नवीन मालिका-"होणार सून मी या घरची"

Submitted by मी मधुरा on 2 July, 2013 - 10:46

Tejashree-Pradhan-Shashank-Ketkar-Honaar-Suun-Mee-Hyaa-Gharchi-Cast.jpg

झी मराठीवर नवीन मालिका सुरु होतेय......'होणार सून मी या घरची'

इतर सासू-सुनांच्या मालिकांपेक्षा हि खूप वेगळी आहे, असे आत्ता सध्या तरी भासते आहे.....
बघूया काय होते ते.....अर्थात मला या मालिकेच्या जाहिराती आवडल्या.... Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजचा भाग.....बुधवार २५ डिसेंबर....

~ एकदाचा "सुखदायी" होईल असा प्रवास मार्गी लागण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. श्री ने सहाही आयांच्यासमोर "मीच तो अकांउंटन्ट आहे असे तिच्याजवळ खोटे बोललो होतो आणि मला नोकरीवरून काढून टाकले जाईल म्हणून जान्हवी तुमच्याशी खोटे बोलली....त्यामुळे आजीने प्रथम मला शिक्षा करावी....". यावर आजी वगळता बाकीच्या पाचही स्त्रिया जान्हवीची बाजू घेऊन आजीकडे तिच्यावतीने वकिलपत्र घ्यायला पुढे सरसावतात. आजी काही प्रमाणात नमतात....तरीही तिचे लग्न झाले आहे हा मुद्दा कळीचा आहेच अन् तो सुटण्यासाठी आपल्याकडील रीसोर्सेस [हाच शब्द मालिकेत वापरला आहे] वापरून लग्नाबाबत खरेखोटे काय आहे ते पाहाण्यास संमती देतात.

दुसरीकडे रात्री जान्हवीच्या घरी मात्र अगदी दिवाळीसारखे हसतखेळत वर्तन चालू आहे.....जान्हवीला मध्यभागी ठेवून बाबा आई आणि पिंट्या तिच्याकडून गोखले बंगल्यावर घडलेला वृत्तांत ऐकतात....अगदी मन लावून. जान्हवीदेखील तिथल्या कडवट अनुभवाला बाजूला ठेवून चांगल्याप्रकारे आपल्याला वर्तणूक मिळाली असेच सांगते. त्याचवेळी श्री चा फोन येतो आणि तो घेऊन जान्हवी बाहेर येते. त्याच्याशी चांगल्याच गप्पा मारते....ओघात श्री तिला 'जानू' म्हणून प्रथमच हाक मारतो....जान्हवीला ती हाक सुखावते.

दुसर्‍या दिवशी मात्र बॅन्केत जाताना बस स्टॉपवर अनिल आपटे तिचा रस्ता अडवितो....आता त्याने आपले टक्कल विगने झाकले असून अतिशय निर्लज्जपणे स्टॉपवर तिची छेडछाड करीत राहून परत लग्नाचा मुद्दा काढतो....जान्हवी संतापते....बाजूला अन्य पॅसेन्जर्सही असतात...त्यानाही तो प्रसंग पाहावत नाही. जान्हवी आपटेला त्याच्या वर्तणूकीबद्दल समज देते आणि ऐकत नाही म्हणून येणारी रिक्षा थांबवून त्यात बसून बॅन्केला येते. पुढे अनिल आपटे जान्हवीच्या घरी येऊन आईला धमकी देत असताना आई त्याला श्री खरा कोण आहे हे सांगून तुमचे ते ७० हजार रुपये आत्ता घेऊन जा असे तोडीसतोड उत्तर देताना दिसते.

बंगल्यात आजी आणि शिवदेमॅडम जान्हवीच्या लग्नाच्याबाबतीत त्यांच्यावतीने चौकशीकरीता ज्या व्यक्ती लावलेल्या असतात त्यांच्या फोनची वाट पाहतात....सहाही स्त्रिया तिथे जमतात. फोन येतो आणि समजते की त्यानी ऐकलेली जान्हवीच्या लग्नाची बातमी खोटी आहे. त्यावर पाच आया आनंदीत होतात....आणि आता जान्हवीचा स्वीकार करू या अशी आजीला विनंती करतात....पण आजीचा अजूनही हे लग्न करून देण्यास नकारच आहे....त्याचे कारण उद्या कळेलच.

अशोक मामा तुमचे updates वाचून मस्त वाट्तं. एखादा भाग मिस केला तरी तुमचे updates वाचून भाग बघितल्याचं समाधान मिळतं.

maama he ajachech updates ahet he pahun mi itaki ghabarale mhanala apala episode chukla ki kay :ao:

.तरीही तिचे लग्न झाले आहे हा मुद्दा कळीचा आहेच अन् तो सुटण्यासाठी आपल्याकडील रीसोर्सेस [हाच शब्द मालिकेत वापरला आहे] वापरून लग्नाबाबत खरेखोटे काय आहे ते पाहाण्यास संमती देतात.>>>> श्रीने हा खुलासा अजून केलाच नाही का ? :रागः

पण आजीचा अजूनही हे लग्न करून देण्यास नकारच आहे....त्याचे कारण उद्या कळेलच.

>> आर यू शुअर कारण कळेल? आज्जी फक्त माझे काही इश्श्युज आहेत एवढंच बोलतेय सारखं सारखं.. Sad

तिला नक्की काय प्रॉब्लेम आहे हेच कळत नाहीये.

जान्हवीच्या आईने श्रीची खरी माहिती अनिल आपटेला सांगून चूक केली असे मला वाटते. आता तो नक्कीच काहीतरी काड्या घालणार. तसेही त्या माणसाला खुप बायका असलेल्या घरात जायची खुप हौस आहेच.

तुतिमी मध्ये प्रिया आणि आशिष एकत्र आले होते स-मं ला वेगळे करायला तसं इथे तो आपटे आणि सायली येऊ शकतात.

गो.गृ.उ. मध्ये काम करणार्‍या शिवदेबाईंचा त्या सायलीशी काय संबंध आहे? त्या तिला मदत (सपोर्ट) करतांना दिसल्या आहेत सुरुवातीला. आणि रो.ह. बाईंना सायली कशी आणि कुठुन मिळाली?/ भेटली ?

(मी काही भाग मिसलेत सुरुवातीचे Sad )

१. अंजली.... श्री ने आपल्या क्षमतेने जान्हवीच्या लग्नाबाबत आजीच्या मनात असलेली अढी काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहेच; पण आजीचा हट्ट असा की त्याना मिळालेली माहिती टाकावू नाही....त्यामुळे श्री च तोडगा काढतो की त्यानी आपले रीसोर्सेस वापरून जान्हवीच्या लग्नाची खात्री करून घ्यावी.....जर ती बातमी खरी निघाली तर श्री वचन देतो की तो जान्हवीपासून कायमचा दूर राहिल....याला सारे मान्यता देतात.

२. पियू परी..... आपटे हे पात्र शक्य तितकी विघ्ने उभी करणारच यात शंका नाही. उद्याच्या एपिसोडमध्ये तो परत गोखले आजीना भेटून त्यांच्या मनात परत जान्हवीविषयी गैरसमज निर्माण करणार....नव्याने.

जान्हवीच्या आईचे पात्र काहीसे थिल्लर दाखविले असल्याने तिने आपटे भेटल्यावर त्याच्याहीपेक्षा किती सवाई जावई मला मिळाला आहे याची टिमकी ती वाजविणार होतीच....तशी ती वाजवितेच....त्यामुळे श्री ला काही धोका निर्माण होईल याची तिला जाणीव नाही.

३ दक्षिणा..... अगं सवयीनुसार एपिसोडचे सार काहीसे जास्तच झाले आहे असे दिसत्ये....पण चालवून घे ना.

४. श्रीयू....जाई.....धन्यवाद.

आजी बहुतेक गरीब श्रीमंत असं काहीतरी बोलेल असं वाटतं आणि तिला जान्हवीच्या आईची मंदिरातली वागणूकही आठवेल.

मला खूप खटकला कालचा भाग. जान्हवीविरुद्धचं मत तयार करण्यात एवढे फुटेज खर्ची पडले तर गैरसमज दूर करणेही सविस्तर दाखवायला हवे. चांगल्या व्यक्तीचे वाईट होताना बघून प्रेक्षकांना वाईट वाटत असते त्यांनाही अशाने रिलीफ मिळतो. पण हे सगळे नीट आलेच नाही. अक्षरशः तीन-चार वाक्यांत बोळवण केली. श्रीने आयांना सांगताना, बॉसने आईआजीशी बोलताना त्यांना पूर्वीचे प्रसंग आठवतात, हळूहळू उलगडा होतो हे कुठे आलेच नाही. शिवाय त्यामुळे त्या पाच आयांचे एकदम जान्हवीच्या बाजूने बोलणेही अनाकलनीय वाटले !

दोन शक्यता आहेत. एकतर लेखक-दिग्दर्शक कमी पडले किंवा चॅनलला श्री-जान्हवीचं लग्न लावण्याची घाई झाली असावी त्यामुळे ह्या सगळ्या प्रसंगांना कात्री लागली असावी.

पुढे अनिल आपटे जान्हवीच्या घरी येऊन आईला धमकी देत असताना आई त्याला श्री खरा कोण आहे हे सांगून तुमचे ते ७० हजार रुपये आत्ता घेऊन जा असे तोडीसतोड उत्तर देताना दिसते.>>>> हे बहुधा आजच्या भागात आहे....

श्री जेंव्हा जान्हवीबरोबर घरी जायला निघतो तेंव्हा रस्त्यावर काळोख असतो पण तो घरी पोहोचतो आणि दार उघडले जाते तेंव्हा एकदम दुपारसारखा प्रकाश बाहेर रस्त्यावर दिसतो.>>>>>>तेव्हा दुपारच असते. तो भाग बघताना मला पण थोडावेळ तसेच वाटले परंतु मागे दाट झाडी असल्यामुळे काळोख दिसतो. त्याचवेळी तिथे उभ्या असलेल्या बस च्या काचेवर आकाशाचे प्रतिबिंब दिसत होते.

<मला खूप खटकला कालचा भाग. जान्हवीविरुद्धचं मत तयार करण्यात एवढे फुटेज खर्ची पडले तर गैरसमज दूर करणेही सविस्तर दाखवायला हवे. चांगल्या व्यक्तीचे वाईट होताना बघून प्रेक्षकांना वाईट वाटत असते त्यांनाही अशाने रिलीफ मिळतो. पण हे सगळे नीट आलेच नाही. अक्षरशः तीन-चार वाक्यांत बोळवण केली. > +१

< त्यामुळे त्या पाच आयांचे एकदम जान्हवीच्या बाजूने बोलणेही अनाकलनीय वाटले ! >
जान्हवीशी लग्नाला संमती दिली नाही तर श्री घर सोडून जाईल अशी त्यांना भीता असावी. भागीरथीबाईंचाही ट्रॅक रेकॉर्ड आपल्या मनाविरुद्ध वागणार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवण्याचा आहे, त्यामुळे त्या पाच जणी चटकन उडी मारून या बाजूला आल्या असाव्यात.

जान्हवीचे लग्न झालेले नाही ऐकल्यावर त्यांचे समाधान झाले. मग ऑफिसात आणि घरी येऊन तमाशा करणारा तिचा सो कॉल्ड नवरा कोण हे माहीत करून घ्यावेसे त्यांना वाटले नाही. श्रीनेही जान्हवीचे लग्न एका म्हातार्‍याशी ठरले होते, आता मोडलेय हे अजिबात सांगितलेले नाही.
एकंदरित कम्युनिकेशनच्या बाबत मा पा पु चा

अनिलचे काम भारी चालू आहे. रस्ता क्रॉस करताना तो कसला उड्या मारत जातो. Lol आणि अजुन वाटतो ना तिशीच्या आतला - कसले एक्ष्सप्रेशन्स होते.

अनिलचे काम जरी भारी वाटत असले तरीही जान्हवी स्टॉपवरून गेल्यानंतर त्याने लाळघोटेपणा करत तिच्याच शेजारी बससाठी उभ्या असलेल्या महिलेची छेडछाड करण्याचा प्रसंग अतिरंजित वाटला. स्टॉपवरही पाच-सहा महिला पॅसेन्जर्स दाखविल्या आहेत....त्यामुळे आजच्या धडाडीच्या महिला युगात त्या स्त्रीने पायातील जोडा काढायला हवा होता.

अशोक मामा, ते कॅरॅक्टर वाईटच आहे पण ते अधिकाधिक ला़ळघोटेपणा करणारे, इरिटेट करणारे रंगवलेय ज्या पद्धतीने (अभिनय त्या व्यक्तिचा) ते आवडतेय.

अदिति..;)
अशोकजी, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं.. मालिका चांगली आहे, आवडते म्हणेपर्यंत असं काहीतरी विचित्र दाखवतात..श्री आणि जाह्नवीची व्यक्तिमत्वं तसंच संवाद बर्यापैकी बारकाईने आणि संयमितपणेहाताळले आहेत. त्या दोघांनी कामही छान केलं आहे.
मग अनिल आपटेच्या वेळी हे लेखक दिग्दर्शक का भान ठेऊ शकत नाहीत अस वाटत राहतं. त्या बसस्टॉप वरच्या बाईने का एक लगावली नाही त्याला? प्रत्यक्षात तिनेच काय हा प्रकार पाहोन स्टॉपवरच्या इतर लोकांनीही त्याला चांगला सुनावला असता. पाच आया आणि त्यांच्या प्रत्येकी प्रतिक्रिया ( कुणाही पात्राच्या वाक्यावर) आता डोक्यात जाऊ लागल्या आहेत. पूर्वीच्या रामानन्द सागरांच्या सीरियलींमधे असं असायचं. एखादं पात्रं म्हणायचं, " हे प्रभू, ये कैसी माया", मग कॅमेरा गरागरा फिरून पहिल्यांदा प्रभू, त्यांची अर्धांगिनी, असलीच तर एकेक करून अपत्ये, प्रभूंचे प्राणि/पक्षी जगतातील वाहन आणि दरबारातील प्रत्येकाची प्रतिक्रिया वन आफ्टर द अदर दाखवणार. एव्हढं होईस्तोवर जाहिरातींची वेळ झालेली असे.

"....दरबारातील प्रत्येकाची प्रतिक्रिया वन आफ्टर द अदर दाखवणार...."

~ योग्य निरीक्षण..... आणि नेमके हेच होसूमी मध्ये घडत आहे सध्या...विशेषतः सहा आया आणि एक नातू यांच्या संवादादरम्यान.....श्री म्हणतो आजीला..."अग आईआजी, तू असं समजू नकोस जान्हवीविषयी.." म्हटल्याक्षणीच कॅमेरा मग त्याची आई, मोठी आई, लहान आई, मावशी आणि बेबी आत्या....यांच्या ताणलेल्या चेहर्‍यांवर ढॅंण्णढँण्ण संगीताच्या साथीवर घुमतो....जणू काही भूकंपसदृष्य चेहरा झाला आहे आजींचा.

रोहिणी हट्टंगडी यांच्यासारख्या सर्वार्थाने ज्येष्ठ म्हटल्या गेलेल्या अभिनेत्रीने शूटिंग दरम्यान अधूनमधून मंदार याना चार गोष्टी सुनावल्या पाहिजेतच......[अर्थात हे होत नसेलच म्हणा.]

" हे प्रभू, ये कैसी माया", मग कॅमेरा गरागरा फिरून पहिल्यांदा प्रभू, त्यांची अर्धांगिनी, असलीच तर एकेक करून अपत्ये, प्रभूंचे प्राणि/पक्षी जगतातील वाहन आणि दरबारातील प्रत्येकाची प्रतिक्रिया वन आफ्टर द अदर दाखवणार. एव्हढं होईस्तोवर जाहिरातींची वेळ झालेली असे.>>> Rofl पर्फेक्ट आहे हे वर्णन!! Rofl

" हे प्रभू, ये कैसी माया", मग कॅमेरा गरागरा फिरून पहिल्यांदा प्रभू, त्यांची अर्धांगिनी, असलीच तर एकेक करून अपत्ये, प्रभूंचे प्राणि/पक्षी जगतातील वाहन आणि दरबारातील प्रत्येकाची प्रतिक्रिया वन आफ्टर द अदर दाखवणार. एव्हढं होईस्तोवर जाहिरातींची वेळ झालेली असे.
>>>>>>>
Rofl

त्या सहाजणी कधी आजीला मम म्हणत असतात कधी श्रीला त्यांना स्वतःची मतेच नाहीत काही.

कालचे शरयूचे एक वाक्य सॉलिड होते. " राम-कृष्ण देव आहेत. त्यांना भुका लागत नाहीत. पण आपलं तसं नाही."
असे काही काही लवंगी फटाके ते भागीरथीबाईंच्या पायात फोडत असते.

गो.गृ.उ. मध्ये काम करणार्‍या शिवदेबाईंचा त्या सायलीशी काय संबंध आहे? त्या तिला मदत (सपोर्ट) करतांना दिसल्या आहेत सुरुवातीला. आणि रो.ह. बाईंना सायली कशी आणि कुठुन मिळाली?/ भेटली ?

(मी काही भाग मिसलेत सुरुवातीचे)

त्या अनिलच कठीण आहे....म्हातारा भंजाळलाय बहुदा.....काय म्हणतो तो श्री त्याला??? ह....आठवलं..'वृद्ध मवाली....' Lol

पियु....

सायलीचे स्थळ गोखले घराण्याच्या गुरुजीनी आणलेले असते. तिचा फोटो आणि तिची अन्य माहिती सहाही स्त्रिया पाहातात आणि श्री साठी अगदी तालेवार घराणे आणले आहे म्हणून गुरुजीवर खूषही होतात. त्यांच्याकडून सायलीच्या घरी प्राथमिक होकार जातो आणि सायलीला श्री च्या ऑफिसमध्ये त्याला भेटण्यासाठी पाठवितात....ती तिथे येणार आहे आणि ती भावी सून आहे असा फोन भागीरथीबाई शिवदेमॅडमना करतात.....त्यामुळे सायली प्रथम ज्यावेळी गोखले गृह उद्योगच्या कार्यालयात येते त्यावेळी साहजिकच शिवदेमॅडम तिच्याकडे भावी मालकीण या नात्यानेच पाह्यला सुरुवात करतात.....पुढे भागीरथीबाईदेखील त्या मताची पुष्टी करत राहिल्याने सायलीला आयताच सपोर्ट मिळत गेल्याचे दाखविले आहे.

[अर्थात हेही खरे की श्री ला याबाबतीत कसलीही कल्पना दिलेली नसते. त्यामुळे तो सायलीकडे कधीच त्या नजरेने पाहात नाही.]

Pages