क्विक मँगो कलाकंद-गोड-सीमा

Submitted by सीमा on 19 September, 2013 - 00:52
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

मिल्क पावडर : १/२ ते ३/४ कप
साखर १/२ कप
आंब्याचा रस काढून घ्यावा किवा मॅगो पल्प : १/२ कप
वेलदोडे,केशर्,ड्रायफ्रुट वगैरे
पनीर १ कप किंवा
(पनीर बनविण्याचे साहित्यः
४ कप दुध
१/२ कप दही)

क्रमवार पाककृती: 

दुध उकळून घ्यावे. त्यात दही घालून आणखी एकदा उकळी आणावी. गाळुन घ्यावे. थोडस पाणी राहिल तरी हरकत नाही. तयार झालेले पनीर नॉन स्टिक पॅनमध्ये घालून परतून घ्यावे.
पनीर विकतचे असेल तर कुस्करून पॅन मध्ये परतून घ्यावे.
त्यात मिल्क पावडर घालून २/३ मिनिटे परतावे. साखर घालावी व साधारण कडेचे बुडबुडे जावू पर्यंत परतावे. आंब्याचा पल्प घालून घ्यावा. केशर,वेलदोडे कुटून घालावेत. साधारण १ मिनिट परतावे.
गॅस बंद करुन तुप लावलेल्या भांड्यात काढून फ्रीज मध्ये ठेवावे. थोड थंड झाल कि ड्रायफ्रुट टाकून वड्या पाडाव्यात. मँगो कलाकंद तयार.

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे
अधिक टिपा: 

मॅगो पल्प ऐवजी इतर फळांचा पल्प घालून पण छान लागेल.उदा. पायनॅपल किंवा ऑरेंज.
गॅसवर करायचे नसेल तर मायक्रोवेव्ह मध्ये पण होतो. वेळेच प्रमाण मात्र मी नंतर बघून लिहिन.

माहितीचा स्रोत: 
नई नवेली दुल्हन कि रेसीपीज :P अर्थात नविन लग्न झाल्यावर ज्या रेसीपीज लिहून घेतलेल्या ती वही भारतातून येताना आणलीये. त्यातली रेसीपी आहे.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दाद, तुझ्याकडून दाद म्हणजे नंबर आलाच माझा. Happy
अंजली , मिल्क पावडरच्या ऐवजी कन्डेन्स्ड मिल्क वापरुन बघ. साखर घालू नको पण मग.

मस्त आहे एकदम.. नक्कीच करुन बघेन.. रंग इतका आवडलाय की त्यासाठी हे पान बरेच वेळा बघितले.. (तसेही पान गाजले आहेच...)

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383

विकतचा आंब्याचा पल्प घालून बनवून झाला एकदा. मस्त, सोप्पी-सुटसुटीत आणि लवकर होणारी रेसेपी. Happy
मब ला टक्कर देणारी रेसेपी आहे अगदी. Happy

आणि हो, अभिनंदन.

कालच केला कलाकंद (किती वेळा क आला) Happy
चव मस्तच जमली पण पनीर रबरासारखे लागत होते. माकाचु?
मी फ्रोजन पनीर डीफ्रॉस्ट करून वापरले. म्हणून का?

अंजली, पनीर फार जुने असणार गं. एकदा माझ्या पनीर माखणीच असं झालेल. लोक खाण्यात इतकी गुंग झालेली कि बोलायची विसरली. नंतर कळल कि पनीर चावण्यात त्यांचा वेळ गेल्याने , बोलायला वेळ झाला नाही. Proud
दुध आणि दही वापरून करुन बघ ना. उलट ताजा छान लागतो त्या पद्धतीने.

मी केला हा कलाकंद. एकदम मस्स्स्स्त झाला. मलई बर्फीला टफ फाईट आहे Wink

माझ्याकडे केसर आंब्यांचा पल्प होता, तो वापरला, रंग सुंदर आला पण तो टिपीकल सुगम्ध काही येईना, मग घरी हापूस आंब्याचा आटवलेला गोळा होता तो थोडा घातला. मग हा मँगो कलाकंद एकदम जमून आला.

अल्पना, मंजुडी थँक्स. नेक्स्ट टाईम थोडं क्रीम घालून पहा, खुप रिच texture येतं. Happy कॅलरी वाढतात खरं.

सर्वाना धन्यवाद. कृती खूप सोपी आहे. आमच्या मुलाला चितळेंची आंबावडी खूप आवडली या ट्रिप मध्ये. येताना घेवून आलेली संपली. आंबा बर्फी जमणार नाही म्हणुन कलाकंद करुन केला. स्पर्धेसाठी पाककृती फिट होईल वगैरे डोक्यात आलं नव्हतं त्यावेळी. नंतर लक्षात आलं. त्यामुळ. सगळ प्रमाण अंदाजान लिहिलय.

गोड सीमा, कलाकंद भन्नाट दिसतोय. फोटोंवर समाधान मानून घेते.. Happy

ते वर, दूध दही वापरून पनीर करायचं लिहीलेस, ते जरा उलगडून सांगतेस का? मी घरी कधी केले नाहीये पनीर..

सीमा कलाकंद दोन-तिन वेळा तरी करून लोकांची शाबासकी मिळवलीये. तुला पोच द्यायची राहिली ह्याची बोच लागली... आज कलाकंद करताना.
केवळ अप्रतिम होतो हा पदार्थं. माझ्यासारखीचा बि'घडवण्यातला हातखंडा बघता, प्रत्येकवेळी जमेलच असा हा पदार्थं म्हणजे ... काय सांगू तुला.
मनापासून धन्यवाद. ताज्या पनीर करण्याने ज्या 'कळ्या' रहातात त्यानंच 'कलाकंद' नाव सार्थं होतय असं माझं मत. (मूळ नावामागे काही वेगळा अर्थं असेलही).

अशा नव्या नवेली दुल्हनीच्या रेसिपीज अजून असतिल तर येऊदेत.

Pages