स्विस सहल - भाग ५/१ माऊंट टिटलीस

Submitted by दिनेश. on 8 October, 2013 - 11:51

स्विसमधे भारतीयांच्या पसंतीचे एक ठिकाण म्हणजे माऊंट टिटलीस. इथे घेऊन जाणारा आणि गोलाकार
फिरणारा गोंडोला हे मुख्य आकर्षण. पण हा गोंडोला शेवटच्या टप्प्यातच आहे. आधी आपण ६ आसनी छोट्या
पाळण्यातून वर जातो. तिथे अर्ध्या वाटेत एक रिसॉर्ट आहे.

पुढच्या टप्प्यात ८० व्यक्ती मावतील एवढा चौरस पाळणा आहे आणि शेवटच्या टप्प्यात तो फेमस गोल पाळणा आहे. याचा मधला भाग आणि खिडक्या स्थिर असतात. आपण उभे असतो तेवढाच भाग गोल फिरतो.
पण एक फेरी होईतो आपण मुक्कामी पोहोचलेलो असतो.

तर चला.

नेहमीप्रमाणेच आपला प्रवास सुंदर दृष्यमालिकांनी सुरु होतो

हिरवाई

निळाई

इथून पहिला पाळणा सुरु होतो. फोटोतली जपानी बाई, शेवटपर्यंत माझ्या सोबत होती. एकटीच होती, तिला
गप्पा मारायला कुणीतरी हवेच होते.

पाळण्याने जरा उंची गाठताच आपल्याला सुंदर दॄष्ये दिसू लागतात.

पायथ्याची नदी व पार्किंग लॉटमधल्या बसगाड्या. एकावेळी एवढे पर्यटक वर असतात.

खास भारतीय पाट्या

आधी साधे डोंगर दिसतात

मग बर्फाचे

सुंदर "कोनाडे"

बर्फच बर्फ

आणखी बर्फ

तिथले आईस फ्लायर. पुर्वी हे ३ सीटर्स होते आता ६ सीटर्स आहेत.

त्या आईस फ्लायर मधून

आपले पाय अधांतरी असतात ( तरी ते पाळणे पुर्ण सुरक्षित आहेत. )

माझ्याकडचा कॅमेरा बघून चेकाळलेल्या मुली

हाच तो गोलाकार पाळणा

आपल्याकडे हा आकार असता तर नक्कीच शिवाचा हात गणला गेला असता !

घसरगुंडी... डाव्या कोपर्‍यात जी बाई उभी आहे तिथे खाली टायरमधून घसरायची सोय आहे. टायर म्हणजे
अगदी टायर नाही. त्याला चांगला भक्कम बेस असतो. आपण गिरक्या घेत खाली जातो. ( त्यावेळी कॅमेरा
बांधून ठेवावा लागतो नाहीतर तोंडावर आपटतो. म्हणून तिथला फोटो नाही. ) वर येण्यासाठी मात्र सरकता जिना आहे. आपला टायर आपण वर घेऊन यायचा.

परत बर्फच

तिथले लेटेस्ट आकर्षण, क्लीफ वॉक. हा नाजूक दिसणारा पूल चालताना थरथरतो. तरीही तो पुर्ण सुरक्षित आहे.

तिथेही बर्फाची गुहा आहेच. पण आतले फोटो परत देण्याऐवजी खास तुमच्यासाठी तिथली आकडेवारी.

खिडकीतून

पायथ्याची नदी. पाण्याचा रंग बहारीचा निळा आहे.

मी जितक्यावेळा तिथे गेलोय तितक्यावेळा भारतीय हनिमनू जोडप्यांना या पूलावर फोटो काढताना बघितलय.

पूलावरुन आठवलं, अजून आपल्याला लुझर्नचा पूल बघायचाय. तो पुढच्या भागात बघू.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याकडे हा आकार असता तर नक्कीच शिवाचा हात गणला गेला असता ! >>>>> हा हा हा ...अग्दी, अग्दी..

मस्तेत सर्व फोटो.............

आभार दोस्तांनो.
एवढी गर्दी असूनही कुठेही गडबड / चेंगराचेंगरी नाही. स्वच्छता तर वाखाणण्याजोगी. आणि गर्दीत बरेचसे भारतीय असतात, हेही विशेष.

अहाहा! सगळेच फोटो सुरेख, पण तरीही हिरवाईचा आणि बहारदार नदीच्या काठावरच्या रेखीव घरांचा हे विशेष आवडले. आत्तापर्यंत प्रत्येकच ठिकाणी दिसलेली टुमदार गावांची, छोट्या वस्त्यांची, आखीव घरा-बागांची ती सुबक मांडणी आणि त्यातून सरपटणार्‍या नद्या-रस्ते-वाटा हे फारच लोभस आहे.

कोनाडे आणि त्या नंतरचा फोटो मस्तच.

शेवटून दुसरा फोटो म्हणजे अगदी ड्रीमहाऊस आहे. कसले भारी वाटत असेल तिथे रहायला!

एवढी गर्दी असूनही कुठेही गडबड / चेंगराचेंगरी नाही. स्वच्छता तर वाखाणण्याजोगी. आणि गर्दीत बरेचसे भारतीय असतात, हेही विशेष.>>>>

हीच तर खासियत आहे आपली... आपण दुसर्‍या देशात गेलो की व्यवस्थित वागतो... भारतातच आपल्याला तसे वागता येत नाही.