तो अन ती ... संभाषण (लघु कथा)

Submitted by मी मी on 14 October, 2013 - 03:57

ती: कित्ती बोलतो ना आपण

तो: किती ?

ती: कित्तेक दिवस काहीच नाही आणि
कधी कधी कित्ती किती…

तो: ह्म्म्म …

ती: कित्ती वेळ, कित्ती विषय
कित्तेक विषयांचे कित्तेक तंतू
किती ज्ञान, किती विचार
किती शब्द, किती बोल
कित्तेक भावना
किती गाठी, किती गुंता
अश्या उकलून समोर मांडल्या असतील आपण

हो ना …

तो: खरंय

ती: पण का रे …

तो: का ?

ती: कदाचित एकमेकांना पूर्ण करायला
कि मग
स्वतःचंच अपूर्णत्व बाहेर काढायला ..

इतकं बोलण्याची ओढ का दाटून येत असावी रे?

तो: का ?

ती: कित्तीही बोललो तरीही हे बोलणं हे नातं कधीच संपणार नाहीये
या विश्वासापोटी…. कदाचित
किंवा मग …
हे असं सगळं कधीतरी संपुष्टात येणारच आहे
तेव्हा हीच वेळ आपली …. फक्त आत्ताच
बोलून घेऊया हवं तेवढं … म्हणून?

तो: असेलही ….

ती: भीती मोठी कि विश्वास रे ?

तो: (एक सुस्कारा) वेडे ......न भीती मोठी न विश्वास !!

परिस्थिती मोठी गं ……

नेईल तिथे जायचं मुकाट्याने ….
काहीही न बोलता …. न विचारता !!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या घर चे संवाद
ती:मला सामान भरायचय, पिल्लु चे अ‍ॅडमिशन आहे अजुन, भाजी निवडायचे आहे , बिल पेमेंट रिसिट शोधायची ये
, आजचा दिवस कसा गेला तुझा , पिल्ले ने आज खुप त्रास दिला
काहि तरी बोल ना
................ ए बोल की
मी तुला खुप त्रास देते का?
तो:ह्म्म्म
ति :काय.....................?
तो : नाही तु काय बोलत होतिस
ती : Uhoh

आमच्याकडचे संवाद :

ती : ब्लाह ब्ला ब्ला ब्लाह ब्ला ब्ला ब्लाह ब्ला ब्ला ब्लाह ब्ला ब्ला ब्लाह ब्ला ब्ला ब्लाह ब्ला ब्ला .... (अजून "ब्लाह ब्ला ब्ला" स्वताच्या सोयीनुसार कॉपीपस्ट करून घ्या) ....

(हे एवढे संपल्यावर... पुन्हा तीच...)

ती : अभिषेक, मी एकटीच बोलतेय का इथे?

मी : अं.. माझ्याशी बोलतेयस..

ती : अरे इथे कोण दुसरा आहे का?, मला वेड लागलेय का स्वताशीच बडबडायला?

मी : अरे पण मग माझे नाव घे ना आधी, माझे लक्ष आहे की नाही हे कन्फर्म झाल्यावर बोल ना, मी माझ्या तंद्रीत होतो.. काय ते आता बोल परत...

ती : काही नाही आता..

मी : ठिक आहे, महत्वाचे नव्हते तर मग राहू दे..

(यानंतर थोडीशी आदळाआपट, काय कश्याची ते विचारू नका, मी सवयीने दुर्लक्ष करत लॅपटॉप घेऊन पुन्हा माझ्याच कामात मग्न... अन पुन्हा एकदा....... तीच)

ती : आयुष्यात कधीतरी मी बोललेले तू पहिल्याच फटक्यात ऐकलेस असे होणार आहे का?

मी : अं.. काय? काय म्हणालीस??

(पुन्हा आदळाआपट, पण यावेळी ती बेडरूमचे दार आपटून बाहेर.. एपिसोड फिनिश..)

चालायचंच.. Happy