Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 10 October, 2013 - 22:56
भेटलो इथे न भेटणार ह्यापुढे
आठवण तुझी समेटणार ह्यापुढे
ओळखू नये जुन्या जगातल्या कुणी
वल्कले नवी लपेटणार ह्यापुढे
टाळतोय गुदगुल्या तुला न स्पर्शिता
स्वप्नरंजनात खेटणार ह्यापुढे
घाम फार पाहिला उन्हामधे चिते
पावसामधेच पेटणार ह्यापुढे
ऐकवून बोल अडकलो जगा तुझे
आपलेच शब्द रेटणार ह्यापुढे
--डॉ .कैलास गायकवाड
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऐकवून बोल अडकलो जगा
ऐकवून बोल अडकलो जगा तुझे
आपलेच शब्द रेटणार या पुढे हे मस्त
ओळखू नये जुन्या जगातल्या
ओळखू नये जुन्या जगातल्या कुणी
वल्कले नवी लपेटणार या पुढे<<<
वा.
वेगळे खयाल!!
ऐकवून बोल अडकलो जगा
ऐकवून बोल अडकलो जगा तुझे
आपलेच शब्द रेटणार या पुढे
व्वा.
वेगळ्या खयालांबद्दल बेफिंशी सहमत.
धन्यवाद सर्वांचे... जुने जग
धन्यवाद सर्वांचे...
जुने जग आणि नवी वल्कले यातला भाव पोचेल की नाही या बाबत साशंक होतो. पण बेफिकीर आणि विदिपा...आपणा दोघांचे प्रतिसाद सेज इट ऑल.
मनःपूर्वक आभार.
(No subject)
सो सॉरी. करेक्टेड इट.
सो सॉरी. करेक्टेड इट.
गझल आवडली.
गझल आवडली.
आवडली
आवडली
खुप छान !
खुप छान !
दुसरा आणि पाचवा शेर सर्वात
दुसरा आणि पाचवा शेर सर्वात विशेष वाटले.
सगळे शेर मस्त
सगळे शेर मस्त
ऐकवून बोल अडकलो जगा
ऐकवून बोल अडकलो जगा तुझे
आपलेच शब्द रेटणार यापुढे....
क्या बात है..
रेटणार शेर फार आवडला!
रेटणार शेर फार आवडला!
ओळखू नये जुन्या जगातल्या
ओळखू नये जुन्या जगातल्या कुणी
वल्कले नवी लपेटणार या पुढे
सुरेख !
छान गझल .
ओळखू नये जुन्या जगातल्या
ओळखू नये जुन्या जगातल्या कुणी
वल्कले नवी लपेटणार या पुढे
व्वाह !
फेसबुकवर वाचली होती.........
फेसबुकवर वाचली होती......... तेव्हा लिहिता आले नाही..
एक शंका आहे.. चॅटवर बोलू.
ओळखू नये जुन्या जगातल्या
ओळखू नये जुन्या जगातल्या कुणी
वल्कले नवी लपेटणार ह्यापुढे ==> सुंदर….टायटल शेर खूपच झकास.
ऐकवून बोल अडकलो जगा तुझे
आपलेच शब्द रेटणार ह्यापुढे ==> क्या बात है…
गझल मस्तच आहे.
शुभेच्छा.