Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46
झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'
इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या....
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सायलीचा फोटो श्रीला दाखवतात
सायलीचा फोटो श्रीला दाखवतात तेव्हा तो कामात बिझी असतो आणि फोटो बघत नाही पण त्या बायकांना वाटते त्याने फोटो बघितला.
काल अनिलने लय हसवलं.. घाम
काल अनिलने लय हसवलं.. घाम येतोय तरीही विग घातला म्हणे फक्त तुझ्यासाठी
रीअली अन्जू ? मग मी तो एपिसोड
रीअली अन्जू ? मग मी तो एपिसोड पाहिलेला नाही, बहुधा. मी तर असेच समजत होतो की ज्यावेळी सायली प्रथमच ऑफिसमध्ये येते त्याचवेळी त्याने तिला पाहिले.
भरतजी,तुम्ही शरयूबद्दल बोलता
भरतजी,तुम्ही शरयूबद्दल बोलता ते बरोबर आहे, ह्याआधी तिनेच जान्हवी चांगली मुलगी आहे, आपले काहीतरी चुकतंय हे मत मांडले होते आणि ती बहुतेक नवऱ्याला चोरून भेटते आणि विसरभोळेपणाचे नाटक करते असे वाटते.
मी तर असेच समजत होतो की
मी तर असेच समजत होतो की ज्यावेळी सायली प्रथमच ऑफिसमध्ये येते त्याचवेळी त्याने तिला पाहिले.>> हो अशोकमामा, असंच होतं. पण तिचा फक्त फोटो त्याला त्याच्या ६ आयांपैकी एकजण दाखवतं, तो तेंव्हा फोनवर बोलत असतो. ही मुलगी चालेल का, याला तो नुसतीच मान डोलवतो, तिचा फोटो नीट पहातही नाही. तर या बायका यालाच त्याचा होकार समजतात..
<अर्थात हेही खरे की श्री ला
<अर्थात हेही खरे की श्री ला याबाबतीत कसलीही कल्पना दिलेली नसते. त्यामुळे तो सायलीकडे कधीच त्या नजरेने पाहात नाही.> श्री ऑफिसला जायच्या घाईत फोनवर बोलत असतो, तेव्हा या सहा जणी(किंवा फक्त श्रीची आई) त्याला त्याच्यासाठी बघितलेल्या मुलीबद्दल सांगतात. त्याचे लक्ष फोनवरच असते.तो फोनवर हो हो म्हणत असतो, ते आपल्यालाच म्हणाला असे त्यांना वाटते.
थॅन्क्स सानी आणि
थॅन्क्स सानी आणि भरत.....
धमाल आहे ह्या धाग्याची.....
६६६ प्रतिसाद झाले..... ग्रेगरी पेक ली रेमिकचा 'ओमेन' आठवला.
<<अनिल आपटे मोड ऑन>> जिथे
<<अनिल आपटे मोड ऑन>>
जिथे बघावा तिथे माझ्या नावाने खडे फोडणे चाल्लाय !!
अहो , त्या पोरीला सरळ लग्नाला मागणी घातली होती ! तिच्या आइने सांगिताले ..हिचा कुठे जमत नाही ...१७-१८ जणांनी नाकारली ..तरी पण मी पत्करायला तयार झालो.. बर ! ती सुद्धा हो म्हणाली होती लग्नाला ...
आणि एक चांगला जावई म्हणून मी ऑपरेशनला मदत करत होतो .. आणि ही लग्नाला हो म्हणाली म्हणून ४ लोकांना सांगितला ..दुसरा जास्त श्रीमंत भेटला ना !! आता हीने शब्द फिरवला आणि पंचाईत झाली ..आता लोक हसतात मला..
असा आधी लग्नाला होकार देउन नंतर नकार देणे ..तुम्हाला पटतं का ??
मनत नसेल तर आधीच नाही म्हणायचा .. समोरच्याच्या इज्जत का फालूदा झाला नं !
<<अनिल आपटे मोड ऑफ>>
६६६ प्रतिसाद झाले>>> मामा,
६६६ प्रतिसाद झाले>>> मामा, यात तुमचाच सिंहाचा वाटा आहे. बाकीच्या सगळ्या खारी आहेत
काश, तुम्हाला उंच माझा झोका आवडली असती!!!
ओफ ओ....सानी.....इन फॅक्ट
ओफ ओ....सानी.....इन फॅक्ट माझ्या भाचीने ही मालिका 'बघच मामा....' असा आग्रह तिसर्याचौथ्या भागानंतर केला.....मी त्यानंतरचे भाग पाहू लागलो अन् मग सादरीकरण तसेच त्या दोघांचा निर्व्याज, सरळ अभिनय पाहून अगदी भारावूनच गेलो.
उंच माझा झोका....राधा...तू तिथे मी....अशा आणखीन् काही मालिका चांगल्या आहेत हे मान्य, पण मला घरातील पोरे जास्तवेळ टीव्हीसमोर बसू देत नाहीत.....त्याना टीव्हीचा ताबा घ्यायचा असतो म्हणून.
पण "होणार सून....' पाहिले की मनही अगदी भरून येतेच.....मग त्यात कितीही त्रुटी असल्यातरी आता ती अखेरपर्यंत पाहणे आलेच.
मामा, तुमचे एकंदरीत प्रतिसाद
मामा, तुमचे एकंदरीत प्रतिसाद वाचून मला खात्री वाटते, की उंच माझा झोका तुम्हाला नक्की आवडली असती.. तुमचे प्रतिसाद मिसले मी..
"होणार सून....' पाहिले की मनही अगदी भरून येतेच.....मग त्यात कितीही त्रुटी असल्यातरी आता ती अखेरपर्यंत पाहणे आलेच.>>> खरंय..
sonalisl | 26 September, 2013
sonalisl | 26 September, 2013 - 00:42
श्री जेंव्हा जान्हवीबरोबर घरी जायला निघतो तेंव्हा रस्त्यावर काळोख असतो पण तो घरी पोहोचतो आणि दार उघडले जाते तेंव्हा एकदम दुपारसारखा प्रकाश बाहेर रस्त्यावर दिसतो.>>>>>>तेव्हा दुपारच असते. तो भाग बघताना मला पण थोडावेळ तसेच वाटले परंतु मागे दाट झाडी असल्यामुळे काळोख दिसतो. त्याचवेळी तिथे उभ्या असलेल्या बस च्या काचेवर आकाशाचे प्रतिबिंब दिसत होते.
>>
पियु परी...
तु म्हणालीस माझे निरीक्षण चांगले आहे पण बघ लगेच तुला सव्वाशेर सोनाली मिळाली :-).
सोनाली पण तो काळोख एकदम रात्रीसारखा दिसत होता कदाचित मग कॅमेर्याचासुद्धा थोडाफार प्रॉब्लेम असेल.
हो तो अगदी रात्री सारखाच दिसत
हो तो अगदी रात्री सारखाच दिसत होता. मला सुद्धा त्यावेळी तसेच वाटले होते.
आज गुरुवार दिनांक २६
आज गुरुवार दिनांक २६ सप्टेम्बर.....
~ पहिलाच एपिसोड असेल की ज्यात जान्हवीला कमीतकमी काम होते. जवळपास सारा भाग गोखले बंगल्यातच गेला. आजी श्री ला आपल्या खोलीत घेऊन त्याच्या डोक्याला तेल लावत लावत जान्हवीच्या नावाला होकार देतात आणि मग श्री आजीला आनंदाने चिकटतोच. तरीही आजी "सायलीचा प्रश्न अजूनही माझ्या डोक्यात असल्याने तीही बाजू मी स्वच्छ करून घेणार आहे' अशी अटही घालतात. असे असले तरी त्याना जान्हवी ही कर्तबगार सून असावी असे श्री ला सांगतात....इतकी कर्तबगार की घरातील पाचही स्त्रियांवर तिने हक्काने वर्तणूक केली पाहिजे....कारण "माझ्या त्या पाचही स्त्रियांवर तितका विश्वास नाही.....अन् एकदा का जान्हवीने इथला कारभार हाती घेतला की मग मी वानप्रस्थाश्रम स्वीकारणार...' असे हसतहसत श्री ला सांगतात.
दुसरीकडे अनिल आपटे सहस्त्रबुद्धेंच्या घरी येऊन थडकतो....विग काढून टाकलाय.... शशिकलाबाईंना परत जुनीच धमकी [पैशाची] देवून तोच लग्नाचा विषय काढतो....यावेळेस मात्र शशिकलाबाई त्याला तोडीसतोड उत्तर देवून घराबाहेर पडण्याचा हुकूम देतात...."तुमचे ७० हजार मी उद्या देते...' असाही जबाब. आपटेला वाटते त्या अकांउंट्न्टच्या जीवावर ही बाई बढाया मारीत आहे; तसे बोलल्यावर आई त्याला मोठ्या आवाजात 'जान्हवीचा होणारा नवरा हा श्रीरंग गोखले असून गोखले गृह उद्योगचा मालक आहे" असे सुनावतात. त्यावर चपापलेला आपटे आणखीन् एक धमकी पुटपुटत घराबाहेर पडतो.
बॅन्केत मॅनेजर बोरकर जान्हवीला केबिनमध्ये बोलावून 'शिवदेमॅडम तुझे लग्न झाले आहे का ? असे विचारीत होत्या..." ही बातमी सांगतात...त्याला जान्हवी हे खोटे आहे हे तुम्हालाही माहीत आहे असे उत्तर देते. नंतर ती आणि तिची बॅन्केतील मैत्रिण गीता त्या अनिल आपटे पाठलाग प्रश्नावर हसतहसत चर्चा करतात.
बेबीआत्या आणि मावशी श्री च्या रूममध्ये येऊन त्याला सायलीसंबंधी प्रश्न विचारतात. त्यावेळी श्री ला समजते की सायलीने या मंडळींना नसलेल्या संबंधाविषयी तिखटमीठ लावून सांगितले आहे....ते सारे आता तो क्लीअर करणार आहे.....म्हणजे त्याचा जान्हवीसोबतच्या लग्नाचा मार्ग मोकळा.
येस्स्स
येस्स्स
देवा नारायणा..... किती तो
देवा नारायणा..... किती तो सस्पेन्स आणि चर्चा करतात हे गोखल्यांच्या घरातले लोक? एवढं प्रेम आहे एकमेकांवर, पण गृहीत कसे धरतात प्रत्येक वेळेला... त्या भागीरथी बाई एवढ्या कर्तबगार , कडक दाखवल्या आहेत... स्वत: सगळे निर्णय घेतात, एकुलत्या एक नातवावर त्यांचा भारी जीव आहे ना? मग त्याचे लग्न ठरवताना, त्याला शेजारी बसवून, सरळ सायलीचा फोटो ठेवून, स्पषट्पणे का सांगत नाहीत, की आम्ही ही मुलगी पसंत केली आहे. आणि तो श्रीपण महान.. त्याच्या ऑफीसमध्ये एक मुलगी येते काय, त्याच्याशी फ्लर्ट करत बोलते काय, ओळख ना पाळख तरी ती रोज येते, याचं श्रीला काहीच कस वाटत नाही? एपिसोड्स वाढवायचे म्हणून एवढे सगळे गोंधळ घालायचे, मग रडारडी करायची आणि नंतर ते गोंधळ निस्तरायला अजून एपिसोड्स खर्ची घालयाचे ...
असा एवढा सावळा गोंधळ घालणारी माणसं एवडा मोठा उद्योग कसा चालवतात आणि तेही यशस्वीरित्या याच आश्चर्य वाटत.... मला तर वाटतं ते फक्त नावपुरते मालक असतील.. उद्योग चालवायची जबाबदारी दुस-य कोणालातरी दिली असेल.. कारण आजपर्यंत एकाही भागात श्री- आणि त्याची आईआजी ( i just hate this name.. सरळ आजी म्हणायला काय होत!) एकदाही त्यांच्या कामाविषयी चर्चा करताना दिसत नाहीत. ना कधी तो श्री ऑफीसमध्ये सीरीयसली काम करताना दिसतो.. सगळा सावळागोंधळ आहे मालिकेत...
मला श्री आवडतो, छान काम करतो पण फक्त श्री ( शशांक केतकर) आणि जान्हवी ( तेजश्री प्रधान) चांगलं काम करतात म्हणून किती दिवस सहन करायचा मेलोड्रामा.... feeling irritated
कालचे शरयूचे एक वाक्य सॉलिड
कालचे शरयूचे एक वाक्य सॉलिड होते. " राम-कृष्ण देव आहेत. त्यांना भुका लागत नाहीत. पण आपलं तसं नाही."
असे काही काही लवंगी फटाके ते भागीरथीबाईंच्या पायात फोडत असते.>>>> =१००००० मध्यंतरी पण एका भागात मोबाईल शोधण्याच्या निमीत्ताने शरयू भागीरथीबाईंना म्हणते तुमच्याकडूनही होऊ शकते चूक......
पण एकंदरीतच कम्युनिकेशन गॅप
पण एकंदरीतच कम्युनिकेशन गॅप मूळे जे काही गैरसमज दाखवले आहेत ते फार आहेत.. हे लोक समज करून घेण्या आधी एक्मेकांशी बोलत का नाहीत..एकदा..दोनदा..तिनदा..आणि ते ही सगळ्यांचा..
"होणार सून....' पाहिले की
"होणार सून....' पाहिले की मनही अगदी भरून येतेच.....मग त्यात कितीही त्रुटी असल्यातरी आता ती अखेरपर्यंत पाहणे आलेच.>>> खरंय.. स्मित >>++०१११११११११११११११११११११११
परन , धन्यवाद. तोही एक लवंगी
परन , धन्यवाद. तोही एक लवंगी फटाकाच होता. ऐकला तेव्हा आवडला होता. आठवत नव्हता.
श्री आणि शरयू यांच्यात एक सिक्रेट पॅक्ट बनला आहे. आजी श्रीला सायलीबद्दल प्रश्न विचारणार हे कळताच शरयू श्रीला त्याबद्दल वॉर्न करते.
आजींनी आणखीही इश्युज म्हटले ते सायलीवरच्या सो कॉल्ड अन्यायाबद्दल की जान्हवीच्या फॅमिली बॅकग्राउंङ इ.बद्दल. (भागीरथीबाई वापरतात त्याच प्रमाणात इंग्रजी शब्द वापरले आहेत
ज्यांना मालिकावाले मायबोलीवरच फीडबॅक वाचतात असे वाटते त्यांच्यासाठी : कालच्या भागात तिन्ही सुना कर्तबगार वगैरे का नाहीत याबद्दल भागिरथीबाई काहीतरी बोलल्या.
जान्हवीचा बॉस त्याच्या बायकोला फोनवर अवाक्षरही काढू देत नाही, तरी तिचा फोन आला की का घाबरतो?
लग्न मोडू पाहणारा विघ्नसंतोषी कोण असा प्रश्न त्याने जान्हवीसमोर टाकला आहे, तरी ती धर्मराजाचा अवतार असल्यामुळे तिला कोण असे करेल हे कळण्याची जराही शक्यता नाही.
बाकी कालच्या भागावे एक
बाकी कालच्या भागावे एक वैशिष्ट्य आज लक्षात आले....ते म्हणजे मालिकेत जान्हवी व श्री यांची ओळख झाल्यापासून प्रथमच दोघे एकमेकाला भेटलेले नाहीत दिवसभर....ना बस स्टॉपवर....ना बागेत....तसेच एक फोनही त्यानी केलेला नाही....सार्या काही घरातीलच उलथापालथी.
कारण आजपर्यंत एकाही भागात
कारण आजपर्यंत एकाही भागात श्री- आणि त्याची आईआजी ( i just hate this name.. सरळ आजी म्हणायला काय होत!) एकदाही त्यांच्या कामाविषयी चर्चा करताना दिसत नाहीत. ना कधी तो श्री ऑफीसमध्ये सीरीयसली काम करताना दिसतो>>> मालिकेमधे ते कसे काम करतात हे दाखवायचे महत्वाचे नाही....आणि ते दाखवत बसले तर अजुन १०० भाग वाढतिल
तसेही श्री सकाळी आयांबरोबर बोलताना मग बस्टॉपवर जान्हवीला भेटलेला, त्यानंतर संध्याकाळी बस्टॉपवर भेटताना दाखवला आहे...मधल्या वेळेत जान्हवी त्याच्या ऑफिस मधे गेली तर मिटिंग मधे दाखवला आहे. त्यामुळे तो काम करताना दाखवायचा प्रश्नच येत नाही.
त्यामानाने तो बर्यापैकी काम करतो.....नाहीतर एलदुगो मधला घना आठवला का? कसला काम करायचा तो!!!!
नाहीतर एलदुगो मधला घना आठवला
नाहीतर एलदुगो मधला घना आठवला का? कसला काम करायचा तो!!!!>>> लॅपटॉप बंद करण्याचे काम कसले भारी करायचा तो
नताशा
नताशा
होना....त्यावर सुद्धा ईथे
होना....त्यावर सुद्धा ईथे चर्चा झाली होती
त्यामानाने तो बर्यापैकी काम
त्यामानाने तो बर्यापैकी काम करतो.....नाहीतर एलदुगो मधला घना आठवला का? कसला काम करायचा तो!!!!>>>> स्वप्नील मस्तच काम करायचा...आणि मुक्ता पण!!!
अगं मधुराआआआआ!!!! कसला काम
अगं मधुराआआआआ!!!!
कसला काम करायचा तो!!!!>>>हे वेगळ्या अर्थाने बोलले होते मी
पण मी मात्र त्याच अर्थाने
पण मी मात्र त्याच अर्थाने म्हणत होते, जो तुला समजलाय!!!
म्हणून किती दिवस सहन करायचा
म्हणून किती दिवस सहन करायचा मेलोड्रामा <<< आता दुसरी सिरीयल शोधायची बघायला… एकदा तो आणि ती एकामेकाच्या प्रेमात पडले की राहिला सासवांचा प्रश्न तेव्हा खरं तर ती serial सम्पली …
satat yenara "saha aayaa" ha
satat yenara "saha aayaa" ha ullekh pan chukicha vatato....ase sagalya natyanchi total ka maratat dev jane. ek mavshi, ek aai, दon kakva, ek kaku chi bahin v ek aajji astana he saha aya kay kadhale ahe dev jane. mhanje tyala 4 kakas v ek baba aste tar to 5 babas mhanala asta ka ?
Pages