढण्याचे कारण जनमानस सातत्याने चाचपणे हा आहे. ज्यांनी माझी पुस्तके वा आंतरजालावरील लेखन वाचले असेल त्यांच्या हे लक्षात येईल की यात डिवचण्याचा हेतु नाही.कारण हा प्रश्न आव्हान व आवाहन या दोन्ही स्वरुपात गेली कित्येक दशके अस्तित्वात आहे.
मी फलज्योतिषाच्या अभ्यासाच्या नादात कॉलेजचे एक वर्ष वाया घालवले आहे.माझा वैयक्तिक ज्योतिष विषयावरील ग्रंथसंग्रह आहे. त्यात अनेक दुर्मिळ पुस्तके आहेत.
धागा वर काढण्याचा दुसरा हेतु असा की असंख्य धागे वेगाने पुढे सरकत असतात तसेच अनेक मंडळी नव्याने वाचक वा धागालेखक झालेली असतात, होत असतात. त्यांना मागील सर्व धागे वाचणे व्यावहारिकदृष्ट्याही शक्य नसते. त्यांच्या साठी हा विषय नव्याने असतो.ते कदाचित प्रतिक्रियांची भर टाकू शकतात.
कापोचे, आपल्या प्रश्नाचे लिंबुटिंबू यानी योग्य दिले आहे.
या विषयात उत्सुकता असलेल्यांनी माझ्या फलज्योतिष चिकित्सा मंडळ या ब्लॉगला जरुर भेट द्यावी

र.का.ने: मानव पृथ्वीकर हे टोपण नाव आहे. आवडीचे म्हणुन घेतलेले.

तूर्तास येणार्‍या प्रतिसांदांवर टिपणी करणार नाही, अजून प्रतिसाद येणार असतील तर त्यावर परिणाम नको म्हणुन.

मानव,

आपण ही व्यक्ती अस्तीत्वात आहात असे म्हणत आहात. धन्यवाद !

बाकी सगळी गंमत आहे म्हणायला आपण यांना ओळखता का ? असेल तर काय चुकले हे सांगा.

१) बँक किंवा तत्सम ठिकाणी नोकरी.

२) वैवाहीक जीवन फारसे सुखावह नाही.

३) ही व्यक्ती पुरुष असण्याची शक्यता जास्त.

४) नाटकात काम करण्याची किंवा नाटक आवडणे / अभिनय आवडणे.

५) शत्रुला भुईसपाट करण्याची कला

वरील पाच पैकी काय चुक आणि बरोबर ते सांगावे. शक्य असल्यास ह्या व्यक्तीचे नाव न जाहीर करता दुसर्‍या मायबोलीकराने यावर लिहावे. आव्हान करता तर मला ही परिक्षेचा रिझल्ट कळू द्या.

केवळ ज्योतिष शास्त्र नाही ह्या अशास्त्रीय गृहीतकावर अनेकांना वेठीस धरु नका.

प्रकाश घाटपांडेसाहेब,

कै. डॉ भा नी पुरंदरे ( जगभरात नावाजलेले गायनीक ) यांचे शल्य कौशल्य या आत्मचरित्रावर आपले काय म्हणणे आहे ? त्यांनी आपल्या आत्मचरीत्रातली पाच पाने ज्योतिष विषयाला दिलेली आहेत.

जगापुढे न आलेले सत्य ही सांगतो. कै. यशवंतराव चव्हाण यांना या विषयात रुची होती. पुण्यातील एका जेष्ठ ज्योतिषाने खाजगीत उलगडा केला ज्यांचे वडील मोठे नावाजलेले ज्योतिषी होते. जननिंदा नको किंवा तथाकथीत पुरोगाम्यांच्या बैठकीत जाता यावे म्हणुन कै यशवंतराव या ज्योतिषांकडे चर्चेला रात्री १२ नंतर जात.

भा मी पुरंदरे यांच्या मतावर एक प्रश्न माझ्या पुस्तकात घेतला आहे. उपक्रमची लिंक गंडली असल्याने देता येत नाही.
यशवंतराव चव्हाण उत्सुकते पोटी जात ही असतील.माणूस आहे शेवटी उत्सुकता असणारच ना! ज्योतिषाकडे गेले म्हणून त्यांच्या कर्तृत्वाला बाधा येत नाही.आता काही कडवे अश्रद्ध पुरोगामींना ही बाब प्रतिगामी असा शिक्का यशवंतरावांवर मारायला पुरेशी वाटते हे खर आहे.पण त्यांच्या सर्टिफिकेट ची यशवंतरावांना गरज नाही. पुरोगामी लोकापवाद नको असे व्यावहारिक भूमिका ते घेत असतील. बहुसंख्य लोकांना कृष्ण धवल द्वैतात जग दिसत असते.

प्रकाशजी,

मला यशवंतराव चव्हाणसाहेबांबद्दल आदर आहेच. मी चर्चा करत होतो ते चव्हाण साहेब यांच्या व्यासंगाबाबत. ओघाने चर्चा त्यांच्या कुंडलीबाबत होत असेलच. पण त्यांना ह्या विषयात रुची फक्त जातक ( प्रश्नकर्ता ) म्हणुन नाही तर एकंदरीतच कसा अभ्यास करतात याबाबत होती.

Pages