Submitted by जागू-प्राजक्ता-... on 26 September, 2013 - 03:19
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२५ मिनिटे
लागणारे जिन्नस:
क्रमवार पाककृती:
सातपुती कापुन तुकडे करुन घ्या.
भांड्यात तेल गरम करून त्यावर राई तडतडवून, जिर टाकून त्यावर कांदा परतवा. कांदा बदामी रंगाचा झाला की त्यावर हिंग, हळद, मसाला, आल-लसुण पेस्ट घालून ढवळा. त्यात कापलेली सातपुती घाला. व ढवळा. पाणी घालण्याची तशी आवश्यकता नसते.
मध्यम आचेवर झाकणावर पाणी ठेवून भाजी शिजवत ठेवा. एक वाफ आली की त्यात मिठ घाला. मधून मधून ढवळत रहा.
१० ते १५ मिनीटांत भाजी शिजते. मग त्यात खोबरे घालून परतवा. झाली भाजी तैय्यार.
वाढणी/प्रमाण:
३ ते ४ जणांसाठी
अधिक टिपा:
सातपुती ही भाजी पावसाळ्यात येते. गोल, लांबट, शिराळ्यांसारखीच पण टोकदार नसलेल्या ह्या भाजीला ७ शिरा असतात.
ही भा़जी शिराळी, घोसाळ्यां प्रमाणे कडधान्ये, आमटीतही घालता येते.
तसेच नुसती भाजी केली तरी त्यात बटाटा, डाळी घालू शकता.
इतर एकत्रीत रानभाज्या - http://www.maayboli.com/node/26435
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खरंच, शशांक यांनी जागू तुझे
खरंच, शशांक यांनी जागू तुझे 'शाकंभरी देवी' नामकरण केले ते योग्य आहे.
"जागू मॅडम, किती श्रीमंत आहात
"जागू मॅडम, किती श्रीमंत आहात हो तुम्ही. तुम्हाला किती रान्भाज्या बनवता येतात, आणि मिळतात सुद्धा. आणि किती सारे माश्याचे प्रकार." - couldn't agree more.
अन्जू अग मिळत असावी कोकणात
अन्जू अग मिळत असावी कोकणात आता एकदा शोध हाच सिझनमध्ये मिळेल बघ.
फेरफटका प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
जागूताई, रेसिपी मिळाली. मी
जागूताई, रेसिपी मिळाली. मी सातपुते नावाने शोधत होती. त्या मावशींनी तसच नाव सांगितल होत. खूप खूप धन्यवाद.
फोटो छान आहे.
आम्ही सातपुते पिक्चर आहे
आम्ही सातपुते पिक्चर आहे
सहज सुचलं म्हणून...
सहज सुचलं म्हणून...
या सातपुती नावाचा स्त्री आरोग्याशी काही संबंध असावा का?
म्हणजे हे भाजी खाल्यास बाळंतपण सुलभ होते किंवा एकंदरीतच आरोग्य?
मला कल्पना नाही. पण मिळेल
मला कल्पना नाही. पण मिळेल माहीती.
Pages