Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 September, 2013 - 03:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
सातपुती कापुन तुकडे करुन घ्या.
भांड्यात तेल गरम करून त्यावर राई तडतडवून, जिर टाकून त्यावर कांदा परतवा. कांदा बदामी रंगाचा झाला की त्यावर हिंग, हळद, मसाला, आल-लसुण पेस्ट घालून ढवळा. त्यात कापलेली सातपुती घाला. व ढवळा. पाणी घालण्याची तशी आवश्यकता नसते.
मध्यम आचेवर झाकणावर पाणी ठेवून भाजी शिजवत ठेवा. एक वाफ आली की त्यात मिठ घाला. मधून मधून ढवळत रहा.
१० ते १५ मिनीटांत भाजी शिजते. मग त्यात खोबरे घालून परतवा. झाली भाजी तैय्यार.
वाढणी/प्रमाण:
३ ते ४ जणांसाठी
अधिक टिपा:
सातपुती ही भाजी पावसाळ्यात येते. गोल, लांबट, शिराळ्यांसारखीच पण टोकदार नसलेल्या ह्या भाजीला ७ शिरा असतात.
ही भा़जी शिराळी, घोसाळ्यां प्रमाणे कडधान्ये, आमटीतही घालता येते.
तसेच नुसती भाजी केली तरी त्यात बटाटा, डाळी घालू शकता.
इतर एकत्रीत रानभाज्या - http://www.maayboli.com/node/26435
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह, शेवटचा फोटो अगदी
वाह, शेवटचा फोटो अगदी जीवघेणा!!!
पहिल्यांदाच ऐकले..सातपुतींबद्दल. दोडका वर्गातली भाजी दिसतेय.
दोनेक आठवड्यांपूर्वी प्लाझा
दोनेक आठवड्यांपूर्वी प्लाझा मार्केटला पाहिली मी. आयुष्यात पहिल्यांदाच बघितली. या भाजीला काही वेगळं नाव असेल असं वाटलंच नाही. मला वाटलं की शिराळ्यांची नविन संकरीत जात आलीये मार्केटमध्ये.
आता नक्की आणून करून बघेन.
अशा भाज्या भेटायला पाहीजे
अशा भाज्या भेटायला पाहीजे ना??? विकायला तर कोणी आणत नाहीत.
बाकी रेसीपी मस्त !
अविकुमार धन्स. मामी नक्की कर
अविकुमार धन्स.
मामी नक्की कर ग. खुप छान लागते ही भाजी.
मुक्तेश्वर तुम्ही मामीला ऑर्डर द्या.
मी आजच ठाण्यात वर्तकनगर आणि
मी आजच ठाण्यात वर्तकनगर आणि शास्त्रीनगर ला हि भाजी पाहिली.आता नक्कि करुन बघेन.
जागूच्या पोतडीतील अजून एक
जागूच्या पोतडीतील अजून एक भाजी आणि आमच्या पण ज्ञानात भर. मस्तच.
मामी प्लाझा मार्केट ला म्हणजे कुठे?
जागू ने लिहिलेल्या बहुतेक भाज्या मला दादर ला टायटन शोरूम च्या पुढे भाजीवाल्या बसतात तिथेच मिळतात. ही बघीतलेली आठवत नाही.
सामी, दादरला प्लाझा सिनेमा
सामी, दादरला प्लाझा सिनेमा शेजारी. होलसेल मार्केट आहे. सकाळी ९-९.३० च्या सुमारास गेलीस तर मस्त ताज्या ताज्या भाज्या मिळतात. अगदी रास्त दरात. दुपारी ३-४ नंतर मार्केट उठतंच.
पालेभाज्या, मशरूम्स, रॉकेटलीव्हज, लेटस, ब्रोकोली, भरपूर लागणार्या भाज्यांपैकी कांदे, बटाटे, लसूण, टोमॅटो, काकडी वगैरे मी बरेचदा इथे जाऊन घेते. बाकीही सगळ्या भाज्या असतातच. कधी कधी तर मी हावरटासारखं आख्खा लाल भोपळा, आख्खा सुरण घेऊन येते. मग कापून ते बाकी मैत्रिणींना वाटते.
मुक्तेश्वर तुम्ही मामीला
मुक्तेश्वर तुम्ही मामीला ऑर्डर द्या. >> मामी पॅकबंद पाठवायला तयारी करा. पार्सलचे पैसे खाल्ल्यावर वळते करतो.
मस्त रेसीपी. पहिल्यांदाच
मस्त रेसीपी. पहिल्यांदाच बघितली ही भाजी.
मस्त दिसतेय भाजी! छोटे गोल
मस्त दिसतेय भाजी! छोटे गोल दोडकेच जणु!
शेवटचा फोटो तोंपासु!
पुण्यात,.. सांगवीत तरी मी ही भाजी पाहिली नाही.
मुक्तेश्वर, त्यापेक्षा आपण
मुक्तेश्वर, त्यापेक्षा आपण जागूकडून तयार भाजीच मागवूयात.
Jaagu tumhi lok bhaajit
Jaagu tumhi lok bhaajit ajibbat guL naahee ghaalat? :ao:
दक्षे अग घालते मी. पण ह्या
दक्षे अग घालते मी. पण ह्या भाजीत घालण्याची गरज नाही. बाकी आमटी, कडधान्ये व इतर भाज्यांमध्ये मी घालते थोडा गुळ चविसाठी.
राधा, सामी, अनुजा, आर्या धन्स.
मामी, मुक्तेश्वर नक्की या.
वाह मस्तच तोंपासू अगदी
वाह
मस्तच
तोंपासू अगदी
मस्त भाजी. मी पण शिराळीच
मस्त भाजी. मी पण शिराळीच समजलो असतो यांना.
मामी थँक्स.
मामी थँक्स.
parval ani hi bhaji vegli ahe
parval ani hi bhaji vegli ahe ka?
एकएक नवीन भाज्या येतायत
एकएक नवीन भाज्या येतायत माबोवर
काल ढेमसे तर आज सातपुती
म स्त ..
म स्त ..
मस्त! जागु, ही सिरीज खूप छान
मस्त! जागु, ही सिरीज खूप छान आहे. बरीच माहिती मिळत्येय. थांकु!
हो मी पण दोडकीच समजले असते!
हो मी पण दोडकीच समजले असते! पहिल्यांदाच नाव ऐकलं या भाजीचं. इथं पुण्यात मिळते की नाही ते नाही माहित. मंडईत बघायला पाहिजे. पा कृ. मस्त आहे. मिळाली तर नक्की करुन बघेन.
मस्त फोटो आणि रेसिपी.
मस्त फोटो आणि रेसिपी.
जाई, दिनेशदा, सामी, राहुल,
जाई, दिनेशदा, सामी, राहुल, सृष्टी, चिन्नू, शांकली, अमेय धन्यवाद.
हो हेमांगी ही भाजी वेगळी आहे.
ह्म्म नविन भाजी....
ह्म्म नविन भाजी.... दोडक्याचा बोन्साइ केल्यासारखा वाटला.
जागू, मी अजून बघितलीच नाहिये
जागू, मी अजून बघितलीच नाहिये ही भाजी. चिरल्यावर आतून तोंडल्यासारखी दिसतेय आणि बाहेरुन बुटकं शिराळं/दोडका.
काय काय शोधून काढशील काही सांगता येत नाही.
जागू मॅडम, किती श्रीमंत आहात
जागू मॅडम, किती श्रीमंत आहात हो तुम्ही. तुम्हाला किती रान्भाज्या बनवता येतात, आणि मिळतात सुद्धा. आणि किती सारे माश्याचे प्रकार. असं वाटतय, तुमच्या बाजूला घर घ्याव आणि तुमच्याकडून रोजचा रतीब लावावा.
जागूच्या पोतडीतील अजून एक
जागूच्या पोतडीतील अजून एक भाजी आणि आमच्या पण ज्ञानात भर. >>> +१००...
जागूमैयाला आता "शाकंभरी देवी" म्हणायला हरकत नसावी ....

हो शशांक, तिच्या आठ
हो शशांक, तिच्या आठ हातांमध्ये नवपल्लव शाखा, पुष्प, फल, कंदमुळे, अक्षय्य जलपात्र, धनुष्य, बाण व नांगर द्यायचा बाकी आहे फक्त
(शाकंभरीच्या हातात शस्त्रं नाहीत).
शशांक, अश्विनी अग साधना खुप
शशांक, अश्विनी
अग साधना खुप जुनी आणि पारंपारीक भाजी आहे ही आमच्याइथे. मी लहानपणी वेलींवरून काढून आणायचे.
वल्लरी स्वागत आहे.
मीपण हि भाजी बघितली नाहीये
मीपण हि भाजी बघितली नाहीये मला शिराळ्याचाच वेगळा प्रकार असे वाटले. कोकणात काही ठिकाणीच होते का हि भाजी?, माझा नवरा देवगडजवळ खेडेगावात वाढलेला पण त्यालाही माहिती नाही एरवी बऱ्याच भाज्या आमच्या सासरी अंगणात मांडव घालून करतात.
Pages