सत्कार

Submitted by Prashant Pore on 24 September, 2013 - 11:48

सुखासारखा दु:खाचा सत्कार करू या
पुन्हा एकदा भगवंताला आज स्मरू या

जलबिन मछली येथे जगते रीतच फसवी
अशा अजब या तडजोडी स्वीकार करू या

तिच्याच फसव्या पाशांमध्ये गुरफटलो मी
तरी इश्क हा सफल करुनी अमर ठरू या

कशा होतसे फूल कळीचे कुठले कळते
तिच्यासारखे निस्वार्थाने चल बहरू या

उगीच इथल्या लाचारीने झिजले मणके
चला दोस्तहो नांगर हाती परत धरू या

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उगीच इथल्या लाचारीने झिजले मणके
चला दोस्तहो नांगर हाती परत धरू या<<< व्वा

तिच्यासारखे निस्वार्थाने चल बहरू या<<< स्वतंत्ररीत्या अप्रतिम ओळ!

Happy

शुभेच्छा!

काका, समीर जी, वैभवराव आणि बेफीसर.... शतशः धन्यवाद...

मतल्यातील उला मिसरा हा ए.के. शेख सरांनी दिलेला आहे. गझल पोस्ट करताना सांगायचे राहून गेले. क्षमस्व...

उगीच इथल्या लाचारीने झिजले मणके
चला दोस्तहो नांगर हाती परत धरू या>>>

व्वा, अगदी मनातले लिहीलेत!

कशा होतसे फूल कळीचे कुठले कळते
तिच्यासारखे निस्वार्थाने चल बहरू या

उगीच इथल्या लाचारीने झिजले मणके
चला दोस्तहो नांगर हाती परत धरू या

हे आवडले Happy