वाहने आली, मनुष्याची चालण्या, धावण्याची क्षमता कमी झाली.
टंकलेखन सुरु झाले, हाताने धड चार पाने सरळपणे लिहु शकत नाही माणुस, चारदा मध्येच बोटे मोडेल दुखतात पंजे म्हणुन.
कानात सतत इयर पीस ठुसुन फोन आणि गाणी ऐकत राहिल्यामुळे ऐकण्याची क्षमता कमी झाली.
कॅलक्युलेटर वापरायची तर ईतकी संवय झाली आहे मनुष्याला कि साधी रोजच्या व्यवहारातली गणितंही सर्रास "कॅलसी", वर चालतात.
मोबाईल फोन्स आणि कंम्प्युटर मुळे पुष्कळ गोष्टी स्मरणात ठेवण्याच्या भानगडित मनुष्य पडतच नाही. स्मरणशक्ति बोथट होत चालली आहे.
दिवसातुन जवळ जवळ ९तास नुसती स्क्रीन्स ( मोबाईल वा कंम्प्युटरची ) पाहाण्यातच जात असल्याने डोळ्यांची अवस्था गडबडली. चष्मे लवकर लागायला लागलेत.
अश्या पुष्कळश्या गोष्टी आहेत जिथे मनुष्याची शारिरीक क्षमता हळु हळु कमि होत चाललेली दिसते.
आता तो दिवस अंधुकसा डोळ्यांपुढे येतो जेव्हा मनुष्याची सर्व कामे त्याचे पर्सनल कंम्प्युटर करत असणार आणि हे महाशय जवळ जवळ नि:सहाय अवस्थेस पोहोचले असतील.
हे बरोबर आहे का ?
एकच बोट स्क्रीन वापरायला (असं
एकच बोट स्क्रीन वापरायला (असं लेखकाचं मत होतं). बाकी तुम्ही काय विचार करता ते तुमच्यावर अवलंबुन आहे.
(No subject)
सगळ्यांची आडनावं एकबोटे पडतील
सगळ्यांची आडनावं एकबोटे पडतील मग...
सगळ्यांची आडनावं एकबोटे पडतील
सगळ्यांची आडनावं एकबोटे पडतील मग... >> आडनावावरुन तरी जातीयवाद पेटणार नाही (अशी आशा)
आडनावावरुन तरी जातीयवाद
आडनावावरुन तरी जातीयवाद पेटणार नाही (अशी आशा)
> > >
आडनांव कशाला ? असले रिकामे वाद सुरु करायला आपल्या माबो वर भरपूर टवाळ आहेत,
सर्व तेच आपल्याआपण लावतात असो.
आधुनिकी करणाने फायदे आणि नुकसान कसे व कोणत्या दूर दृष्टीने होऊ शकते हा ह्या धाग्याचा मूळ मुद्दा,
आता डार्विनची थेरं ( थिअरीज ), मला पटत नाहित. नवा गडी उभा करा भाऊ !
आम्हाला जर कोणाची मतं पटत नसली तर आम्ही अपमानकारक, अभद्र, अमंगळ, तुच्छ लेखणारी भाषा, वाद वाढवणारी भाषा न वापरता सरळ बोलुन मोकळे होतो.
कारण अश्या भाषा वापरणारे आमच्या खिजगणतित नाहित. त्यांच्या कडे लक्ष द्यायला वेळ नाही फालतु आमच्याकडे.
राजपुर, तुमच्या लेखाचा रोख
राजपुर, तुमच्या लेखाचा रोख गेल्या २०-३० वर्षात विकसित झालेल्या तंत्रज्ञानावर व तांत्रिक वस्तुंच्या वापरावर आहे. पण अजून थोडा विचार केलात तर आढळून येईल की आदिमानवाने आगी कशी लावायची व नियंत्रित करायची (माबोवरील आग लावणे नव्हे, खरीखुरी) ह्याचा शोध लावल्यावर आपले कच्चे मांसभक्षण करण्यासाठी आवश्यक असलेले दात/नखे वगैरे बदलले. वस्त्राच्या/निवार्याच्या नवीन वस्तुंच्या शोधानुसार अंगावरील केस/थंडीपासून संरक्षण करण्यासाठी लागणारी नैसर्गिक क्षमता कमी होत गेली. हे होत आले आहे व होत राहील. घोडे/बैल ह्यांना पाळायला लागल्यापासून चालण्याची/धावण्याची क्षमता कमी होत गेली. नैसर्गिक उत्क्रांतीपासून आपण आता मानवाने गती दिलेल्या उत्क्रांतीकडे गेली हजारो वर्षे झाली वळलेलो आहोत. आता त्या गतीचा वेग/वेळ (अॅक्सलरेशन) वाढते आहे इतकेच.
तर तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे: हो, बरोबर आहे.
>>>
आता डार्विनची थेरं ( थिअरीज ), मला पटत नाहित.>>>
अच्छा असं आहे होय. मग आता तुमची थेअरी सांगा.
ट्ण्या +१. एकदम बैलाच्या
ट्ण्या +१. एकदम बैलाच्या डोळ्यावर नेम.
मोबाईल आणि संगणक वापरु
मोबाईल आणि संगणक वापरु नका.>>>> हे केले तर इथल्या नसत्या उठाठेवी तरी बंद होतील
टण्या छान उत्तर.. म्हणजे
टण्या छान उत्तर.. म्हणजे मुद्देसुद आणि विषयाला धरून..
>>> आता डार्विनची थेरं (
>>>
आता डार्विनची थेरं ( थिअरीज ), मला पटत नाहित.>>>
अच्छा असं आहे होय. मग आता तुमची थेअरी सांगा.>>>>
त्यांची थेअरी दशावताराची आहे.
१. एका मोठ्ठ्या शिंगवाल्या माशाने प्रलया मधून ब्राह्मण मनुला वाचवले
२. सापाची दोरी आणि पर्वताची रवी वापरून समुद्रमंथन करत असताना एका मोठ्ठ्या कासवाने तो पर्वत आपल्या पाठीवर तोलून धरलेला. या मंथना मधून लक्ष्मी, अप्सरा, दारू, कामधेनु, कल्पवृक्ष इत्यादी रत्ने बाहेर आली.
३. एका राक्षसाने पृथ्वीच पळवून नेली. तेव्हा एका डुकराने, त्या राक्षसाबरोबर ढिशुम-ढिशुम करून पृथ्वी आपल्या सुळ्या वर उचलून परत आणली.
४. एक खूप वाईट राजा होता. इतका वाईट की देवांना त्याची भिती वाटू लागली. सिंहाचे डोके आणि माणसाचे शरीर असलेल्या एका जीवाने त्या सो-कोल्ड दुष्ट राजाला ठार मारले.
५ . एक खूप सत्शील आणि चांगला राजा होता. इतका चांगला की देवांना त्याची भिती वाटू लागली. त्याच्या मनात भरवले की यज्ञ कर आणि ब्राह्मणांना दान दे. मग एक बुटका ब्राह्मण तिथे आला आणि त्याने ३ पावले जमीन दान मागितली. पहिल्या दोन पावलात त्याने अख्खी पृथ्वी, स्वर्ग आणि चराचर व्यापून टाकले. आणि तिसरे पाउल त्या चांगल्या राजाच्या डोक्यावर ठेवून त्याला त्याच्या चांगुलपणाबद्दल पाताळात गाडले.
६. अजून एका ब्राह्मणाने मग २१ वेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली.
७. उत्तरेकडून आलेल्या एका आर्य राजाने दक्षिणे कडील एका द्रविड राजाचा पराभव केला.
८. एका मुलाने आपल्या मामाचा खून, सॉरी वध केला. मग आपल्या मानलेल्या बहिणीच्या घरगुती भांडणात त्याने एका बाजूचा विजय होण्यामध्ये मदत केली आणि हे अधोरेखित केले की जी बाजू लढाईत जिंकते तिच बाजू सत्याची असे मानले जाते.
९. आणि १० यामध्ये तज्ञांमधे एकवाक्यता नाही. शास्त्रीय चिकित्सा चालू आहे.
माझ्या एका सनातनी मित्राने
माझ्या एका सनातनी मित्राने हिरीरीने असे मत मांडले की खुद्द डार्विन ने उत्क्रांती वाद आपल्या दशावातारातून शिकला.
१. मत्स्य: पहिले जीवन पाण्यामध्ये सुरु जाहले
२. कुर्म: उभयचर जीव तयार झाले.
३. वराह: जमिनीवर प्राणी तयार झाले
४. नरसिंह: प्राण्यांची माणूस होण्याकडे वाटचाल
५. वामन: बटू माणूस
६. परशुराम: माणूस आयुधे वापरू लागला
७. राम: माणूस समुहात राहू लागला
८. कृष्ण: माणूस पशुपालन करू लागला
९. बलराम: माणूस शेती करू लागला
१० कल्की: माणसाकडे प्रचंड विनाशकारी शक्ती आली
दात न दाखवता हसणे हाही एक
दात न दाखवता हसणे हाही एक आधुनिक शोध आहे.
दात न दाखवता हसणे हाही एक
दात न दाखवता हसणे हाही एक आधुनिक शोध आहे.
>>
अरे बापरे! असे दात न दाखवता हसल्याने दात नष्ट तर नाही ना होणार?
शारिरीक क्षमतां बरोबर बौद्धिक
शारिरीक क्षमतां बरोबर बौद्धिक क्षमता ही पुष्कळच कमि झालेली दिसते आहे.
असो, कालचा गोंधळ बरा होता.
शारिरीक क्षमतां बरोबर बौद्धिक
शारिरीक क्षमतां बरोबर बौद्धिक क्षमता ही पुष्कळच कमि झालेली दिसते आहे. >>>> डार्विनला विचारवं लागेल.
बाकी हे प्रचंड धाडसी विधान आहे.
मला मात्र यामध्ये नक्कीच तथ्य
मला मात्र यामध्ये नक्कीच तथ्य दिसतंय...
जो शरिराचा भाग माणूस वापरत नव्हता तो नाहीसा होत गेला जसे की शेपूट...(शाळेतल्या शिक्षण पद्धती नुसार)
तसाच मेंदूचं कमी वापरला तर त्यातले न्युरोंस कमी होतील... टेक्नॉलॉजी वर जर आपण इतके अवलंबून राहिलो तर एक दिवस आणि एखादी पिढी अशी असेल की प्रत्येक कामाला जर टेक्नॉलॉजी वापरावी लागेल....
मला मात्र एवढी खात्री आहे...आपण टेक्नॉलॉजी मुळे कदाचित तो खूप प्रगती करू..पण निसर्गावर मात आपण कधीच करू शकणार नाही. अरे हिमालयाच्या टोकावरून आपण जर माणसाला पहायचं प्रयत्न केला तर तोही उघड्या डोळ्यांनी दिसत नाही...जर हाच हिमालय उद्या रागावला तर माणूस पुन्हा इतिहासात जमा होईल...असो.
मेंदू कमी वापरला. मेंदू कमी होईल. शारीरिक श्रम नसेल तर स्नायू कमी होतील. डोळ्यांचा नैसर्गिक पदधतीने वापर नसेल तर त्याची नजर कमी होईल. ज्या ज्या गोष्टी आपण वापरणार नाही ते ते कमी होईल आणि एक दिवस नाहीशी होईल आणि याला बराच काळ लागेल...कदाचित अजून हजार एक वर्ष...पण सुरुवात मात्र हळू हळू आपल्यापासून होईल. उदा. आपल्याला जसा एको ऐकताना आवाज कमी कमी होत जातो आणि एक क्षणानंतर तो नाहीसा होतो अगदी तसाच. खूप काही विचार येत आहेत. इथेच थांबतो.