नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी मुलगी विचारत होती हा या सगळ्या बायकांच्या पोटातून बॉर्न झालाय का? इतक्या आया कशा त्याला? Proud

आज शुक्रवार दि.२७ सप्टेम्बर... अपडेट

~ सुंदर संवादाने सजलेला आजचा भाग.... जान्हवी आणि श्री मधील फोनवरील संभाषणाने.

जान्हवी : "आज घरी आम्ही सारे बसलेलो....आई म्हणाली, जान्हवी तू उजळलेली दिसत्येस आजकाल."
श्री : [हसून] : "मग तू काय उत्तर दिलेस ?"
जान्हव्ही : [लाजून] : "मी काय बोलणार ? मनात म्हणाले, श्री चा रंग लागलाय...." ~ आणि तिने लाजून चेहरा झाकून घेणे..... मस्तच हा मोबाईल संवाद रंगविला दिग्दर्शकाने.

आज जान्हवीच्या वडिलांना दवाखान्यात नेण्यात आले....बरोबर जान्हवी आणि पिंट्या. पण आदल्या रात्री ही मंडळी लग्नाविषयी आनंदाने गप्पा मारीत बसलेले असताना जान्हवीचा चाळीतील मित्र मनिष खाली मान घालून येतो आणि जान्हवीला बाहेर बोलावितो. तो युवक गल्लीतीलच आणि घरी नेहमी येजा करीत असल्याने त्याच्या विनंतीला कुणी रोखत नाही. दोघेही खाली येतात आणि चौकातील बाकावर बसता क्षणीच डोळ्यात पाणी आणून मनिष जान्हवीला 'आपले शिवानीशी ठरलेले लग्न मोडले...कारण शिवानीच्या आईवडिलांनी घरजावई होण्यास तयार असशील तरच मुलगी देईन...' अशी अट घातल्याचे सांगतो. जान्हवीलाही हा एक धक्काच असतो कारण तिला माहीत आहेच की मनिष हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असून वडील आजारी असल्याने तो त्याना सोडूच शकत नाही. त्यामुळे उपाय एकच म्हणजे शिवानीशी संबंध संपुष्टात आणणे. मनिष आणि शिवानी यांची जोडी जान्हवीने तयार केली असल्याने आता तिच्यावर हे संबंध कसे टिकवावेत याची जबाबदारी आली आहे. ती विचारात असतानाच श्री चा फोन येतो....आणि ती त्याला सारे सांगते.

श्री च्या बंगल्यावर आज ना आजी होत्या ना सार्‍या आया...फक्त दोघीच....आणि त्याही श्री ला तो जणू काही केजीचा विद्यार्थी असल्यागत भरभरून खायाला घालत होत्या.....सायली प्रकरणही बेबीआत्यासमवेत चर्चिले गेले.

जान्हवी, वडील, पिंट्या दवाखान्यात गेल्यावर घरी आई आपल्या थोरल्या भावाला फोन करून जान्हवीचे लग्न ठरत असल्याची बातमी देते आणि हे स्थळ किती गब्बर आहे याची बढाई मारते. फोन ठेवल्या क्षणीच दारात दोन पोलिस आले आहेत आणि ते 'तुम्हाला पोलिस स्टेशनवर आले पाहिजे....तुमच्याविरूद्ध तक्रार नोंद झाली आहे....' अशी बातमी देतात.....आईला धक्का.

जान्हवीच्या बाबांच्या बोलण्यावरून कळते की शशिकलाचा भाऊ त्यांच्याकडे कितीक वर्षांत आलेला नाही व तो लोकांना टोप्या घालीत फिरत असतो. नंतर शशिकलाचे भावाशी फोन-संभाषण दाखविले.-त्याला अनिल आपटे प्रकरण माहीत आहे. जान्हवीच्या गळाला श्रीमंत मासा लागला आहे.

नाहीतर एलदुगो मधला घना आठवला का? कसला काम करायचा तो!!!!>>> लॅपटॉप बंद करण्याचे काम कसले भारी करायचा तो >>>> + १००० Proud

satat yenara "saha aayaa" ha ullekh pan chukicha vatato....ase sagalya natyanchi total ka maratat dev jane. ek mavshi, ek aai, दon kakva, ek kaku chi bahin v ek aajji astana he saha aya kay kadhale ahe dev jane. mhanje tyala 4 kakas v ek baba aste tar to 5 babas mhanala asta ka ?>>>> हाहाहाहा अगदी खरं... १०० % अनुमोदन.... जगावेगलआ मुलगा with ६ आया आणि ५ बाबाज Biggrin

नाहीतर एलदुगो मधला घना आठवला का? कसला काम करायचा तो!!!!>>> घना माउलीला बोलायच नाही बर!:) तो नाही का एकदा एका क्लायंटला म्हणलेला की बॅक अप घेउन ठेवा मी आल्यावर पी सी फॉरमेट करतो Proud Lol

आताच (बहुतेक)स्टार माझावर तेजश्री, शशांक यांची मुलाखत दिसली. : हा डेली सोप आहे, त्यामुळे गोष्टी हळूहळू घडणार आहेत. पेशन्स लागेल" हे तिनेच सांगितले Wink
तिचा मुक्ता बर्वे, उ.का. , सिद्धार्थ चंद्रात्रे यांच्याबरोबर 'लग्न पहावं करून ' हा चित्रपट येतोय.

ABP माझा वरती chat corner मध्ये श्री आणि जान्हवी आले आहेत, मस्त बोलतायेत.....

पोलिसानी संगितल्य जानु चा आई ला की तुमचा पैशांचा चा घोळ बाहेर चा बाहेर सोडवा....
आता जानु ची आई ते "अनिल आपटे" ७० हजार रुपयांच प्रकरण...जानुच्या बांगड्या विकून निपटावेल....
आणि नंतर जानु ला सांगेल की बांगड्या हरवल्या ... Sad
आणि नेहमि प्रमाणे जानु श्री ला खर काय झालाय ते सांगणार नाही ...आई चा प्रेमापोटी .... (राग राग...)
म्हणजे मग परत आईआजी भडकणार... अणि घोळ सोडवायला १ आठवडा... Sad

नियती...प्राजक्ता...जाई....शुभांगी

~ गंमत म्हणजे मलाच शनिवारचा भाग पाहता आला नाही. घरी खूप पाहुणे आले होते माझ्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी. मग त्यांच्या उपस्थितीत मला टीव्ही चालू करणे योग्य वाटले नाही. रविवारी पुनर्प्रसारण असेल म्हणून गप्प बसलो....तर रविवारी दिवसभर स्पेशल 'बीपी - बालकपालक' वरच झी ने लक्ष केन्द्रीत केले होते.

~ सो...सॉरी....मात्र आज सोमवारच्या भागाबद्दल काही अडचण नाही.

अशोक काका, प्रकृतीला काय झालं? संभाळून असा हो. तुमच्या तब्येतीचं अपडेट नक्की द्या. मालिकेचं होईल.

अशोक काका, प्रकृतीला काय झालं? संभाळून असा हो. तुमच्या तब्येतीचं अपडेट नक्की द्या. मालिकेचं होईल.>>>>+१०००

शनिवारच्या भागत शशिकलाबाईंना पोलिसांनी समज देऊन परत पाठवले. हे सगळे त्या आपल्या भावाशी बोलल्या, त्यावरून भावाला हवा खाण्याचा दोन वेळचा अनुभव असल्याचे कळले. त्यांचा विचार भावी जावयाकडूनच पैसे घेऊन प्रकरण मिटवायचा आहे, पण अजून या जावयाशी तितकीशी ओळख नाही.
पिंट्या बाबांना घेऊन डॉक्टरकडे गेला.
श्री जान्हवीला बँकेत भेटायला गेला. जान्हवीने संध्याकाळी बसस्टॉपवर नको कॉफीशॉपवर भेटूया असे म्हटल्यावर गीताने (तिची जिजूशी ओळख झाली आहे) तिथे अजून जावळही न आलेले बाळ असेल असे म्हटलं.
श्री आणि नंदन यांनी सायली प्रकरणावर चर्चा केली. तिच्या वागण्याचा अर्थ लावायचा प्रयत्न केला.
आज (किंवा लवकरच) अनिल आपटे गोखल्यांकडे येउन अजून जान्हवीशी लग्न झालेलं नाही, पण जान्हवी श्रीमंत मासे गळाला लावते, तुमच्यापेक्षा श्रीमंत मासा मिळाला की तुम्हालाही सोडेल असे सांगेल.

Pages